आडनावाचे फायदे किती व तोटे किती
जगभर सगळीकडे आपण पहातो की नावा बरोबर आडनावे असतात. युरोपात सुमारे ५००० हजार वर्षापुर्वी आडनावे उपयोगात हळू हळू यायला लागली. भारतात कधी व का उपयोगात आली ते कळायला मार्ग नाही. वेदकाळानंतर गोत्र उत्पन्न झाली. पुढे वंशज व कुळ हे आडनावा सारखे उपयोगात आले. रामाला बहूतेक आडनाव नव्हते. कृष्णाला यादव कुळातला म्हणून संबोधले जाते. वर्णाश्रम व जातीवार रचने मुळे आपल्या कडे आडनावांना महत्व आले.
'अरे पण आडनाव काय त्याचे' मुलाने वर्गातल्या मुलाचे नाव आपल्याला सांगितले की सहजच हा प्रश्न विचारला जातो. ह्या संबंधात काथ्याकूट करण्यासाठी खालील मुद्दे देत आहे. त्या बरोबर माझी मते ही देत आहे.
१. आडनावांमुळे जातीवार रचनेची गाठ सुटू शकत नाही. माझे मत - आडनावांमुळे जातीवार रचना अजूनच जोपासली जात आहे.
२. आडनाव हवेच का. काही लोकांचे म्हणणे हे पडते की तिच तिच नावे खुप असतात, जर नाव व त्या बरोबर आडनाव जोडले तर हा गोंधळ दुर होतो. माझे मत - असे असेल तर आडनावे लावायच्या ऎवजी नावा मागे आई वडलांचे नाव जोडले तर हा प्रश्न राहणार नाही.
३. समाजात जागरुकता आली व सरकारी पाठींबा असला तर (म्हणजे विविध सरकारी फॉर्मस् मध्ये आडनावाचा रकाना काढून टाकला तर) काही वर्षानी भारतीय समाजात 'आडनाव' उपयोगात येणार नाही, त्याचा काही सामाजीक समरसतेत फरक व्हायला मदत होईल का.
४. अर्थातच बाकीच्या धर्मीयांनी पण हे अमलात आणले पाहिज (मुस्लिम पर्सनल लॉ...समान नागरी कायदा वगैरे वगैरेची गुंतागुंत नको).
५. आडनाव न वापरण्याचे फायदे, ते न वापरण्याच्या तोट्यांपेक्षा जास्त आहेत का.
(माझ्या डोक्यात बरेच दिवस हा विचार चालू आहे. माझ्या एका परिचीत कुटूंबाने (ते तमिळ आहेत) आडनाव म्हणून त्यांचे गोत्र लावले आहे त्यांच्या मुलांच्या नावा पुढे.)
प्रतिक्रिया
मग तसाही नावाचा काय पेशल
आपल्या कुळाचा एक अभिमान
:)
सगळे कुळकर्णी?
आमच्या माहीतीतले ३घेही देशस्थ
हुद्दा
काका मला वाचवा!!! (आता
णारायणराव बहुदा २५ हजारांची
आडनावे
फिरोझ
दारुवाला .......
हॅ हॅ हॅ
थत्ते साहेब अगदी खरे सांगतो
थोडं आणखी आर्जव करा... किंवा
खरे आहे
देवेगौडा
सहमत
बरोबर
अहो 'मी पंतप्रधान होईन' ही
हा
माझ्यावर विश्वास ठेवा.
अडचण
अडचण
raul vinci
लिट्टे
पुण्याबाहेर सर्वत्र जातिभेद
उत्तर हिंदुस्थानात बॉस राग
हा हा!! रोचक माहिती
मराठी आडनाव...
खी खी खी
खरे आहे
उत्तर भारतीय ळ म्हणू शकत
.
Pagination