कुणाला कुणाचे कशाला हवे

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
12 Jul 2011 - 7:56 am

कुणाला कुणाचे कशाला हवे

- - -

जळाला तळ्याचे कशाला हवे
मनाला जनाचे कशाला हवे
.
कुठे काय झाले कधी अन् कसे
कुणाला कुणाचे कशाला हवे
.
दुखवट्यामध्येही मुखवटे बरे
रडे काळजाचे कशाला हवे
.
चिता चंदनाची ढिगाने फुले
मढे माणसाचे कशाला हवे
.
प्रिया बांध रे बंध नाजूकसे
परी त्यात काचे कशाला हवे
.
मला दाखवी रूप माझे खरे
हसे आरशाचे कशाला हवे
.
धन्या फायद्याचे पहा नीटसे
लळे चाकराचे कशाला हवे
- - -

कवितागझल

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Jul 2011 - 8:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तिसरं कडवं (का शेर?) इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटलं.

धन्या हा श्लेष आवडला. कविताही आवडली.

अलख निरंजन's picture

12 Jul 2011 - 7:48 pm | अलख निरंजन

धन्या हा श्लेष आवडला.

धन्या?? काय वय ह्या धन्याचे?

ऋषिकेश's picture

12 Jul 2011 - 8:54 am | ऋषिकेश

उ त्त म!!!!!!! रचना फारच आवडली!
तिसरा आणि शेवट्चे दोन शेर अधिक आवडले.

१. मनाला जनाचे कशाला हवे की जनाला मनाचे? यातून काय सुचवायचे आहे? की फक्त अनुप्रास साधला आहे?
२. रचनेला गझल असे का वर्गीकृत केलेले नाही?

चतुरंग's picture

12 Jul 2011 - 9:36 am | चतुरंग

सुरेख गजल! धन्याशेठ, फारच छान!

-रंगा

श्रावण मोडक's picture

12 Jul 2011 - 10:13 am | श्रावण मोडक

चांगली रचना, आवडली. पुन्हा-पुन्हा वाचावीशी.
अवांतर: फुलटॉस आहे. तरीही रंगाशेठ फक्त 'सुरेख गझल'वर थांबले हे पाहून ड्वाले पाणावले... ;)

श्रावण मोडक's picture

12 Jul 2011 - 10:14 am | श्रावण मोडक

प्रकाटाआ.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jul 2011 - 2:18 pm | अत्रुप्त आत्मा

उत्तम अप्रतिम

विसुनाना's picture

12 Jul 2011 - 2:33 pm | विसुनाना

गझल आवडली.

दुखवट्यामध्येही मुखवटे बरे
रडे काळजाचे कशाला हवे
.
चिता चंदनाची ढिगाने फुले
मढे माणसाचे कशाला हवे

हे विशेष आवडले.

मला दाखवी रूप माझे खरे
हसे आरशाचे कशाला हवे

हा शेर -

दिसावे मला रूप माझे खरे
हसू आरशाचे कशाला हवे?

असाही वाचला. 'धन्या'चा श्लेष थोडा घुसवल्यासारखा वाटला.

श्रावण मोडक's picture

13 Jul 2011 - 10:48 am | श्रावण मोडक

'धन्याचा श्लेष' याविषयी सहमत.
सुचवणीही आवडली.

पल्लवी's picture

12 Jul 2011 - 3:49 pm | पल्लवी

प्रत्येक शेर स्वतंत्र आणि सुंदर.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jul 2011 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार

कविता, गझल वैग्रे प्रकार कळत नाहीत, पण हे जे काय आहे ते एकदम आवडले.

चिता चंदनाची ढिगाने फुले
मढे माणसाचे कशाला हवे

हे जबर्‍याच.

विदेश's picture

12 Jul 2011 - 6:01 pm | विदेश

काव्य आवडले .

प्रियाली's picture

12 Jul 2011 - 6:09 pm | प्रियाली

दिल बहलाने के लिये खयाल अच्छा है|

रचना आवडली. :)

सहज's picture

12 Jul 2011 - 7:17 pm | सहज

कविता स्फुराया कशाला हवे
जनाला छळाया कशाला हवे

कुठे काय झाले कधी अन् कसे
कुणाला कुणाचे कळाया हवे

डुआयड्यांमध्येही मुखवटे बरे
आयपी कळायला कशाला हवे

जाउ द्या पुरे :-)

नक्की काय म्हणायचे कळले नाही बहुदा गझल /सात लघुकविता आहेत बाकी आ.क.फा.का.क.ना. हे. मा.आ.

राजेश घासकडवी's picture

12 Jul 2011 - 7:48 pm | राजेश घासकडवी

जगात कशाने कशाला काय फरक पडतो? विशेषतः जग काय करतं त्याने मला काय फरक पडतो. असा काहीसा तिरकस प्रश्न विचारत सुरू होते. इथे कोण कोणाचा आहे? असा ऱ्हेटॉरिकल प्रश्न विचारते. मनुष्य हे बेट आहे असं सांगते. नंतरचे शेर यापासून थोडी फारकत घेतात, पण कशाला हवे चं सूत्र कायम राहातं.

गजलेच्या गुच्छातली फुलं एकाच छटेतली आहेत हे पाहून बरं वाटलं.

अलख निरंजन's picture

12 Jul 2011 - 7:48 pm | अलख निरंजन

.

गणेशा's picture

12 Jul 2011 - 8:05 pm | गणेशा

मला दाखवी रूप माझे खरे
हसे आरशाचे कशाला हवे

आवडली कविता ..हल्ली मला असेच काहीसे वाटत असते :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2011 - 10:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रत्येक दोन ओळीत स्वतंत्र कथानक आहे.
सुंदर.......!

-दिलीप बिरुटे

मला दाखवी रूप माझे खरे
हसे आरशाचे कशाला हवे

सुंदर... :)

सोनल कर्णिक वायकुळ's picture

13 Jul 2011 - 10:22 am | सोनल कर्णिक वायकुळ

कविता आवडली.

दुखवट्यामध्येही मुखवटे बरे
रडे काळजाचे कशाला हवे
.
चिता चंदनाची ढिगाने फुले
मढे माणसाचे कशाला हवे.... हे सुन्दर.

पण आशय मिश्र वाटला. काही कडवी उपहासिक आणि प्रहार करणारी पण काहि फक्त यमक जुळवणारी वाटली.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Jul 2011 - 10:30 am | llपुण्याचे पेशवेll

छान कविता धनंजयसर. :)