उद्या कुठे भेटणार?
एका मूलतत्ववाद्याच्या म्हणण्यानुसार आज २१ मे रोजी अंतिम निवाड्याचा दिवस (Day of reckoning) आहे.
आज जगाचा शेवट होणार असून आपण केलेल्या कृत्यांचा हिशोब आज होणार आहे.
तेव्हा उद्या सगळे तिकडेच म्हणजे चित्रगुप्ताच्या/सेंटपीटरच्या कोर्टात भेटू म्हणतो. अनायासे मिपा कट्टा पण होऊन जाईल. :)
त्यानंतरही मिपा चालूच राहील अशी आशा आहे.
पण मिपाचा सर्वर स्वर्गात असणार की नरकात?
सर्व्हर स्वर्गात असेल तर मला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येईल का?
मी नरकात असणार याची खात्री आहे.
सर्व्हर नरकात ठेवलेला बरा कारण सगळे डीबी अॅडमिनवाले पण नरकातच असणार. :)
जाऊद्या कशाला विचार करायचा एवढा? उद्या बघू !!!!!!
वाचन
12225
प्रतिक्रिया
49