पावसाची परी

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
9 Jul 2008 - 10:56 am

काल मिपा वर पावसाची परी नावाने नवीन सदस्य आले. काही सदस्याना मीच पावसाची परी या नावाने लिहितो आहे असा संशय येउन
त्यानी परीला काही प्रश्न विचारले.
(सखाराम गटणे या सदस्याबद्दल देखील असाच समज होता.तो काल तात्याला डॉ दाढेला गटणे प्रत्यक्ष भेटल्यावर दूर झाला)
त्या परी साठी ही कविता

परीला एका छाळीत होते
दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक
परी बिचारी घाबरली पाहुन प्रत्येक
बावरली हिरमुसली ती..
उत्तरे देउन एकेक.
मग हांक मारली तीने देवांस.
देव ही नाही आला सोडवावयास
म्हणाला मंत्र जाण परीबाळा या कलियुगाचा
मैत्री जोडावी दुष्टांसमवे
देवोनिया मिसळपाव सुस्वभावे
तोची जाण मार्ग एक
भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक

(अवांतरः प्रत्येक वेळीस माझाच संशय का यावा हा प्रश्न गहन आहे कोणीतरी पटापट उत्तर याचे सांगेल काय:)] )

फलज्योतिषसल्ला

प्रतिक्रिया

II राजे II's picture

9 Jul 2008 - 11:05 am | II राजे II (not verified)

मैत्री जोडावी दुष्टांसमवे
देवोनिया मिसळपाव सुस्वभावे
तोची जाण मार्ग एक
भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक

:D

जबरा !!!!

>प्रत्येक वेळीस माझाच संशय का यावा हा प्रश्न गहन आहे कोणीतरी पटापट उत्तर याचे सांगेल काय

अनुभव.... अनुभव असे कोणीतरी मागून ओरडत आहे हो ;)

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

आनंदयात्री's picture

9 Jul 2008 - 11:05 am | आनंदयात्री

>>सखाराम गटणे या सदस्याबद्दल देखील असाच समज होता.तो काल तात्याला डॉ दाढेला गटणे प्रत्यक्ष भेटल्यावर दूर झाला)

बर्‍याच जणांना असे वाटते की तो तुमच्या कंपनीतलाच एखादा एबॅपर असणार, सखाराम गटणे चा तोतया !

(असहमत) प्रसादलाडु

टारझन's picture

9 Jul 2008 - 11:23 am | टारझन

निबार हाणलाय ... च्यायला खविसाची आरती (आरतीच , हे नाम नव्हे) म्हणायची का काय ?
पण विजाभौंचा आटापिटा बघता .. आमच्या मनात नसलेली शंकेची पाल चुकचुकायला लागलिय..
ही (कि हा ?) परी बालगंधर्व तर नव्हे ? बाँड्गिरी करून छडा लावलाच पाहीजे ....
कॉलेज मधे पब्लिक ला आम्ही बालगंधर्व बनूनच फात __त काढलंय. तो होणारा पोपट कधीही कोणी ही विसरत नाही.

अवांतर (होय अवांतरच) : काव्य अतिशय जबराट.. मजा आ गया .. मला क्वचितच काव्य आवडते ...
वा विजाभौ वा !

सावध ) कु, खवीस


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

मदनबाण's picture

9 Jul 2008 - 11:54 am | मदनबाण

फलज्योतिष सल्ला हा लेखन विषय आणि श्रेणी ?
काय भाऊ ग्रह तारे फिरले की काय ? नाही म्हणजे प्रत्येक वेळीस माझाच संशय का यावा हा प्रश्न गहन आहे कोणीतरी पटापट उत्तर याचे सांगेल काय असे तुम्हीच विचारले आहेत म्हणुन... :)

(नावात बरचं काही असतं) असे म्हणणारा.. :)
मदनबाण

विसोबा खेचर's picture

10 Jul 2008 - 9:29 am | विसोबा खेचर

म्हणाला मंत्र जाण परीबाळा या कलियुगाचा
मैत्री जोडावी दुष्टांसमवे
देवोनिया मिसळपाव सुस्वभावे
तोची जाण मार्ग एक
भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक

छान..! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2008 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणाला मंत्र जाण परीबाळा या कलियुगाचा
मैत्री जोडावी दुष्टांसमवे
देवोनिया मिसळपाव सुस्वभावे
तोची जाण मार्ग एक
भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक

मस्त !!!

जे आपल्याला कळत नाही, एकतर समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.