गाभा:
एका मूलतत्ववाद्याच्या म्हणण्यानुसार आज २१ मे रोजी अंतिम निवाड्याचा दिवस (Day of reckoning) आहे.
आज जगाचा शेवट होणार असून आपण केलेल्या कृत्यांचा हिशोब आज होणार आहे.
तेव्हा उद्या सगळे तिकडेच म्हणजे चित्रगुप्ताच्या/सेंटपीटरच्या कोर्टात भेटू म्हणतो. अनायासे मिपा कट्टा पण होऊन जाईल. :)
त्यानंतरही मिपा चालूच राहील अशी आशा आहे.
पण मिपाचा सर्वर स्वर्गात असणार की नरकात?
सर्व्हर स्वर्गात असेल तर मला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येईल का?
मी नरकात असणार याची खात्री आहे.
सर्व्हर नरकात ठेवलेला बरा कारण सगळे डीबी अॅडमिनवाले पण नरकातच असणार. :)
जाऊद्या कशाला विचार करायचा एवढा? उद्या बघू !!!!!!
प्रतिक्रिया
21 May 2011 - 5:12 am | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
खपाखपी झाली =)) =)) =)) हा मुलतत्ववादी कोण महाभाग आहे मनोरंजक आहे ..
बाकी थत्तेचाचा , उद्या नर्कात भेटु .. रावणचौकात .. :) तात्याही असेल तिकडेच ;) मस्त दारवा पिउ , पानं खाऊन पचापचा थुंकू ... मिसळपाव वरच्या आघाव म्हैला दिसल्या तर त्यांना शिट्ट्या बिट्ट्या मारु .. .. जिकडं जाऊ तिकडं पापं करु :)
25 May 2011 - 11:21 am | मालोजीराव
पुण्यात कैक पोस्टर लागलेत या महाभागांचे २१ मे चे
21 May 2011 - 5:18 am | वेताळ
पण सुरुवात आज संध्याकाळ पासुन होईल असे त्या पादर्याचे म्हणणे आहे.
25 May 2011 - 9:39 am | शिल्पा ब
ई!!! पाद्र्याचे काय म्हणता फादरचे किंवा चर्चवाल्याचे म्हणा.
ब्याकवर्ड कुठचे!!
21 May 2011 - 5:23 am | प्यारे१
त्ये जाऊ दे हो चाचा.
साला सब्बीच जाने वाले होएंगे तो टेन्शन काय का?
उधर टार्या की आवडती चिकन बिर्यानी और तात्या क्या आवडत्या सौदींडियन हिरवनी के जैसे दिक्ने वाल्या अप्सरा मिलेंग्या ना? फिर काय का टेन्शन?
आज कुणाला दिवंगत माजी पंतप्रधानांची आठवण कशी काय नाय आली?
21 May 2011 - 5:36 am | अन्या दातार
नक्की कुठे असेन माहित नाही, पण थत्तेचाचा, टारुभौ, प्यारेभौ वगैरे समदीच नर्कात असतील तर तिकडेच येईन म्हणतो. नरक कट्टा करावा का परवाच??
21 May 2011 - 5:37 am | स्पा
चायला मिपाकर नरकात भेटले तरी आपल्यासाठी तो स्वर्गच असेल
21 May 2011 - 5:55 am | अमोल केळकर
प्रतिसाद आवडला :)
अमोल केळकर
21 May 2011 - 6:23 am | विजुभाऊ
बहुतेक श्री श्री श्री डानराव हे तिथे पोहोचणार नाहीत.
वायदेआझम असल्यामुळे ते तिथे येतो असे सांगून ऐन वेळेला कलटी देतील आणि इथेच रहातील
21 May 2011 - 2:49 pm | Nile
च्यायला तुम्ही लोक अजून खालीच का? इथे पण उशीर!! या लवकर,एकटा कंटाळलोय इथे!
24 May 2011 - 12:02 am | कुंदन
आपण तर बुवा वसुली झाल्याशिवाय काही येणार नाही हां ....
नाही म्हणजे आमचे ठरलेच आहे तसे.
24 May 2011 - 7:59 pm | सहज
बघा!! कुंदनसेठच्या वसुलीच्या हट्टापायी परमेश्वराला जगबुडी पुढे ढकलावी लागली तर!!
24 May 2011 - 11:23 pm | कुंदन
तो निळ्या एकटा वर जाउन बसलाय ,त्याला आणा खाली कोणीतरी.
साला एकटा अप्सरांबरोबर मजा करत असेल तिथे.
25 May 2011 - 5:17 am | सहज
निळ्या आता एकटा नाही. ओ-बी-एल त्याच्या सोबतीला आहे. तो ओबीएल 'बाकीचे ७१ कुठे आहेत?' असे निळ्याला सारखे सारखे विचारत होता म्हणे.
25 May 2011 - 7:14 am | पंगा
अगागागागागागागा! :P
25 May 2011 - 7:38 am | पैसा
स्वर्गात कसा पोचला? चित्रगुप्ताच्या खात्यात काही तरी गडबड आहे!
25 May 2011 - 8:19 am | धनंजय
उरलेले सत्तर कुठे?
25 May 2011 - 12:38 pm | Nile
सहजकाकांनाच माहित! सहजकाका, सोडा आता त्या सत्तर लोकांना, एखादा ठेवून घ्या हवं तर ! ;-)
25 May 2011 - 12:40 pm | Nile
ह्या मराठी माणसांना दुसर्याचं सुख बघवत नाही म्हणतात ते काही खोटं नाही!! तसंही कुंदनशेठ येणार हे ऐकुन बर्याच अप्सरांनी पलिकडे मूव्ह केलं अशी वार्ता ऐकली.
25 May 2011 - 12:48 pm | सूड
तसंही कुंदनशेठ येणार हे ऐकुन बर्याच अप्सरांनी पलिकडे मूव्ह केलं अशी वार्ता ऐकली.
म्हणजे ऐलतीराहून पैलतीरीच ना !! ;)
26 May 2011 - 10:32 pm | विजुभाऊ
साला एकटा अप्सरांबरोबर मजा करत असेल तिथे.
हॅ.... त्या अप्सरा कित्येक शतके वयाच्या आहेत. सध्या संधीवातामुळे बैठी गाणी सुद्धा गाउ शकत नाहीत
21 May 2011 - 7:32 pm | नावातकायआहे
पन सरव 'सोईं'सकट भेटा!
21 May 2011 - 10:19 pm | १.५ शहाणा
चला गम कि पर्टि करु या
21 May 2011 - 11:06 pm | विकास
=)) =))
मस्त! तुमच्या नाडीपट्टीप्रमाणे अजून टाईम हाय! तेंव्हा कल्जी नसावी! ;)
बाकी यावरून एनपीआर, न्यूयॉर्क टाईम्स सकट सर्वत्र बातम्या आल्या याचे जास्त आश्चर्य वाटले होते. ९२ साली बॉस्टनला असले महाभाग बघितले होते. तेंव्हा त्यांच्या दृष्टीने इथल्या स्टेडीयममधे साक्षात एका ठराविक दिवशी येशू ख्रिस्त प्रकट होणार होता.
थोडे अवांतरः खूपपुर्वीची सांगितलेली एक गोष्ट. मुंबईत एका जत्रेत "कुत्ता राम बोलता है" म्हणून बोर्ड होता. पब्लीक पैसे देऊन बघायला गेले. त्या माणसाने कुत्र्याकडून अनेक करामती करवून घेतल्या. नंतर शो खतम म्हणल्यावर लोकांनी, कुत्र्याने राम म्हणले नव्हते म्हणून विचारले, तर तो म्हणाला, "कुत्ता कभी राम बोल सकेगा क्या?" पब्लीकने त्याला राम म्हणायची वेळ येई पर्यंत धुऊन काढले. :-)
22 May 2011 - 10:12 am | प्रदीप
खूप पूर्वी कुत्रे तसे करायचे. पण नंतर, म्हणजे गेल्या चार पाच दशकात ते सगळे बदलले. आता कुत्रे विशीष्ट 'जी' अथवा 'साहेबा'च्या नावाचा उच्चारच काय, चक्क जपच कऊ शकतात! कुठल्याही एका वेळी ते फक्त एकाच 'जी'अथवा 'साहेबा'चे नाव घेतात. पण काळवेळ बदलली की ते दुसर्या 'जी/साहेबा' च्या नावाचा जप करू लागतात. आणि हे परिवर्तन ते एका रात्रीत घडवून आणतात!
ह्याला म्हणतात rapid strides towrds being a supper-dupper power!
22 May 2011 - 10:13 am | प्रदीप
.
22 May 2011 - 10:32 am | नरेशकुमार
अरे काय ! कोनंच नाय इकडं.
मी कधी पासुन वाट पाहतोयं
मुक्कम पोस्ट New Hell Town. Near Inter-Universe Air port. West. Pin : 4.3456 E10
22 May 2011 - 10:37 am | सुहास..
वरील बातमीवर " दिग्गी राजा " काय म्हणतात या कडे लक्ष देत आहोत ..
बाकी थत्ते चाचा , तिथ भेटुच !
22 May 2011 - 2:12 pm | देवदत्त
बाकी अमेरिकेकरिता ते म्हणजेच पूर्ण जग असेही काही वेळा असते ना.. :)
22 May 2011 - 4:56 pm | गौत्या
भले शाब्बास तुम्हा सर्वान्च्या गप्पा वाचून अस्मादिकान्ची यथेच्छ करमणूक झाली त्याबद्दल तुम्हा सर्वान्ना ही बातमी भेट.
http://news.yahoo.com/s/afp/20110518/od_afp/usreligionanimalsoffbeat_201...
23 May 2011 - 3:30 pm | सुधीर काळे
नितिन, आपली भेट (लवकरच) ठाण्यालाच होईल असे वाटते!
23 May 2011 - 9:30 pm | विकास
नितिन, आपली भेट (लवकरच) ठाण्यालाच होईल असे वाटते!
ठाणे हे नरकच काय नरकासमान देखील नाही! ;)
23 May 2011 - 10:29 pm | आनंदयात्री
कॉलिंग अदिती .. कॉलिंग मेघना .. !!
25 May 2011 - 11:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ठाणं आहेच भिक्कारडं, मला अजिबात आवडत नाही. एक कचराळीचा तलाव वगळता बाकी ठाण्यात काहीही चांगलं नाही; काय आंद्या, बरोबर ना?
25 May 2011 - 10:38 pm | विकास
एक कचराळीचा तलाव
हा नरकसदृश भाग आहे का? कारण जे वर्जिनल ठाणे आहे त्यात प्रामुख्याने, "स्वर्ग से सुंदर" मासुंदा तलावच येतो. पाचपाखाडी वगैरे तसे अंमळ गावाबाहेरचेच ;)
26 May 2011 - 12:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कचराळीच्या तलावाचा इतिहास लवकर लिहील्या जाईल. वर्जिनल ठाण्यात आता पाऊल ठेवण्याएवढीही जागा सापडत नाही. खान्देशातल्या लोकांना कचराळी नरक वाटू शकतो.
25 May 2011 - 10:44 pm | आनंदयात्री
>>काय आंद्या, बरोबर ना?
ठाणे आणि ठाणेकर दोन्ही 'तसले'च ..
-
(जाड बुडाचा तरीही ठाणेकर नसलेला)
आंद्या ठाणेदार
25 May 2011 - 10:50 pm | माझीही शॅम्पेन
ठाण्यला नरक म्हणायचे तर मग पुण्यला काय म्हणायाच ? (स्वर्ग हा पर्याय नाहीए)
तसही आता पूर्वीच ठाण राहिला नाही आता ( पु.ल च्या पुणेकर धर्तीवर )
26 May 2011 - 12:13 am | आनंदयात्री
>>ठाण्यला नरक म्हणायचे तर मग पुण्यला काय म्हणायाच ?
विद्येचे माहेरघर :)
-
माझीही क्वार्टर
26 May 2011 - 4:58 am | नरेशकुमार
पन विद्या आजकाल माहेरी रहाते का ?
-
माझाहा हाफ.
26 May 2011 - 6:59 am | विकास
>>ठाण्यला नरक म्हणायचे तर मग पुण्यला काय म्हणायाच ?
विद्येचे माहेरघर :-)
मला तुमच्या भावना कळताहेत, पण काय करणार, पुर्वीचं पुणं नाही ना राहीलं आता! ;)
23 May 2011 - 11:16 pm | राजेश घासकडवी
स्वर्गात आहोत की नरकात? काही फारसं वेगळं वाटत नाहीये.
25 May 2011 - 11:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
काल रात्री स्वर्गात होते. तेव्हा चुकीच्या गाडीत बसले आणि आज नरकात पोहोचले आहे. ;-)
28 May 2011 - 6:16 am | गोगोल
=)=)=)
25 May 2011 - 5:44 am | नगरीनिरंजन
.
25 May 2011 - 5:41 am | नगरीनिरंजन
.
1 Nov 2012 - 10:52 am | नितिन थत्ते
.
2 Nov 2012 - 10:17 pm | नितिन थत्ते
या धाग्यात फक्त विकासरावांचेच प्रतिसाद दिसतायत.....
3 Nov 2012 - 11:26 am | तिमा
धागा वर काढण्याची युक्ती आवडली. तसेही २१ डिसेंबरसाठी हाच धागा पुन्हा चालवता येईल.