कधी वाटते सोडून जावे
अवतीभवतीचे हे सारे
कुठुन कशाची ओढ लागते
पुन्हा गुंततो इथे कसा रे
कधी वाटते का जाउ मी
सोडून माझे सखे सोबती
अशाच वेळी श्वास कोंडतो
विझुनी जाते जीवन ज्योती
येणे जाणे आणि थांबणे
आपुल्या हाती नाहीच काही
तोच मांडतो खेळ पसारा
तोच नकळता आवरून घेई
तरीही येथे गुंतुन जावे
आयुष्यावर प्रेम करावे
मातीत शेवटी जाणे आहे
कुठे तरी पण नाव उरावे
प्रतिक्रिया
7 Jul 2008 - 5:41 am | मिसळपाव
सुंदर काव्य आहे. फक्त शेवटून दुसरी ओळ (...मातीत शेवटी जाणे आहे.....) जरा खटकली. म्हणजे अर्थ चपखल आहे पण शब्द थोडे खटकताहेत.
"मातीशी तर अखेर नाते" जमेल का? पुष्कराज, मला कल्पना आहे की ही अगदि रावसाहेबांच्या "पी यल्, 'गच्ची'त 'ची' येत नाही काSSय शेवटी"? छाप सूचना आहे!!
7 Jul 2008 - 5:58 am | शितल
छान कविता
कधी वाटते सोडून जावे
अवतीभवतीचे हे सारे
कुठुन कशाची ओढ लागते
पुन्हा गुंततो इथे कसा रे
हे तर मस्तच.
7 Jul 2008 - 8:49 am | विसोबा खेचर
तरीही येथे गुंतुन जावे
आयुष्यावर प्रेम करावे
मातीत शेवटी जाणे आहे
कुठे तरी पण नाव उरावे
कविता चांगली आहे. पुलेशु...
तात्या.
7 Jul 2008 - 8:58 am | यशोधरा
कधी वाटते सोडून जावे
अवतीभवतीचे हे सारे
कुठुन कशाची ओढ लागते
पुन्हा गुंततो इथे कसा रे
हे खूप आवडले
7 Jul 2008 - 6:40 pm | अरुण मनोहर
सुंदर आणि अर्थपूर्ण कविता.
7 Jul 2008 - 11:58 pm | llपुण्याचे पेशवेll
कधी वाटते सोडून जावे
अवतीभवतीचे हे सारे
कुठुन कशाची ओढ लागते
पुन्हा गुंततो इथे कसा रे
हे कडवे तर खासच.
पुण्याचे पेशवे
8 Jul 2008 - 6:05 am | श्रीकृष्ण सामंत
कविता आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com