युसुफ मेहेर अली सेंटर, तारा-पनवेल (भाग २ - कुंभारकाम)

जागु's picture
जागु in कलादालन
30 Jun 2011 - 4:09 pm

मागच्या भागात आपण सेंटरचा दर्शनी भाग व तेलाची फॅक्टरी पाहीली आता आपण वळुया येथिल कुंभारकामाकडे.

१) आपल्या स्वागतासाठी हा फलक.

मी ह्याच्या आत शिरले आणि वेड्यासारखे फोटो काढायला लागले. कुढला काढू आणि कुढला नको अस मला झाल. त्यादिवशी सुट्टी असल्याने मला कुंभारकामाच प्रात्यक्षिक पाहायला मिळाल नाही.

२) कुंभारकामासाठी कर्नाटकातुन माती आणली जाते. ती भिजवुन मुरवावी लागते.

३) कुंभाराचे आधुनिक चाक (इलेक्ट्रिक)

४) रॅकमध्ये ह्या मातीच्या वस्तु रचल्या होत्या.

५) मुखवटे

६) गणपती बाप्पा मोरया.

७) पेन, चमचा स्टँड

८) दिव्यांचे स्टँड

९) हे पहा किती सुंदर आहे.

१०) हा अजुन मुखवटा

११) वाडगे

१२) हे आहेत जादुचे दिवे. ह्या दिव्यामध्ये खाली तेल भरुन उलटा करतात व वात लाउन पेटवातात पण परत सरळ ठेवल्यावर तेल गळत नाही.

१३) गांधीजी, पिगिबँक, घंटी व फुलदाणी

१४) फुलदाणीची सुंदर कलाकुसर. रंग दिल्यावर किती छान दिसेल !

१५) इथे थोडा रंग दिसला. छत्री, घर, मातीची परडी ? पहिलांदाच पाहीली, फुलदाणी

१६) मला ही छोटुशी मडकुली जास्त आवडली.

१७) फुलदाण्या

१८) चेहरे पे चेहरा

१९) अजुन काही वस्तु

क्रमश.. पुढील भागात सुतारकाम, साबण कारखाना

संस्कृती

प्रतिक्रिया

सुनील's picture

30 Jun 2011 - 4:16 pm | सुनील

छान माहिती.

तिथे प्रत्यक्ष मातीत हात घालून तुम्हाला तुमच्या कुंभारकामाची हौसदेखिल भागवता येते!

सहज's picture

30 Jun 2011 - 4:25 pm | सहज

छान माहीती. साधारण किती वेळ लागतो हे सगळे बघायला? तिकीट आहे का?

अहो सुनीलराव 'घोस्ट' (आठवा डेमी मूर, पॅट्रीक स्वेझी) सिनेमा पाहुन कुंभारकामाची हौस आली असेल तर ;-)

सुनील's picture

30 Jun 2011 - 4:35 pm | सुनील

हा हा हा !!!

मला कुंभारकाम आवडत. करायलाही आवडेल म्हणण्यापेक्षा लहानपणापासुनची इच्छा आहे. पण तिथे गेले तेंव्हा त्यांच काम बंद होत त्यामुळे करता नाही आल. परत कधीतरी जाऊन ती हौस पुर्ण करेन.

सहज बरेच प्रकल्प आहेत तिथे. कमित कमी १ तास तरी सगळ पहायला लागेल.

सहज's picture

30 Jun 2011 - 6:27 pm | सहज

युसुफ मेहेर अली सेंटर मधील सगळे विभाग पहायला १ तास की फक्त कुंभारकाम विभाग पहायला १ तास?

मस्त..
कुंभाराला मडके घडवतना पहायला खुप आवडत.

गणेशा's picture

30 Jun 2011 - 4:53 pm | गणेशा

हा भाग छान झालाय.. येथुन बघायलाच इतकी मज्जा येते आहे तर तेथे कीती मज्जा आली असेन

किती वेळ लागेल हे तुमच्या पाहण्यावर अवलंबुन आहे. जर आपण प्रत्येक गोष्टीची माहीती विचारली तर वेळ लागेलच. नुसत पाहील तर लवकर होईल. मी गेले तेंव्हा तिथल्या कारागिरांना रजा होती. त्यामुळे मी सगळ १ तासात पटापट पाहील. कारण मला दुसर्‍या २ ठिकाणांना भेट द्यायची होती.

तुमचा उपक्रम खुपच छान आहे