काळोखात तेवावी
ज्योत दिव्याची मंद
अस्तित्व तसं तुझं
उजळ्ते माझे अंतरंग
होत असंही कधी कधी कि न कळे कसे काय ? कुठल्या कुणाच्या अनाहुत शब्दाने भरला माठ ओसंडुन वहावा तसे शब्द मनाच्या गाभार्यातुन हलकेच ओठावर येतात, नसतच जे कधी कुणाशी बोलायचं, नसतच कुणालाही सांगायचं, आपल्याच नकळत ते आपणच उघडं करुन जातो.
बोलल्यावर क्शणभर मन हलकं होत खरं पण आयुष्यभराची हुरहुर लागुन जाते, का बोललो असे आपण? का?
.
प्रतिक्रिया
31 May 2011 - 9:30 pm | धमाल मुलगा
दुसरं काय? तेव्हढा क्षण उमगला आणि स्वतःला सावरलं तर कित्येक प्रश्नच उभे रहात नाहीत.
अर्थात, हे कळतं, पण वळत नाही. (आणि आम्ही म्हणजे 'लोका सांगे ब्रम्हज्ञान... ;) )
31 May 2011 - 9:53 pm | विजुभाऊ
हुरहुर लावणारे बरेच काही असते
कुरकुर ऐकवणारे बरेच काही असते
आता हेच पहा ना
उसाच्या गुर्हाळातले इंजीन कुरकुरु नये म्हणून तेल ओततात
तो आवाज इतराना ऐकु येवू नये म्हणून घुंगरे लावतात.
त्या खुळ्ळ खुळ्ळ मध्ये कुरकुर बुजून जाते.
समाजमनाचे देखील असेच आहे. कुरकुरणारे आवाज आनंदी खुळखुळी पुढे दबले जातात.
माणसाने कसे नन्दी असले तरी आनन्दी असावे
1 Jun 2011 - 2:45 am | स्पंदना
वा! विजुभाउ! वा!
नन्दी असले तरी आनन्दी !! वा ! वा! वा! माशाल्ल्ला!
अब मेरा फंडा सुचेता! झाल ना एकदाच ? आता परत फिरवता येइल का? नाही ना? मग कसले काहुर? कुठली हुरहुर?
जरा विसावु या वळणावर्....या वळणावर
1 Jun 2011 - 10:00 am | अरुण मनोहर
>>दारुमध्ये व्हिटॅमिन "पी"असते.
दारुमध्ये व्हिटॅमिन(?) "पी" (pee) असते.
1 Jun 2011 - 11:04 am | नाना बेरके
खरंय, बोलल्यावर मन हलकं होतं.
'पी" व्हिटॅमीन घेतल्यावर मनंच काय.. माणूसच हलका होऊन तरंगायला लागतो.
वाट्टेल ते आणि वाट्टेल तेवढं बोलायला लागतो, मांडायला लागतो.
आनंदाने खुळखुळणारे आवाज कानात यायला लागतात.
आणि माणूस मग प्रतिसाद द्यायला लागतो ....
शिवांबूमध्ये व्हिटॅमिन "ई S S" असते.
2 Jun 2011 - 5:19 pm | तिमा
हल्लीच्या बर्याच धाग्यांमधे व्हिटॅमिन ' शी' असते.