एक छोट्या बहरातली गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. बघा आवडते का --
लिहू नवी गझल जरा
व्यथे अजून सल जरा
भ्रमात या खुशाल मी
खर्यास दे बगल जरा
असेच टाळ नेहमी
अशीच घे दखल जरा
मना कधी कळेल का
तुला तुझाच कल जरा
नवीन स्वप्न पाहु दे
हवा तुला बदल जरा
असेल ध्रुव एकटा
मलाहि ये ढकल जरा..!
प्रतिक्रिया
18 May 2011 - 4:21 pm | आत्मशून्य
.
18 May 2011 - 10:50 pm | मितभाषी
हे मुझको भी तु लिफ्ट करादे च भाशांतर आहे का?
19 May 2011 - 4:10 am | टारझन
वा !! काय काव्य आहे .. अगदी आवर्जुन दखल घ्यावं असं ! वा !!
- उपट^^
7 Jul 2017 - 2:31 am | सत्यजित...
खरेतर अश्या छोट्या बहरात लिहिणं म्हणजे अतिशय अवघड काम.खूप छान गझल...जवळपास सर्वच शेर आवडले!
अगदी समोरासमोर बसून बोलल्यासारखा लेहजा परिणाम साधतो आहे! मतला खासंच,शिवाय,
>>>असेच टाळ नेहमी
अशीच घे दखल जरा>>>सुंदर!
7 Jul 2017 - 10:23 am | चांदणे संदीप
सुरेख!
Sandy