घेतली मिठीत आम्ही
मेघातली त्या वीज ती
ठाउक हे होते जरी की
आंम्हास हो जाळेल ती
जाळणे हे काम तिचे
तक्रार नाही आंम्हास हो
घेतली होती मिठीत
कौतुक त्याचे आंम्हास हो
चटका जरी बसला असा पण
हौस नव्हती भागली
फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही
वीज होती घेतली
प्रतिक्रिया
3 Jul 2008 - 8:53 pm | संदीप चित्रे
असे वीज जरी ती
मिठी हवी तिलाही
मिठीत येता फिरूनी
तगमग ती निमावी :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------
3 Jul 2008 - 10:19 pm | llपुण्याचे पेशवेll
लगे रहो पुष्कराज....
:)
पुण्याचे पेशवे
4 Jul 2008 - 8:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चटका जरी बसला असा पण
हौस नव्हती भागली
फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही
वीज होती घेतली
सुंदर !!! समज असूनही वेदनेला मिठीत घेणे नव्हे, वेदनेच्या मिठीत जाणे काही औरच असते.
आवडली कविता !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
4 Jul 2008 - 8:56 am | विसोबा खेचर
छोटेखानी परंतु सुंदर कविता!
आवडली...!
पुलेशु...
तात्या.
4 Jul 2008 - 9:20 am | सुचेल तसं
तात्यांशी एकदम सहमत.
आकाराने छोटी पण मनावर मोठा ठसा उमटवणारी कविता.
-ह्रषिकेश
http://sucheltas.blogspot.com
http://sucheltas.blogspot.com
4 Jul 2008 - 12:00 pm | कौस्तुभ
मार डाला!! ...मस्तच!