गंगाधर मुटे यांची अस्तित्त्व दान केले ही सुंदर गझल पाहिली आणि आमच्या अस्तित्त्वाची आठवण झाली.
मुटे साहेबांची क्षमा मागून...
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच बायकोने माझे लेख दान केले
मागेच विसरलेल्या एकाच आयडीने
अकाऊंट आज माझे, डुआयमान केले
हळवा नकोस होऊ, मित्र मला म्हणाले
संतप्त बायकोनी, जरी उपटून कान नेले
चंचूप्रवेश होता घरी हळुवार पावलांनी
तो वास येता, बायकोनी त्रस्त दिनमान केले
वाचाळ बायकोला वैतागलो पुरेसा
सेक्रेटरीसह जाणारै, बुक विमान केले
ठेचल्या शरिराला मी चाचपतो अजूनी
सासर्याने हाडांना माझ्या चूर्णासमान केले
भेटले ते लॉबीमध्ये, मी मूढ उभा रे!
यंदा चतुर सेक्रेटरीने भाऊ बनवून नेले
प्रतिक्रिया
10 Sep 2011 - 6:04 am | पाषाणभेद
हा हा हा
विमानाचे तिकीट सौ सह बुक केले
ऐन वेळेला मग सेक्रेटरीलाच नेले
की मग असे होणारच
10 Sep 2011 - 6:29 am | निनाद
पाहिल्या कडव्यात थिल्लरपणा वाढवण्यासाठी
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
बायकोने माझे दाढीचे सामान दान केले
हे जास्त योग्य वाटते.
10 Sep 2011 - 8:37 am | प्रकाश१११
निनाव
- हळवा नकोस होऊ, मित्र मला म्हणाले
संतप्त बायकोनी, जरी उपटून कान नेले
छान जमलीय ..!!
10 Sep 2011 - 7:51 pm | जाई.
विडंबन ऊत्तम जमलेय
12 Sep 2011 - 8:39 am | स्पंदना
__/\__
12 Sep 2011 - 10:08 am | नितिन थत्ते
अरेरे, निनाद यांनासुद्धा बायको आणि दारू याच विषयात विडंबन करताना पाहून दु:ख झाले.
12 Sep 2011 - 10:42 am | निनाद
मला हे विषय वर्ज्य असावेत असे नितिनरावांना का वाटते हे कळले नाही. दोन्हींचा माझ्याशी संबंध नाही असा गैरसमज झाला की काय आपला?
असो, (आता ...! ) येथे वेगळया विषयावरचे विडंबनही वाचायला मिळेल. आशा आहे ते आवडेल. तरीही जाणकांना कल्पना असेल की चराचरात भरूनही उरणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे बायको, त्यामुळे त्यापासून सुटका नाही!