आज कालचा उद्दया असतो
आणि
आज उद्दयाचा काल असतो
मग
उद्दया जेव्हा ’आज’ होईल
आणि
’आज’ त्याचा ’काल’ होईल
तेव्हा
त्या उद्दयाच्या उद्दयाला
’आजचा’ ’उद्दयाच’ म्हटलं जाईल
आता
आज जे होत राहिलंय
त्याचं
काल म्हणून होत जाणार
जे
उद्दया म्हणून होणार आहे
त्याला
आज म्हणून म्हटलं जाणार
म्हणून
“आता कशाला उद्दयाची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात”
हे माणूस सिनेमातलं गोड गाणं शांताबाई हुबळीकरांच्या तोंडून ऐकून मजा यायची.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
25 Jun 2008 - 10:20 pm | सहज
सामंत साहेब आज न लिहता उद्या लिहले असते तरी चालले असते!! ;-)
आज उद्या कधीतरी इतर लोकांना प्रतिसाद द्या मग परवापासुन परत लेख, कविता लिहा.
कृ. ह. घ्या.
25 Jun 2008 - 10:31 pm | श्रीकृष्ण सामंत
उद्दाचा उद्दया म्हणजेच तुमच्या भाषेत "परवा"
ते तर मी करीतच आहे
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
28 Jun 2008 - 8:32 am | विसोबा खेचर
काल, आज, उद्या?
अहो काय ह्या कोलांट्या उड्या लावल्या आहेत? तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे ते कालही कळलं नव्हतं, आजही कळत नाहीये आणि उद्याही बहुदा कळणार नाही! :)
आपला,
(फक्त कालचा अन् आजचा, उद्याचं माहीत नसलेला!) तात्या.
30 Jun 2008 - 10:11 pm | श्रीकृष्ण सामंत
नमस्कार तात्याराव,
म्हणूनच मी फक्त एव्हडंच म्हणत आहे
"आता कशाल उद्दाची बात"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
30 Jun 2008 - 9:58 pm | शेखस्पिअर
किती प्याले रिचवल्यावर अश्या कविता सुचतात?
30 Jun 2008 - 10:41 pm | श्रीकृष्ण सामंत
शेख-स्पिअर साहेब,
प्याले रिचवून कविता सुचण्याचे दिवस आता गेले साहेब.
एव्हडं खरं माझी ही कविता एकदा वाचून पिल्या सारखं कदाचीत वाटावं.
किंवा पिऊन ही कविता एकदा वाचल्यावर "त्यापेक्षा आणखी एक पेला बरा" असंही वाटणं संभवतं.
कविता सुचण्यासाठी प्याले रिचविण्याचे निमीत्त करणं हे काही खरं नाही बघा!
मी स्वतः मात्र "सुपारीचं खांड" पण खात नाही.पेले कुठून रिचविणार सांगा?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
30 Jun 2008 - 10:44 pm | अभिज्ञ
किती प्याले रिचवल्यावर अश्या कविता सुचतात? :(
सामंतजी,
आपण काय करावे आणि काय करु नये हे सांगायचा मला काहिहि अधिकार नाहि.
तरिहि एक गोष्ट खटकली ती सांगाविशी वाटते,
आपले इथे बरेच लेखन आढळले,किमान तीस धाग्यांवर आपल्या प्रतिक्रिया आहेत.
अन त्यातले २८ धागे हे आपणच सुरु केलेले आहेत.फ़ार क्वचित आपण इतर विषयांना प्रतिसाद देताना दिसता.
इथे लिहिणारा प्रत्येकजण हा बाकिच्यांच्या लिखाणावर ब-या वाइट का होइना प्रतिक्रिया देताना आढळतो.
तसा प्रकार आपल्या बाबतीत घडताना दिसत नाहि.
इथे बाकिच्यांना प्रतिक्रिया लिहायलाच पाहिजे असा काहि नियम वगैरे नाहि..नसावा....
परंतु इथला एक नियमित वाचक म्हणून हि बाब खटकली,म्हणुनच ह्या प्रतिक्रियेचा खटाटोप.
असो,
तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती.
अभिज्ञ
30 Jun 2008 - 11:45 pm | विसोबा खेचर
अभिज्ञराव,
तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती.
आपल्या प्रतिक्रियेत काही वावगं असेल तर ते इतकंच की आपल्या प्रतिसादाचा 'आता कशाला उद्याची बात...' या कवितेशी काहीही संबंध नाही. ते विषयांतर वाटते व आपण आपले मत सामंतसाहेबांना पोष्टकार्ड पाठवून कळवायला हवे होतेत!
असो, बाकी मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे. परंतु सोडून द्या! कुणाला प्रतिक्रिया द्यायची किंवा नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शिवाय, अहो असतो एकेकाचा कुणालाही दाद न देण्याचा स्वभाव! त्याला काय इलाज?
किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या लायकीचे वाटत नसेल!
कारणं अनेक असू शकतात...
असो,
आपला,
(विश्लेषक) तात्या.
1 Jul 2008 - 3:53 am | श्रीकृष्ण सामंत
अभिज्ञजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.आपलं ऑबझरवेशन खरं आहे,आपल्याला खटकण्याजोग आहे,आणि आपल्या प्रतिक्रियेचा खटाटोप अगदी योग्य आहे.
त्याचं असं आहे,मला ह्या संस्थळावर येवून अवघे एक दोन आठवडे झाले असतील.ह्या बहुचर्चीत संस्थाळावर मी एव्हडा रमून जाण्याचं मुख्य कारण माझ्या कविता अथवा लेखावर एव्हड्या अंतःकरणापासून लिहिलेल्या प्रतिक्रिया येतात की माझा मीच त्या वाचून आणि त्याला उत्तर देवून हरवून जातो.
आता पावेतो मी माझ्या लेखनावरच्या प्रतिक्रियेचा सूर,नूर आणि किती धूर होतो ते निरखून पहात आणि वाचत होतो.
मी या संस्थाळावरचे लेखन वाचत नाही असं नाही.पण एव्हडं खरं की जात्याच मी टिका केलीच पाहिजे म्हणून करायला उद्दयुक्त होत नाही.याचा अर्थ इतर तसं करतात असं मला मुळीच म्हणायचं नाही,नव्हे तर मला ते तंत्र कदाचीत जमत नसावं.पण मनाला अत्यंत भावलेलं एखाद्दा लेखनाचं भरभरून प्रशंसा करायला मागे पुढे पहात नाही.
आता इथे आल्यावर जरा सराव झाल्याने बघुया कसं जमतं ते.
तात्यांचं टिकास्त्र,डॉ,दिलीपजीचं मार्गदर्शन,फटू,बेसनलाडू,आपल्या सारखे अभिज्ञ यांच्या सुचना,अरूण मनोहर,सहज,राजे,शितल,विजूभाऊ,मदनबाण,पक्या,धृव,वैशाली हसबनीस,विश्वजीत,मयुरे लपते,चतुरंग,प्राजु,शेखर,यशोधरा,चाणाक्य,रुपेश आणि -कुणी चुकलं असेल तर ते अवधाने असं समजू नये- वगैरेची प्रशंसा त्याशिवाय आणखी किती तरी लोकांच्या प्रतिक्रिया वाचून लेखन करायला स्फुर्ति येते हे मात्र नक्कीच.
वेळात वेळ काढून माझी पण प्रतिक्रिया देण्याचा मी प्रयत्न करीन.
"किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे
सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या
लायकीचे वाटत नसेल!"
असा चुकून सुद्धा विचार माझ्या मनात येणं म्हणजे पाप होईल.
अहो लेखन ही निर्मिती आहे.अशी माझी धारणा आहे.
आणि प्रत्येक लेखाचा मला आदर आहे.
मीच माझ्या एका कवितेत म्हणतो
" प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे"
आपल्या सगळ्यांचा माझ्यावर कृपालोभ,कृपादृष्टी आणि लेखनावर वक्रदृष्टी ठेवून सुद्धा माझ्या वर लोभ असावा हीच विनंती.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com