एक रस्ता , आणि माणसं.
खुप माणसं, कळपासारखी. एवढ़ी माणसं असुनही रस्त्यावर फारसा गोंधळ नाही. आपापले सामान घेउन जो तो चालतोय ... फक्त चालतोय.
रस्त्याला थोडा उतार आहे , रस्ताही रुंद, मग चालणंही सोप्प झालयं. गर्दीलाही उत्साह आलाय, उतारबघुन.
काहीजण जात्याच मजबुत आहेत, मग त्यांचा वेग अजुन वाढतो ... त्यांच्या नकळत.
त्यांना समजत नाही की बाकीचे का हळू चालतायेत. स्वतःशीच हसत चालत रहातात, दुसर्यावर.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला सापाच्या आकाराचे चर... नागमोडी पण समांतर.
चर मोठे गूढ़. आतले काही दिसत नाही अन अंदाजही येत नाही.
काहींना त्या आकाराची भिती वाटतीय तर काहींना ते आहेत याचीच जाणिव नाही.
पण दोघेही त्याच्यापासुन अंतर ठेउन आहेत.
चराच्या पलीकडे मात्र गर्द दाट झाडी अन हिरवळ आहे, गर्दीला त्याची सोबतच बरी वाटतेय.
गर्दी चालत रहाते, काहींचे डोळे पेंगतायत डोळ्यावर झापड आलीय पण गर्दी त्याला थांबू देत नाही, मागून धक्के बसतात.. त्याला चालावचं लागतं.
धक्क्यानंतर तोही खोट्या उत्साहाने चालू लागतो. बाजुच्यांच्या चेहर्यावर हास्य.
अशातच एकाला धाप लागते, डोळ्यांना समोर आकाश दिसतय. श्वास घेण्यासाठी छाती तोंडापर्यंत येतेय. धडधड अचानक वाढ़ते अन... थांबते.
त्याला आता पुढे रस्ता दिसत नाही, अंधार दिसतोय. त्याचा रस्ता तिथेच संपला.
बाजुचा मोठ्या प्रेमाने त्याला उचलतो खांद्यावर घेतो आणि रस्त्याच्या कडेला ठेवतो. गर्दीतला एक त्याचे सामान घेउन पुढे होतो.
गर्दी चालत रहाते... अखंडित... अबाधित.
अचानक... मागुन एक शिळ ऐकू येते, आर्त, तरसलेली.
गर्दी घाबरते... पुन्हा एक??? या वेळी कोण आणि का?
नजर मागे,
या वेळीही तो तसाच आहे, दोन्ही हात रिकामे, झोळी रिकामी, थोडासा भांबावलेला. या वेळीही त्याची नजर काहीतरि शोधत आहे.
तोंडाने शीळ घालत त्या काळ्याकुट्ट चरापाशी एकाटाच घुटमळतो आहे.
अरे, याला दुर सारा .. काहीतरी करा.
याला भिती दाखवा, कशाचिही... गर्दीची... दानवाची... नाहीच ऐकला तर .. देवाची...
पण याला रस्त्यावर आणा.
त्याला मात्र कसलीच जाणिव नाही, तो तिथेच काहीतरि शोधतोय... नव्हे तो चुकुन इथे आलाय. तो बाहेरचा रस्ता शोधतोय.
पण गर्दीला याचा त्रास होतोय, त्यांना तो असह्य झालाय.
गर्दीतून एक पुढे होतो आणि ... आपल्या खांद्यावरच ओझं त्याच्या खांद्यावर टाकुन बाजुला होतो.
त्याची चिडचिड होते, तो वैतागतो पण तो आता हलूच शकत नाही. त्याच्याही हातात सामान आलयं.
मग तो ही रस्त्यावर येतो आणि चालू लागतो.
गर्दीच्या चेहर्यावर हास्य.
मग तो ही हसतो ... केविलवाणे...
प्रतिक्रिया
8 Jul 2008 - 6:37 pm | ऍडीजोशी (not verified)
#:S
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
8 Jul 2008 - 8:11 pm | प्राजु
एखादी गोष्ट रूपकाच्या माध्यमातून लिहायची होती का? म्हणजे ते चर.. समांतर.. वगैरे. नक्की काय सांगायचे होते ??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Jul 2008 - 10:37 am | छोट्या
चाकोरी सोडुन जर कोणी बाहेर जायचा प्रयत्न केला तर काय?
समजायला अवघड असेल तर.... माझं दुर्दैव!!! दुसरं काय?
9 Jul 2008 - 10:43 am | बेसनलाडू
माझं दुर्दैव!!! दुसरं काय?
यावरून मनात आकार घेत असलेल्या माझ्या एका गझलेतला एक शेर उधृत करण्याचा मोह येथे आवरत नाही -
दुर्दैवा,इतके नकोस विसरू बाबा स्वतःला कधी
माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी?
(शायर)बेसनलाडू
8 Jul 2008 - 8:24 pm | टारझन
छोट्या दादाने फार मोठं मोठं लिहीलयं
नासमज ) कु ख
http://picasaweb.google.com/prashants.space
8 Jul 2008 - 11:16 pm | बेसनलाडू
कविवर्य ग्रेस यांनी छंदमुक्त लिहिले असते तर कसे लिहिले असते याची चुणूक दाखवायचा हा प्रयत्न आहे काय? (ह. घ्या.)
(तिरकस)बेसनलाडू
अवांतर - हे मुक्तक नव्हे.कृपया धोंडोपंतांची मुक्तके वाचावीत;मुक्तकाची व्याख्या समजून घ्यावी.
(शास्त्रशुद्ध)बेसनलाडू
9 Jul 2008 - 10:32 am | छोट्या
याला नक्की काय म्हणतात ते माहित नाही आणि पुस्तकातल्या व्याख्या लक्ष्यात रहात नाहीत..
पुढच्या वेळी नक्की काळ्जी घेइन.
8 Jul 2008 - 11:25 pm | धनंजय
रूपककथा आवडली. गूढ लेखनशैली.
आंधळ्यांच्या राज्यात डोळस माणूस वेडा...
गतानुगतिकांच्या गर्दीत रेटले जाण्यावाचून गती नाही.
9 Jul 2008 - 2:25 am | चतुरंग
चतुरंग
9 Jul 2008 - 2:39 am | बेसनलाडू
त्या दोन प्रश्नचिह्नांचा अर्थ वॉट् द फक् किंवा/आणि वॉट् द हेल् होता ना रंगराव? कस्सं पकडलं!!!
(चावट)बेसनलाडू
9 Jul 2008 - 4:30 am | चतुरंग
चतुरंग
9 Jul 2008 - 5:47 am | अरुण मनोहर
छोट्याच्या मोठ्या ललीत लेखातल्या भावना कळल्या. माझ्या समजूतीप्रमाणे, काहीशा माझ्या पुढील लीन्क मधील लेखासारख्याच असाव्यात.......चूक भूल देणे घेणे.....
http://www.misalpav.com/node/2444
9 Jul 2008 - 10:45 am | छोट्या
शेवट सोडुन...
9 Jul 2008 - 10:04 am | Rainman
"वळु" बघताना एक जाणवलं होतं तेच तु मांड्लयस छोट्या .... थोडी चाकोरी सोडुन कुणी वागायला लागला की गर्दीला त्याच्या तोन्डावर मुस्क्या बांधाव्या वाटतात बहूदा..
चांगल लिहलयस ...
9 Jul 2008 - 10:46 am | छोट्या
You got it!!!
9 Jul 2008 - 1:56 pm | खुशालचेंडू
छोटु , कशाला त्रास देतोय गर्दीला खोलगट विचार करायला लावुन , निवांत रहा रे मेढंरानों !!! डोक्याला त्रास देतय, पण एकुणच छान लिहिलय...
तु गर्दीतला की फक्त गर्दी पाहणारा ?... :?
9 Jul 2008 - 2:12 pm | छोट्या
तु गर्दीतला की फक्त गर्दी पाहणारा ?...
माहीत नाही... कदाचित गर्दीत ओढला गेलेला असेल. :$
9 Jul 2008 - 2:06 pm | नीलकांत
मला आवडलं...
नीलकांत
9 Jul 2008 - 5:03 pm | विवेकपवार
खुपच छान .....
(Keep it up)
~ विवेक
9 Jul 2008 - 5:09 pm | अभिरत भिरभि-या
गर्दीला वळवु शकणार्या लोकांबद्दल काय ?
या लोकांनी चाकोरी बदलली तर ही नवी तर्हा वहिवाट बनते.
उ.दा. रजनीकांत
--------------
दुनिया झुकती है, बस एक झुकझुकगाडी चाहिये |
9 Jul 2008 - 6:01 pm | छोट्या
<):) <):) <):)
अशा लोकांचीच तर दुनिया आहे ... बाकीचे सगळे फक्त निमित्तमात्र आहेत.
9 Jul 2008 - 6:40 pm | मन
वा! वा!!
अप्रतिम!
नक्की कुणी लिहिलय ते सोडुन देउ एक मिनिटभर.
पण जे लिहिलय ते खुपच मस्तय्!झक्कास.......
चालु द्यात मग लिखाण आणखी.
हल्ली कार्यबाहुल्य आणि कार्यातिरेकानं जाल्-भटकंती करु शकत नसल्याबद्दल
समस्त नेट्-सुहृदांची माफी मागु इच्छित असणारा,
आपलाच,
मनोबा
10 Jul 2008 - 10:08 am | पारिजातक
ek manus aadhich mela...tyach saman gheun konitari gele..
Means:::: jenva kutumbatala konihi marato tenva tyala premane bajula karun baakiiche pudhe jatat, tyache saman (i.e. JABABDAARI) gheun konitari dusara gheto.... tyache kutumb tithech sampat nahi...... jag pudhech jat rahate.
aani shitti tar toch vajavat hota jo tya 'chara' shejari hota.... aani to kahi tyache saman shodhat navata tar to baher jayala rasta shodhat hota....swatachya marji pramane jagayala.
Pan samaj tyala baher jau det nahi.....tyala kasale na kasale Saman (jababdaari) deun tyala bandhun thevate aani to hi mag jagu lagato SARVASAMANYA pramane.
हे खर आस आहे !!!!
18 Jul 2008 - 6:31 pm | कोडगा
ह्याशिवाय समजणे आमच्या लहानगत डोक्यामधल्या सुक्ष्म बुध्दिच्या पलिकडले होते. ह्याबद्दल पारिजातकाचे आभार.
छोट्याच्या महान विचारांना आपला सलाम.....!!!!
11 Jul 2008 - 2:40 pm | अनिल हटेला
छोट्या !!!!
बाता बडी बडी !!!!
पण चालतये.......
वाचताना थोडा त्रास झाला ....
नक्कि काय चाललये ह्याचा ...
पण आपून जास्त डोक वापरत नाय.....
यु नो ?
मी गर्दीत असून नसलेला!!!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~