आज साधारण १वर्षापूर्वी माझा मावस भाऊ (वय-२४) बाइक वरुन पडून अपघाती दिवंगत झाला.असे प्रसंग अनेकांवर येतात,हे प्रसंग विसरत तर नाहीतच,पण स्वतःच्या मनाची समजुत कशी घालावी हेही कळत नाही...त्यामुळे या कवितेला सत्याचा आधार आहेच,पण त्याही पेक्षा हे अश्या प्रकारचं कटु वास्तव स्वीकारावं कसं हा प्रश्न मला छळत होता ...तो सोडवायला मला जमला की नाही?मला कळत नाही. प्रयत्न मात्र केलाय...
रस्त्यावरुन तो एकटाच गेला
आंम्हा सगळ्यांना कायमचे मागे ठेऊन
अत्यंतीक दूर जाणे ही सवय
अशी इथःपर टिकायला नको होती
व्यक्तित्व म्हणाल तर धावता वारा
मन म्हणजे खुला पिसारा
तरीही आंम्ही त्याच्या शोधात भटकतो आहे
आणी तो मात्र मुक्कामाला जाऊन पोहोचलाही
कधीही न परतता येणाय्रा
तारुण्याची धुंदी हे कारण?
की त्याला जायचच होतं हे सत्य?
आपण अर्थ कोणताही घेतला तरी
म्रुत्यू बेफिकीर आहे...आजही...हे कंसं नाकारणार?
तो नाही 'हे' सत्य मन स्वीकारत नाही
नुसतं बुद्ध्या समजुन तरी उपयोग काय?
कारण तो आता नसला तरी
त्याची साथ हवी होती ना बराच काळ?
ती ओटी,पडवी,झोपाळे ते अंगण
कुणीही आता आंम्हाला ओळख दाखवत नाही
घरंही एकट्याला आत घेत नाहीये
अता त्या वास्तुत शोधायचं तरी काय?
आणी हरवायचं तरी कंसं स्वतःला?
मग आता आपण काय करायचं?
हे सगळं टाळुन स्वतःची सोडवणूक करुन घ्यायची?
ती तर शक्यच नसते,मग चला तर
आपल्या आहे तश्या मनानी स्वीकारू हे वास्तव
होय...त्याच्या शिवाय आता जगायचंय
आंम्ही त्याच्या फक्त मागेच उरलो नाही
तर आजही त्याच्या पाठीशी आहोत
त्याच्या दिवंगततेचं सत्य स्वीकारण्यासाठी .....
जगणारे सारे मर्त्य मानव.....
पराग दिवेकर....
प्रतिक्रिया
12 Sep 2011 - 12:38 am | पाषाणभेद
जाणारा माणूस जातो ती त्याची आठवण मागे ठेवूनच.
12 Sep 2011 - 9:30 am | निनाद
मुक्तक आवडले.
हे जास्त नेमके आहे.
12 Sep 2011 - 1:16 pm | अत्रुप्त आत्मा
निनाद व पाषाणभेद... दोघासही धन्यवाद
12 Sep 2011 - 1:48 pm | आत्मशून्य
.
13 Sep 2011 - 1:09 pm | किसन शिंदे
:(