आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
23 May 2011 - 10:12 pm

रानातली वाट.. एक न संपणारा परिघ -१

आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक
सुरकतलेल्या चेहर्‍यावरी तुझाच कयास
उसवला श्वास गड्या जणू संपला प्रवास

भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं
सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं
भुकेला पोटाला आता मातीची ढेकळं
पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं

आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!!

आस घे भिडायाला ओठी पिरतीचे गाण
रानातल्या पिकासाठी काळजाचा ठाव
हरवलं देहभान.. आता अंधारलं जग
मिठीत तुझ्या विसावलं माझं वेडं स्वप्नपान

------------- शब्दमेघ ( २३ मे २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ)

२. काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती

करुणजीवनमानरेखाटन

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

24 May 2011 - 12:57 am | पाषाणभेद

भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं
सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं
भुकेला पोटाला आता मातीची ढेकळं
पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं

हे छान समजले.

आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!!

म्हणजे चांगली चाहूल आहे काय?

आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!!

या ओळींचा अर्थ आहे...

करपलेल रानात आता पुन्हा नवतारुण्य घेवुन झाडांना.. रोपांना पुन्हा हिरवा शालु घेवुन नटायचे आहे..
पावसाच्या .. प्रियकराच्या अलिंगणा मध्ये चिंब भिजुन जायचे आहे. आणि म्हणुन आभाळाला भुई साकडे घालते आहे , असे चित्र आहे ह्या ओळीत.

(पण ही कविता रोमँटीक नाहि .. करुन असल्याने असे शब्दचित्र.. अश्या शब्दभावना ह्या कवितेत आल्या नाहीत..
पुढे सर्व पद्धतीत 'रानातील वाट... 'लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे तेंव्हा झाडांसाठी,.. हिरव्या शेतासाठी असे रोमँटीक लिहिणार आहे)

मनापासुन कविता वाचल्या बद्दल आभार.

प्राजु's picture

24 May 2011 - 4:38 am | प्राजु

चांगली आहे कविता. महानोरांच्या कवितांची आठवण झाली.

_/\_.

छान कवीता.

गडबडीत आहे गणेशा , पण काहितरी छान दिसतय , नंतर एडीट करते.

__/\__

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2011 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त.....!

-दिलीप बिरुटे

दत्ता काळे's picture

24 May 2011 - 10:15 am | दत्ता काळे

प्राजुच्या म्हणण्याप्रमाणे - महानोरांच्या कवितांची आठवण झाली.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 May 2011 - 11:08 am | मिसळलेला काव्यप्रेमी

असं काहीतरी लिहीता येणे म्हणजेच, संवेदनशील मनाचे लक्षण आहे.
खुप सुंदर गणेशा!!

सर्वांचे मनपुर्वक आभार..

नविन लिखानाला सुरवात करतानाच असे सुंदर प्रतिसाद पाहुन खुप छान वाटले.. मनापासुन.

प्राजु जी आणि दत्ता जी ना.धो.महानोर यांच्या कविता म्हणजे खुपच जबरदस्त आहेत. तशी उंची गाठायला तेव्हडा अनुभव नाहिच.. पण तुम्ही असे लिहिल्याने छान वाटले.

अवांतर :
ना.धो.महानोर यांच्या स्वताच्या चालीत. त्यांच्या समोर त्यांच्या काही कविता ऐकल्या आहे.. ( वंसत व्याखानमाला, उरुळी कांचन), मी कात टाकली .. आणि नभ उतरु आलं.. जबरदस्तच आहेत.

स्वर भायदे's picture

24 May 2011 - 5:19 pm | स्वर भायदे

छान कविता आहे गणेशा
भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं
सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं
हे आवडलं( शेतकऱ्याची नेमकी मनोवस्था अशीच झाली आहे.)

मृत्युन्जय's picture

24 May 2011 - 5:32 pm | मृत्युन्जय

मस्त रे गणेशा.

प्यारे१'s picture

24 May 2011 - 5:50 pm | प्यारे१

सही रे शब्दमेघ....

सखी's picture

24 May 2011 - 9:54 pm | सखी

चांगली कविता!! छान असं लिहणार होते पण त्यातल्या कारुण्याने तसं लिहावसं वाटलं नाही.
पांगिरा कधी पहायला मिळतो कुणास ठाऊक, पण हे तश्याच एखाद्या चित्रपटातील गाणं वाटावं इतकी चांगली झालीय कविता असं म्हणावेसे वाटते.

पैसा's picture

24 May 2011 - 11:21 pm | पैसा

मला सुरुवातीला सगळा अर्थ लागला नव्हता, पण परत वाचली आणि तू लिहिलेला अर्थ वाचला तेव्हा कळले.

अरुण मनोहर's picture

25 May 2011 - 7:47 am | अरुण मनोहर

एक सुंदर कविता.
गणेशा, आणखीन येऊ देत. शुभेच्छा.

प्रकाश१११'s picture

25 May 2011 - 8:24 am | प्रकाश१११

गणेशा -खूपच मस्त .खूप आवडली

भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं
सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं
भुकेला पोटाला आता मातीची ढेकळं
पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं
हे छान लिहिले आहे.

अमोल केळकर's picture

25 May 2011 - 9:24 am | अमोल केळकर

सुंदर रचना :)

अमोल केळकर