कुंभारकामाच्या समोरच सुतारकाम चालते. पण तिथेही त्यादिवशी कोणी नसल्याने तिथे मिळतील ते फोटो घेतले.
१) ही मशीन सुतारकामाची आणि विलायती लोकांनी काहीतरी बनवण्यासाठी केलेले शेप. तेथील माणसाने सांगितले की त्यांना घोडा बनवायचा होता.
२) तिथे सुतारकामासाठी लागणारे ओंडके.
३) तिथे तयार असलेली खुर्ची
५) आता जाउया साबण फॅक्टरी मध्ये. इथे कपड्याचे, अंगाचे साबण आणि फिनेल तयार करतात. इथे प्रवेश केल्यावरच साबणाचा सुगंध स्वागत करतो.
६) साबणासाठी लावणारे काही साहित्य
७) साबणाच्याही नुडल्स असतात :हाहा:
८) ह्याच त्या नुडल्स असाव्यात.
९) इथे लिक्विड सोप किंवा फिनेल बनत असेल.
१०) तिथे ह्या बाटल्या रचलेल्या होत्या लेबल लावण्यासाठी
१२) साबण बनवण्याच्या मशिन
१३) इथे काम चालु असते तर पहायला खुप छान वाटल असत.
१५) ह्याच्यातुन साबणाची पट्टी निघतोय बहुतेक.
१६) इथे साइझमध्ये वड्या कापल्या जातायत.
१७) साबणाला कव्हर घालण्याचे काम फक्त चालु होते आम्ही गेलो तेंव्हा.
१८) हे सँडल फ्लेव्हरचे साबण. मी घेतले वरचे आणि हे सँडलचे खुप छान आहे वास दोघांचाही. आणि साबणाची कॉलीटीही चांगली आहे.
पुढील भागात बापु कुटी व शेती.
प्रतिक्रिया
4 Jul 2011 - 2:23 pm | इरसाल
लई भारी,
एक अनुभव - जे लोक जास्त गाजावाजा करून साबण बनवतात त्यापेक्षा हे लोक चांगली क़्वालिति राखतात.
आमच्या गावात आंब्याच्या कोयीपासून साबण बनवतात.
4 Jul 2011 - 2:31 pm | जागु
अरे वा आंब्याच्या कोईपासुन ? मस्तच जमल्यास त्याच्या प्रोसिजरचे फोटो व माहीती टाका.
5 Jul 2011 - 9:49 pm | इरसाल
पुन्हा जेव्हा घरी जाईन त्यावेळेस ती पद्धत आणि माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करेन.
त्यात बनलेल्या साबणाचा रंग ५०१ साबण सारखा असतो आणि त्याची वडी साधारण १५ व्या फोटोत दाखवल्या प्रमाणे असते आणि ते लोक हातगाडीवर विकायला घेवून येतात जेवढा पाहिजे तेवढा कापून मोजून देतात किलोवर.
अवांतर : लहानपणी आंब्याच्या कोई जमा करून सुकवून त्यांना विकायला जात असू ४० पैसे ते ५० पैसे किलो इतका भाव मिळत असे. मग त्यात म्हणजे येणाऱ्या ३/४ रुपयात दिवाळी म्हणजे कचोरी, कांदाभजी किंवा मटका/डबा कुल्फी .