कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)
इतिहास :
कोकणस्थांचा १४ व्या शतकाच्या आधी कोकणात उल्लेख मिळत नाही. मग हे कोठून आले ? या बद्दल तीन मते आहेत.
(१) हे बर्बर देशातून जलमार्गे कोकणांत आले. ह्या प्रदेशाचा उल्लेख जुन्या ग्रंथांत मिळतो. त्यातच यांचा व परशुरामाचा संबंधही सांगितला आहे. परशुरामाला समुद्र किनारी १४ शवे मिळाली. त्याने जिवंत करून त्यांची कोकणात स्थापना केली. शवे सोडा, आसन्नमरण माणसे मिळाली; त्यांची सुश्रुषा करून त्यांना वाचवले. मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.म्हणून चित्तपावन परशुरामाचे भक्त. या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते. श्री साने, मंडलिक यांनी हे मत मांडले आहे. या उपर्या ब्राह्मणांना देशस्थ ब्राह्मण कमअस्सल का समजत हे ही कळते.
(२) दुसरे मत राजारामशास्त्री भागवतांनी मांडले आहे. त्यांचे म्हणणे ही माणसे दक्षिणेतील कर्नाटकातून कोकणात शिरली. कर्नाटकातल्या गोकर्ण महाबळेश्वर (जोगळेकर), वनवासी (बापट) वगैरे ब्राह्मण कुटुंबे तेथील देवालयांत पुजारी म्हणून अजूनही आहेत. आणखी एक पुरावा म्हणजे माणुस स्वदेश सोडून दुसरीकडे गेला तरी नवीन वस्तीस आपल्या जुन्या गावांची नावे ठेवतो. जगभर ही प्रथा आहे. कर्नाटकातील अनेक गावांची नावे कोकणातही आढळतात. मलबारात अजूनही काही गौरवर्णी जमाती आढळून येतात.
(३) तिसरे मत हे लोक मराठवाडा-विदर्भातून चवदाव्या शतकातल्या दुष्काळात तेथून निघाले व कोकणात स्थिरावले. या वेळी महाराष्ट्रात इतकी उलथापालथ झाली होती की हे सहजशक्य आहे. याला पुरावा म्हणून आंबेजोगाई येथील देवी अनेक कोकणस्थ कुटुंबांची कुलदेवता आहे याची साक्ष देतात. नाही तर शेकडो मैलांवर असलेले दैवत कुलदैवत कसे होणार ?
आणखी एक शक्यता म्हणजे उत्तर हिंदुस्थानातून गुजराथ-काथेवाड भागातून जलमार्गे हे ब्राह्मण कोकणात आले व त्यांनी तेथून येतांना परशुराम पूजा आणली. परशुरामाचा संबंध गुजराथशी ( शुर्पारक भूमी) जास्त आहे. तेव्हा परशुराम क्षेत्र तेथून कोकणात आले म्हणणे जास्त संयुक्तिक ठरते.
व्यवसाय :
मुळ वसाहत करणारे क्षितिपावन म्हणजे शेतकरी होते. ते वेदांचे अध्ययन व अध्यापन करत व इतर जातींचे पौरोहित्य करत. सतराव्या शतकात भट घराणे देशावर आले व बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा पंतप्रधान झाला. पुढे पटवर्धन, फडके, मेहेंदळे, गोखले, खाजगीवाले, रास्ते इत्यादी अनेक रणधुरंधर पुरुष नावाजले.राजकारणच नव्हे तर इतर क्षेत्रातही,वैदिक पंडित, ग्रंथकार, मुत्सद्दी, वकील, सावकार, व्यापारी वगैरेत त्यांनी शिरकाव केला. नंतर इंग्रजी काळातही रानडे, टिळक, चिपळुणकर, आगरकर, कर्वे वगैरे अनेकांनी आपली कर्तबगारी दाखवली.
देवधर्म :
प्रारंभी सर्व कोकणस्थ शैव होते. गुहागरचा वाडेश्वर, हरिहरेश्वर, कोळेश्वर, व्याघ्रेश्वर, वेळेश्वर, सोमेश्वर हे मह्त्वाचे कुलदेव. चित्पावन देवीचे उपासक नाहीत पण काहींनी जोगेश्वरी ही कुलदेवता म्हणून स्विकारली. काही जण वाडेश्वर-जोगेश्वरी, सोमेश्वर-महालक्ष्मी, महादेव-जगदंबा अशी जोडकुलदैवते मानतात. काही कुळांत विष्णूची उपासना सुरू झाली.लक्ष्मी-नारायण, केशवराज, लक्ष्मीनृसिंह, लक्ष्मीकेशव ही कुलदैवते काही घराण्यांनी स्विकारली. याशिवाय खंडोबा,भवानी, त्यंबकेश्वर, गिरमाई, वेताळ, कालभैरव,व्यंकोबा यांनाही कुलस्वामीचे स्थान मिळाले आहे. काही घराण्यात जोगवा मागण्याचे व्रत पाळले जाते. या शिवाय जाखाई, केडजाई, करंजेश्वरी, नवलाई इत्यादी ग्रामदेवता पुजणारेही सापडतात.
सण व उत्सव :
चैत्री पाडवा, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, कृष्णजन्माष्टमी, गणेशचतुर्थी, नवरात्र, होळी व रंगपंचमी हे महत्वाचे सण. गणेशाचे महत्व पेशवाईपासून वाढले कारण पेशवे गणेशभक्त होते.
शरद
प्रतिक्रिया
2 Jul 2011 - 11:27 am | भडकमकर मास्तर
जलमार्ग, विदर्भ, कर्नाटक, मराठवाडा, काठेवाड -गुजरात...
झालंच तर मध्य युरोप, ग्रीस, इटली, मध्यपूर्व .... शिवाय इस्त्रायल, वगैरेवगैरे...
अवांतर : आता राहिले काय ....
आसाम, मणिपूर, झैरे, अदिस अबाबा, , तैवान, टास्मानिया, फिजी, जलालाबाद, इस्तंबूल वगैरे वगैरे....
4 Jul 2011 - 1:48 pm | सुनील
झालंच तर मध्य युरोप, ग्रीस, इटली, मध्यपूर्व .... शिवाय इस्त्रायल, वगैरेवगैरे...
ह्यात इटली हे कोकणस्थांचे मूळ असण्याची शक्यता किती?
4 Jul 2011 - 9:06 pm | लॉरी टांगटूंगकर
सुपर लाइक
2 Jul 2011 - 11:40 am | स्पा
हॅ हॅ हॅ
नव्या वादास सुरुवात
2 Jul 2011 - 12:52 pm | स्वानन्द
धाग्याचा मजकूर तरी वादविवाद करणारा वाटत नाही.
2 Jul 2011 - 6:50 pm | मी-सौरभ
वाद नाही होणार कारण 'कोब्रा' ना वाद घलण्यापेक्षा 'डसणं' जास्त आवडते :)
----------
आम्हाला श्री कृपेकरून काम धंदे असल्याने सपक, टुकार, राजकारण आणि जातीवरून वादविवाद करणाऱ्या धाग्यांचा किरकोळ, तसेच घाऊक दरात बाजार आउटसोर्स केल्या गेलेला आहे :)
..
2 Jul 2011 - 8:26 pm | स्पा
आम्हाला श्री कृपेकरून काम धंदे असल्याने सपक, टुकार, राजकारण आणि जातीवरून वादविवाद करणाऱ्या धाग्यांचा किरकोळ, तसेच घाऊक दरात बाजार आउटसोर्स केल्या गेलेला आहे
तेच तर तुम्हा व्हाइट कलर लोकांच चुकत ना ;)
काम धंदे आहेत म्हणून... हातावर हात ठेवायचे. काम धन्द्यांच्या नावाखाली .. आपण काय करता ते देवच जाणे ;), अणि मग समाजात काही चांगल होतच नाही..
काही घडतंच नाही, म्हणत बोंबलत फिरायला मोकळे..
जिथे चूक दिसते ती तेंव्हाच ठेचायला हवी ...
असो...
अधिक काय बोलणे...
बाकी बोलणे आपण खरडीतून करूच :)
3 Jul 2011 - 2:34 pm | मी-सौरभ
ख व त च भेटू
2 Jul 2011 - 11:50 am | अमोल खरे
पुर्वी वाचले होते की चित्पावन स्पेन मध्ये गेले की तेथील स्थानिक त्यांना स्पॅनिश समजुन त्यांच्याशी स्पॅनिश मध्ये संभाषणास सुरुवात करतात. आता ह्यात तथ्य किती ते माहिती नाही. पण मी काही स्पॅनिश लोकांना पाहिले होते ज्यांचा टिपिकल चित्पावन लुक होता. कोणी मिपाकर स्पेनमध्ये गेला असेल तर जास्त सांगु शकेल.
2 Jul 2011 - 10:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काही स्पॅन्यर्ड्स भारतीय म्हणून खपून जातील असे दिसतात, काही पक्के पश्चिम/मध्य युरोपातले दिसतात. हीच गोष्ट ग्रीक, इतालियन लोकांबद्दलही म्हणता येईल. या तीनही देशांमधे काही भारतीय* मित्रमैत्रीणींना, स्थानिकांनी या भारतीयांना स्थानिक समजण्याचा अनुभव आहे. या तिन्ही देशातील लोकांची सरासरी उंची भारतीयांपेक्षा बरीच जास्त आहे.
विख्यात फ्रेंच अभिनेत्री ऑद्रे तोतू हिने आपण स्पॅनिश, इतालियन वा आफ्रिकन किंवा आशियाई वंशाची नाहीत असा स्पष्ट उल्लेख केला आहे.
*या लोकांच्या जाती-भाषेचा उल्लेख मुद्दामच टाळला आहे.
माहितीपूर्ण लेख आवडला.
4 Jul 2011 - 12:51 pm | सुधीर काळे
माझ्याशी व माझ्या सख्ख्या बहिणीशी अमेरिकेतले बरेच लोक स्पॅनिशमध्ये बोलायला सुरुवात करतात व आम्ही स्पॅनिश येत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यावर आश्चर्य दर्शवितात हे खरे आहे. तसेच अमेरिकन हॉटेल्समधील बरेच कर्मचारी मेक्सिकन असतात व तेही आधी स्पॅनिशमधून बोलतात हे आजही अनुभवाला येते.
मी पहिल्यांदा बार्सिलोनाला गेलो (१९७८) तेंव्हा मला ’घरी’ आल्यासारखे वाटले हे आजही आठवते. तिथल्या लोकांच्या चेहरेपट्टीत कोकणस्थांशी कमालीचे साम्य मला भासले.
पण बर्याच लोकांच्या मते कोकणस्थ पूर्व युरोपातील आर्मेनियाच्या आसपासच्या प्रदेशातून आले. तुर्की लोकही कोकणस्थ दिसतात व त्यांचा दही-ताक खाण्यावर असलेला भर कांहींसा त्या भागातील इतर लोकांपेक्षा वेगळा व कोंकणस्थांशी मिळता-जुळता वाटला.
लो. टिळकांच्या मते कोकणस्थ उत्तर ध्रुवीय प्रदेशातून आले तर कांहीं युरोपीय संशोधक ते ज्यू असल्याचे सांगतात.
थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा!
4 Jul 2011 - 2:02 pm | नितिन थत्ते
>>कांहीं युरोपीय संशोधक ते ज्यू असल्याचे सांगतात.
बेने इस्राएल (शनवार तेली) या रायगड जिल्ह्यात राहणार्या समाजात सुद्धा अशीच कहाणी (जहाज, प्रेते वगैरे) सांगितली जाते.
5 Jul 2011 - 10:26 am | पंगा
ज्यू लोकांत सुंता करण्याचीसुद्धा प्रथा आहे.
कोंकणस्थांत ही प्रथा नेमकी कधी (आणि का) लोप पावली असावी बरे?
(की अजूनही आहे? कल्पना नाही - पडताळून पाहण्याचा योग आलेला नाही. तशी इच्छाही नाही म्हणा!)
4 Jul 2011 - 5:07 pm | अजातशत्रु
+१
:)
4 Jul 2011 - 10:56 pm | पंगा
तुर्की लोकांचा कबाब वगैरे खाण्याकडेही भर असतो असे कळते. हे कोकणस्थांच्या नेमक्या कोणत्या प्रथेशी मिळतेजुळते असावे बरे?
हे एवढे एकच काय ते खरे असावे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
5 Jul 2011 - 6:46 am | सुधीर काळे
पंगा-जी,
"आम्ही चितपावन" या पुस्तकाच्या लेखकांपैकी एक-डॉ. जगन्नाथ दीक्षित-माझे चांगले पत्रस्नेही आहेत. पूर्वी आम्ही दोघे एका संस्थळावर बरेच लिहायचो. त्यांनी लिहिलेल्या वरील पुस्तकात त्यांनी चितपावनांच्या DNA वर खूप लिखाण केलेले आहे. (दुर्दैवाने मला ते समजले मात्र नाहीं)
मी तुर्कस्तानच्या भेटीनंतर त्यांना तुर्की लोकांच्या दही-ताकाबद्दलच्या आवडीबद्दल लिहिले असता त्यांनी तुर्की लोकांच्या आणि चितपावन लोकांच्या DNA मध्ये खूप साम्य असल्याबद्द्ल मला कळविले होते. पण ही माहिती सांगोवांगीची (hearsay) आहे!
यातून काय तो बोध घ्यावा!
5 Jul 2011 - 9:30 am | पंगा
बहुधा तथ्य नसावे, असे वाटते.
साधी गोष्ट घ्या. स्पॅन्यर्ड्ज़ जर कोंकणात - किंवा गेलाबाजार सदाशिवपेठेत - आले, तर स्थानिक लेले-नेने-सानेमंडळी त्यांना चित्पावन समजून त्यांच्याशी सानुनासिक मराठीत 'हॅ हॅ हॅ... कसें येणें केलेंत? चहां घेऊनच आलां असांल... काय? चहां घेत नाहीं तुम्हीं? उत्तम! अहों, चहां पित्तकारक, म्हणजे प्रकृतीस अपायकारक! छे छे... काँफीं आम्हीं नाहीं हो पींत! काँफीं बद्धकोष्ठकारक आणि वातकारक - तुम्हींसुद्धां कद्धी पीत जाऊं नकां बरें... असो. पुन्हां कधी आलांत(च), तर जेवूंन जा हों' अशी संभाषणास सुरुवात करतील काय?
थियरीत तथ्य असते, तर इट शुड हॅव वर्क्ड बोथ वेज़.
5 Jul 2011 - 9:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ग्रीक लोकांनी माझ्याशी ग्रीकमधून संभाषण सुरू करण्याचा अनुभव आहे. मला ग्रीक समजत नाही हे समजल्यावर इंग्लिशमधून बोलले; (इंग्लिश येत नाही हे ग्रीक बोलण्याचं कारण नव्हतं*). "मी ग्रीक दिसते काय?", असं न विचारल्यामुळे त्यांनी ग्रीकमधून संभाषण सुरू करण्याचं कारण समजलं नाही.
*बेल्जममधे असताना फ्रेंच आणि डच / फ्लामिश येत नसल्यामुळे मी मराठी बोलणं वेगळं!
... पण, सदाशिवपेठी कोब्रा लोकं भय्या आणि अण्णा लोकांशीही मराठीतूनच बोलतात असं ऐकून आहे!
तसं एका पोर्तुगीज मातृभाषिक ब्राझिलियन बाईने माझ्याशी केलेल्या संभाषणाची सुरूवात "नमस्ते"ने केली होती. मी पण मग स्पॅनिश आणि पोर्तुगीज फार वेगळे नसाव्यात या समजापायी "ओलाऽ" केलं
बाकी मूळ थिअरीबद्दल काही कल्पना नाही. शरद यांच्याकडून या लेखाप्रमाणे माहितीपूर्ण लेखनाची अपेक्षा आहेच.
वेगवेगळ्या देशांतल्या करदात्यांच्या पैशांवर किती प्रवास केला याची ही जाहिरात नव्हे.
तुर्की, ग्रीस हे देशच नव्हे तर एकूण भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांमधल्या हवेमुळे तिथे दही लागणं शक्य आहे या कारणामुळे हे लोकं दही खातात हे शक्य आहे का? आजघडीला पश्चिम युरोपात ग्रीक दही बर्यापैकी प्रसिद्ध आहे. ग्रीक शाकाहारी जेवणाची चवही आपल्या शाकाहारी जेवणाशी साधर्म्य दाखवणारी असते, याचं कारण हवा असेल काय? इंग्लंडात भेंडी,गवारी पिकत नाहीत. याचा संदर्भ मानवी गुणसूत्रांशी नसावा.
5 Jul 2011 - 10:07 am | पंगा
हो, पण याचा अर्थ ते भय्या आणि अण्णा मंडळींना कोब्रा समजतात असा घेता येऊ नये, नाही का? (कदाचित स्पेनमधील स्पॅन्यर्डांचे आणि ग्रीसमधील ग्रीकांचेही असेच काही असू शकेल काय?)
अतिअवांतर: फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दिल्लीतून जात होतो, आणि जुनी दिल्ली स्टेशनावर उतरल्यावर तेथून लाल किल्ल्याकडे जायचे होते. (अतिअतिअवांतर: लाल किल्ला बघण्यासाठी म्हणून नव्हे. तर, दिल्लीत मला जेथे जायचे होते तेथे मला नेणारी बस लाल किल्ल्यासमोरून सुटत होती म्हणून. असो.) रस्ता तसा साधारणपणे माहीत होता, पण एका चौकात पोहोचल्यावर 'आपल्याला उजवीकडे वळायचे आहे ते नेमके या चौकात की पुढल्या चौकात' अशा प्रकारचा संभ्रम मनात निर्माण झाला. म्हणून सर्वप्रथम दिसला त्या पोलिसाला हटकून रस्ता विचारला. पोलीस सरदारजी. त्याने मला समजते-न समजते याची पर्वा न करता अस्खलित पंजाबीतून पत्ता सांगितला. आणि मी 'मला पंजाबी समजत नाही, कृपया हिंदीत सांगतलेत तर बरे होईल' असे वारंवार (हिंदीतून) सुचवूनही महाशय पंजाबीची कास सोडायला तयार नव्हते.
आता या पोलिसाला मी सरदारजी आहे असे वाटण्याचे कोणतेही कारण निदान माझ्या तरी लक्षात आलेले नाही. (मी फेटा बांधत नाही, दाढी सहसा वाढवत नाही आणि त्या वेळी तर निश्चितच वाढवलेली नव्हती.) असो.
ही शक्यता पटण्यासारखी वाटते. अधोरेखिताशी विशेष सहमत.
5 Jul 2011 - 8:51 pm | आनंदयात्री
>> फेटा बांधत नाही, दाढी सहसा वाढवत नाही आणि त्या वेळी तर निश्चितच वाढवलेली नव्हती
फेटा या शब्दाएवजी पगडी हा शब्द योग्य आहे अशी आमची एक बारकी सुचवणी, बाकी चालू द्या.
5 Jul 2011 - 10:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या अतिअवांतरातला पंजाबी बोलणारा पोलिस आणि माझ्या आधीच्या प्रतिसादात लिहील्याप्रमाणे मी बेल्जममधे जाऊन मराठी बोलणं यात मला फार फरक दिसत नाही.
शक्य आहे.
फ्रेंच लोकं सर्व जगाशी फ्रेंचच बोलतात याचं कारण ते जगाला फ्रेंच भाषिक, फ्रेंच वांशिक नव्हे(!) समजतात असं आहे.
8 Jul 2011 - 9:42 pm | स्मिता.
फ्रेंच लोकं सर्व जगाशी फ्रेंचच बोलतात याचं कारण ते जगाला फ्रेंच भाषिक, फ्रेंच वांशिक नव्हे(!) समजतात असं आहे.
हे बाकी अगदी खरं. कुणीही येवून फ्रेंच तर बोलतातच (कदाचित मी फ्रेंच दिसत असेल ;)), पण आपण कितीही नम्रपणे त्यांना इंग्रजीतून बोलायची विनंती केली तरी ते बोलत नाहीत (इंग्रजी बोलता येत असेल तरी!!)
हाईट म्हणजे इंडियन स्टोअर चालवणारेही (जे बहुदा तमिळ असतात) सर्व भारतीय चेहर्यांशी संभाषणाची सुरूवात फ्रेंचमधूनच करतात असा अनुभव आहे. ढवळ्या शेजारी पवळा बांधला... असा नियम लागू व्हावा.
8 Jul 2011 - 11:49 pm | शिल्पा ब
थोडक्यात तुम्ही फ्रांस मधे असता.
9 Jul 2011 - 1:47 am | स्मिता.
मला खूप दिवसापासून एक प्रश्न आहे: तुमच्या लॅपटॉप/डेस्कटॉपच्या पडद्यातून काय फक्त लिहिणार्याच्या वास्तव्याच्या जागांचीच नावे तेवढी फिल्टर होवून दिसतात का??
9 Jul 2011 - 5:43 am | शिल्पा ब
हो.
9 Jul 2011 - 1:24 am | सूड
>>ढवळ्या शेजारी पवळा बांधला... असा नियम लागू व्हावा.
हे तुम्ही फ्रेंच मडळींमुळे तमिळी असे झाले म्हणत असाल तर मी उलट म्हणेन की फ्रेंचांना ही सवय तमिळींमुळे लागली असावी. तिकडे जाऊनही तमिळींनी मातृभाषेचा नसता टेंभा मिरवायला लागल्यावर फ्रेंच मडळींनी वेळीच सावध होऊन ही फ्रेंच बोलण्याची सवय लावून घेतली असावी.
असा माझा आपला अंदाज, बाकी चालू द्या.
9 Jul 2011 - 4:00 am | निनाद मुक्काम प...
स्मिताजी हाच अनुभव तुम्हाला जर्मनी मध्ये येईल .
युके मध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे .( येथे गुजराती आणी पंजाबी ही लोक दुसर्या महायुध्धा नंतर केनिया व इतर आफ्रिकन देशात पूर्वी मजूर म्हणू नेली होती ती इंग्रजांनी बहुसंख्य प्रमाणात यु के मध्ये आणली .स्वस्त मजूर मिळवणे हा मुख्य हेतू .ह्याच लोकांच्या समूहाने पुढे भारतीय किराणा माल व हॉटेल ह्याची मोठ्ठी साखळी युकेत निर्माण केली .लंडन मधील सौथ होल येथे पंजाबी किंवा हिंदी येत असेल तर दुकानच काय पण कुठल्याही ठिकाणी निभाऊन जाते . वेम्ली मध्ये हिंदी आणी गुजराती आले पाहिजे .
तर इस्ट लंडन मध्ये हिंदी आणी बंगाली .
पण अशी सुविधा फ्रेंच लोकांनी त्यांच्या कॉलनी असलेल्या देशांना दिली नाही .त्यामुळे फ्रांस व जर्मनी येथे कुठल्याही परप्रांतीय माणसाला तेथील भाषा यावी लागते .
सध्या अनेक निर्वासित ( आफ्रिकन व अरब देशातील ) ह्यांच्या देशात येऊन स्वस्तात काम करत आहेत .तर कुशल मजूर ( भारत ,जपान ,अमेरिका ) येथून येऊन मोठ्या पदावर आहेत .त्यामुळे स्पर्धेत व गुणवत्तेत स्थानिक युरोपियन मार खात आहेत .भरीस भर म्हणून पूर्व युरोप युरोपियन युनियन मध्ये आला आहे .त्यामुळे त्यांचे लोंढे ह्यांच्या देशातील नोकर्या पळवत आहेत .त्यामुळे आपल्या संस्कृतीवर गदा येईल व आपल्या देशात आपण परके होऊ ह्या असुरक्षित भावना त्या मागे असते .
9 Jul 2011 - 12:29 pm | स्मिता.
निनाद, तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे.
त्यामुळे आपल्या संस्कृतीवर गदा येईल व आपल्या देशात आपण परके होऊ ह्या असुरक्षित भावना त्या मागे असते.
कोणत्याही परप्रांतात गेल्यावर तिथल्या लोकांनी आपल्याशी स्थानिक भाषेत संभाषण सुरू करण्यास हे महत्त्वाचे कारण असावे. आपले राष्ट्र, भाषा याविषयीची अस्मिता जागृत ठेवण्याचा तो प्रयत्न असावा. असाच अनुभव आपल्याकडे तामिळनाडूमध्ये येतो.
यावरून सर्वच भारतीय तमिळ लोकांसारखे दिसतात असे म्हणणे धाडसाचे ठरेल. ;) ह.घ्या.
5 Jul 2011 - 10:06 am | प्रचेतस
हे ग्रीक लोक पुर्वी भारतात आलेच होते. मूळात पश्चिम आशियातील आयोनिया भागातून आलेले हे लोक. आयोनिया म्हणजेच सध्याचा ग्रीस. तिकडून आलेले लोक आयोनियन, त्यांना इथले लोक योन म्हणायला लागले झाले व परत पुढे यवन म्हणून रूपांतरण झाले. मौर्य, सातवाहनकाळातील बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर यातील बहुसंख्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, पुढे हिंदू धर्माचा प्रभाव परत वाढल्यानंतर यातीलच काही हिंदू झाले असतील व पुढे त्यांचेपण ब्राह्मणीकरण झाले असावे.
5 Jul 2011 - 10:27 am | नितिन थत्ते
चला. कुठले का होईना..... कोकणस्थ बाहेरचे (परके/उपरे वगैरे) हे कन्फर्म ना?
नाही म्हणजे उपर्यांना घालवून लावण्यासाठीचं* आंदोलन सुरू करायला हवे. ;)
.
.
.
* घालवून दिल्यावर त्यांनी स्पेन/इस्राएल/ग्रीस/तुर्कस्थान कोठेही जावे. तो आमचा प्रश्न नाही.
.
.
(स्थानिक भूमिपुत्र)
5 Jul 2011 - 10:38 am | पंगा
... हे चित्पावन, नाही का? (नसल्यास चूभूद्याघ्या.)
म्हणजे (या थियरीप्रमाणे) मूळचे यवन! मग त्यांना यवनांबद्दल नि यावनी संस्कृतीबद्दल एवढा राग का बरे असावा?
की अरबस्तानातले प्रेषितापूर्वीचे मूर्तिपूजक रहिवासीही अरबच, आजचे (मुसलमान) रहिवासीही अरबच, पण आजच्या रहिवाशांना 'त्या' अरबांच्या संस्कृतीबद्दल तिटकारा असतो, तसे काही आहे हे?
हो म्हणा, कितीही झाले तरी सावरकर म्हणजे बाटगे यवन. (बाटून हिंदू ब्राह्मण झालेले.) आणि बाटगे हे अधिक कट्टर असायचेच.
जाऊ द्या, झाले!
5 Jul 2011 - 11:21 am | प्रचेतस
मी फक्त एक उपपत्ती मांडली.
यवनांचा(ग्रीकांचा - यांना बरेच लोक गैरसमजूतीमुळे मुसलमान वा अरब मानतात. ) व चित्पावनांचा काही संबंध असेलच असेही नाही. पण यवनांनी बौद्ध/हिंदू धर्म स्वीकारला होता हे मात्र निश्चित, याचे पुरावे आजही लेण्यांमध्ये शिलालेखांच्या रूपाने बघायला मिळतात.
2 Jul 2011 - 12:25 pm | सोत्रि
होमपेज वरील संपादकांच्या नोटीशीला फाट्यावर मारणारा हा धागा का उडवू नये?
2 Jul 2011 - 12:40 pm | प्यारे१
शरद यांनी कुठलीही जिज्ञासा न दाखवता सरळ्सोट माहिती दिलेली आहे. यामध्ये भडकाऊ पणाचे काहीही आढळत नाही. समाजमानसात असलेले प्रवाद त्यांनी इथे मांडले आहेत. (हे वैयक्तिक मत आहे.)
उत्तम माहिती शरदराव.
अवांतरः ऐतिहासिक काळात आलेल्या/झालेल्या/लादल्या गेलेल्या देशीविदेशी 'संबंधां'मुळे निर्माण शारिरीक वर्णबदलाच्या शक्यतेवर आज ऐच्छिक/ स्वेच्छा म्हणून केलेल्या संबंधातून शारिरीक वर्णबदल होण्याच्या काळात चर्चा सुरु असलेली पाहून अम्मळ मौज वाटते आहे.
2 Jul 2011 - 2:28 pm | अजातशत्रु
ऐतिहासिक काळात आलेल्या/झालेल्या/लादल्या गेलेल्या देशीविदेशी 'संबंधां'मुळे निर्माण शारिरीक वर्णबदल आज ऐच्छिक/ स्वेच्छा म्हणून केलेल्या संबंधातून शारिरीक वर्णबदल होण्याच्या काळ ??
...
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
(जनरलवाले)
5 Jul 2011 - 3:54 am | शिल्पा ब
नोटीस देणारे तुम्ही कोण?
2 Jul 2011 - 2:05 pm | विसोबा खेचर
छान लेख..!
आपला,
(बहुजनसमाजवादी चित्तपावन) तात्या.
2 Jul 2011 - 2:23 pm | Nile
द्क्षिण कर्नाटकात लेले, नेने वगैरे नावे आढळतात काय? नसल्यास अशी नावे कशी आली असावीत?
.
पण ही नावे कोकणस्थांनीच ठेवली असे कशावरून ठरवता येते?
ब्राह्मणत्वच का दिले असावे?
कालांतराने बदल होण्याचे कारण काय असावे?
इतकी उलथापालथ झालीच असेल तर कोकणातून विदर्भाकडे का गेले नसतील आणि तिकडे गेलेल्यांनी सोयीने आंबेजागाई कुलदेवता का करून घेतली नसावी? कोकणात कोकणस्थांचे कीती कुलदेव्/देवता आहेत?
त्याशिवाय कालौघात, देशावरचे/विदर्भातले काही कोकणस्थ झाले नसावेत याला काही खात्रीशीर पुरावा आहे काय?
हे वाक्यवरील विधानाला छेद देतेच.
वरील प्रश्न फक्त कुतुहल म्हणून विचारलेले आहेत.
2 Jul 2011 - 2:38 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. नाईलशत्रु ह्यांना अनुमोदन.
2 Jul 2011 - 2:29 pm | खादाड
आमचे कुलदेवत कर्हाटेश्वर आणि जोगेश्वरी आहे !
2 Jul 2011 - 2:30 pm | अजातशत्रु
मला वाटले धागा पुन्हा संपादित करुन रिज्युम झाला कि काय?
2 Jul 2011 - 2:33 pm | रणजित चितळे
मला माहित नव्हती ही माहिती.
2 Jul 2011 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेखनाबद्दल आभार.....!
-दिलीप बिरुटे
2 Jul 2011 - 6:45 pm | योगप्रभू
म. श्री. दिक्षित यांच्या 'आम्ही चित्पावन' या पुस्तकात चित्पावन समाजाचा इतिहास, चालीरीती, स्वभाववैशिष्ट्ये याबाबत तपशीलवार माहिती आहे.
बाकी चालू दे...
2 Jul 2011 - 7:23 pm | तिमा
'चित्पावन -कोकणस्थ', सिर्फ नाम ही काफी है! (वाद निर्माण व्हायला, पोटात दुखायला, हार्टबर्न व्हायला)
2 Jul 2011 - 8:00 pm | रेवती
या धाग्यावर कोणताही जातीय वाद सुरु होवू नये ही इच्छा!
माहिती म्हणूनही काही लिहायची सोय ठेवली नाहिये.
2 Jul 2011 - 10:46 pm | अविनाशकुलकर्णी
मिसळपाव.कॉमवर कुठल्याही प्रकारे जातीय अथवा धार्मीक तेढ निर्माण करणारे लेखन लिहीण्यास बंदी आहे. कुणी सदस्यं जाणीवपुर्वक असे लेखन करताना आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. कुणाला असे लेखन आढळल्यास कृपया संपादकांशी संपर्क साधावा. तसेच मिसळपाव हे केवळ मराठी म्हणून एकत्र येणार्या मराठी मनाच्या लोकांसाठी आहे.ज्यांना ही मराठीपणाची चौकट मान्य नसेल त्यांना संकेतस्थळावर प्रवेश घेण्याची तसदी घेऊ नये.
============================================
असे लिहावयाचे व देशस्थ..कोकणस्थ..क~हाडे..ओ.बीसी ..दलीत..असे लेख लिहायचे हे कितपत योग्य??????????कुठली जात काहि स्वर्गातुन वा नरकातुन निर्माण झाली नाहि मग कौतुक वा द्वेश कशा साठी??...........धागा उडवणार का? का देशस्थ..त्यांचे कार्य..संत मंडळी..सामाजिक योगदान..शिवकालीन काळातिल स्वराज्य स्थापने मधिल योगदान ....असा धागा आला वा दलित समाज व आंबेडकरांचे योगदान..वा शिवाजी महाराज..मराठा समाज..व त्यांचे योगदान चालीरिति...वा फुले व त्यांना त्रास देणारा ब्राह्मण समाज व फुल्यांचे कार्य व माळी समाजाच्या चालिरिति ...असे लिहिले तर त्याचे स्वागत करणार????????????जातीय अथवा धार्मीक तेढ निर्माण करणारे वा कौतुक व उदात्तिकरण करणारे असेहि लिखाण नसावे असे वाटते...........
2 Jul 2011 - 11:22 pm | चिरोटा
अविनाश करतात धाग्याचा सत्यानाश!!
4 Jul 2011 - 5:32 pm | अजातशत्रु
श्री.अविनाशकुलकर्णी आपल्याशी सहमत आहे.
कौतुक व उदात्तिकरण करण्यास काहि हरकत नाही, पण ते करण्याच्या नादात इतरांना बालिशपणे खिजवने अत्यंत हिन आहे,
अशाच एका प्रतिसादावर मि दिलेली प्रतिक्रिया या दोन्ही ही अप्रकाशीत करण्यात आलेल्या आहेत,
संपादक मंडळाच्या या कारवायीचे मनापासून अभिनंदन,
केलेली कारवायी अत्यंत योग्य होती.अतिशय आवडले.
या लेखातून येणारी नवनविन माहीती खरेच महत्वपुर्ण आहे,
आणखी माहीतीच्या प्रतिक्षेत.
3 Jul 2011 - 12:19 am | नर्मदेतला गोटा
>>या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते.
--
हॅ हॅ हॅ
यांच्यातही अनेक लोक काळ्या रंगाचे असतात हे कशे ?
3 Jul 2011 - 7:39 am | कुळाचा_दीप
चांग्लय ... अशी मतभिन्नता असली की सतत लाइम लाइट मधे राहता येत!
4 Jul 2011 - 12:29 am | विजुभाऊ
एक इतिहास असा आहे की
परशुरामाला चिपळूण गुहागराच्या जवळ ५५ माणसे एका जहाजात आसन्नमरण अवस्थेत सापडली ( हे सर्व पुरुष होते) परशुरामाने त्याना जिवीत ठेवले ( आणून सुषृशा केली) त्यांचे चित्त पावन करून दिले.
हे लोक बहुधा पर्शिया कडील असावेत असा कयास आहे. त्या नंतर त्या लोकांचा इथल्या स्थानीक लोकांशी संकर झाला. ( संदर्भ : विश्वकोष : लक्ष्मण शास्त्री जोशी वाई)
शुर्पारक भूमी म्हणजे शूर्पारक बंदर ( सध्याचे नाला सोपारा) होय. गुजरातचा त्याच्याशी काही संबन्ध नाही.
4 Jul 2011 - 10:39 am | llपुण्याचे पेशवेll
हे लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे तर्कतीर्थ अत्रे ज्यांना नर्कतीर्थ म्हणत का?
4 Jul 2011 - 4:26 pm | शरद
आपली महिती बरोबर आहे. शूर्पारक म्हणजे सोपाराच. गुजराथमधून प्रथम जलमार्गे सोपार्याला आले असे लिहावयास पाहिजे होते.दुरुस्तीबद्दल धन्यवाद.
शरद
4 Jul 2011 - 12:24 pm | शरद
सर्वश्री. स्पा, सोकाजीराव त्रिलोकेकर, अविनाश कुलकर्णी. सप्रेम नमस्कार.
कोकणस्थ या लेखावर आपला आक्षेप वाचला. आपणास जातीय तेढ वाढवणारी कोणती वाक्ये वाटली ती कृपा करून कळवाल का ? माझा उद्देश केवळ माहितीपर लिखाण एवढाच होता. व त्याप्रमाणे पूर्वकालीन लेखकांनी दिलेली माहिती त्यांच्या नावासकट उदा. साने, मंडलिक, भागवत, दिली आहे. जर " या उपर्या ब्राह्मणांना देशस्थ ब्राह्मण कमअस्सल का समजत हे ही कळते." या वाक्यावर आपला आक्षेप असेल तर भा.संस्कृतिकोशातील पुढील उतारा बघा. ..कोकणातील ब्राह्मण समाजात पूर्वी चित्पावन हे हीन मानले जात होते. त्यांना हेर किंवा हरकारे समजत. देशस्थ ब्राह्मण त्यांना आपल्या पंगतीला घेत नसत. आता हे ऐतिहासिक सत्य मी सांगितले म्हणून जातीय तेढ कोठे वाढते ते कळत नाही. मी आणखीन असे माहितीपूर्व लेख लिहण्याचा विचार करत आहे; उदा. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. मिपावरील बर्याच वाचकांना ही माहिती असतेच असे नाही. तरी जरा वेळ काढून, संदर्भ देऊन, आपण आपले आक्षेप कळवलेत तर उपकृत होईन. आपला,
शरद
4 Jul 2011 - 12:59 pm | llपुण्याचे पेशवेll
शरदराव रागावू नका. आम्ही वाचत आहोत. बाकी बोलणार्याना जे काय बोलायचे ते बोलूदेत.
4 Jul 2011 - 1:28 pm | मेघवेडा
पुपेंना सर्वस्वी अनुमोदन. छान माहितीपूर्ण लेख.
जाता जाता : पण आमच्या आडनावाची एक दरी स्कॉटलंडमध्ये फिरता फिरता सापडली. अधिक चौकशी व थोडंफार उत्खनन केलं असता असे कळलें की आमच्या कुळाची मुळं स्कॉटिश हायलँड्स मध्येच आहेत! ही अजून एक भर! ;)
4 Jul 2011 - 1:21 pm | मृगनयनी
शरद'जी... महत्वपूर्ण माहितीबद्दल आभारी आहे.. पूर्वी कदाचित देशस्थ ब्राहमण कोब्रांना पन्गतीला बसवत नसत... परन्तु.. पेशवाईमध्ये मात्र देशस्थ आणि कोकणस्थ यांच्यात बर्यापैकी दिलजमाई झाल्याचे चित्र होते...
आणि आता तर ..एकाच घरात देशस्थ, कोकणस्थ, कर्हाडे... ब्राह्मणांच्या सगळ्या मुली/ बायका एकत्र नान्दताना दिसतात.. असो... आजकाल ब्राह्मणांच्या अरेन्ज मॅरेज मध्ये सुद्धा "सीकेपी"(चांद्रसेनीय कायस्थ प्रभू)
देखील वर्ज्य नाहीत.... तसेच कारावारी सारस्वत'देखील ब्राह्मणांमध्ये सामावू लागलेले आहेत..
डेफिनेटली, शरद'जी.. तुम्ही देत असलेली माहिती खरोखर उपयुक्त आहे.. पण कृपया आत्ताच्या घडीला, पूर्वी ब्राह्मण पोटजातींमध्ये असलेले बेबनाव जास्त फोकसमध्ये ना आणलेले चांगले!!! कारण या घडीला सगळ्या ब्राह्मणांनी पोटजातीभेद विसरून एकत्र येऊन ब्राह्मणांना बदनाम करणार्या, देवांची विटंबना करणार्या, ब्राह्मणांची सात्विक मूल्ये, तत्वे पायदळी तुडवणार्या अतिरेकी संघटनांविरुद्ध लढा देण्याची गरज आहे.. असो...( तो विषय आत्ता नको... नैतर पुन्हा सम्पादकांकडून प्र. का. टा. आ. ... व्हायचा!!! ) ;)
त्यामुळे ब्राह्मणांची- त्यांच्या पोटजातींची नावे, वैशिष्ट्ये, चालीरीती...रुढी परम्परा... इ. सांगणारे लेख आपण अवश्य लिहावेत.. आम्ही आनन्दाने वाचू!! :)
- मॅग्नेटिक मॉडेल (हाईटेड) चित्पावन मिलिन्द सोमणची आणि क्यूट फेस (हाईटेड) मॉडेल सुपर्ब चित्पावन शरद केळकरची फॅन,
नैनीशा चिनॉय!!! :) :) :)
अतिअवान्तर : मॉडेल कीर्ती गायकवाड... ही शरद केळकर'ची बायको आहे!!! :) :)
4 Jul 2011 - 7:44 pm | यशोधरा
> तसेच कारावारी सारस्वत देखील ब्राह्मणांमध्ये सामावू लागलेले आहेत..
मृगनयनी, म्हणजे काय ते समजले नाही. सारस्वत ब्राह्मण हे सरस्वती नदीच्या काठावर वास्तव्य करुन असत.
( सरस्वती तीराया यस्या ते - चुभूद्याघ्या) आणि पुढे ते इतरत्र पांगले. खूप डीटेल्स आता लिहित नाही, पण केवळ कारवारमध्येच (कर्नाटक) सारस्वत नसून काश्मीर, बंगाल, पंजाब, केरळ वगैरे इतर प्रांतातही त्यांचे वास्तव्य होते/ आहे/ असावे. सारस्वत ब्राह्मणांची वस्ती कोकणामध्येही श्रीपरशूरामांनी वसवली ते अध्यापनकर्म करण्यासाठी. पर्तगाळी ( पोर्तूगीज नव्हे ) मठामध्ये आणि इतर सारस्वत मठांमध्ये जी काही कागदपत्रे आहेत, त्यात सारस्वत समाजाचा बराच इतिहास आणि माहिती आहे. काश्मिरी पंडीत सारस्वत आहेत.
सारस्वत ब्राह्मणांचा उल्लेख वेदांमध्येही आहे. जे अद्वैत तत्वज्ञान मानतात त्यांना गौड सारस्वत ब्राह्मण म्हणतात - श्री गौडपादाचार्य ह्यांनी मांडलेले तत्वज्ञान. गौडपादाचार्य मठ हा सारस्वतांचा प्रथम मठ आणि आधी तो केळोशीला स्थापन झाला होता व नंतर कवळे (कैवल्यपूर), गोवा इथे पोर्तुगी़जांच्या अमदानीत हलवण्यात आला. आजही कवळे मठाच्या पीठाधीशांना गौडपादाचार्य ही संज्ञा आहे. तो एक प्रकारचा मान आहे, आणि त्याला पात्र असण्याइतपत पात्रता, अभ्यास त्यांना करावा लागतो. हे तुला ठाऊक आहे का?
असो. तुझे विधान अत्यंत खटकले म्हणून माहिती लिहिली.
10 Jul 2011 - 5:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>> तसेच कारावारी सारस्वत'देखील ब्राह्मणांमध्ये सामावू लागलेले आहेत..
हे विधान अज्ञानजन्य आहे. सारस्वत हे ब्राह्मणच आहेत. त्यांना ब्राह्मणात सामावून घेणे किंवा न घेणे याचा काही संबंधच येत नाही. त्यांच्यात उपनयन संस्कार असतो, जानवे घालतात, पूजा सांगतात. थोडक्यात म्हणजे ब्राह्मणांची जी जी म्हणून राखीव कुरणे आहेत तिथे सारस्वत आहेतच.
शिवाय ब्राह्मण्याचा विचार करायचा झाला तर कारवारी सारस्वतांना वेगळे काढण्याचा हेतू समजला नाही. वर यशोधरा ताई म्हणाल्याप्रमाणे सारस्वत हे भारतभर आहेत. पण त्यातही वाडकर(मराठी सारस्वत), गोवेकर, कारवारी आणि मेंगलोरी यांत बेटी व्यवहार सर्रास होत असतात. भाषा मिळत्या जुळत्या शिवाय प्रांत जवळ जवळ आहेत.
>>असो. तुझे विधान अत्यंत खटकले म्हणून माहिती लिहिली.
यशोधरा ताई, मलाही मूळ विधान खटकले. तुम्ही छान माहिती दिली आहे.
17 Jul 2011 - 7:51 pm | मृगनयनी
यशोधरा ताई आणि विश्वनाथजी,
सारस्वतांना कमी लेखण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच होता.. की आजकाल सारस्वतदेखील देशस्थ - ऋग्वेदी यजुर्वेदी , कर्हाडे या ब्राह्मणांमध्ये सामावू लागलेले आहेत. पूर्वी सारस्वत आणि कोकणस्थ यांच्यातील काही रुढी-साधर्म्यामुळे यांच्यात रोटी-बेटी व्यवहार केले जायचे. काही सारस्वत हे नॉनव्हेज खात असल्यामुळे देशावरचे काही कट्टरपन्थीय ब्राह्मण पूर्वी त्यांच्याशी नाते जोडण्यास तयार नसत. लग्नकार्यातल्या, जीवनमानातल्या सारस्वतांच्या काही पद्धती नॉर्मल महाराष्ट्रीयन ( देशस्थ) ब्राह्मणांपेक्षा वेगळ्या आहेत.... त्यांचे काही पदार्थ वेगळे आहेत... भाषेचा लहेजा वेगळा आहे.. त्यामुळे महाराष्ट्रातील घाटावरच्या ब्राह्मणांना ते आपल्यापेक्षा कुणीतरी वेगळे वाटायचे. तीच गोष्ट सारस्वतांना घाटावरच्या लोकांबाबतीत वाटायची. इतकेच कशाला पण आजही काही "मराठी मॅट्रीमोनी"वरती देखील देशस्थ मुलामुलींच्या प्रेफरेबल कास्ट्स- या ब्राह्मण- देशस्थ, कोब्रा, कर्हाडे इथपर्यन्तच सीमित असतात. पण आता ग्लोबलायझेशनमुळे म्हणा... किन्वा इतर काही कारणांमुळे यात बदल होत आहे...
अर्थात सारस्वतांचे महत्व आणि कार्य हे जगन्मान्यच आहे.. त्यामुळे कृपया गैरसमज करुन घेऊ नये. :)
- मृगनयनी
18 Jul 2011 - 6:07 am | योगप्रभू
मृगनयनी,
ब्राह्मण जातीचा इतिहास बारकाईने अभ्यासल्यास देशस्थांचा सारस्वतांशी तितकासा संबंध आलेला नाही. शिवकाळात तर देशस्थांचा चित्पावनांशीही संबंध आलेला नव्हता. शिवाजी महाराजांच्या राज्यात देशस्थ ब्राह्मणांबरोबर चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) ही जात फडाच्या कामात मदत करत असे. प्रत्येक गडावर नेमलेला कारखानीस हा सीकेपी असे (म्हणूनच कारखानीस हे नाव आजही त्यांच्यात आढळते)
देशस्थ ब्राह्मणांचे संघर्ष वेगळे झालेले आहेत. देश म्हणजे पार कर्नाटकापासून ते विदर्भापर्यंतचा मोठा पट्टा. देशस्थ ब्राह्मणांत प्रथम वैष्णव-शैव, नंतर ऋग्वेदी-यजुर्वेदी असे भेद होते. शाकाहाराच्या मुद्यावरुन देशस्थ ब्राह्मणांचा संघर्ष दैवज्ञ ब्राह्मणांशी झाला. दैवज्ञ म्हणजे सोनार (संत नरहरी हा ब्राह्मण होता, परंतु पेशा सोनाराचा पत्करला होता) आता इथे गंमत बघा. खुद्द सोनारांच्यातच मांसाहार करणारे आणि सात्विक असे दोन भेद होते. यातील सात्विक सोनार लोक चालीरीती/ रोटीबेटी याबाबत देशस्थांशी संबंध राखून होते पण मांसाशन करणार्यांना 'खतावळे' (खाणारे) म्हणून संभावना करुन दूर ठेवत होते. कोकणपट्टीत राहणारे सारस्वत कुठेही या चित्रात नव्हते.
कोकणात चित्पावन, कर्हाडे, देवरुखे व सारस्वत अशा चार ब्राह्मण पोटजाती होत्या (आधी आठ होत्या, पण चार जातींचा विलय झाला किंवा त्या नष्ट झाल्या). यातील चित्पावन ही प्रबळ जात. जे देशावर घडले तेच कोकणात घडले. चित्पावनांनी आजवर कर्हाडे, देवरुखे व नंतर देशस्थ या शाकाहारी ब्राह्मणांशीही कायम अंतर राखून व्यवहार केले आहेत तिथे मांस-मासे खाणार्या सारस्वतांशी ते रोटी-बेटी संबंध कसे करतील?
गौड सारस्वत तरी एक होते का? त्यांच्यातही चित्रापूर सारस्वत, राजापूर सारस्वत व कुडाळदेशकर सारस्वत असे भेद आहेतच. प्रत्येक गटाचे स्वामी व मठ निराळे. हा सारस्वत समाज कर्नाटक (कारवार), गोवा व कोकणात पसरला होता. शाहूच्या काळात चित्पावनांनी कोकण सोडून देशाची वाट धरली तेव्हा सारस्वत शहाणपणाने साहेबाच्या राजधानीकडे मुंबईकडे सरकले आणि मग मुंबई व आसपासच्या भागात स्थिरावले. इकडे चित्पावन देशावर येताच त्यांचा संघर्ष आधीपासून राहात असलेल्या देशस्थांशी सुरु झाला.
हे सूक्ष्म भेद समजून घेतल्यास देशस्थांचा सारस्वतांशी द्वेष करण्याइतका संबंध कधीच आलेला नाही. देशस्थांचा दैवज्ञ व चित्पावन वगळता कर्हाडे व देवरुखे ब्राह्मणांशीही तितकासा खटका उडलेला नाही.
(मॅट्रिमोनीबाबत बोलायचे झाले तर प्रत्येकजण आधी स्वतःच्या पोटजातीला महत्त्व देतो. चित्पावन स्थळांच्या जाहिरातींतही पहिली अपेक्षा 'प्राधान्याने चित्पावन' व नंतर कर्हाडे, देशस्थही चालतील, अशीच असते. खरे तर सर्वांनीच आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. तेही कालौघात घडेल. काळ आणि नव्या पिढ्या सामाजिक बदल घडवत असतात आणि ते स्वागतार्ह असते.)
31 Jul 2011 - 7:22 pm | मृगनयनी
महत्वपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद!... योगप्रभू'जी ... :)
4 Jul 2011 - 9:18 pm | अप्पा जोगळेकर
शरद यांचा लेख माहितीपूर्ण आहे. कुठेच जातीय विद्वेष पसरवणारे लिखाण आहे असे वाटले नाही.
कारण या घडीला सगळ्या ब्राह्मणांनी पोटजातीभेद विसरून एकत्र येऊन ब्राह्मणांना बदनाम करणार्या, देवांची विटंबना करणार्या, ब्राह्मणांची सात्विक मूल्ये, तत्वे पायदळी तुडवणार्या अतिरेकी संघटनांविरुद्ध लढा देण्याची गरज आहे
ब्राम्हणांची सात्विक मूल्ये कोणती ?
सगळ्या ब्राम्हणांनी एकत्र यावे याचा अर्थ काय ? कारण कोणत्यातरी विशिष्ट समाजाने एकत्र यावे या प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ इतर कोणत्यातरी घटकांना बाजूला काढावे असा अप्रत्यक्षपणे होतो.
वरील क्वेरीमध्ये कोणताच उपरोध नाही पण विचारण्याचे कारण हे की गेल्या काही महिन्यांपासून वारंवार हा सूर कानावर पडतो आहे. मिपावर आणि बाहेर सगळीकडे जरा जास्तच. विशेषतः पुणे शहरामध्ये जातीय विद्वेषाचे प्रमाण फारच जास्त आहे असे जाणवले याकरता वरील मुद्दा उपस्थित करत आहे.
9 Jul 2011 - 6:34 pm | सोत्रि
शरदजी,
आपल्या धाग्यावर अजिबात आक्षेप नाही आणि नव्हताही. आपला लेख माहितीपुर्ण आहे, बहुतांशी प्रतिक्रिया ही हेच दर्शवितात.
'आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कार्टे' असे इतर लेखांबाबत होउ नये येवढेच मत मांडण्याचा एक प्रयत्न होता.
असो, अजुनही असहमती असल्यास व्यनीतुन संवाद साधुयात. :)
- (प्रतिगामी) सोकाजी
4 Jul 2011 - 12:26 pm | नीधप
मूळ लेखात तरी वादोत्पादक काही दिसत नाहीये. निव्वळ माहिती जी दुसर्या कोणाला न दुखावता दिलेली असेल तर वाद होण्याची गरज नाही.
म. श्री. दिक्षितांचं 'आम्ही चित्तपावन' हे चित्पावनांच्यासंदर्भाने केल्या गेलेल्या विविध अभ्यासपूर्ण लेखांचं संकलन आहे. जे मानववंशशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे. इरावतीबाईंचा (इरावती कर्वे) चितपावनांवरचा अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख पण आहे त्यात. संपूर्णपणे मानववंशशास्त्राच्या अंगाने लिहिलेला आहे.
जातीभेद, श्रेष्ठ-कनिष्ठ अश्या प्रकारची कुठलीही टीप्पणी त्यात नाही. केवळ सोप्या भाषेत पण अभ्यासपूर्ण अशी माहिती आहे.
तसेच जगन्नाथ दिक्षित, अजिता जोशी आणि रघुनंदन दिक्षित यांचे 'चित्पावनिझम' हे पुस्तक पण इंटरेस्टींग आहे. अगदी डि एन ए मॅपिंगपासून अनेक गोष्टींचा यात विचार केलेला आहे.
जरूर वाचावे.
5 Jul 2011 - 6:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नी, इरावतीबाईंचा लेख कसा मिळेल/प्रकाशक किंवा इतर आणखी माहिती?
5 Jul 2011 - 11:11 am | नीधप
अगं त्याच पुस्तकात ('आम्ही चित्तपावन' ) मधे आहे.
4 Jul 2011 - 12:28 pm | नीधप
जातींच्या संदर्भातील माहितीपूर्ण लिखाण हे जातीय तेढ वाढवणारेच असते असे नाही.
उदाहरणार्थः त्र्यिंबक नारायण आत्रे यांचे 'गावगाडा'
4 Jul 2011 - 1:38 pm | सुनील
जातींच्या संदर्भातील माहितीपूर्ण लिखाण हे जातीय तेढ वाढवणारेच असते असे नाही.
उदाहरणार्थः त्र्यिंबक नारायण आत्रे यांचे 'गावगाडा'
सहमत!
तरीही, गावगाडा हे पुस्तक १९१५ साली प्रथम प्रकाशित झाले ह्याचे भान पदोपदी ठेवावे लागते!
(मूळातील अवांतराला हे अतिअवांतर - गावगाडा वाचताना श्री. आत्रे ह्यांच्या मनात कुठेतरी महार आणि गुरव आदि ब्राह्मणेतर उपाध्ये ह्यांच्याबद्दल किंचित राग्/अढी असल्याचे मला तरी जाणवते. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे!)
बाकी, शरदराव, असेच अजून माहितीपूर्ण लेख येउद्यात.
4 Jul 2011 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार
'मिपाच्या स्थापनेत व उत्कर्षात ब्राह्मणांचा सहभाग व त्यांचे योगदान' अशा लेखाची आतुरतेने वाट पहात आहे.
पराजी ब्रिगेड
4 Jul 2011 - 2:30 pm | llपुण्याचे पेशवेll
मध्यंतरी रूपकुंड या हिमालयातील एका गोठलेल्या कुंडामधे केलेल्या संशोधनामधे जेवढे डीएनए सँपल जमवले होते ते सगळे कोकणस्थांशी मिळते जुळते होते असा संशोधनांती आलेला निष्कर्ष वाचल्याचे स्मरते. (मी कॉलेजमधे असताना). त्यापुढे जाऊन हे सगळे लोक महाराष्ट्रातून गेले असण्याची शक्यता गडद करणारे पुरावेही सापडले होते(उदा. कोल्हापुरी चप्पल जिचा तळ झिजून झिजून खालून भोक पडले होते. लाखेच्या बांगड्या, ज्या मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशात अजूनही उत्पादीत होतात व पूर्वीपासून मप्र त्या साठी प्रसिद्ध आहे म्हणजे सदर मृतांचा समूह महाराष्ट्रातूनच चालत यात्रेसाठी हिमालयात गेला असावा असे त्यातून दिसते.) सदर अवशेषांचे कालमापन शास्त्रीय पद्धतीने केले असता ते ८व्या शतकातले असल्याचे सिद्ध झाले होते. याचा अर्थ कोकणस्थ ८व्या शतकापासून महाराष्ट्रात किंवा त्याच्याही दक्षिण भागात वास्तव्य करीत असावेत असा होतो.
यूट्यूब नॅटजिओ ने केलेल्या या संशोधनाची व्हीडीओ क्लिप मिळू शकते.
4 Jul 2011 - 4:45 pm | योगप्रभू
माझ्या वाचनात अकराव्या शतकात चित्पावन ब्राह्मणांचा नामोल्लेख असलेली नोंद आली आहे.
सिंघण राजवटीत दंडनायक असलेला बिचा उर्फ बिचण हा कॄष्णकाली यादवांचा मंत्री होता. (कृष्ण उर्फ कन्हर हा शके ११६९ म्हणजेच इ. स. १२४७ मध्ये राजा झाला) तर या बिचणाचा मोठा भाऊ मल्ल उर्फ मल्लीशेटी हा अमात्य व कुहुंडी देशाचा सर्वाधिकारी असून तो रायचुरापाशी मुद्गल येथे राहात होता. त्याने कृष्ण राजाच्या अनुज्ञेने बागेवाडी गावाच्या जमिनी भिन्न गोत्रांच्या ३२ ब्राह्मणांना दान केल्या. त्यात पटवर्धन व घैसास हे चित्पावन ब्राह्मण, घळसासी व पाठक हे देशस्थ ब्राह्मण व त्रिवेदी हे गुजराथी ब्राह्मण यांची आडनावे आहेत.
>(संदर्भ : मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड पहिला, लेखक व प्रकाशक - वासुदेव कृष्ण भावे, पुणे, १९४६, पॄष्ठ क्रमांक १३०)
अवांतर व गंमतीखातर - तळ झिजून झिजून खालून भोक पडलेली कोल्हापुरी चप्पल हिमालयात घालून जाणारे लोक नक्कीच कोकणस्थच असणार. शिवाय लाखेच्या बांगड्या म्हणजे सगळ्यात स्वस्त दागिना म्हणजे शंकाच नको. त्या काळात रबरी स्लीपर आणि प्लॅस्टिकच्या बांगड्या वापरात नव्हत्या, हे दुर्दैवच :))
-कृपया ह. घ्यावे. असे चिमटे आम्ही परस्परांना गेली २०० वर्षे काढत आहोत.
4 Jul 2011 - 7:59 pm | शरद
आपले संदर्भ मीही वाचले आहेत. बागेवाडी जर रायचूरजवळ असेल तर " कोकणात उल्लेख सापडत नाही " याला बाध येत नाही. महानुभवी साहित्यात जर कोकणस्थ ब्राह्मणांचा उल्लेख सापडला तर तो या आधीचा म्हणावा लागेल. कोणी शोधेल का ?
शरद
4 Jul 2011 - 11:50 pm | योगप्रभू
<<महानुभवी साहित्यात जर कोकणस्थ ब्राह्मणांचा उल्लेख सापडला तर तो या आधीचा म्हणावा लागेल.>>
शरदजी,
वर उल्लेखलेला यादवराजा कृष्ण उर्फ कन्हेरदेव व महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर यांची भेट लोणार येथे झाल्याचा उल्लेख लीळाचरित्रात आहे. कृष्णाचा मृत्यू शके ११८२ (इ.स. १२६०) मध्ये झाला. याचाच अर्थ कृष्ण व चक्रधर यांची भेट इ.स. १२६० पूर्वी झाली असणार. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर व पहिला संघटक नागदेवाचार्य यांच्या नावावर स्वतःची अशी ग्रंथरचना नाही. या पंथाचे पहिले साहित्य मानले जाणार्या लीळाचरित्राची रचना महिंद्रव्यासाने (म्हाईंभट) इ.स. १२७८ मध्ये केली. याचाच अर्थ बागेवाडीच्या दानाची नोंद ही महानुभावी साहित्याच्या खूप पूर्वीची ठरते.
बागेवाडी नक्की कुठे आहे, हे नाही सांगता येणार. बहुधा कर्नाटकात असावे. (कर्नाटकातील कल्याणचा कलचुरी राजा विज्जल याचा प्रधान म्हणजे लिंगायत पंथाचे संस्थापक बसवेश्वर. तर या बसवेश्वरांचे वडील मादिराज हे कलादगीजवळील बागेवाडी येथे राहात असत, असा उल्लेख आहे.) तसे पाहता गेल्या ८०० वर्षांत अनेक गावे नष्ट झाली अथवा त्यांची नावे बदलली आहेत. समाज विस्थापितही झाला आहे. पटवर्धन किंवा घैसास कुलवृत्तांतामध्ये शोध घेतल्यास पडताळून पाहता येईल, परंतु त्यासाठी हा कुलवृत्तांत अकराव्या शतकापर्यंत मागे जायला हवा.
कोकणावर मौर्य, सातवाहन, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव अशा अनेक राजघराण्यांची सत्ता राहिली आहे. त्यांच्या शिलालेख/दानपत्रात चित्पावनांचा उल्लेख सापडू शकेल. पण अडचण अशी आहे, की अकराव्या शतकापर्यंत आडनावांची पद्धत नव्हती असे दिसते.
अवांतर - यादवांचा मंत्री हेमाद्रि उर्फ हेमाडपंत (काळ अंदाजे इ.स. १२५० ते १३१०) हा कर्हाडे ब्राह्मण. त्याहीपूर्वी महानुभाव पंथातील पंचकृष्णांत समावेश असलेले चक्रपाणी राऊळ (चांगदेव राऊळ) हे सिद्ध पुरुष ( जन्म इ.स. ११२१) हेही कर्हाडे ब्राह्मण. याचाच अर्थ कर्हाडे ब्राह्मणांच्या नोंदी चित्पावनांपेक्षा आधीच्या सापडतात.
5 Jul 2011 - 12:00 pm | विसुनाना
घळसासी आणि बागेवाडीकर उपाख्य (आडनावाची) कुटुंबे जवळच्या ओळखीत आहेत.
बागेवाडी 'बेळगावसह झालाच पाहिजे' अशा संयुक्त महाराष्ट्रात मोडते.पण सध्या (आणि कदाचित कायमची) कर्नाटकात आहे. इथे पहा.
5 Jul 2011 - 4:09 am | निनाद मुक्काम प...
चांगला लेख आहे .
शरदजी आपणास एक विनंती आहे .
माझ्या वाचनात आले होते की'' शक हूण ह्या रशियन वोल्गा नदीच्या किनारी राहणाऱ्या दोन जमाती जगभरात स्थायिक होण्यासाठी धडपडत होत्या'' .
भारतात सुद्धा ह्या जमतीने खूप आक्रमण केलीत .पण विक्रमादित्याच्या नंतर मात्र ते भारतात येऊन उत्तर भागात स्थायिक झाले तर काही युरोपात गेले .त्यांच्याबाबतीत काही माहिती मिळू शकते का ?
निळे डोळे व सोनेरी केस असलेली लोक अफगाण लोकांमध्ये किंवा पाकिस्तानमधील काही भागात सर्सास आढळतात .( कपूर ,रोषण ही काही परिचित नावे )
आपल्या पंजाब मध्ये सुद्धा निळे डोळे अनेकात दिसून येतात .
5 Jul 2011 - 6:19 pm | प्रियाली
चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला. :)
5 Jul 2011 - 6:44 pm | धमाल मुलगा
चार आणे व्यवहारातून हद्दपार झाले आहेत.
सबब किमान आठ आण्याची कोंबडी आणा.
5 Jul 2011 - 9:24 pm | इरसाल
यो बब्बो,
आठ्ण्यात दोन कोंबड्या येतील कि वो .
आठाणे कि २ कोंबडी डेढ का मसाला चालेंगा क्या ?
9 Jul 2011 - 10:07 am | रमेश आठवले
हे विधान बरोबर आहे का ?
सर्व चित्त्पावन हे कोकणस्थ ब्राम्हण आहेत पण सर्वच कोकणस्थ ब्राह्मण हे चित्तपावन असतात असे नाही.
9 Jul 2011 - 10:09 am | रमेश आठवले
हे विधान बरोबर आहे का ?
सर्व चित्त्पावन हे कोकणस्थ ब्राम्हण आहेत पण सर्वच कोकणस्थ ब्राह्मण हे चित्तपावन असतात असे नाही.
9 Jul 2011 - 11:54 am | नितिन थत्ते
>> पण सर्वच कोकणस्थ ब्राह्मण हे चित्तपावन असतात असे नाही.
चित्तपावन शब्दावर (ज्याचे मन पवित्र आहे असा) श्लेष असेल तर हे विधान कोणत्याही जातीबाबत बरोबर असेल.
11 Jul 2011 - 3:48 pm | धिन्गाना
मागे एकदा अरविन्द गोखले तसेच गौरि देशपान्डे(चु. भु. द्या.घ्या.) ह्यानि "इराणि लोक मुस्लिम आक्रमणानन्तर ईराण मधुन पळाले, ज्याना आपण सध्या पारसि म्हणतो ते ,कोकणच्या किनार्याला लागले आणि त्यान्चा स्थानिक जनतेशि सम्बन्ध येउन कोकणस्थ हि जमात जन्माला आलि" असे वाचले होतें. निळसर डोळे,गोरा रन्ग, विरळ केस हा सारखेपणा.