अर्धसत्य..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जे न देखे रवी...
26 May 2011 - 5:10 pm

मूळ कविता - दिलिप चित्रे
अनुवाद - तात्या अभ्यंकर.

अर्ध सत्य..

चक्रव्युहात घुसण्यापूर्वी
कोण होतो मी, कसा़ होतो
हे मला माहीत नसेल..
चक्रव्युहात घुसल्यानंतर
माझ्या आणि चक्रव्युहादरम्यान
फक्त एक जवळीक होती जीवघेणी -
हे मला कळणारच नाही
चक्रव्युहातून बाहेर पडल्यावर
भले ही मी मुक्त होईन..
तरीही चक्रव्युहाच्या रचनेत
काहीच फरक पडणार नाही..

मरू की मारू? मारला जाईन की जीव घेईन?
याचा कधी निर्णयच होणार नाही..
झोपलेला मनुष्य जेव्हा झोपेतून उठून
चालायला लागतो,
तेव्हा त्याला स्वप्नांचा संसार
दुसर्‍यांदा कधीच दिसणार नाही..
निर्णयाच्या त्या प्रकाशात
सर्व काही सारखं असेल का?
एका पारड्यात नपुंसकता
आणि एका पारड्यात पौरुष
आणि तराजुच्या काट्यावर मधोमध,
अर्धसत्य..!

वाङ्मयमुक्तक

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

26 May 2011 - 5:43 pm | llपुण्याचे पेशवेll

मूळ कवितेचे कवि म्हणून चित्रेंचे नाव दिसते आहे. मूळ कविता कोणत्या भाषेत आहे? कारण ज्याअर्थी अनुवादकाचे नाव आहे त्या अर्थी मूळ कविता मराठीत नाही. असो.

छान कविता आहे. समोर आणल्याबद्दल तात्याचे आभार.

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2011 - 6:41 pm | परिकथेतील राजकुमार

आणि इथे चित्रपटातील मुळ दृष्य बघता येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2011 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, अनुवादित कविता आवडली अजून येऊ दे........!

(मूळ कविता दिली असती तर जाणकारांनी काही भर घातली असती किंवा काही उणिवा सांगितल्या असत्या असे वाटले)

-दिलीप बिरुटे
(तात्याच्या लेखनाचा फ्यान)

आनंदयात्री's picture

26 May 2011 - 7:33 pm | आनंदयात्री

सहमत आहे. अनुवाद आवडला.

मूकवाचक's picture

27 May 2011 - 9:22 pm | मूकवाचक

अजुन येउ द्या.

विसोबा खेचर's picture

27 May 2011 - 9:14 am | विसोबा खेचर

सर्वांचे आभार.. :)

(किंचित कवी) तात्या.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 May 2011 - 11:43 am | मिसळलेला काव्यप्रेमी

आपले मनःपूर्वक आभार इतकी सुंदर रचना, अनुवादीत करुन आम्हाला वाचायला दिल्याबद्दल!!

गोगोल's picture

28 May 2011 - 6:04 am | गोगोल

नेहमीच्या लेखांपेक्षा वेगळाच लेख..