( मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं )
चाल : माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं, गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं
कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं
मुंबैच्या दर्यामंदी साचले काळं पानी
खुपते दृश्य सारं, किनारा पाहुनी
कोळंबी,बांगडा धोक्यात जीवं येतं
कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं
बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं !
नावेची सागरात, जोरात धडक होई
एमेसी चित्रा हंसा, बुडूनी त्यात जाई
'रेसक्यू ऑप्रेशन' नेहमीच फेल होतं
कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं
बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं !
फसतो कोळीराया, नियम आड येतं
वल्हवू नौका कशी, सागरी पिक जातं
पुनवेचा सण येतो, उदास मनं होतं
कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुळ गाणे -
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
दादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं, मायेची वयनी
हसत डुलत, मोत्याचं पीक येतं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी गं
सावळा बंधूराया, साजिरी वयनी बाई
गोजिरी शिरपा हंसा, माहेरी माज्या हाई
वाटेनं माहेराच्या धावत मन जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी गं
राबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी, जीवाचं लिंबलोनं
मायेला पूर येतो, पारुचं मन गातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
प्रतिक्रिया
10 Aug 2011 - 3:26 pm | प्रास
.
10 Aug 2011 - 4:00 pm | कुंदन
जहाजे बुडण्यामागे पौर्णिमा-अमावस्येला येणारी भरती/ओहोटी कारणीभुत असावी का?
10 Aug 2011 - 4:05 pm | प्रास
कॉलिंग जुजुत्सू..... ;-)