जगभर सगळीकडे आपण पहातो की नावा बरोबर आडनावे असतात. युरोपात सुमारे ५००० हजार वर्षापुर्वी आडनावे उपयोगात हळू हळू यायला लागली. भारतात कधी व का उपयोगात आली ते कळायला मार्ग नाही. वेदकाळानंतर गोत्र उत्पन्न झाली. पुढे वंशज व कुळ हे आडनावा सारखे उपयोगात आले. रामाला बहूतेक आडनाव नव्हते. कृष्णाला यादव कुळातला म्हणून संबोधले जाते. वर्णाश्रम व जातीवार रचने मुळे आपल्या कडे आडनावांना महत्व आले.
'अरे पण आडनाव काय त्याचे' मुलाने वर्गातल्या मुलाचे नाव आपल्याला सांगितले की सहजच हा प्रश्न विचारला जातो. ह्या संबंधात काथ्याकूट करण्यासाठी खालील मुद्दे देत आहे. त्या बरोबर माझी मते ही देत आहे.
१. आडनावांमुळे जातीवार रचनेची गाठ सुटू शकत नाही. माझे मत - आडनावांमुळे जातीवार रचना अजूनच जोपासली जात आहे.
२. आडनाव हवेच का. काही लोकांचे म्हणणे हे पडते की तिच तिच नावे खुप असतात, जर नाव व त्या बरोबर आडनाव जोडले तर हा गोंधळ दुर होतो. माझे मत - असे असेल तर आडनावे लावायच्या ऎवजी नावा मागे आई वडलांचे नाव जोडले तर हा प्रश्न राहणार नाही.
३. समाजात जागरुकता आली व सरकारी पाठींबा असला तर (म्हणजे विविध सरकारी फॉर्मस् मध्ये आडनावाचा रकाना काढून टाकला तर) काही वर्षानी भारतीय समाजात 'आडनाव' उपयोगात येणार नाही, त्याचा काही सामाजीक समरसतेत फरक व्हायला मदत होईल का.
४. अर्थातच बाकीच्या धर्मीयांनी पण हे अमलात आणले पाहिज (मुस्लिम पर्सनल लॉ...समान नागरी कायदा वगैरे वगैरेची गुंतागुंत नको).
५. आडनाव न वापरण्याचे फायदे, ते न वापरण्याच्या तोट्यांपेक्षा जास्त आहेत का.
(माझ्या डोक्यात बरेच दिवस हा विचार चालू आहे. माझ्या एका परिचीत कुटूंबाने (ते तमिळ आहेत) आडनाव म्हणून त्यांचे गोत्र लावले आहे त्यांच्या मुलांच्या नावा पुढे.)
प्रतिक्रिया
16 Jun 2011 - 1:57 pm | जागु
चितळे हे आडनाव वाचले की मला बाकरवडी, गुलाबजाम श्रिखंड आठवत.
16 Jun 2011 - 9:46 pm | अलख निरंजन
मला ते कोकणस्थ आहेत इतके कळते पण त्यांचा फोटो बघून ते नसावेत असेही वाटते.
17 Jun 2011 - 12:18 am | नर्मदेतला गोटा
चितळे कोकणस्थच असतात असे नाही
16 Jun 2011 - 2:33 pm | योगी९००
चितळे..
तुम्ही तुमचे आडनाव तुमच्या मि.पाच्या सदस्यनामात का ठेवले आहे? आडनाव वापरण्याचे फायदे, ते वापरण्याच्या तोट्यांपेक्षा जास्त आहेत का?
बाकी लेख आवडला. आडनावाचा मुख्य उपयोग पासपोर्ट, टॅक्स वगैरे ठिकाणी खुपच होतो असा मला अनुभव आहे...
माझे मत - असे असेल तर आडनावे लावायच्या ऎवजी नावा मागे आई वडलांचे नाव जोडले तर हा प्रश्न राहणार नाही.
उलट <नाव><आई-वडीलांचे नाव><माहेरचेआडनाव><सासरे आडनाव> असे ठेवले तर गोंधळ होतच नाही.
बाकी आजकालच्या बर्याच लग्न झालेल्या मुलींना आपले माहेरचे आणि सासरचे आडनाव एकत्र लावायची सवय असते.. आपले लग्न झाले आहे हे त्यांना सुचित करायचे असावे.
16 Jun 2011 - 4:04 pm | शाहिर
ओक -लेले
काळे- फडके
16 Jun 2011 - 4:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
==))==))==))==))==))==))
==))==))==))==))==))
==))==))==))==))
==))==))==))
==))==))
==))
16 Jun 2011 - 5:53 pm | मैत्र
काळे - बेंद्रे
16 Jun 2011 - 2:36 pm | परिकथेतील राजकुमार
हा प्रश्न फक्त बामणांच्या घरातच विचारला जातो.
16 Jun 2011 - 4:07 pm | शाहिर
प रा याना विनन्ति आहे ..त्यानी बामण नव्हे ब्राम्हण असा शब्द वापरावा ..
16 Jun 2011 - 4:38 pm | अमोल केळकर
सहमत :)
अमोल
16 Jun 2011 - 4:49 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्हाला बाह्मण म्हणायचे आहे का? ;)
साखरदांडे
16 Jun 2011 - 4:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>तुम्हाला बाह्मण म्हणायचे आहे का?
त्यांना बाह्मण नाही ब्राह्मण म्हणायचे आहे.
17 Jun 2011 - 3:49 am | पिवळा डांबिस
आम्हाला जे काय म्हणायचं होतं ते खाली घासकडवी गुर्जींनी म्हंटलेलं असल्याने पुनरुक्ती होऊ नये म्हणून प्रकाटाआ...
17 Jun 2011 - 11:54 am | भारी समर्थ
आवो बोली भाशेत आसंच बोलत्यात राव... कोइ औरंग्या नामधारी दलिंदर तो बम्मन और मर्रट्ठा कर के पुकारता था... जांदो यार....
न्हाय त्या गोश्टीवरनं ऑफेन्ड होउन आगीत त्याल वतनार्यांना त्यालाचा डरम दिउ न्हाइ म्हनतो मी..
भारी समर्थ
16 Jun 2011 - 4:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे
काहीही !!! तुम्ही हा प्रश्न फक्त ब्राह्मणांच्या घरात ऐकला असेल. याचा अर्थ इतर घरात विचारला जात नाही असे नाही. काही ठिकाणी तर सरळ जात विचारतात (खाली नीलकांत ने लिहिले आहे त्याअर्थी केवळ मला आलेला अनुभव नाही हा).
16 Jun 2011 - 5:03 pm | परिकथेतील राजकुमार
हा विनोद खरच कळला नाही मला.
काही ठिकाणी म्हणजे कुठे ? मी कसे स्पष्ट लिहिले आहे तसे स्पष्ट लिहा बरे. म्हणजे समजायला सोपे.
16 Jun 2011 - 9:28 pm | सुकामेवा
अच्छा फ़क़्त ब्राम्हणाच्या घरात असे विचारतात, मग बाकीचे आडनावा पुढे जे विशेषण लावतात त्यांचे काय.
उदा. ढमाले(देशमुख), मोरे (पाटील)
17 Jun 2011 - 11:16 am | मालोजीराव
विशेषण लावतात कारण इतिहास असतो याच्या मागे.....
- मालोजीराव जगदाळे (देशमुख)
17 Jun 2011 - 2:02 am | किशोरअहिरे
हा प्रश्न फक्त बामणांच्या घरातच विचारला जातो. >> १००% अनुमोदन
पूण्यात आधी आडनाव विचारले जाते आणी मगच घर भाड्याने मिळते..
17 Jun 2011 - 1:06 pm | चिंतामणी
हे दाखवण्याचा हा क्षीण प्रयत्न वाटतो.
(सुज्ञ मिपकरांनी दाखवण्याचा याची विषेश नोंद घ्यावी. अर्थातच हे फक्त दाखवणे आहे हे सुज्ञांना सांगायची गरज नसावी.) ;)
16 Jun 2011 - 2:37 pm | नीलकांत
सर्वात आधी अडनाव हे जात सांगतं हे खरं आहे. यासाठी जेपींच्या आंदोलनाच्या वेळी अनेक तरूणांनी आपले अडनाव टाकून दिल्याचे वाचलेले आहे. तसेच राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी अनेक दलीतांना आपले आहे ते अडनाव टाकायला सांगून समाजातील वरच्या वर्गाची अडनावे धारण करण्यास सांगीतले होते.
काही अडनावे ही जवळपास सर्वच जातींत दिसतात जसे काळे, शिंदे, जाधव, वानखडे आदी. मात्र कुठले शिंदे आपले आणि कुठले शिंदे त्यांचे याची नोंद ठेवताना मी पाहिले आहे. त्यामुळे केवळ आडनाव बदलल्यामुळे जात जाईल असे वाटत नाही.
जात ही बरीचशी क्लिष्ट अशी मनो-सामाजीक अशी रचना आहे असं मला वाटतं. जातीमुळे आपल्या पुर्वजांच्या प्रराक्रमावर आपल्याला मिजाश करता येते आणि स्वत: काही नाही केलं तरी त्यांच्या नावावर आपला इगो सुखावता येतो. कदाचीत मानसन्मान प्राप्त होतो. काही वेळा राजकीय मंच प्राप्ती , अनेकवेळा आर्थीक मदत (हे मराठी समाजात कमी मात्र अन्य समाजात दिसतं) आणि हमखास वेळा आपल्याला जोडीदाराची सोय होते. अश्या प्रकारे जातीचे अनेक फायदे असल्यामुळे जाहीर किंवा पुरोगामीत्वासाठी आम्ही काय बोलायचे ते बोलू मात्र प्रत्यक्षात काय वागतो ते बघण्यासारखे असते.
त्यामुळे अडनाव बदलल्याने काही बदलेल असे वाटत नाही. केवळ पट्टीबदलून जखम बरी होत नाही तर आतील औषध प्रभावी असायला हवे.
या विषयामुळे अडनावाची अन्य माहिती मिळाली तर उत्तम. काही जाती ह्या अडनाव वाटाव्यात एवढ्या सामाईक असतात. मग अश्या अडनावांत लग्न जमतांना अडचणी येत नाही का? असा सुध्दा प्रश्न कधी कधी येतो.
बाकी आपल्या वडीलांचं नाव लावण्याची पध्दत आधीपासूनच आहे. आज सुध्दा ग्रामीणभागात तुझं अडनाव काय हे न विचारता, "कुणाचा रं तु? " असंच विचारतात.
- नीलकांत
17 Jun 2011 - 11:30 am | पिवळा डांबिस
आज सुध्दा ग्रामीणभागात तुझं अडनाव काय हे न विचारता, "कुणाचा रं तु? " असंच विचारतात.
जबराच हाय की ह्यो ग्रामीण भाग!
पण ग्रामीण भागातही प्रत्यक्ष वडिलांनी मुलांना हा प्रश्न विचारायची बंदी असावी असं आपलं मला अडान्याला वाटतं!!!
नाय म्हंजे.....
;)
16 Jun 2011 - 3:26 pm | नगरीनिरंजन
आडनाव विचारण्यावरून काही न विसरता येण्याजोगे अनुभव आठवले.
16 Jun 2011 - 4:24 pm | योगी९००
आम्हालाही कळूद्यात की ते अनुभव...
16 Jun 2011 - 5:13 pm | नगरीनिरंजन
जाऊ द्या हो. जात-पात वगैरे कोणत्याही प्रकारचा भेदभाव आता नष्ट झालेला आहे या जगातून तर कशाला त्याच्या आठवणी तरी? आता इथून पुढे कानाला खडा. जे काय सांगायचं ते कलाकृतीतून फक्त.
16 Jun 2011 - 5:16 pm | परिकथेतील राजकुमार
__/\__
16 Jun 2011 - 3:33 pm | ॐकार केळकर
तमिळ (किंवा तेलुगु, जे काही असेल ते.) लोकांतही गोत्र वगैरे जे काही लावतात त्यातून जात कळतेच...
जसे रेड्डी, सुब्रामाण्यम ..
असो, आणि परिकथेतील राजकुमार, बामण नव्हे, ब्राह्मण!!!
16 Jun 2011 - 4:08 pm | परिकथेतील राजकुमार
बा म ण !!!
डोक्यातछप्रु
16 Jun 2011 - 4:37 pm | pramanik
please behave yourself.
khup smart zaalyaasaarakhe waatate kaa ase karun?
17 Jun 2011 - 12:23 am | शिल्पा ब
काय? मराठीत लिहा जमलं तर...आम्हालाही समजेल.
16 Jun 2011 - 4:37 pm | टारझन
=)) =)) वाटलंच होतं कोण तरी पिळकणार म्हणुन ;)
- दांडेकर
16 Jun 2011 - 3:40 pm | शानबा५१२
रत्नागीरीला 'चितळे बंधु'चे श्रीखंड वगैरे मिळते,तो माणुस स्वभावाने कसलाही असला तरी त्यच्या नावाने एका गोड पदार्थाची आठ्वण होते.
आता तुमचे आडनाव तेच आहे,ना तुम्ही श्रीखंड बनवता वा तुमचा स्वभाव गोड का अजुन कसा काय माहीती मिळत नाही.
म्हणजे काय तर आडनावाचे फायदे काहीच नाहीत पण एखादे '**झाके' '**वणे' वगैरे आडनाव असले की लोकांना चिडवायला मिळते,म्हणजे तोटाच आहे.
16 Jun 2011 - 4:03 pm | दत्ता काळे
माझ्यासारखे आडनाव महाराष्ट्रातल्या सर्व इतर जातीधर्मातल्या लोकांमध्ये आहे.
फायदे : (१) आडनांव छोटे असल्यामुळे लिहायला सोप्पे जाते. (२) शाई कमी लागते.
तोटे : १) काळे आडनांव म्हणजे . . . . . . .तुम्ही नक्की ब्राह्मणच नां ? असा प्रश्न चिकित्सक पुणेर्यांकडून (विचारवंतांकडून )कायम विचारला जातो.
२) माझा आणि माझ्या मुलांचा रंग दाट सावळा असल्यामुळे आडनांवसुध्दा रंगावरच गेले आहे असेही लोक म्हणतात.
अवांतर : माझ्या माहितीतल्या एक गृहस्थाचे आडनाव 'भोंगळे' होते. ते त्यांनी अॅफिडेव्हीट करून बदलून घेतले. कारण त्यांच्या मुलांना शाळेत इतर मुले आडनावावरून चिडवंत असंत.
16 Jun 2011 - 4:32 pm | योगी९००
आमच्या वर्गात एक ठोंबरे होता..
त्याला सगळे ठोंब्या म्हणायचे..विचारा फार शांत पोरगा होता..पण प्रत्येकाला सरळ नावाने हाक मारायची पद्धत नसल्याने त्यालाही आणि आम्हालाही इतके वेगळे वाटायचे नाही...एक दोन वेळा शिक्षक आम्हाला ओरडले पण नंतर त्यांनाही ती सवय लागली. (म्हणजे कोणत्याही शिक्षकाने ठोंब्या "ए ठोंब्या" अशी हाक नाही मारली पण आमचे त्याला ठोंब्या म्हणणे त्यांनी चालवून घेतले..)
मला मात्र योग्या म्हणायचे..
17 Jun 2011 - 12:24 am | नर्मदेतला गोटा
ठोंब्याच्या बापास काय महाठोंबरे म्हणायचात का तुमी
16 Jun 2011 - 5:44 pm | llपुण्याचे पेशवेll
मूळात जातीव्यवस्थेलाच आक्षेप नसल्यामुळे आडनावे जातीवरून असावीत /नसावीत याबद्दल काहीच बोलू शकत नाही.
16 Jun 2011 - 7:32 pm | मी-सौरभ
वडीलांचे किंवा गोत्राचे नाव लावून प्रश्न सुटणार नाही. आपल्या समाजात पण आता लोकांना नावाने बोलावण्याची पद्धत सुरु झाली आहेच :)
आमच्या वेळेला (फक्त १० वर्षांपूर्वी) शाळेत आडनावाने बोलवायचे आता नावाने बोलावतात हे बघून छान वाटते.
@ प.रा. 'बामण' हा शब्द वापरून मतदार गोळा करायची जागा ही नाही. ईथे बहुमत आहे आमचं.
16 Jun 2011 - 8:22 pm | वायुपुत्र
आपणास व॑शावळ हा प्रकार महिती असावा असे वाटते. आडनावा शिवाय व॑शावळी ला काहीच अर्थ राहणार नाही. घरातल्या प्रत्येकाचे नाव वेगळे असले तरी आडनाव हा त्या घरातल्या सर्वाना बा॑धून ठेवणारा एकमेव दुवा आहे. म्हणुन आडनाव महत्त्वाचे.
आडनावाचे महत्त्व पटवून देणारी एक जुनी आठवण आहे.
काही वर्षापुर्वी केरळ ला सहली साठी गेलो होतो. आमच्या गाडीचालका बरोबर त्याचा ८ वर्षाचा मुलगा देखील होता. त्या गाडीचालकाचे नाव फ्रान्सिस आणि त्याच्या वडिला॑चे नाव पीटर असे होते. आणि त्या गाडीचालकाच्या मुलाचे नाव जॉन असे होते. तो गाडीचालक त्याचे पुर्ण नाव फ्रान्सिस पीटर असे सा॑गे व त्याचा मुलगा त्याचे नाव जॉन फ्रान्सिस असे सा॑गे. त्या॑ना त्या॑चे आडनाव महिती नव्हते (कारण म्हणे त्या॑च्यात आडनाव लावणे ही पद्धतच नव्हती. वडीला॑चे नाव हेच आडनाव म्हणुन ते वापरत. जॉनला त्याच्या पणजोबा॑चे नाव देखील महिती नव्हते) आडनाव महिती नसल्या कारणाने, पीटर च्या आजोबा॑ची वडीलोपर्जित जमीन पीटर च्या वडीला॑च्या म्रुत्यु न॑तर पीटर च्या नावावर होवु शकली नाही. आणि लहानपणापसून श्रीम॑तीत वाढलेल्या पीटर च्या नशिबी गरिबी आली. कारण आडनावाचा उल्लेख कुठल्याच कागदपत्रात नसल्या कारणाने व॑शावळीचा पुरावाच नव्हता...
ता.क. : ह्यामधील सर्व नावे खरी आहेत.
16 Jun 2011 - 8:44 pm | तिमा
नांवाच्या पुढे आपल्याला येत असलेला किंवा आपण करत असलेला व्यवसाय लावला तर ?
उदा. अभिषेक आयटी, प्रसाद कारकून, प्रमोद बिल्डर, काशिनाथ बॉडीबिल्डर इत्यादि.
16 Jun 2011 - 8:50 pm | आदिजोशी
ही प्रथा पार पूर्वीपासून अस्तित्वात आहे.
उदा: जोशी, कुळकर्णी, पाटील, इनामदार, सोनार अशी अनेक आडनावं आहेत की.
विनोद म्हणूनही हे वाक्य वाचण्याजोगे नाही. कारण मुळात त्यात विनोद नाही आणि कारकूनाचे प्रमोशन होताना त्याने दर ५-६ वर्षानी आडनाव बदलायची तकतकही आहे.
17 Jun 2011 - 1:32 pm | मृत्युन्जय
कर्नाटकात हा प्रकार रुढ आहेत. त्यामुळे बर्याच लोकांची आडनावे कांदे, कोळसे, बटाटे (यांची कन्नड नावे) अशी दिसु शकतील. पुर्वीच्या काळात त्या लोकांना ते ज्या पदार्थाचा व्यवसाय करायचे त्यावरुन ओळखल जायचे. हळुहळु तीच त्यांची आडनावे झाली
16 Jun 2011 - 8:44 pm | आदिजोशी
जो पर्यंत वेगवेगळे धर्म अस्तित्वात आहेत तोवर जाती व्यवस्था संपणार नाही.
17 Jun 2011 - 3:57 am | पिवळा डांबिस
जो पर्यंत वेगवेगळे धर्म अस्तित्वात आहेत तोवर जाती व्यवस्था संपणार नाही.
आपण अधिक स्पष्टीकरण देऊ शकाल काय?
कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या धर्मात जाती आहेत?
(धर्मांतरीत होऊन दुसर्या धर्मात गेलेल्यांनी तरीसुद्धा जपून ठेवलेल्या जुन्या धर्मातल्या जाती सोडून, कारण ती भारतीय उपखंडापुरती युनिक केस आहे...)
तेंव्हा तुमच्या वरील विधानामागचं रॅशनॅल वाचायला आवडेल...
धन्यवाद!
16 Jun 2011 - 8:58 pm | धनंजय
एकापेक्षा अधिक शब्दांची नावे असली तर काँबिनेशने थोडी अधिक होतात. हा एक फायदा आहे.
उदाहरणार्थ मिसळपावावर अनेक व्यक्ती "धनंजय" आहेत. (काही दशकांपूर्वी हे नाव बर्याच लोकांना त्यांच्या मुलांना ठेवावेसे वाटले.) त्यांच्यापैकी मी एकट्याने "धनंजय" आयडी आडवून ठेवला आहे. आयडीमध्ये आणखी एखादा शब्द असता - उदाहरणार्थ "धनंजय घाटात" ("घाटात" हा माझा मिसळपावावर लिहिलेला प्रथम शब्द होता. पण वाटेल तो दुसरा शब्द चालेल.) तर मग अन्य धनंजय-व्यक्तींची आडवणूक झाली नसती.
- - -
लहान मुलांनी वैयक्तिकनाव आणि आडनाव असे दोन्ही पाठ केले, तर एक फायदा असतो. मूल हरवले, तर मुलाला नाव विचारून कमीतकमी कुटुंब कुठले ते कळते. म्हणून दुसरे नाव कुटुंबाचे सामायिक असण्यात सोय आहे.
- - -
त्याकरिता आई आणि बापाची वैयक्तिक नावे जोडण्याची कल्पना चांगली आहे. आणि काही प्रमाणात इंग्रजपूर्व काळात महाराष्ट्रात प्रचलितसुद्धा होती. (व्यक्तीचे आणि त्याच्या बापाचे वैयक्तिक नावच साधारणपणे वापरण्यात येई. आडनाव वापरत नसत.) खंडो बल्लाळाचे आडनाव शोधले तर मला सापडेल (चिटणिस). पण ते न-वापरण्याचीच रूढी अधिक आहे. वाटल्यास बदलत्या व्यवसायाबरोबर व्यवसायाचे नाव जोडण्याची पद्धत होती. बाळाजी विश्वनाथ याचे आडनाव भट की पेशवे? त्याच्या मुलाचे आडनाव काय?
खुद्द माझे आडनाव एका पूर्वजाने व्यवसायाचे नावच आडनाव म्हणून घेतले होते. (कमीतकमी त्यामुळे हे बरे होते, की आडनावाने महाराष्ट्रातल्या दोन-चार, गोव्यातल्या वेगळ्या काही, आणि उत्तर/पूर्व भारतातल्या आणखीनच वेगळ्या जाती त्या आडनावाशी जोडलेल्या आहेत.) त्या पूर्वजाच्या बापाने राहात्या गावाच्या नावाला "-कर" जोडून आडनाव म्हणून वापरले होते! म्हणजे दीडेक शतकांपूर्वी आडनाव हे तितकेसे स्थायी नसावे. खंडो बल्लाळाचे आडनावही व्यवसायाचे नावच होते. चिटणीस व्यवसाय करण्यापूर्वीचे त्याच्या पूर्वजांचे आडनाव काय होते?
लग्न करताना गोत्र, जात वगैरे सांगतच असत, शिवाय गल्लीमध्ये एकाच जातीचे लोक राहात... जात महत्त्वाची होती पण एवढी महत्त्वाची वाटणारी गोष्टसुद्धा नावात स्थायी रूपाने असली पाहिजे अशी आवश्यकता तेव्हा वाटत नसे.
- - -
फक्त बापाचे नाव जोडण्याऐवजी बाप आणि आईचे नाव जोडले, तर अधिक काँबिनेशनांचा फायदा मिळेलच.
उदाहरणार्थ : रघुनाथ राधा-धोंडो, दिनकर गोदू-धोंडो वगैरे. किंवा विजयालक्ष्मी मोती-स्वरूप.
गमतीदार कल्पना आहे.
16 Jun 2011 - 9:16 pm | वायुपुत्र
आपण म्हणता ते तितकेसे बरोबर नाही. ख॑डो बल्लाळाचे उदाहरण तुम्ही दिलेत पण त्याकाळच्या सर्वसामान्य जनतेच्या आडनावा॑बद्दल जरा महिती काढून बघा. बोली भाषेत वडीला॑ वरून मुलाला ओळखण्याची पद्धत होती हे खरे आहे. पण कगदोपत्री आडनाव नियमाने लावले जाई. हे खरे आहे की त्या काळी व्यवसायाचे नाव हे आडनाव म्हणुन वापरले जाई. पण ते फक्त बोली भाषेत. माझ्या पाहण्यात तरी कुठल्याही कागदपत्रात आडनावाचा उल्लेख टाळल्याचा प्रयत्न दिसलेला नाही.
अर्थात माझे स्वत:चे आडनाव हे मुळ नसून ते व्यवसायावरुन आलेले आहे.
17 Jun 2011 - 1:34 am | धनंजय
माझ्या प्रतिसादातील उद्धरण असे आहे :
येथे एका पिढीतून दुसर्या पिढीपर्यंत आडनाव बदलण्याबाबत उल्लेख आहेत. त्यामुळे "स्थायी" = "पैतृक वंशात कायमचे" असे म्हणायचे होते. परंतु तसे स्पष्ट नसल्यास दिलगीर आहे.
खंडो बल्लाळाचे पैतृक पूर्वज जर मूळ भारतीय-वंशातले असतील, आणि हजारो पिढ्यांपासूनही त्यांचा व्यवसाय चिटणिस-कामाचा असेल, तरी "चिटणीस" नाव हे त्या मानाने नवीनच असणार. "चिटणीस" शब्द फारसी-उद्भव आहे. त्यामुळे हे नाव त्यांच्या पैतृक वंशात कोणीतरी बदलले असणार, हे निश्चित.
माझे व्यावसायिक आडनाव कुठल्या-कुठल्या पूर्वजांनी बदलले ते तर मला माहीतच आहे. हे बदललेले आडनाव कागदोपत्री असलेले जुने उतारेसुद्धा माझ्यापाशी आहेत. दस्तऐवजात आडनाव लिहिलेले आहे, हे जरी खरे असले, तरी ते बदललेले-व्यावसायिक आडनाव आहे. त्या काळातल्या कारकुनाने "तुमचे पूर्वीचे पैतृक आडनावच दिले पाहिजे" अशी सक्ती केली नाही, असेच दिसते. पहिल्या बाजीरावा/नानासाहेबांच्या पत्रांमध्ये आडनाव काय दिसते हे बघितले पाहिजे. नाना फडनविसाच्या कागदपत्रांत पैतृक "भानू" हे आडनाव दिसत असे, की "फडनीस"? की दोन्ही? हे बघितले पाहिजे.
17 Jun 2011 - 12:29 am | नर्मदेतला गोटा
एक कानाचे डॉक्टर होते - डॉ. बेहेरे
एक डोळ्याचे डॉक्टर होते - डॉ. काणे
चारचाकी न आपटता कशी चालवायची हे शिकवणारे
आहेत त्या क्लासचे नाव "आपटे मोटार ड्रायविंग स्कूल "
17 Jun 2011 - 2:19 pm | बिपिन कार्यकर्ते
आमचे एक मित्र आहेत... दाताचे डॉक्टर आहेत. त्यांचे आडनाव 'दाढे' आहे! आता बोला! ;) http://www.misalpav.com/user/364
17 Jun 2011 - 12:38 am | नर्मदेतला गोटा
मराठा घरात गेल्यास तेथील वडिलधारी माणसे
जातीची फार चौकशी करतात
पेडणेकर म्हणजे सोनार का ?
गोडबोले म्हणजे बामण का ?
चव्हाण म्हणजे तुम्ही नक्की कोण हे की ते की ते ?
असे प्रश्न त्यान्ना पडतात
घरात आलेला अगदी बारका पोरगा ज्याला जात म्हणजे काय समजत नाही
तो सुद्धा सोनाराचा किंवा सुताराचा पोरगा असतो
17 Jun 2011 - 1:50 am | अभिज्ञ
आडनावाचा फायदा होतो कि तोटा हे आडनाव काय आहे ह्यावरही अवलंबून असते.
अभिज्ञ.
17 Jun 2011 - 5:27 am | शिल्पा ब
मग तसाही नावाचा काय पेशल फायदा आहे हेसुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
17 Jun 2011 - 8:07 am | पाषाणभेद
आपल्या कुळाचा एक अभिमान म्हणून पाहिले गेले तर आडनाव लावण्यात तसे काही गैर नाही.
काही आडनावे हास्यास्पद असल्यास बदलून घ्यावे.
आडनाव हे व्यक्ती सॉर्ट करण्यात उपयोगी पडते. म्हणजे एकाच कंपनीत ५ सचिन असले तर आडनावांमुळे लवकर समजते.
17 Jun 2011 - 10:48 am | llपुण्याचे पेशवेll
आमच्या कंपनीत ५ सचिन कुळकर्णी आहेत. त्यातल्या ३ना मी वैयक्तीक ओळखतो.
17 Jun 2011 - 10:52 am | पिवळा डांबिस
खरं सांगा, त्यातले कुळकर्णी किती आणि कुलकर्णी किती? दोहोंत फरक आहे...
:)
17 Jun 2011 - 10:59 am | llपुण्याचे पेशवेll
आमच्या माहीतीतले ३घेही देशस्थ ब्राम्हण आहेत. मग ते कुलकर्णी का कुळकर्णी?
बादवे फारसा फरक असावा असे वाटत नाही. पूर्वी कोकणातील आमच्या गावाचे कुळकरण पद (रहाळकर नामक) कोकणस्थ ब्राम्हणाकडे होते असा उल्लेख मी रहाळकरांकडच्या एका चोपडीत वाचला आहे.
असो.
17 Jun 2011 - 11:05 am | पिवळा डांबिस
कुलकर्णी किंवा कुळकर्णी हे वेगवेगळे हुद्दे आहेत, त्याचा जातीशी संबंध नाही.....
फरक सांगीन पण त्याआधी एक "काका, मला वाचवा!!" अशी जोरदार आरोळी मारा बघू नारायणराव!!!
:)
17 Jun 2011 - 11:13 am | llपुण्याचे पेशवेll
काका मला वाचवा!!!
(आता व्यनितून 'वाच'वलेनित तरी चालेल. ) ;)
17 Jun 2011 - 11:15 am | टारझन
णारायणराव बहुदा २५ हजारांची अत्तरं आणायला गेले .. :) पावसाळ्याचे दिवस ना ? :)
17 Jun 2011 - 9:13 am | रणजित चितळे
उत्तर हिंदुस्तानात लोकं नावा नंतर आडनाव विचारतात. खुप लोकं आडनावानेच बोलावतात. ब-याच वेळेला तरुण पोराला नावाने संबोधतात. वयस्करांना आडनावाने.
ऑफिस मध्ये बॉसचा मुड चांगला असेल तर नावाने बोलावतो. मुड खराब झाला की लागलीच आडनावाने बोलावले जाते.
नाव एक दुस-याला जवळ करतात. आडनाव थोडे अंतर आणते रिलेशनशीप मध्ये.
पारशी, बोहरी, सिंधी समाजात कामावरुन आ़डनावे असतात - कारपेंटर. बाटलीवाला, काचवाला, लक्कडवाला इत्यादी
आडनावांमुळे स्वार्थ साधला जातो.
म्हणे इंदिरा गांधींचे आडनाव गांधी नव्हते ते वेगळेच होते. त्यांचा अपभ्रंश करुन गांधी केले. एक तर हे ऎकायला सोपे व राजकारणासाठी चांगले आडनाव आहे.
उद्याला राहूल गांधी दुसरे आडनाव त्याच्या पासपोर्टावर जे नाव आहे ते (काहींचे म्हणणे raul vinci) घेऊन निवडणूक लढवली तर किती प्रसिद्धी मिळेल व निवडून येईल का नाही सांगता येत नाही.
17 Jun 2011 - 10:24 am | चिरोटा
पतीचे नाव फिरोझ दारुवाला होते.दारुवाला आडनाव घेवून भारतात राजकारण करणे पायावर धोंडा मारुन घेणे.!
व्यक्तीच्या नावावरुन तिच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज बांधता येत नाही. जात वगैरे बाजुला सोडा, आडनावावरुन मात्र व्यक्तीमत्वाविषयी ठोकताळे थोडेफार बांधता येतात. पूर्वी एंटरव्युज घेताना बायोडेटा बघितल्यावर आड्नाव आम्ही आधी बघायचो. मुलाखतीत ही व्यक्ती कसे बोलेल, व्यक्तीमत्व कसे असेल ह्याविषयी अंदाज करायचो.
17 Jun 2011 - 10:31 am | रणजित चितळे
का अजून काही होते.
17 Jun 2011 - 10:53 am | नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ
आत्ता कळला या धाग्याचा उद्देश काय ते.
चितळेसाहेब, ताकाला जायचं तर भांडं कशाला लपवायचं?
17 Jun 2011 - 11:27 am | रणजित चितळे
माझ्यावर विश्वास ठेवा.
आधी लक्षात आले नव्हते पण प्रतिसाद वाचता वाचता व लिहीता लिहीता आठवले. ही माहिती होती आधी माझ्या कडे. ह्यावर धागा काढायचा असता तर बेधडक काढला असता. पुर्वी लिहीले होते किवा माझी मते न लपवता ठेवली पण होती अन्यत्र.
17 Jun 2011 - 2:32 pm | स्वानन्द
थोडं आणखी आर्जव करा... किंवा जमल्यास राहुल गांधींचं गुणगान करा.... मग कदाचित विश्वास ठेवतील ते ;)
17 Jun 2011 - 2:43 pm | रणजित चितळे
पुढच्या वेळेला लक्षात ठेवीन.
राहूल गांधींना बघीतले की नशिबावर विश्वास बसायला लागतो. त्यांचा आत्मा काँग्रेसच्या गांधीनावाच्या आडनावाच्या पोटी जन्माला आला त्यामुळे पंतप्रधान होण्याची probability किती वाढली बघा. तोच आत्मा कोणी तारापोरवाला, बाटलीवाला, वाढेरा किंवा लोखंडवाल्या कडे जन्माला आला असता तर त्यांची पंतप्रधान होण्याची प्रोबॅबिलीटी कोणी गणित विषारदाने काढली पाहीजे.
17 Jun 2011 - 3:07 pm | सुनील
देवेगौडा आडनाव असलेली व्यक्ती पंतप्रधान बनण्याची शक्यता (१९९६ पूर्वी) किती असावी असे आपणास वाटत होते?
17 Jun 2011 - 4:32 pm | चिरोटा
सहमत. तीच गोष्ट गुजराल ह्यांची् ! हे आडनाव दोनदा ऐकले. त्यांचे बंधू सतीश गुजराल चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत्.
18 Jun 2011 - 9:02 am | रणजित चितळे
गुजराल व देवेगौडा (देवगौडाच्या मुलाची जशी मुख्यमंत्रीहोण्याची शुन्यापेक्षा अधीक होती व मुख्यमंत्रीपद मिळालेही) ह्यांची प्रॉबॅबिलीटी (पंतप्रधान बनण्याआधी) शुन्य होती. राहूल गांधींची आत्ताच शुन्यापेक्षा जास्त आहे आडनाव व घराणेशाही मुळे.
17 Jun 2011 - 4:47 pm | प्यारे१
अहो 'मी पंतप्रधान होईन' ही शक्यता खुद्द देवेगौडांना पण नसेल आली कधी..... ;)
बाकी राजकारणात घराणेशाही चालत नाही अथवा घराणेशाही शिवाय राजकारण करता येते यावर विश्वास असणारां बद्दल प्रचंड सहानुभूति आहे. भारतीयच का जागतिक राजकारणातही आडनाव म्हणजे कोरा चेक आहे असे आमचे ठाम मत आहे. आमच्या एकमेव जाणत्या राजाचे वंशज ही एकमेव पात्रता सोडली तर बाकी काहीही नसणारी व्यक्ती संसदेमध्ये आरामात निवडून येते ही वस्तुस्थिती आहे.
मूळ विषयाकडे:
माझे आडनाव तथाकथित बॅकवर्ड आडनावाशी साधर्म्य सांगते.
नोकरी करताना, मुलाखत देताना, समाजामध्ये वावरताना या आडनावाबद्दल प्रामुख्याने तथाकथित ब्राह्मणां च्या मागील पिढीमध्ये प्रचंड उपेक्षा आहे हे जाणवते. 'हा म्हणजे असाच, आपल्याहून खालच्या दर्जाचा' ही भावना दिसून येते. एखाद्याला आडनाव माहिती नसते. येतो, बोलतो, आडनाव विचारतो. सांगितल्यावर कसनुसं झालेलं तोंड पाहून मीच कसनुसा होतो.
अर्थात एका जातीने दुसर्या जातीला नावे ठेवणे (बहुजन समाजातही कदाचित आणखी तीव्रतेने असेल) नवीन नाही. ते बदलणे, लवकर बदलणे तरी अवघड आहे.
17 Jun 2011 - 8:13 pm | चिरोटा
राजकारणात माहित नाही पण (भारतात)इंटरनेटच्या सुरुवातीच्या दिवसात आडनावाला महत्व होते. चॅटिंग करत असताना आम्ही मित्र आमचे खरे आडनाव लावत असू. कोणीच येईना. मग मित्तल्,बजाज्,कपूर अशी आडनावे घेतली. मग चॅटिंगला येणार्यांची संख्या वाढली. इकडे जातीपेक्षा वरील आडनावांना भारतिय ग्लॅमर असल्याने तसे असेल.
17 Jun 2011 - 3:17 pm | नारयन लेले
मिप वरील सर्वा॑चा तुमच्यावर विश्वास आहे.
पण समाजात ओळख पटवीण्यासाठी आडणावाचा उपयोग होतो हे ही खरे.
विनित
17 Jun 2011 - 11:15 pm | आनंदयात्री
>>चितळेसाहेब, ताकाला जायचं तर भांडं कशाला लपवायचं?
अरे कर्मा .. काँग्रेसवाल्यांची इथे पण अडचण का ?
;-)
गंमतीचा भाग सोडला तर, जातीपातीवरच्या चर्चा वाचून आता वीट आलाय, आपण किती दिवस अश्या नळावरच्या भांडणात कालापव्यय करणार आहोत ते रामालाच ठावूक. (मुद्दाम जातनिरपेक्ष देव निवडला)
18 Jun 2011 - 10:45 am | नितिन थत्ते
>>अरे कर्मा .. काँग्रेसवाल्यांची इथे पण अडचण का ?
खुसपटे काढण्याचे स्वातंत्र्य आहे पण प्रतिवाद केल्यास अडचण आहे का?
17 Jun 2011 - 5:35 pm | शाहिर
राजीव गान्धिची हत्या झाल्यानन्तर राहुल गान्धि कॉलेज बदलला...तेव्हा ओळख लपवायसाठी त्यान्चे नाव बदलले . कारण लिट्टे कडुन धोका होता ...असा सन्दर्भ जाला वर सापडला
17 Jun 2011 - 8:06 pm | चिरोटा
लिट्टेवाल्यांना कॉलेज शोधून काढता येत नसेल काय?
17 Jun 2011 - 9:43 am | श्रीरंग
पुण्याबाहेर सर्वत्र जातिभेद नष्ट होऊन फक्त पुण्यातच कसे जतीयवादी ब्राह्मण राहतात ही नवीन माहिती मिळाली.
17 Jun 2011 - 10:51 am | इरसाल
उत्तर हिंदुस्थानात बॉस राग कसा व्यक्त करतो. चितळे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे..............
१. चांगला मूड असेल तेव्हा " अरे राम क्या चल रहा है ? क्या हाल है ?
२. थोडे तापमान वाढले कि " यादव ये क्या हो रहा है ?
३. व्यवस्थितरीत्या तापल्यावर " अरे सर मै क्या कह रहा हु आपसे ?
'सर' म्हटले कि समजून जायचे कि आज कोणाचा तरी किंवा आपला तरी पराठा शेकला जाणार.
17 Jun 2011 - 2:29 pm | स्वानन्द
हा हा!!
रोचक माहिती :)
18 Jun 2011 - 12:16 pm | चिगो
मराठी आडनावांची महाराष्ट्राबाहेर काय वाट लागते हे पाहील्यावर तरी आडनावाचे तोटेच जाणवतात.. माझ्या "गोतमारे" ह्या आडनावाचे गोटमारे, गूटमारे, घोटमारे, गुटमारी असे अनेक बारसे झालेयत.. कुणाकुणाला सांगत बसणार? बाकीच्या बर्याच आडनावांची अशीच लावली जाते.. वाट ;-)
18 Jun 2011 - 12:35 pm | नितिन थत्ते
आमच्या आडनावाची महाराष्ट्रातच मराठी लोकांकडून इतकी रूपांतरे झाली आहेत.
थिटे, थेटे, थंटे, सत्ते, सप्ते.
18 Jun 2011 - 1:08 pm | रणजित चितळे
उत्तर भारतीय ळ म्हणू शकत नाहीत त्यामुळे चितले, चिताले, चिटाले व अगदीच जमले नाही तर चिट्स.
18 Jun 2011 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार
च्यायला म्हणजे शितोळे आडनावाच्या लोकांची पंचाईतच की.
18 Jun 2011 - 4:15 pm | नर्मदेतला गोटा
शितोळे चितळे सारखच वाटतं