काल अगदी असंच मला तो नेसकॅफेवर कॉफी पिताना भेटला
मी "मी पाटील" म्हणताच, "मी नातलग" काहीसं तो म्हटला
माझं सारं बोलणं तसं अगदी पुर्णपणे ईंग्रजीतून चालू होतं
तो मात्र मराठी आणि ईंग्रजी दोन्हींची काशी घालताना दिसला
माझ्याच वयाचा, पण "सार्या जगाचं ओझं माझ्या खांदयावर"
असं शब्दाशब्दाला भासवणारा, मला जरा तो आगाऊच वाटला
पोरगा नक्कीच सुखवस्तू अन खात्यापित्या घरातला असावा
"मोबाईल, गाडीचा" अभिमान त्याच्या चेहर्यावर होता साचला
म्हटलं माझ्या मित्रा, तू तेविसाव्या वर्षी आयायटीचा प्रोफेसर हो
अगदी त्या सिकंदरासारखं जिंकण्याची उर्मीही तुझ्यात असू दे
"Confidence. हा पुर्वी नव्हता..." असं मात्र नको बोलू रे राजा
"अहंकाराचा वारा न लागो..." आठव, ही अशी गुर्मी तुझ्यात नसू दे
तो "आयडॉलीजीम" की असंच काहीसं म्हणाला, मला ते कळेचना
पुढे बोलला, आम्ही मुक्त... आमचं पुर्ण विश्व घडवणार आम्ही
छानच आहे की, पण... "ही जिद्द, धाडस होतं की पुर्वी?" म्हणत
आधीच्या पिढयांच्या मेहनतीला, पायदळी तुडवणार का तुम्ही?
कुठल्या तामिळनाडूच्या पोरीला हेड बॉडी शिकवलं असेल, नसेल
तर फ्रँकनेसच्या नावाने अगदी बेंबीपासून शंख करत तो सुटला
वाटलं, कधी वाचले असतील का याने मुक्तेचे "ताटीचे अभंग"
ज्या चिमुरडीने ज्ञानाच्या जोरावर नामदेवाला गुरुचरणावर घातला
म्हणावसं वाटलं लेका, तु नशिबवान आहेस, फेसबूक मिळतंय
कितीतरी लेकरं अशी असतील, शंभरपानी वहीसाठी रडणारी
म्हणे "आमची माध्यमांची जाण" संगणक, मोबाईल अजून काही
गॅजेटची दुनिया तुझी, अशीही लेकरं आहेत रात्री उपाशी राहणारी
जरी "पोरं पोरीं" च्या गोष्टी करत पौंगडावस्थेतच अडकला आहे
तरी "कोहं" हा प्रश्न माझ्या त्या शहाण्या मित्रालाही पडला आहे.
भल्याबुर्याचीही जाण असावी त्याला, निदान वाटत तरी होतं
पण बहुतेक घोडा उगाचच पोक्तपणा दाखवल्यामुळे अडला आहे
मी सर्वज्ञानी आहे असं भासवणार्या या छोटयाशा नामदेवाला
देव नसेल तिथे पाय ठेव म्हणणारा एखादा गुरु भेटायला हवा
तसा फार हुशार आहे तो, पुढे जाईल, काहीतरी करुन दाखवेलं
फक्त त्याचा अहंकाराने काठोकाठ भरलेला घडा फुटायला हवा
प्रतिक्रिया
10 Jun 2011 - 11:29 pm | प्रभो
हुच्च्च!!!!! भारी झालीय कविता.
13 Jun 2011 - 4:20 pm | सुहास..
फु ट लो !
10 Jun 2011 - 11:31 pm | छोटा डॉन
छान आहे, मस्त आहे कविता.
तुम्ही शिर्षक कंसात लिहले आहे म्हणुन विडंबन म्हणवे तर हे काव्य ओरिजनलच वाटत आहे आणि अगदी वास्तववादी झाले आहे.
मजा आली :)
- छोटा डॉन
11 Jun 2011 - 7:14 am | अनामिक
मस्तं जमलंय!
11 Jun 2011 - 12:01 pm | विनायक पाचलग
प्रचंड आवडल ....
( खर खर सांगतो - अस एखाद काव्य जर का माझ्या लेखामुळे आले असेल , तर तेवढा बास आहे :) बाकी , चुका सुधारायला वेळ आहेच ...इथे गडबड कोणाला आहे ? )
12 Jun 2011 - 12:48 pm | प्रदीप
असेच म्हणतो.
11 Jun 2011 - 12:07 am | गोगोल
जमलय.
ईतक्या फास्ट कसं काय बुवा सुचलं?
11 Jun 2011 - 12:37 am | आत्मशून्य
.
11 Jun 2011 - 12:57 am | बहुगुणी
दाद दिलीच पाहिजे इतकं परखड लिखाण! सलाम!
11 Jun 2011 - 1:02 am | प्राजु
जबरदस्त!!! आपण महागुरू आहात! :)
विडंबन नव्हेच.. हे काव्यच आहे.
12 Jun 2011 - 8:33 am | पाषाणभेद
खरेच आहे.
धनाजीराव विनायकाचा लेख हे केवळ निमीत्त आहे. पुढल्या पिढीसाठी हे उत्तम काव्यांजन आहे.
11 Jun 2011 - 1:06 am | रेवती
छानच हो धनाजीराव!
मूळ साहित्यप्रकार संपूर्ण वाचला नाहिये तरी हे विडंबन आवडले.;)
11 Jun 2011 - 7:31 am | विजुभाऊ
सुंदर आहे मुक्तक.
11 Jun 2011 - 9:16 am | टारझन
एक नंबर ! !
- टारझन
कोच , आयडॉली जिम
11 Jun 2011 - 10:09 am | नगरीनिरंजन
मस्त लिहीलं बरं!
11 Jun 2011 - 10:25 am | पैसा
मला काय यात विडंबन दिसलं नाय! कवितेत लिव्हलंय हेच वास्तव आहे. उलट मूळ लेख विडंबन होता की काय अशी पुसटशी शंका येतेय.
11 Jun 2011 - 10:43 am | श्रावण मोडक
धन्यवाद. लेखन मूळचे वाटते यात पावती आहेच. पण शीर्षकाला कंस टाकून जो संदेश दिलात त्याबद्दल धन्यवाद.
11 Jun 2011 - 11:00 am | भडकमकर मास्तर
पण बहुतेक घोडा उगाचच पोक्तपणा दाखवल्यामुळे अडला आहे
क्या बात है... :)
11 Jun 2011 - 12:08 pm | दत्ता काळे
लेख अगोदर वाचल्यामुळे हे लिखाण वाचाताना संदर्भ लागत होते. शेवटच्या दोन कडव्यांचा सूर अब्राहम लिंकनने शिक्षकाला लिहीलेल्या पत्रासारखा वाटला. पण कविता योग्य उत्तर देऊन गेली.
11 Jun 2011 - 2:08 pm | रणजित चितळे
किती सुंदर व किती पटकन साधलत. विलक्षण आवडले.
11 Jun 2011 - 4:10 pm | शाहरुख
व्वा !!
11 Jun 2011 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार
अप्रतिम !
11 Jun 2011 - 3:06 pm | धन्या
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार...
आशा करूया, आपल्या नाम्या यातून काही बोध घेईल...
- धनाजीराव वाकडे
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझियां सकलां हरिच्या दासा ।।१।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी । ही संतमंडळी सुखी असो ।।२।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासा भाविकांसी ।।३।।
नामा म्हणे तया असावे कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ।।४।।
11 Jun 2011 - 5:24 pm | भडकमकर मास्तर
आशा करूया, आपल्या नाम्या यातून काही बोध घेईल...
खिखिखि..
गंमत पहा...
वरती ते म्हणतात ," त्यांच्या लेखामुळे तुम्हाला कविता सुचली , चुका काय नंतर बघू...."
वाकडेसाहेब पालथ्या घड्यावर पाणी....
यावरून एका जालीय काकांनी यांना दिलेल्या काही " जालीय सल्लासेशनांची" आठवण झाली...
12 Jun 2011 - 12:52 pm | प्रदीप
नाम्याने हे कमीत कमी वाचण्याची कृपा तुमच्यावर केली तर तेव्हढ्यावरच आनंद माना.
11 Jun 2011 - 3:13 pm | मितभाषी
अगागागा धनाजीराव. मान गये. :)
अहंकार नाही सोडला तर हा चांग्या १४०० वर्षाचा झाला तरी कोराच रहानार.
GO KISS THE WORLD
NO EGO
GO EGO
LO ENO
भावश्या पाचगळ.
11 Jun 2011 - 5:04 pm | स्वाती२
प्रचंड आवडले !
12 Jun 2011 - 8:06 am | ५० फक्त
लई भारी याचा काही चांगला परिणाम झाला तर श्री. धनाजीरावांना माझ्यातर्फे एक प्यार्ती लागु.
12 Jun 2011 - 1:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त........! :)
-दिलीप बिरुटे
12 Jun 2011 - 7:59 pm | JAGOMOHANPYARE
मस्त
13 Jun 2011 - 10:00 am | चतुरंग
मारा लेकिन कितना सॉल्लिड मारा नै?
____/\____
13 Jun 2011 - 12:09 pm | चेतन
मुक्तक मस्तच झालयं
या मुक्तकावरुन कोणाला नवीन म्हणायचे आणि कोणाला जुना या विचारात पडलोय. ;)
असो
चेतन
13 Jun 2011 - 12:59 pm | प्यारे१
छानच हो धनाजीराव!
मूळ साहित्यप्रकार संपूर्ण 'वाचवला गेला' नाहिये तरी हे विडंबन आवडले.Wink
प्यारे व ती ;) (रंगांची क्षमा मागून)
13 Jun 2011 - 1:55 pm | माझीही शॅम्पेन
__/\_____/\_____/\_____/\_____/\_____/\___
__/\_____/\_____/\_____/\_____/\_____/\___
13 Jun 2011 - 2:22 pm | मैत्र
विडंबन नक्कीच नाही.
मी सर्वज्ञानी आहे असं भासवणार्या या छोटयाशा नामदेवाला
देव नसेल तिथे पाय ठेव म्हणणारा एखादा गुरु भेटायला हवा
तसा फार हुशार आहे तो, पुढे जाईल, काहीतरी करुन दाखवेलं
फक्त त्याचा अहंकाराने काठोकाठ भरलेला घडा फुटायला हवा
एक नंबर ! बेष्ट !!
-- सल्लाराम वाटणे
13 Jun 2011 - 2:59 pm | वाहीदा
वाकडे साहेब,
तुम्हीतर खुप सरळ-सरळ परखड आहात :-)
मी सर्वज्ञानी आहे असं भासवणार्या या छोटयाशा नामदेवाला
देव नसेल तिथे पाय ठेव म्हणणारा एखादा गुरु भेटायला हवा
तसा फार हुशार आहे तो, पुढे जाईल, काहीतरी करुन दाखवेलं
फक्त त्याचा अहंकाराने काठोकाठ भरलेला घडा फुटायला हवा
अप्रतिम कविता / मुक्तक !