पनवेलच्या तारा गावात एका स्नेह्यांच्या पार्टीच्या निमित्ताने मागच्या महिन्यात जाण्याचा योग आला. तिथेच युसुफ मेहेरअली सेंटर व त्यांच्याच शाखेचे बोगनवेलीचे प्रदर्शन असल्याने आम्ही ते पाहण्यासाठी लवकरच निघालो. तिथे पाहण्यासारखे इतके होते की आम्हाला वेळ कमी पडला. सर्वप्रथम आम्ही युसुफ मेहेर अली सेंटरला भेट दिली.
युसुफ मेहेरअली ची सुरुवात १९६१ मध्ये झाली. सन १९६६ मध्ये भारताचे व्हाईस प्रेसीडेंट डॉ. झाकीर हुसेन यांच्या हस्ते योग्य रित्या स्थापना करण्यात आली. आपल्या राज्याची उन्नतीला हातभार लावण्यासाठी व गावकर्यांच्या समस्यांचे परिक्षण करण्यासाठी ह्या सेंटरची स्थापना करण्यात आली. अधिक माहीती गुगलवर सर्च करुन मिळेल. ह्या सेंटरमध्ये तेथिल आसपासचे गावकरी काम करतात. साबणाची फॅक्टरी, बेकरी, कुंभारकाम, सुतारकाम तेलाच्या घाणी हे मुख्य आकर्षण ठरते. येथे आयोजित व्यवसाय कला आत्मसात करण्यासाठी, पाहण्यासाठी येथे विविध संस्था, शाळा भेट देतात. शालेय कॅम्पही इथे चालु असतात.
१) युसुफ मेहेर अली सेंटरमध्ये प्रवेश केल्यावर ह्या कुट्या दिसतात. इथे बसुन नाश्तापाणी केले जाते.
४) तिथेच तिथे असणार्या सर्व विभागांची यादी आहे.
६) काही विदेशी कारागिर ह्या सेंटरमध्ये आले होते व हे असे प्लास्टीकच्या बाटल्या कापुन झाड बनवले त्यांनी. मला ते पाहुनच राग आला. त्याएवजी तिथे एखादे हिरवेगार झाड लावावे असे वाटले.
७) हे असे उपद्व्याप केले होते.
८) आता सुरुवात होते येथिल ग्रामोद्योग केंद्रांची.
९) ह्यामध्ये तिन-चार तेलाच्या घाणी/चक्की आहेत. ह्या घाणीं/चक्कींमध्ये शेंगदाणा, खोबरे, तिळ, राई, बदाम इत्यादी तेलांचे उत्पादन निघते.
१०) तेलाचे जिन्नस ह्यात भरडले जाते.
१४) ह्या मशिनमध्ये तेल गाळले जाते.
१८) तेल काढुन झाल्यावर निघालेल्या पेंडी. ह्या दुभत्या गुरांना खाण म्हणुन दिल्या जातात.
२०) ह्या कॅनमध्ये तेल साठवले आहे.
२१) ही आहेत तेलाची उत्यादने (शेंगदाणा, तिळ, मोहरी, बदाम, खोबरे..)
२३) विक्रिसाठी लेबल लावण्यासाठी ठेवलेल्या बाटल्या
पुढच्या भागात कुंभारकाम.
प्रतिक्रिया
27 Jun 2011 - 7:38 pm | प्रास
सर्व फोटो छान!
फुललेला आरग्वध (बाहावा) केव्हाही, कधीही आणि कुठेही त्याच्या नावाप्रमाणे 'राजवृक्ष' वाटतो.
पुढल्या कलामालेच्या प्रतिक्षेत.
27 Jun 2011 - 8:47 pm | इरसाल
छान जागुताई.
नवीन उपक्रमाची ओळख झाली. ह्यातील काही गोष्टी फारच ओळखीच्या वाटत आहेत.
तारा हे पनवेल पासून किती अंतरावर येते आणि कुठे ?
28 Jun 2011 - 9:03 am | सुनील
तारा हे पनवेल पासून किती अंतरावर येते आणि कुठे ?
कर्नाळा अभयारण्य. मुंबई-गोवा महामार्ग. पनवेलहून साधारणतः १६-१७ किमी.
28 Jun 2011 - 12:21 pm | इरसाल
धन्यवाद सुनिल.....
28 Jun 2011 - 11:46 am | जागु
प्रास अगदी हा बहावा म्हणजे मला लाईटींग केल्यासारखा वाटतो नेहमी.
इरसाल सुनील ह्यांनी लिहीलेलाच पत्ता.
तारा गाव, कर्नाळा ग्राम पंचायत, मुंबई-गोवा महामार्ग आणि युसुफ मेहेर अली सेंटर कोणीही सांगेल.
28 Jun 2011 - 12:59 pm | गणपा
छान.
पुढिल (कुंभार कामाच्या) भागाच्या प्रतिक्षेत.
29 Jun 2011 - 2:57 pm | sagarparadkar
धन्यवाद ....
जाता जाता: शेवटचा फोटो खाली-वर स्क्रोल करताना एक वेगळाच दृष्टीभ्रम निर्माण होतोय ... नकळत 'झूमिंग' इफेक्ट येतोय .... छान
1 Jul 2011 - 3:03 pm | पियुशा
+ १ हो हो हेच म्हनते
बाकी माहिती आणि फोटो छानच :)
1 Jul 2011 - 5:45 pm | प्राजु
मस्तच. एका नविन जागेची माहिती समजली.
एकूणच परिसर छान दिसतो आहे सगळा. :)
जागु तुझे आभार. :)