कवीवर्य ग.दि.मांची माफी मागून
कतरीनाचा सलमान बाई कधी अॅशचा हा सलमान
कपडे काढून दावी डोले शोले
कतरीनाचा सलमान बाई कधी अॅशचा हा सलमान
बिगबॉसच्या ह्या सिज़न साठी किती गाळे घाम॥ध्रु॥
एक एक बाई नवी , फॅन गाई गीत
एक एक लफ़डी जोडी कुणी न धरे ह्याचा हात, बिचारा हा नाथ॥1॥
कधी अॅश तर कधी कतरीना संगे, हाच होई त्यांचा दास
एक एक प्रकरणी गुंते, फ़ेस येई तोंडास, खानांचा हा खान॥2॥
चाळीशीच्या उंबरठ्यावरती एकच आहे आस
आतातरी कुणी यावे कुणी घ्यावे पास, व्हावे कुणाचातरी नाथ ॥3॥
हळूहळू उघडी डोळे पाही जो सलमान
वापरूनी सख्या गेल्या कापूनी माझी मान,कुठे म्हणे सलमान॥4॥
प्रतिक्रिया
11 Jul 2011 - 12:58 pm | पियुशा
कतरीनाचा सलमान बाई कधी अॅशचा हा सलमान
सन्गीता बिजलानी,सोमि अलि याना विसरलात का ? ;)
चाळीशीच्या उंबरठ्यावरती
केव्हाच पार झालीय त्याची ;)
11 Jul 2011 - 1:32 pm | सूड
कविवर्य गदिमांची माफी का म्हणे ?? त्यांच्या कोणत्या गाण्याचं विडंबन आहे हे ??
11 Jul 2011 - 2:09 pm | परिकथेतील राजकुमार
बहुदा माणिक वर्मा ह्यांनी गायलेल्या ह्या गाण्याचे.
11 Jul 2011 - 2:43 pm | सूड
हे होय, लक्षातच आलं नाही माझ्या. या वयात व्हायचंच असं, असो.
11 Jul 2011 - 5:38 pm | स्वप्ना_तुषार
हे गीतरामायणातील "कौसल्येचा राम बाई" या गाण्याचे विडंबन आहे.
11 Jul 2011 - 5:50 pm | सूड
कौसल्येचा राम गीतरामायणातलं आहे ?? खरंच माझी मती भ्रष्ट झालीये, मला अजूनपर्यंत ते 'देव पावला' का 'देवबाप्पा' अशा कोणत्याशा मराठी चित्रपटातलं आहे असं वाटत होतं. माहितीबद्दल आभारी आहे. :)
11 Jul 2011 - 5:57 pm | परिकथेतील राजकुमार
देव पावला :) आणि संगीतकार पु. ल.
बाकी प्रतिसादाखाली 'ग. दि. मा. यु टू ?' असे लिहिले असतेस तर प्रतिसादाचे वजन वाढले असते.
11 Jul 2011 - 6:14 pm | सूड
>>बाकी प्रतिसादाखाली 'ग. दि. मा. यु टू ?' असे लिहिले असतेस तर प्रतिसादाचे वजन वाढले असते.
प्रतिसादांचं वजन, समेवर अलगद येणं आणि प्रतिसादानं समोरच्याला गुंगवून टाकणं हे तुमच्याइतकं जमणार आहे का आम्हाला ?? असो, पुढच्या लिखाणात नक्की काळजी घेऊ. ;)
11 Jul 2011 - 10:35 pm | धन्या
एका ज्वलंत अशा प्रश्नावर भाष्य करणारे विडंबन आहे हे !!!
- धनाजीराव वाकडे