डाल ग कोंबडी डाल

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
20 May 2011 - 10:16 pm

डाल ग कोंबडी डाल

डाल ग कोंबडी डाल, तू लवकर कोंबडी डाल ग
अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||धृ||

चोच बारीक लाल लाल पिसं
पळतीया कुठं, पकड निट
हाती धरून आण तिला इथं
नको करू तिच्या जिवाचे हालं ग
डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग
अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||१||

तुरेवाल्या कोंबड्याला कोंबडी लई ग प्यारी
दानं घाल दोघांना, झाली आपली न्याहारी
पानी प्यायाला निर्मळ घाल पारातीत
पोरासोरांना खेळू नको देवू तिथं
एकांत मिळू दे दोघांना आता
कुत्रं मांजर तू लांब हाकलं ग
डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग ||२||

अंडी, चिकन, आक्खी कोंबडी
बाजारात विकाया मी जाई
त्याच्या मधूनच होई कमाई
किराणामाल घरी घेवून येई
तयार रहा, वाजलेका सहा
ताट वाढून ठेव, मला लई भुक लागलं ग
डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२१/०५/२०११

कविताजीवनमान

प्रतिक्रिया

स्वानन्द's picture

20 May 2011 - 11:47 pm | स्वानन्द

:) मजा आली.

नाना बेरके's picture

21 May 2011 - 4:47 am | नाना बेरके

तुमची हि कविता एखाद्या संगीतकाराला चाल लावायला द्या.
"कोंबडी पळाली, तंगडी धरून" ..... पेक्षा ही कविता कितीतरी उजवी आहे.

अरुण मनोहर's picture

22 May 2011 - 10:26 am | अरुण मनोहर

मस्त रस्सा!