तिची कापरापरी दृष्टभेट घडते
द्विधा पाडसांच्या मनी स्पष्ट होते
मनांची व्यथा सांगते ही कथा
हास्य ओठांतले लपवुनी नाहि लपते
लपंडाव हा पोरका जीवघेणा
कळी काजळातून ओथंबते
उधाणून येते नि माया दुधारी
पापणीतळी स्वप्न ओसांडते
इथे अन तिथेही रमल पाशतंतू
दूरस्थ दोघे दिशांना परंतू
जिथे मेघवारा तिथे साद संकल्प
अढळ ध्रूव दोन्ही सदाही प्रवाही
...........................अज्ञात
प्रतिक्रिया
8 Jun 2011 - 11:02 am | मिसळलेला काव्यप्रेमी
झकास!