✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उद्या कुठे भेटणार?

न
नितिन थत्ते यांनी
Sat, 05/21/2011 - 05:06  ·  लेख
लेख
एका मूलतत्ववाद्याच्या म्हणण्यानुसार आज २१ मे रोजी अंतिम निवाड्याचा दिवस (Day of reckoning) आहे. आज जगाचा शेवट होणार असून आपण केलेल्या कृत्यांचा हिशोब आज होणार आहे. तेव्हा उद्या सगळे तिकडेच म्हणजे चित्रगुप्ताच्या/सेंटपीटरच्या कोर्टात भेटू म्हणतो. अनायासे मिपा कट्टा पण होऊन जाईल. :) त्यानंतरही मिपा चालूच राहील अशी आशा आहे. पण मिपाचा सर्वर स्वर्गात असणार की नरकात? सर्व्हर स्वर्गात असेल तर मला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येईल का? मी नरकात असणार याची खात्री आहे. सर्व्हर नरकात ठेवलेला बरा कारण सगळे डीबी अ‍ॅडमिनवाले पण नरकातच असणार. :) जाऊद्या कशाला विचार करायचा एवढा? उद्या बघू !!!!!!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12195 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

=)) =)) =)) =)) =)) =))

टारझन
Sat, 05/21/2011 - 05:12 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) खपाखपी झाली =)) =)) =)) हा मुलतत्ववादी कोण महाभाग आहे मनोरंजक आहे .. बाकी थत्तेचाचा , उद्या नर्कात भेटु .. रावणचौकात .. :) तात्याही असेल तिकडेच ;) मस्त दारवा पिउ , पानं खाऊन पचापचा थुंकू ... मिसळपाव वरच्या आघाव म्हैला दिसल्या तर त्यांना शिट्ट्या बिट्ट्या मारु .. .. जिकडं जाऊ तिकडं पापं करु :)
  • Log in or register to post comments

पुण्यात कैक पोस्टर लागलेत या

मालोजीराव
Wed, 05/25/2011 - 11:21 नवीन
पुण्यात कैक पोस्टर लागलेत या महाभागांचे २१ मे चे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

चालेल मग भेटायला काय हरकत नाही

वेताळ
Sat, 05/21/2011 - 05:18 नवीन
पण सुरुवात आज संध्याकाळ पासुन होईल असे त्या पादर्‍याचे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments

ई!!! पाद्र्याचे काय म्हणता

शिल्पा ब
Wed, 05/25/2011 - 09:39 नवीन
ई!!! पाद्र्याचे काय म्हणता फादरचे किंवा चर्चवाल्याचे म्हणा. ब्याकवर्ड कुठचे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

त्ये जाऊ दे हो चाचा.साला

प्यारे१
Sat, 05/21/2011 - 05:23 नवीन
त्ये जाऊ दे हो चाचा. साला सब्बीच जाने वाले होएंगे तो टेन्शन काय का? उधर टार्‍या की आवडती चिकन बिर्यानी और तात्या क्या आवडत्या सौदींडियन हिरवनी के जैसे दिक्ने वाल्या अप्सरा मिलेंग्या ना? फिर काय का टेन्शन? आज कुणाला दिवंगत माजी पंतप्रधानांची आठवण कशी काय नाय आली?
  • Log in or register to post comments

मी

अन्या दातार
Sat, 05/21/2011 - 05:36 नवीन
नक्की कुठे असेन माहित नाही, पण थत्तेचाचा, टारुभौ, प्यारेभौ वगैरे समदीच नर्कात असतील तर तिकडेच येईन म्हणतो. नरक कट्टा करावा का परवाच??
  • Log in or register to post comments

चायला मिपाकर नरकात भेटले तरी

स्पा
Sat, 05/21/2011 - 05:37 नवीन
चायला मिपाकर नरकात भेटले तरी आपल्यासाठी तो स्वर्गच असेल
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला अमोल केळकर

अमोल केळकर
Sat, 05/21/2011 - 05:55 नवीन
प्रतिसाद आवडला :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बहुतेक श्री श्री श्री डानराव

विजुभाऊ
Sat, 05/21/2011 - 06:23 नवीन
बहुतेक श्री श्री श्री डानराव हे तिथे पोहोचणार नाहीत. वायदेआझम असल्यामुळे ते तिथे येतो असे सांगून ऐन वेळेला कलटी देतील आणि इथेच रहातील
  • Log in or register to post comments

च्यायला तुम्ही लोक अजून खालीच

Nile
Sat, 05/21/2011 - 14:49 नवीन
च्यायला तुम्ही लोक अजून खालीच का? इथे पण उशीर!! या लवकर,एकटा कंटाळलोय इथे!
  • Log in or register to post comments

या लवकर....

कुंदन
Tue, 05/24/2011 - 00:02 नवीन
आपण तर बुवा वसुली झाल्याशिवाय काही येणार नाही हां .... नाही म्हणजे आमचे ठरलेच आहे तसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

:-)

सहज
Tue, 05/24/2011 - 19:59 नवीन
बघा!! कुंदनसेठच्या वसुलीच्या हट्टापायी परमेश्वराला जगबुडी पुढे ढकलावी लागली तर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

अरे पण

कुंदन
Tue, 05/24/2011 - 23:23 नवीन
तो निळ्या एकटा वर जाउन बसलाय ,त्याला आणा खाली कोणीतरी. साला एकटा अप्सरांबरोबर मजा करत असेल तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

करेक्शन

सहज
Wed, 05/25/2011 - 05:17 नवीन
निळ्या आता एकटा नाही. ओ-बी-एल त्याच्या सोबतीला आहे. तो ओबीएल 'बाकीचे ७१ कुठे आहेत?' असे निळ्याला सारखे सारखे विचारत होता म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

--/\--

पंगा
Wed, 05/25/2011 - 07:14 नवीन
अगागागागागागागा! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ओबीएल

पैसा
Wed, 05/25/2011 - 07:38 नवीन
स्वर्गात कसा पोचला? चित्रगुप्ताच्या खात्यात काही तरी गडबड आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

इनोसंट

धनंजय
Wed, 05/25/2011 - 08:19 नवीन
उरलेले सत्तर कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सहजकाकांनाच माहित! सहजकाका,

Nile
Wed, 05/25/2011 - 12:38 नवीन
सहजकाकांनाच माहित! सहजकाका, सोडा आता त्या सत्तर लोकांना, एखादा ठेवून घ्या हवं तर ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

तो निळ्या एकटा वर जाउन बसलाय

Nile
Wed, 05/25/2011 - 12:40 नवीन
तो निळ्या एकटा वर जाउन बसलाय ,त्याला आणा खाली कोणीतरी. साला एकटा अप्सरांबरोबर मजा करत असेल तिथे.
ह्या मराठी माणसांना दुसर्‍याचं सुख बघवत नाही म्हणतात ते काही खोटं नाही!! तसंही कुंदनशेठ येणार हे ऐकुन बर्‍याच अप्सरांनी पलिकडे मूव्ह केलं अशी वार्ता ऐकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

म्हणजे

सूड
Wed, 05/25/2011 - 12:48 नवीन
तसंही कुंदनशेठ येणार हे ऐकुन बर्‍याच अप्सरांनी पलिकडे मूव्ह केलं अशी वार्ता ऐकली. म्हणजे ऐलतीराहून पैलतीरीच ना !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

साला एकटा अप्सरांबरोबर मजा

विजुभाऊ
गुरुवार, 05/26/2011 - 22:32 नवीन
साला एकटा अप्सरांबरोबर मजा करत असेल तिथे. हॅ.... त्या अप्सरा कित्येक शतके वयाच्या आहेत. सध्या संधीवातामुळे बैठी गाणी सुद्धा गाउ शकत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

कुठ भी भेटा!

नावातकायआहे
Sat, 05/21/2011 - 19:32 नवीन
पन सरव 'सोईं'सकट भेटा!
  • Log in or register to post comments

गम कि पर्टि

१.५ शहाणा
Sat, 05/21/2011 - 22:19 नवीन
चला गम कि पर्टि करु या
  • Log in or register to post comments

आगे बढो!

विकास
Sat, 05/21/2011 - 23:06 नवीन
=)) =)) मस्त! तुमच्या नाडीपट्टीप्रमाणे अजून टाईम हाय! तेंव्हा कल्जी नसावी! ;) बाकी यावरून एनपीआर, न्यूयॉर्क टाईम्स सकट सर्वत्र बातम्या आल्या याचे जास्त आश्चर्य वाटले होते. ९२ साली बॉस्टनला असले महाभाग बघितले होते. तेंव्हा त्यांच्या दृष्टीने इथल्या स्टेडीयममधे साक्षात एका ठराविक दिवशी येशू ख्रिस्त प्रकट होणार होता. थोडे अवांतरः खूपपुर्वीची सांगितलेली एक गोष्ट. मुंबईत एका जत्रेत "कुत्ता राम बोलता है" म्हणून बोर्ड होता. पब्लीक पैसे देऊन बघायला गेले. त्या माणसाने कुत्र्याकडून अनेक करामती करवून घेतल्या. नंतर शो खतम म्हणल्यावर लोकांनी, कुत्र्याने राम म्हणले नव्हते म्हणून विचारले, तर तो म्हणाला, "कुत्ता कभी राम बोल सकेगा क्या?" पब्लीकने त्याला राम म्हणायची वेळ येई पर्यंत धुऊन काढले. :-)
  • Log in or register to post comments

खूप पूर्वी

प्रदीप
Sun, 05/22/2011 - 10:12 नवीन
थोडे अवांतरः खूपपुर्वीची सांगितलेली एक गोष्ट.
खूप पूर्वी कुत्रे तसे करायचे. पण नंतर, म्हणजे गेल्या चार पाच दशकात ते सगळे बदलले. आता कुत्रे विशीष्ट 'जी' अथवा 'साहेबा'च्या नावाचा उच्चारच काय, चक्क जपच कऊ शकतात! कुठल्याही एका वेळी ते फक्त एकाच 'जी'अथवा 'साहेबा'चे नाव घेतात. पण काळवेळ बदलली की ते दुसर्‍या 'जी/साहेबा' च्या नावाचा जप करू लागतात. आणि हे परिवर्तन ते एका रात्रीत घडवून आणतात! ह्याला म्हणतात rapid strides towrds being a supper-dupper power!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

प्र. का. टा. आ.

प्रदीप
Sun, 05/22/2011 - 10:13 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अरे काय ! कोनंच नाय इकडं.मी

नरेशकुमार
Sun, 05/22/2011 - 10:32 नवीन
अरे काय ! कोनंच नाय इकडं. मी कधी पासुन वाट पाहतोयं मुक्कम पोस्ट New Hell Town. Near Inter-Universe Air port. West. Pin : 4.3456 E10
  • Log in or register to post comments

वरील बातमीवर " दिग्गी राजा "

सुहास..
Sun, 05/22/2011 - 10:37 नवीन
वरील बातमीवर " दिग्गी राजा " काय म्हणतात या कडे लक्ष देत आहोत .. बाकी थत्ते चाचा , तिथ भेटुच !
  • Log in or register to post comments

बाकी अमेरिकेकरिता ते म्हणजेच

देवदत्त
Sun, 05/22/2011 - 14:12 नवीन
बाकी अमेरिकेकरिता ते म्हणजेच पूर्ण जग असेही काही वेळा असते ना.. :)
  • Log in or register to post comments

भले शाब्बास तुम्हा

गौत्या
Sun, 05/22/2011 - 16:56 नवीन
भले शाब्बास तुम्हा सर्वान्च्या गप्पा वाचून अस्मादिकान्ची यथेच्छ करमणूक झाली त्याबद्दल तुम्हा सर्वान्ना ही बातमी भेट. http://news.yahoo.com/s/afp/20110518/od_afp/usreligionanimalsoffbeat_2011051818
  • Log in or register to post comments

नितिन, आपली भेट (लवकरच) ठाण्यालाच होईल असे वाटते!

सुधीर काळे
Mon, 05/23/2011 - 15:30 नवीन
नितिन, आपली भेट (लवकरच) ठाण्यालाच होईल असे वाटते!
  • Log in or register to post comments

कसं शक्य आहे?

विकास
Mon, 05/23/2011 - 21:30 नवीन
नितिन, आपली भेट (लवकरच) ठाण्यालाच होईल असे वाटते! ठाणे हे नरकच काय नरकासमान देखील नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

कॉलिंग अदिती

आनंदयात्री
Mon, 05/23/2011 - 22:29 नवीन
कॉलिंग अदिती .. कॉलिंग मेघना .. !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

तुमने पुकारा ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/25/2011 - 11:30 नवीन
ठाणं आहेच भिक्कारडं, मला अजिबात आवडत नाही. एक कचराळीचा तलाव वगळता बाकी ठाण्यात काहीही चांगलं नाही; काय आंद्या, बरोबर ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

कदाचीत

विकास
Wed, 05/25/2011 - 22:38 नवीन
एक कचराळीचा तलाव हा नरकसदृश भाग आहे का? कारण जे वर्जिनल ठाणे आहे त्यात प्रामुख्याने, "स्वर्ग से सुंदर" मासुंदा तलावच येतो. पाचपाखाडी वगैरे तसे अंमळ गावाबाहेरचेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कचराळीच्या तलावाचा इतिहास

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/26/2011 - 00:00 नवीन
कचराळीच्या तलावाचा इतिहास लवकर लिहील्या जाईल. वर्जिनल ठाण्यात आता पाऊल ठेवण्याएवढीही जागा सापडत नाही. खान्देशातल्या लोकांना कचराळी नरक वाटू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ठाणे

आनंदयात्री
Wed, 05/25/2011 - 22:44 नवीन
>>काय आंद्या, बरोबर ना? ठाणे आणि ठाणेकर दोन्ही 'तसले'च .. - (जाड बुडाचा तरीही ठाणेकर नसलेला) आंद्या ठाणेदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ठाण्यला नरक म्हणायचे तर मग

माझीही शॅम्पेन
Wed, 05/25/2011 - 22:50 नवीन
ठाण्यला नरक म्हणायचे तर मग पुण्यला काय म्हणायाच ? (स्वर्ग हा पर्याय नाहीए) तसही आता पूर्वीच ठाण राहिला नाही आता ( पु.ल च्या पुणेकर धर्तीवर )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

पुण्याला

आनंदयात्री
गुरुवार, 05/26/2011 - 00:13 नवीन
>>ठाण्यला नरक म्हणायचे तर मग पुण्यला काय म्हणायाच ? विद्येचे माहेरघर :) - माझीही क्वार्टर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

पुने विद्येचे माहेरघर पन

नरेशकुमार
गुरुवार, 05/26/2011 - 04:58 नवीन
पुने विद्येचे माहेरघर
पन विद्या आजकाल माहेरी रहाते का ? - माझाहा हाफ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

पण

विकास
गुरुवार, 05/26/2011 - 06:59 नवीन
>>ठाण्यला नरक म्हणायचे तर मग पुण्यला काय म्हणायाच ? विद्येचे माहेरघर :-) मला तुमच्या भावना कळताहेत, पण काय करणार, पुर्वीचं पुणं नाही ना राहीलं आता! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

पोचलो का?

राजेश घासकडवी
Mon, 05/23/2011 - 23:16 नवीन
स्वर्गात आहोत की नरकात? काही फारसं वेगळं वाटत नाहीये.
  • Log in or register to post comments

काल रात्री स्वर्गात होते.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/25/2011 - 11:31 नवीन
काल रात्री स्वर्गात होते. तेव्हा चुकीच्या गाडीत बसले आणि आज नरकात पोहोचले आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हाहाहाहा

गोगोल
Sat, 05/28/2011 - 06:16 नवीन
=)=)=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

.

नगरीनिरंजन
Wed, 05/25/2011 - 05:44 नवीन
.
  • Log in or register to post comments

.

नगरीनिरंजन
Wed, 05/25/2011 - 05:41 नवीन
.
  • Log in or register to post comments

.

नितिन थत्ते
गुरुवार, 11/01/2012 - 10:52 नवीन
.
  • Log in or register to post comments

?

नितिन थत्ते
Fri, 11/02/2012 - 22:17 नवीन
या धाग्यात फक्त विकासरावांचेच प्रतिसाद दिसतायत.....
  • Log in or register to post comments

धागा

तिमा
Sat, 11/03/2012 - 11:26 नवीन
धागा वर काढण्याची युक्ती आवडली. तसेही २१ डिसेंबरसाठी हाच धागा पुन्हा चालवता येईल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा