रानमाळी पावसाळी चिंब ओली पाकळी
झाडपानी निथळणार्या चाहुलींच्या थेंबओळी
मृत्तिकेच्या गर्भदेही अत्तरे घनबावळी
रोमरोमांचा फुलोरा रासक्रीडा सावळी
आडमेघांपलिकडे आतूर किरणे कोवळी
सावलीच्या पाउली उमले कळी कळि वेगळी
ओघळे मन ओघळांवर श्वास भरती पोकळी
बंड काळिजपाखरांना पापणीकड मोकळी
रम्य निर्मळ स्फटिकधारा जात त्यांची सोवळी
स्पर्श होताक्षण धरेचा अर्घ्यमुद्रा ओवळी
वाहतांना नांदती काठावरी स्वप्नावळी
जीवनी ही सृजनतेची एक मोठी साखळी
...........................अज्ञात
प्रतिक्रिया
8 Jun 2011 - 11:00 am | मिसळलेला काव्यप्रेमी
हे तर फारच सुंदर आहे!!
विशेषतः
व्वाह!! क्या बात!
8 Jun 2011 - 11:05 pm | आंबोळी
शक्यतो कवितेच्या वात्याला जात नाही... पण ही कविता खुपच छान वाटली...
धन्यवाद टू इजुभौ...
8 Jun 2011 - 11:14 pm | पैसा
असेच म्हणते..
8 Jun 2011 - 11:36 pm | प्राजु
अप्रतिम कविता!
7 Jul 2017 - 2:02 am | सत्यजित...
सुंदर!
7 Jul 2017 - 10:35 am | जयंत कुलकर्णी
फारच छान.
यातील प्रत्येक ओळीसाठी माझ्याकडे एक छायाचित्र आहे. वापरू का तुमच्या ओळी?
7 Jul 2017 - 10:40 am | जयंत कुलकर्णी
आडमेघांपलिकडे आतूर किरणे कोवळी