विडंबन काव्य
मायमाऊली मराठीच्या अतीस्वाभिमानी किंवा अंधाभिमानी अपत्यास हे काव्य अर्पण करताना मनाला "दिव्य आनंद" होत आहे.हे सांगणे अगत्याचे वाटते.आयुष्यभर केळ्यांचा आस्वाद न घेता,व्याकरणाचे 'शिक्रण' करुन खाण्यातच यांचा जन्म जायचा...आणी तिथेही 'यांचा' पंक्तीप्रपंच मधे मधे आड यायचा.तेंव्हा या माहाभागांच्यामधुन आपण बाहेर पडावे,आणि जाता जाता एक आहेर,बाहेर पडण्यापुर्वी यांना करावा हे उचित नाही काय?
असो...विडंबनाला जुळी भावंडे म्हणता म्हणता,मुळ काव्य-जग हे बंन्दी शाळा-प्रथम अपत्य,बघ हा रंगित चाळा-द्वितीय(किंवा एकमेवाद्वितीय) अपत्य,तर'बघ हा नंन्दी काळा' हे त्रुतीय अपत्य झाले.म्हणजे जुळ्यांचे नाते जमवता जमवता हे तिळे झाले.शेवटी "माता पितरांच्या" हाती प्रयत्न तेवढे असतात.अंती परमेश्वरच,तो काय तो भव्य दिव्य लीला करत असतो,किंवा करवुन घेत असतो..नाही का?(कंसात टाकलेले अकडे हे तळ टिपांचे आहेत,तेंव्हा वचकांनी नेहमीप्रमाणे तळ-टिपावा..ही विनंती)
॥नंन्दी-काळा॥
बघ हा नंन्दी काळा,बघ हा नंन्दी काळा।
कुणी म्हणे यास-खुळा/आंधळा,जो तो खुळखुळलेला॥ध्रु॥
ह्याची याला प्यारं चोपडी(१),चोपडीतले सखे(२)-सवंगं-गडी।
आत "गोडी" अन बाहेर "खोडी"(३)प्रीय हो याची याला॥
हा तो याच्या बाकी अखडे(४),नजर न धावे मराठी पलिकडे(५)।
नंबरातले विळे-कोयते(६),नम-बरी करिती "शीला"(७)॥
पुन्हा न माहित 'रजा' किती ते(८),पेटुन आलो हे नच स्मरते(९)।
फटके लागी मन घाबरते (१०),जो आला तो "खपला"॥
१)बोली भाषेत सदैव "न" आणि "ण" ची लफडी शोधण्याचा उद्योग लागलेला असतो,तो याच "चोपडी"बहाद्दरांना.
२)हे सखे नेहमीच यांचे चुलत किंवा 'चुलत चुलत' असतात..."दाखविती असे सख्य हे सख्खे,परी मारीती अंर्तयामी बुक्के...एकमेकांना"
३)हा या अतीस्वाभिमान्यांचा 'दिव्य गुण'..मग क्षेत्र कोणतेही असो.
४)अखडणारच...हे विद्वान मुळातच अखडु व्रुत्तीचे
.
५)वास्तविक यांचिच बोलि मराठी 'वीक' असते.म्हणुनच हे महाभाग 'आपण मराठीत ईंग्लिश शब्द वापरायचे नाहित' हे वाक्य अपल्याला सदैव अइकवत असतात.खर तर यांनी हेच वाक्य-"मात्रुभाषेत वार्तालाप करते प्रसंगी आंग्ल शब्द योजना करणे उचित नाही" असे उच्चारावयाला हवे..नाहि का?
६)हे विळे कोयते अपल्या जमावातनं जमवतात खरे,पण 'गवत' कापण्यापलिकडे हे काहिही करित नाहित.वास्तविक विळ्या/कोयत्यानी "तण" काढतात,हे यांना कळु नये याचेच राहुन राहुन आश्चर्य वाटते.
७)खरतर हे ज्यांना सुधारायला जातात,त्यांचि लाथ घालुन शिलाच करतात,रामासारखे पादस्पर्शत्व यांच्या ठायी येणे नाही हेच खरे.
८)कशि माहित असणार रजा?हे मराठीच्या नोकरिवर वेळेवर जायला तर हवेत ना?तेंव्हा यांच्या 'कारकिर्दीचा' आरंभ होईल.
९)"पेटुन" म्हणजे स्वतः नाहि.ह्यांना कायम दुसरेच कोणीतरी 'शिलगावित' असते.आणि त्यावरुन हे आपण पेटलो,असा 'दिव्य' अर्थ काढित असतात.आमच्या मते 'ताडात नाहि,ते माडात कुठुन येणार?'
१०)'घाबरते' तरी पुन:पुन्हा फटके खाते..यांच्या खात्यावर जमा म्हणजे-फक्त-फटके/फाटके/आणि फटाके.
०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०
--पराग--
प्रतिक्रिया
18 May 2011 - 3:05 am | अरुण मनोहर
तुम्ही खरडफळ्यावर केलेली गुहार ऐकून इथे लिहावेसे वाटले.
कवितेचा फॉरमॅट क्लिष्ट आहे, त्यामुळे वाचण्यात अडथळे येतात.
तळटिपांचा तळ टिपावा असे तुम्ही म्हटले आहे. पण तळटिपा बघून तळतळाट होतो.
वाचकांच्या रसिकपणावर किंवा बुद्धीवर विश्वास नसावा असा संशय येतो.
कवितेत तळटिपा म्हणजे - पोळी खिलवण्या ऐवजी तोंडात बचकभर कणीक, ओंजळभर पाणी आणि दोन निखारे टाकून चव विचारण्यासारखे वाटते.
----(तिळ)पापड
18 May 2011 - 4:37 am | अत्रुप्त आत्मा
कवितेसाठी तळटिपा असं नसुन,तळटिपे साठीच कविता असं झालं खरं... या पुढच्या लेखनात अश्या चुका न होण्याची खबरदारी मी घेईन.वाचकांच्या बुद्धिवर विश्वास नाही...असे मात्र नाही.तो घोळ तुम्ही म्हणता तसं फॉर मेट मुळे झाला, हे मला मान्य आहे.
18 May 2011 - 1:26 am | नरेशकुमार
बोबडी वळली.