ईश्वर!!!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
1 Jul 2008 - 12:48 pm

मी माझ्या अनंत पसार्‍यात मी एकटाच बसलोय!
नेहमीप्रमांणे कृतकॄत्य न वाटता आज मन अगदी क्षुब्ध झालंय!!
राहून राहून माझी नजर त्या गोलकावर जात्येय......
तसं मी हे सर्वच विश्व जन्माला घातलं.....
पण मी अतिशय हौसेनं ज्ञन्माला घातलेला तो गोलक........
पाण्याच्या प्रभावाने टचटचीत फुगलेला तो गोलक....
त्याची किती निगराणी केली होती मी.....
किती जोपासना केली.......
वेळोवेळी काळजी घेतली घेतली, आवश्यक ती उपाययोजना केली........
अनेक आजारांतून त्याला वाचवला........
आणि अखेरीस तो अगदी परिपक्व केला....
मलाच केव्हढा अभिमान वाटला होता स्वतःचा त्यावे़ळेस........
रसरशीत आणि टचटचीत.......
सर्व योग्य परिस्थिती मी निर्माण करून ठेवली होती.......
मीच निर्माता त्याचा.....
मीच ईश्वर त्याचा......
सर्वशक्तिमान, सर्वनियंता परमेश्वर.......
आणि एके दिवशी ती जात निर्माण झाली.........
मी कौतुकाने पहात होतो.......
जात हळूहळू वाढली.......
मी पहात होतो......
हळूहळू त्या जातीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली......
मी निर्माण केलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचा उपभोग घ्यायला सुरवात केली......
पहाता पहाता त्यांचा हा उपभोग हाताबाहेर गेला.......
हावरटपणापायी त्यांनी ह्या स्त्रोतांची प्रमाणाबाहेर नासाडी करायला सुरुवात केली........
जे अगोदरच हा स्त्रोत वापरत होते त्यांनी वापरात काटकसर करायला नकार दिला.....
जे हा स्त्रोत पूर्वी वापरत नव्हते त्यांनी "हा स्त्रोत काय तुमच्या बापाचा" असं म्हणून तो स्त्रोत नव्या दमाने वापरायला सुरुवात केली.......
काही समझोता घडवून आणण्यात ते अशयस्वी ठरले........
कारण एकच.......
हाव, तृष्णा, सूडबुद्धी...........
त्यांनी त्या स्त्रोतांसाठी आपापसात लढायला सुरुवात केली......
एकमेकांना बेचिराख करायला सुरुवात केली.........
आणि या आपापसातल्या भांडणात त्यांनी मी निर्माण केलेल्या या गोलकाची विल्हेवाट लावायला सुरवात केली.......
सत्यानाश केला त्यांनी त्या स्त्रोतांचा.......
बघा, बघा त्या गोलकाकडे पुन्हा एकदा.....
एकेकाळचा तो रसरशीत परिपक्व गोलक आज कसा झाकोळून, कोमेजून गेलाय.........
तो पूर्वीचा रसरशीतपणा कधीच निघून गेलाय.......
माझीच निवड चुकली! हा गोलक आणि ही जात जगायच्याच लायकीचे नाहीत.......
माझा राग अनावर झालाय......
माझ्या अनंत पसार्‍यात हा गोलक असला काय आणि नसला काय! काहीच फरक पडत नाहीय.......
माझा राग आता पराकोटीला पोचतो.........
मी रागारागाने तो गोलक उचलतो........
आणि सर्व शक्ती एकवटून त्या आगीच्या लोळात फेकून देतो.......
गोलक आगीत आपटतो, फटकन फुटतो......
लालभडक रस सगळीकडे पसरतो.........
आगीत होरपळून मरणार्‍या त्या जातीचा दुर्गंध सगळीकडे पसरतो........
मी एका अतीव समाधानाने त्याकडे पहात रहातो........
एक विश्व समाप्त झालंय.......
एक जमात पूर्णपणे नष्ट झालीय......
मी सर्वशक्तीमान परमेश्वर.......
जगन्नियंता, सर्वशक्तिमान.........
एका जगाचा मी पूर्ण नाश घडवून आणलाय.....
पण....
पण तरीही मला समाधान वाटत नाही........
परिपूर्ण शक्तिमानतेची भावना माझ्या मनाला स्पर्शत नाहीय..........
उलट......
उलट एका अनामिक भीतीने मन झाकोळून आलंय........
का? का? का?.......

मी निर्माण केलेला, जोपासलेला हा एक गोलक......

माझ्या बागेतला एक टोमॅटो......
साल्मनेला आणि ई-कोलाय यांनी त्याचा सत्यानाश केला म्हणून रागावून मी तो नष्ट केला........

पण मनात भीती ही साचलीय की........

माझा "ईश्वर" सुद्धा "माझ्या" गोलकाविषयी असेच विचार करत असेल का?............

(निवेदनः काही दिवसांपूर्वी साल्मनेला वा इ-कोलाय या जीवाणूंनी प्रादुर्भाव केला होता म्हणून अमेरिकन फूड आनि ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने कॅलिफोर्नियात सर्वत्र टॉमॅटो विकायला बंदी केली होती. लोकांचे आरोग्य बिघडू नये म्हणून लक्षावधी टन फ्रेश टोमॅटो त्यांनी भस्मसात केले. त्या वेळेस सुचलेली ही संकल्पना......)

देशांतरप्रकटन

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

1 Jul 2008 - 12:53 pm | विजुभाऊ

श्री श्री श्री १००८डांबीस काका.
(कॅलिफोर्नियापीठाधीश)
रूपक छान आहे.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

इनोबा म्हणे's picture

1 Jul 2008 - 1:14 pm | इनोबा म्हणे

रूपक छान आहे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

1 Jul 2008 - 1:11 pm | विसोबा खेचर

आयला डांबिसा!

टोमॅटोचे रुपक वापरून जबरदस्त कविता केली आहेस! अंगावर आली ही कविता....!

साला, वाचताना क्षणभर मला तर वाटलं की मी कुणा मोठ्या विंग्रजी कवीच्या कवितेचे भाषांतर वाचतो आहे! शेचटी बघतो तर तो मोठा कवी खुद्द आमचा डांबिसकाकाच निघाला!

मनापासून अभिनंदन! खूप आवडली ही कविता....

तात्या.

प्रमोद देव's picture

1 Jul 2008 - 1:29 pm | प्रमोद देव

खरंच असे होऊही शकते. शंकररावांनी आपला तिसरा डोळा उघडला तर जग भस्मसात होते अशी कल्पना आपल्या पुराणात आहे. तेव्हा हे अगदीच अशक्य नाही वाटत. :) इथे प्रत्यक्ष शंकर वगैरे असोत नसोत.... निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप आता मर्यादेच्या बाहेर चाललेला आहे.. तेव्हा असा नैसर्गिक विस्फोट केव्हाही होऊ शकतो. धरणीकंप,त्सुनामी,वादळं ह्या सगळ्या धोक्याच्या सूचना आपल्याला वेळोवेळी मिळताहेतच.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अनिल हटेला's picture

1 Jul 2008 - 2:10 pm | अनिल हटेला

छान कविता!!
अजुन वाचायला आवडेल......

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

वरदा's picture

1 Jul 2008 - 6:43 pm | वरदा

मस्तच कविता....आवडलि आणि पटली...

खरंच असे होऊही शकते. शंकररावांनी आपला तिसरा डोळा उघडला तर जग भस्मसात होते अशी कल्पना आपल्या पुराणात आहे. तेव्हा हे अगदीच अशक्य नाही वाटत. इथे प्रत्यक्ष शंकर वगैरे असोत नसोत.... निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप आता मर्यादेच्या बाहेर चाललेला आहे.. तेव्हा असा नैसर्गिक विस्फोट केव्हाही होऊ शकतो. धरणीकंप,त्सुनामी,वादळं ह्या सगळ्या धोक्याच्या सूचना आपल्याला वेळोवेळी मिळताहेतच.


१००% सहमत...

एडिसन's picture

1 Jul 2008 - 7:10 pm | एडिसन

रूपक मस्त आहे..आणि तात्या म्हणतात त्याप्रमाणे खरोखर एखाद्या इंग्रजी कवितेचा भास होतोय..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

लई भारी....
पेले ३ वेळा आर्धा आर्धा वाच्या.. पण सगळा बोउंसर गया. नंतर मग अंत तक वाच्या तो कळ्या...
वा पिडा काका तुमने षटकार हान्या.... आमको कोइ ईक अटोमबॉम्ब दो रे...
साला त्या आमेरिका के वरच डाल के येतो. साले लै ऊड्या मारून रायलेत..

अस्सल भारतप्रेमी आणि लादेन मामांएवढांच अमेरिकेचा राग अशणारा
कुबड्या खविस

तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

बेसनलाडू's picture

2 Jul 2008 - 3:41 am | बेसनलाडू

प्रासंगिक गोलकविचार. आवडले. शेवट अधिक विचार करण्यायोग्य वाटला.
(विचारशील)बेसनलाडू

चतुरंग's picture

2 Jul 2008 - 7:44 pm | चतुरंग

टोमॅटोचं रुपक छान वापरलंय!

चतुरंग