गृहिणीच "सोप्प "लाईफ
सकाळ झाली गजर वाजला, निवांत झोपलेला जीव माझा दचकून उठला ,
वाटल होत आज जरास उठाव उशिरा ,नवऱ्याच फर्मान होऊन जाऊदे आज बदाम शिरा ,
बेल एकदाच वाजवायची असते हे दुधवाल्याला कळत नाही ,
दार उघडेपर्यंत त्याच बेलवरच बोट ढळत नाही,
छोट्या सोन्याला उठवायची रोजची आहे कसरत
झोपेत असतो तरी नेम धरून लाथा मारतो ,
त्याला उठवायची नाही होत लवकर हिम्मत
सकाळच्या या गोंधळात छोटी छकुलीही उठते
माझ्याकडे इवले हात पसरत मम्मा मला घे न ,घे ना, करत माझ्यामागे फिरते ,
दोन चार दात तिच्या तोंडात तरी ब्रश करण्याची तिला घाई
किती वेळा समजावलं सोनी पेस्ट ब्रशला लावतात खात नाही
कडेवर छकूलीला घेऊन दोन घोट चहाचे घशाखाली उतरवते
छोट्या सोनुचा प्रश्न "आज आई कटलेट देते की सॅण्डविच देते ?
आज सोन्या भाजी पोळी उद्या नक्की म्हणून कसबस पटवते ,
सासुबैंची देवपूजा एव्हाना आटोपलेली असते त्यांना पाहिजे असतो चहा
"आणते ह लगेच जरा छकुलीला पहा "
आजीच्या चष्म्याची छकुलीला भारी आवड ,मला देना करत चालू होते रडारड
छकुलीच्या लाथांनी हातातला चहा सांडतो
इकडे सोनू बुक नाही सापडत म्हणू माझ्याशी भांडतो
नवर्याची रोजची प्रसन्न (वैतागलेली ) मुद्रा पाहून मला खुदकन हसू येते ,
त्याच तुझ्याशिवाय पानच हलणार नाही हे वाक्य किती मनाला सुखावून जाते
ग्यालरीत पेपर वाचत बसलेले सासरे खुदकन हसतात ,त्यांना पाहून यजमानच लाजतात
सकाळ्ची घाईची वेळ संपली ,झाला स्वैपाक झाली जेवण
ताणून देऊया मस्त नाहीतर ,पाहूया टी व्ही कराव आज तरी पूर्ण स्वप्न
पण माझी छकुली दुपारी झोपतच नाही ,दुसर्या बाळासारखी तू कधी शहाणी होणार ग बाई
वाजले दुपारचे तीन ,डोळे भयंकर पेंगतात
तेव्हड्यात सासू बाई "का ग ह्या साडीवर ह्या बांगड्या छान दिसतात ?
आज काय आहे ? सासूला एव्हडी का घाई ?
अरे आज जोश्याकडे भजन कस विसरले मी बाई
आता कसलं झोपण कसलं टी व्ही पाहन ,कधी पूर्ण होईल जाणे माझ अधूर स्वप्न ,
मारला तोंडावर गार पाण्याचा फवारा ,उशीर होतोय पट पट आवरा
फ्रीज मधला मोगर्याचा गजरा त्यान्च्या आंबाड्यात माळला
सासूने मायेने माझ्या गालावर हात फिरवला
काढली स्कुटी निघाली स्वारी ,छोटी छकुली होर्न वाजवून वाजवून मज्जा घेतेय भारी
येताना आणलीये मंडई तून भाजी मॉल मधली भाजी मला परवडणार कशी ?
झाली संध्याकाळ स्वयपाकाची तयारी ,सोन्याची स्वारी बेल वाजवी दारी
छकुलीची रडारड सोन्याची आदळ आपट,त्यांना सांभाळू कि काम करू पटापट ?
सोनूचा होम वोर्क घेता घेता स्वयपाक करते ,एकीकडे छकुलीला वरण भात भरवते
झाली जेवण चालू साफ सफाई ,नवर्याची वाट पाहत बसलेय मी बाई
दोन घास खात खात नवरा चॅनल बदलत असतो
माझा शिणलेला अवतार पाहून तो पन भांडी विसळू लागतो
"अहो राहू द्या कि , मी करते हो "
कारण तो हि दिवसभर शिणलेला असतो
भांडी लावता टेबल पुसता आम्ही मारतो रोज गप्पा
किचनचा ओटा बनून जातो आमच्या गप्पाचा कट्टा
दिवसभराच शीण कसा १० मिनटात पळून जातो
पुन्हा झोपताना साडेपाचचा गजर पुन्हा लावला जातो
कुणी नाही लादला ,कुणी नाही थोपवला
पूर्ण वेळ गृहिणीचा जॉब मीच निवडला
कारण हाच जॉब मला मनापासून आवडला :)
प्रतिक्रिया
17 May 2011 - 1:07 pm | मी ऋचा
एकदम मस्त! सगळं काही सही सही उतरलय!
23 May 2011 - 11:25 am | खादाड अमिता
मस्त मस्त मस्त पियुशा
17 May 2011 - 1:09 pm | स्पा
चान चान
ग्यालरीत पेपर वाचत बसलेले सासरे खुदकन हसतात ,त्यांना पाहून यजमानच लाजतात
हे भारीये :)
17 May 2011 - 1:37 pm | नरेशकुमार
मुक्तक छान
घरात दोन/तिन कामवाल्या मावशी लावायच्या. खुप वेळ मिळेल मंग.
आपलेच पंख आपन्हुनच म्हनुन का कापुन घेतासा.
नाही मंजे गृहीनी असा, पन पुर्न वेळ कशाला ? आप्ल्यातील सुप्त गुनांना सुद्धा वाव द्या.
घरात आनी बाहेर दोनिहिकडे सत्ता ठेवा.
आपुलकीने घ्या बरंका !
17 May 2011 - 1:37 pm | प्रीत-मोहर
छानच ग :)
17 May 2011 - 1:49 pm | रश्मि दाते
म्स्त मजा आली वाचुन्,लीहीत रहा....
17 May 2011 - 2:15 pm | अन्या दातार
बादवे, मोष्ट एळीजिबल बॅचलरेट साठी पियुशाचे चाललेले प्रयत्न नक्किच फलद्रुप होतील यात शंका नाही.
त्याचबरोबर पियुशाला भारताचा जीडीपी वाढवण्यात काहीही रस नाही हे बघुन खेद वाटला ;)
15 Jun 2011 - 6:45 pm | चिंतामणी
मोष्ट एळीजिबल बॅचलरेट साठी पियुशाचे चाललेले प्रयत्न नक्किच फलद्रुप होतील यात शंका नाही.
या वाक्यामुळे चित्र पालटले.
हे वाचल्यावर अनेक एलिजीबल बॅचल्रर्सना "ही तीचा स्वानुभव आहे का?" असा प्रश्ण पडण्याची शक्यता होती. पण या वाक्यामुळे चित्र पालटले. ;)
17 May 2011 - 3:26 pm | प्रभाकर पेठकर
मुक्तक छानच आहे.
पण तुझ्याशिवाय पानच हलणार नाही हे वाक्य किती मनाला सुखावून जाते हा जीवघेणा सापळा आहे. आपल्या उतारवयात जेंव्हा इतर सर्व 'पाने' स्वतःहून हलायला लागतात तेंव्हा आता कोणाला आपली गरजच उरली नाही ही भावना 'एकटेपणा' ह्या मानसिक आजारपणाला आमंत्रण देणारी ठरते. भविष्यासाठी शुभेच्छा..!
17 May 2011 - 8:57 pm | गोगोल
जरा ज्यास्तच आदर्शवादी वाटली.
व्यायामाला वेळ नाही.
17 May 2011 - 11:39 pm | सखी
पेठकरकाकांशी सहमत आहेच नंतर एकटेपणा येऊ शकतोच आणि अजुनही एक त्यात वाढवावेसे वाटते की 'पाना' लाही हे अवलंबुन रहाणे अवघड जाते/जाऊ शकते. कुठल्याही कारणाने घरातल्या बाई बाहेर पडली की तिला घरी घाईत परतावे लागते, बाहेरगावी रहाता येत नाही कारण घरी सगळ अडलेलं असत. आजकाल मुख्यत: नोकरीच्या निमित्ताने जर पुरषालाही बाहेर रहावे लागले, तर साध्या गोष्टी (जसे की चहा, आयत्यावेळी भूक लागली तर पोहे, खिचडी, साधा आमटी-भाताचा कुकर लावणे) करताना कसरत होऊ शकते.
तरीही बाकी मुक्तक आवडले, खासकरुन शेवटचा कट्टा.
18 May 2011 - 2:06 am | पियुशा
@ पेठकर काका
अहो हे फक्त मि साध मुक्तक लिहिलय, बाकि अड्जस्ट्मेन्ट हि एका ग्रुहिनिला असो वर्किन्ग वुमनला असो ति लाइफटाइम कराविच लागते नो ओप्शन !
आनि "तुझ्याशिवाय पानच हलणार नाही हे वाक्य किती मनाला सुखावून जाते"" हा एक गमतिचा भाग आहे ,वस्तु सापड्त नाहित म्हनुन नवर्याने केलेलि लाडीगोडि :)
18 May 2011 - 9:18 am | प्रभाकर पेठकर
साधं म्हणजे 'खोटं-खोटं' का? तसं नसावं. कारण 'आपल्याशिवाय पान हलत नाही' ह्या भावनेला गांभिर्याने घेऊन सुखावणार्या बायका पाहिल्या आहेत. त्याच डोळ्यासमोर आल्या म्हणून लिहीले.
अड्जस्ट्मेन्ट हि एका ग्रुहिनिला असो वर्किन्ग वुमनला असो ति लाइफटाइम कराविच लागते नो ओप्शन !
'आपल्याशिवाय पान हलत नाही' आणि 'आजकाल आपल्याशिवायही पाने हलतात' ह्यात 'अॅडजेस्टमेंट' कुठे आली कळल नाही. तसेच, 'पुरुषांना आयुष्यभर कुठली अॅडजेस्टमेंट करावी लागत नाही' (कारण फक्त गृहिणी आणि वर्किंग वुमनचाच विचार केला आहे.) ह्या गर्भित शेर्यामुळे नविन वादाला तोंड फुटण्याच्गी शक्यता आहे.
मुक्तकाला 'स्वैरतेचे' रुप येऊ नये हिच प्रार्थना.
18 May 2011 - 9:25 am | पियुशा
मि एक मुलगि आहे त्यामुळ प्राधन्य दिले ग्रुहिनिना ,पुरुशान्च्या लाइफ वर, adjustment वर पन एखादि कविता लिहुन्च टाकते आता :)
बाकि मुक्तक हलकच घ्यावे काय आहे ना, मि नव कवायित्रि आहे त्यामुळ ह्या धाग्याचे काश्मिर झालेले मला अज्जिबात आवडनार नाहि हो :)
18 May 2011 - 9:43 am | प्रभाकर पेठकर
मि एक मुलगि आहे त्यामुळ प्राधन्य दिले ग्रुहिनिना ,पुरुशान्च्या लाइफ वर, adjustment वर पन एखादि कविता लिहुन्च टाकते आता
मुलीसुद्धा आपल्या वडिलांना त्यांच्या आयुष्यात ते करत आलेल्या तडजोडींना (अॅडजेस्टमेंट्स) पाहात आलेल्या असतात. कवयित्रीचे मन संवेदनशील असते. तिच्या नजरेतून हे कसे सुटू शकेल? असो. लगे हाथ 'पुरुशान्च्या लाइफ' वर एखादी (?) कविता 'लिहून्च' टाकण्याचा संकल्प सोडून तमाम पुरुषजातीवर केलेल्या उपकाराबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
मि नव कवायित्रि आहे त्यामुळ ह्या धाग्याचे काश्मिर झालेले मला अज्जिबात आवडनार नाहि हो
माफी असावी. 'मुक्तका'वर आपले विचार मांडण्याची 'मुक्तता' प्रत्येकाला असेल असे समजून विचार मांडले आहेत. आवडले नसतील तर सोडून द्यावे.
19 May 2011 - 3:12 am | पियुशा
@ पेठकर काका
(कारण फक्त गृहिणी आणि वर्किंग वुमनचाच विचार केला आहे.) ह्या गर्भित शेर्यामुळे नविन वादाला तोंड फुटण्याच्गी शक्यता आहे.
मुक्तकाला 'स्वैरतेचे' रुप येऊ नये हिच प्रार्थना.
नाराज होउ नका काका :)
तुम्हाला काय सर्व वाचकाना हक्क आहे हो मनातल सान्गन्याचा त्यामुलेच तर चुका समज्तिल मला :)
पन वादाला तोन्ड फूट्ल च बघा ;)
असो आता एक फक्कड कविता करुनच टाकते :)
19 May 2011 - 3:42 am | प्रभाकर पेठकर
नाराज अजिबात नाही. स्त्रियांनी काय किंवा पुरुषांनी काय, कोणीही मतं व्यक्त करताना दुसर्या कोणावर आपण अन्याय करत नाही ना, इकडे लक्ष द्यावे असे वाटते. म्हणूनच 'मुक्तकाला स्वैरतेचे रुप येऊ नये' असे म्हंटले आहे.
माझ्या कुठल्या वाक्याने, अनवधानाने मी तुम्हाला दुखावले असेल तर क्षमस्व.
तोंड फुटलेला वाद जास्त पसरणार नाही अशी अपेक्षा आहे.
व्यक्तीवर हल्ला करण्यापेक्षा मुद्यावर हल्ला चढवावा म्हणजे वाद टाळता येतील आणि वातावरण गढूळ होणार नाही.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा....!
17 May 2011 - 5:20 pm | सविता
>माझा शिणलेला अवतार पाहून तो पन भांडी विसळू लागतो
>"अहो राहू द्या कि , मी करते हो "
>कारण तो हि दिवसभर शिणलेला असतो
>भांडी लावता टेबल पुसता आम्ही मारतो रोज गप्पा
>किचनचा ओटा बनून जातो आमच्या गप्पाचा कट्टा
हे सुपरलाईक करण्यात आलेले आहे!
18 May 2011 - 4:16 am | नगरीनिरंजन
छानच लिहीलं आहे.
17 May 2011 - 5:35 pm | amirohi
खुप छान लिहिले अहे, मनाला बरे
17 May 2011 - 5:51 pm | मुलूखावेगळी
मस्त ग
आवडले.
17 May 2011 - 6:02 pm | रेवती
छान लिहिलय.
टिपिकल दिनक्रम असतो गृहिणीचा!
आपल्याशिवाय पान हलत नाही असं मला अज्जिबात वाटत नाही.;)
अर्थात मुलं लहान असताना बर्यापैकी असेच असते.:)
18 May 2011 - 2:16 am | इंटरनेटस्नेही
छान कविता... एकंदरीत महिला वर्गाचे जीवन हे बर्याच कॉम्प्रोमॉईजेसने भरलेले असते, ही खेदाची बाब आहे.
18 May 2011 - 2:25 am | प्यारे१
आयला, ही पियूशा लग्नाळू झालीये काय?
कविता काय पाकॄ काय???
मुलीला स्वयंपाक येतो आणि 'छान छान' कविता पण करते. (कौतुक केलंय हो ;))
झाला की नाही मस्त सी व्ही मध्ये अॅसेट.
बाकी निरीक्षण छानच.
18 May 2011 - 4:46 am | विजुभाऊ
झकास लिहीले आहेस.
तुझ्या शिवाय घरातले पान सुद्धा हलत नाही. या वाक्याने सुखवायचा अट्टाहास सोडून माझ्याशिवाय घरतले पान हलले म्हणून बिघडले काय असा विचार करुन बघा. एक वेगळीच अनुभूती येते. त्यातले विड्रॉल सिम्पटम्स सहन करता आले तर आपण स्वतःलावलेल्या सापळ्यातून मुक्तता होऊ शकते.
18 May 2011 - 5:26 am | रमताराम
छान ऐतिहासिक(!) कविता. :D
(पळा.)
18 May 2011 - 6:43 am | ५० फक्त
छान पॉराणिक (!!) कविता
(किक मारा गाडीला)
अवांतर - डोळ्यासमोर एकदम शिल्पा तुळसकर, म्रुणाल कुलकर्णी वैग्रे वैग्रे आल्या. बाकी 'अहो','स्कुटी','मॉल मधली भाजी' यांनी जुन्या आठवणी जागवल्या.
''पूर्ण वेळ गृहिणीचा जॉब मीच निवडला
कारण हाच जॉब मला मनापासून आवडल''
कोणताही जॉब निवडताना हेच होतं, इंटर्व्यु मध्ये सांगितलेला स्कोप आणि ऑफर लेटर मधले आकडे याला भुलुन आपण जॉब पकडतो पण एकदा जॉईन झालो आणि पहिली पेस्लिप मिळाली की पाय बरोबर जमिनीला टेकतात. आणि त्यात फुल टाईम ग्रुहिणि हा तर एक नंबरचा थँकलेस जॉब आहे.
@ प्यारे १ - या नंतर विणकाम / भरतकाम / क्रोशा / ग्लास पेंटिंग/ करुन फोटो कलादालनात टाका असा सल्ला नाही दिलात नशीब. आणि एक वाईट स्वानुभव - कविता करणे हे फुल टाईम ग्रुहिणी या जॉब साठी अतिशय निगेटिव्ह क्वालिफिकेशन आहे.
18 May 2011 - 7:02 am | ५० फक्त
प्रकाटाआ - डबल झाल्याने.
18 May 2011 - 4:19 pm | आत्मशून्य
शब्दच सापडत नाहीयेत हे वाचून भावना व्यक्त करायला........... पण स्त्रीमूक्तीच्या फाजील कल्पनांना फाटा दील्याबद्दल मात्र अभीणंदन लेखीकेचही आणी त्यांना लाइक करणार्यांचही, ऊत्तरोत्तर अशीच प्रगती करा.
18 May 2011 - 5:50 pm | शिल्पा ब
<<<स्त्रीमूक्तीच्या फाजील कल्पनांना फाटा दील्याबद्दल मात्र अभीणंदन
तुमचे विचार वाचुन धन्य वाटलं..स्वतंत्र विचाराच्या / आचाराच्या स्त्रियांविशयीचे विचार वायायला आवडतील.
विजुभाउ आणि इतरांनी आत्मशुन्य यांच्याकडुन प्रेरणा घ्यावी, जरा उच्च विचार करायला शिकावे. उगाच बायकांना स्वातंत्र्य वगैरे असावे असा विचार तुम्ही करूच कसा शकता...तेसुद्धा या वयात?
आत्मशुन्य यांनी आम्हा सर्वांचे प्रबोधन करावे हि विनंती.
बाकी कविता बालिश..टॅकी काय म्हणाल ते!!
18 May 2011 - 6:51 pm | आत्मशून्य
मग ऐका, कोणतीही व्यक्ती माणूस म्हणून समान हक्क राखून आहे या मताचा मी आहे. फक्त हा हक्क बजावताना मी एक माणूस/मानव(ह्युमन बिइंग) म्हणूनच तो बजवावा इतकीच अपेक्षा आहे. मी स्त्री आहे म्हणून अथवा पूरूष आहे म्हणून मला(कोणाला) एक्स.वाय. झेड. हक्क जास्त आहेत असे कोणी समजू नये. तसच हे करताना स्त्रीया जैवीकरचनेनूसार पूरूषांपेक्षा ताकतीने कमी आहेत हे सत्य नाकारणे म्हणजेसूध्दा आंधळेपणा होय. ( कवीतेतील नायक ज्याला अर्थातच कवीतेत फार दूय्यम स्थान आहे हा भांडी घासतो म्हणून पूरूष जातीला लांछन आहे अथवा तो चूकीचे वागतो असे म्हटलेले नाही, यावरूनच तो नायीकेला करत असलेल्या मदतीबद्दल मला अभीमान वाटतो हे ठळकपणे लीहू काय ?)
सदरील कवीतेमधील नायीका जे करत आहे ते स्वेच्छेने करत असल्यानेच मला त्याबद्दल कौतूक वाटले आहे. आणी ते करताना स्त्रीमूक्तीच्या फाजील कल्पनांना फाटा दीला असल्याचे मी म्हटल्याने तूम्हाला झालेला प्रमाणाबाहेर आनंद माझ्या समजूतीबाहेर आहे. असो, माझे वीचार तूम्हाला प्रेरणादायक वाटले याबद्दल आभारी आहे. त्यांचे पालन करयची पात्रता तूमच्या अंगी यावी म्हणून मी जरूर प्रार्थना करेन.
अवांतर :- बाकी कविता बालिश वाटत असल्यास याच धरतीवर "गृहिणीच अवघड लाइफ" म्हणून प्रौढीश वा तरूणीश कवीता आपण जरूर बनवावी. उगीच कोण काही चांगल लीहीत असताना खोडा घालणे चूकच. एक स्त्रीच स्त्रीची खरी शत्रू असते असं एक मैत्रीण फार पूर्वी म्हणाल्याच स्मरतय, त्याचा आता प्रत्यय येतोय.
19 May 2011 - 1:33 am | शिल्पा ब
<<<एक स्त्रीच स्त्रीची खरी शत्रू असते असं एक मैत्रीण फार पूर्वी म्हणाल्याच स्मरतय, त्याचा आता प्रत्यय येतोय.
वाह!!! तुमचे विचार खरोखरीच उच्च दर्जाचे आहेत...कृपया आपण माझी पात्रता आपल्यासारखी व्हावी म्हणून प्रार्थना करू नकाच ....त्याचा काहीएक उपयोग होणार नाही, कारण मी तुमच्या पत्रातेपर्यंत पोहोचू शकत नाही.
केवळ एका स्त्रीने कविता लिहिली म्हणुन त्याला छान छान म्हणावे अशी अपेक्षा वाचुन तर समानता समानता ती हीच अशी खात्रीच झाली.
तुम्ही आमचे असेच ज्ञानवर्धन करावे हीच इच्छा.
19 May 2011 - 8:24 am | आत्मशून्य
आहो ताइ कीमान प्रयत्न तर करून पहा ? असा धीर सोडून जग चालतं व्हय ?
कळलच नाय, काय म्ह्ण्ताय ते. पन यक सांगू ? ही कवीता पूरूषाने लीहली असतीना तर प्रतीसाद द्यायचे डेरींगच झालें नसत, काय आहे स्त्रीमूक्ती अतीफाजील कल्पनांना बळी पडलेल्यांनी तर मग कहरच मांडला असता ...? होय की नाय ? बाकी कवीता छान आहे यातच सर्व आले नाही काय ? ऊगीच स्त्रीने लीहली आहे की पूरूषाने असा वाद कशाला उभा करायचा ?
सांगीतल तर पटत नाय. प्रार्थना करतो म्हटल तर काहीएक उपयोग होणार नाही म्हणताय.. आन वरून असेच ज्ञानवर्धन करावे हीच इच्छा का म्हून धरालाय ? बी. द चेंज यु वांट टू बी..... अन बघा जग कस पायघड्या पसरेल तूमच्यासाठी.
19 May 2011 - 6:05 pm | शिल्पा ब
नाईलाज आहे...आम्हाला उगाच फार खाली जावेसे वाटतच नाही.
कविता आम्हाला अजिबात आवडलेली नाही...कारण तुम्हाला सांगूनही समजेल असे वाटत नाही (तरीसुद्धा अगदीच वाटले तर वरचा प्रतिसाद पाहावा.)
जग आमच्यासाठी काय करेल किंवा नाही याची काळजी करण्यास आम्ही स्वतःच समर्थ आहोत काळजी नसावी.
बाकी तुम्ही आल्यामुळे हल्ली गायबलेल्या आयड्यांची कमतरता भरून निघाली..तुम्ही लिहीतच राहावे हीच विनंती.
वैयक्तिक होतंय असं वाटल्यामुळे तुमच्या पुढील प्रतिसादांचे उत्तर खरडीत दिले जाईल, उत्तर देण्यायोग्य प्रतिसाद वाटला तर.
20 May 2011 - 6:11 am | आत्मशून्य
उगीचच प्रतीसाद दीले असं वाटतय, कारण सर्व लेखन तूमचे केवळ भावनेच्या भरात झाले आहे. वीचार स्वातंत्र्याचा इथे आपण उपयोगच केलेला दीसत नाही. उपकार करा व खरडवहीत काही प्रतीसादू नका. बाकी आपण काळजी करण्यास समर्थ आहातच हे लक्षात आलेच (भावनीक आहात) पण काळजी वाहण्याची क्षमता सूध्दा लाभो ही प्रार्थना करून नीरोप देतो. धन्यवाद. आता यापूढे कोणतीही वीनंती अथवा मार्गदर्शनाची अपेक्शा करू नका.
19 May 2011 - 4:07 am | वाहीदा
आत्मशुन्य,
स्त्रीमुक्तीच्या कल्पना या कधीच फाजील नव्हत्या. स्त्रीमुक्ती म्हणजे मुर्ख मुक्त स्त्री ची जननी नव्हे हे ज्यांना कळत नाही किंवा समजून घ्यायचीही ज्यांना इच्छा ही नाही त्यांना त्या नेहमीच फाजील वाटतात .
स्त्री मुक्ती वैचारिक चळवळ ही तिची सामाजिक , कौटुंबिक जबाबदारी ओळखुन आहे अन त्याचा ती स्विकार करते.
कवितेतील नायिका ही स्वयंनिर्णय घेऊन गृहिणीचा जॉब निवडते आहे. म्हणजे तिचे विचार बंधनातून आलेले नाहीत तर भावपाशातून आलेले आहेत, म्हणून तिने स्त्रीमूक्तीच्या फाजील कल्पनांना फाटा दीला आहे हे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे.
कवितेतील नायिका स्वतःच्या विचारात स्वतंत्र च आहे.
पियुशा,
छान कविता ग ! अभिनंदन !! :-)
19 May 2011 - 6:24 am | परिकथेतील राजकुमार
ह्या कवितेच्या निमित्ताने मिपा प्रगल्भतेकडे निघाले आहे म्हणुन पियुषा ह्यांचे अभिनंदन.
संपूर्ण प्रतिक्रिया मराठीत लिहिली आहे त्याबद्दल वाहीदा ह्यांचे अभिनंदन.
आणि एकाच धाग्यात दोन स्त्रीयांचे फाजील कौतुक केल्याबद्दल आमचे देखील अभिनंदन.
19 May 2011 - 6:53 am | वाहीदा
निरिक्षणात खूप तरबेज आहेस हां परा !
19 May 2011 - 8:50 am | आत्मशून्य
खरंच ? मनापासून बोलताय ? मग आपण खरोखरच जपलेली नीरागसता बघून तूमचाबद्दल हेवा वाटला व आदरही (अजून) वाढला.
21 May 2011 - 3:29 am | सूर्यपुत्र
स्त्री मुक्ती म्हणजे काय?
-सूर्यपुत्र.
19 May 2011 - 4:09 am | michmadhura
मस्त आहे कविता
19 May 2011 - 6:08 am | समीरसूर
छान लिहिले आहे.
शेवटी आयुष्य म्हणजे काय, हसत, रडत, रुसवे-फुगवे धरत केलेल्या कडू-गोड (आणि क्वचित तिखट) तडजोडी! आपण कुणासाठी तरी तडजोड करतो तेव्हा ती व्यक्तीदेखील आपल्यासाठी कुठेतरी तडजोड करत असण्याची शक्यता असतेच. विशेषतः घरातली आपली माणसे तर सगळ्यांसाठी तडजोड करतच असतात. अशा या लज्जतदार मिश्रणातूनच तर कुटुंब ही चविष्ट भेळ तयार होत असते. तिचा आस्वाद घेत रहायचा...बस्स..बाकी विठ्ठलाच्या चरणी सोडून द्यायचं...:-)
20 May 2011 - 7:35 am | पिलीयन रायडर
मी नवी नवरी मला काही समजत नाही..
आई आणि सासू ह्यांना हेच वाटत राही...
माझा होता बना कि नोकरी सोडणार नाही..
नवरा म्हणे.. हो..मी आहे न सोबत बाई...
नवीन नवीन संसार, मला थाटून दिला..
दोन दिवसान मध्ये माझा भ्रम गळून पडला..
पाय पसरून लोळत राहणं किती छान असता..
आई असते तेवा आयुष्य सोप्पा आणि मस्त..
गडबडले मी दोन दिवस म्हणून सासूबाई आल्या...
नुकत्याच तेवा जमत होत्या मला खाण्या जोग्या पोळ्या...
वाटू लागला अशा मध्ये कि होईल का नोकरी??
सोडून सगळा संसार करावा..इच्छा मनात दाटली..
पण मग आठवली कोलेजची वर्ष चार..
मार्क मिळवण्या साठी मी कष्ट केलेत अपार..
प्रेम बीम सांभाळून मी केला होता अभ्यास...
आता घर सांभाळण्य साठी सोडू माझा ध्यास??
मग थोडा विचार करून एक मार्ग काढला...
आता माझ्या कामाचा वेग दुप्पट वाढला..
नवरा बरोबरीनी करतो काम हातात झाडू घेऊन..
दीर म्हणतो जेवायला चाल वाहिनी, घेऊन पान वाढून..
बाई घासते भाडी, स्वयंपाक करतो मिळून...
आठवड्यातून दोनदा १ तासात घर घेतो आवरून..
माझ्या शिवाय अडत नाही आता कुणाचच पान..
नवरा सुद्धा आता स्वयंपाक करतो छान..
लहान बाळाचे अजून तरी नाहीत पाश...
पान सासर माहेर एक होऊन देईल तेवा साथ...
खांद्याला खांदा लावून माझा कुटुंब काम करत...
नोकरी करून घर चालवणं मला आता सोप्पा वाटत..
20 May 2011 - 8:20 am | स्वानन्द
मस्तच!!
20 May 2011 - 7:50 am | पियुशा
अरे व्वा पिलियन भाउ छान लिहिल कि हो तुम्हि :)
आवडेश !
20 May 2011 - 8:22 am | स्वानन्द
पिलियन भाऊ??? :D
20 May 2011 - 8:22 am | पिलीयन रायडर
मी ताई आहे... भाउ नाही... म्हणुनच तर लिहिता आलय...
23 May 2011 - 10:08 am | पियुशा
स्वारि ह ताइ !
पन मला काय माहित नव्हते हो तुम्हि भाउ नाहि ताइ आहात म्हनुन ;)
23 May 2011 - 3:07 pm | रमताराम
बायका नेहमीच 'ड्रायवर सीट'वर असतात असे आमचा मित्र म्हणतो, पण त्या 'बॅक सीट ड्रायविंग' करतात हे सत्य पियुशाला (स्वतः स्त्री असूनही) ठाऊक नाही?
(मी दोन महिने उत्तर ध्रुवावर सुटीसाठी निघालोय, दोन महिन्याने प्रतिसाद वाचेन).
23 May 2011 - 3:36 pm | पियुशा
बायका नेहमीच 'ड्रायवर सीट'वर असतात असे आमचा मित्र म्हणतो, पण त्या 'बॅक सीट ड्रायविंग' करतात हे सत्य पियुशाला (स्वतः स्त्री असूनही) ठाऊक नाही?
हा हा हा "दोनाचे चार झाले नाहित अजुन, अनुभव नाहि " ;)
24 May 2011 - 2:41 pm | पिलीयन रायडर
अजुन पोपुलर झाले नाही वाट्त मी इथे...