विडंबन काव्य-(मुळ काव्य-जग हे बंदीशाळा)-"धुंदी-शाळा"
कुठल्याही व्यसनाला कोणि'रसं' म्हणावे,कोणि सु(?)रस म्हणावे,कोणि चुरस(?) म्हणावे,तर कोणि निरस म्हणावे...आमचे काव्य या सगळ्यात सरस आहे, असे आमचे अजिबात मत नाही...पण प्रत्येकाला "हे"---म्हणजे काव्य आवडेल असे मात्र वाटते.याविषयी कोणाचे दुमत होणार नाहि,असेही वाटते...कंसात टाकलेले आकडे हे तळटिपांचे आहेत,काव्यात काय किंवा व्यसनात काय?...दोन्हीकडे तळ गाठल्या शिवाय टिपांचा अर्थ कळत नाहि...म्हणुन ईथेही वाचकांनी काव्यापुरता तळ गठावा...हि विनंती...
बघ हा रंगित चाळा,बघ हा रंगित चाळा
कुणि न येथे पिला थांबला,जो तो पथं सुटलेला॥ध्रु॥
ज्याची त्याला प्यार खोपडि(१),खोपटीतले सख्खे(२) सवंगडि।
आत कडी की बाहेर बेडी,ठाउक ज्याची त्याला॥
जो तो अपुल्या बाकी अखडे(३),नजर न धावे टेबला पलीकडे।
झुंबरातले खिळे हतोडे,झुंबरी करीती लीला(४)॥
कुणा न माहित 'मजा' किती ते,झोकुन आलो हे नच स्मरते(५)।
'अटके' लागी मन घाबरते,जो आला तो 'जमला'(६)॥
१)हि तीची आदिवासी तसेच भटक्या विमुक्त जतितली दुरची चुलत बहिण आहे,परंतु 'वर' सर्वांगिण विचार व्हावा म्हणुन 'स्तर' जरा खाली आणला.
२)हे रात्रीचे सख्खे,दुसय्रा दिवशी सकाळि वेगळे,तर प्रसंगी वेगवेगळे(ही)होतात.
३)म्हणुनच हिच्या घट्ट मिठितल्या काळाला आखाड म्हणतात,आखडच म्हणावे,खाड खाड म्हणु नये.नाहितर आ आ असा अवाज येईल.
४)ह्या लीला काहि वेळेस भव्य दिव्य असल्याचे दिसुन येईल.आध्यात्मात ज्याला "क्रिया" होणे म्हणतात ना,...तोच प्रकार.
५)आणि नंतर कुठे चाललो तेहि,म्हणजे परत आध्यात्मा प्रमाणेच,आधि-आत-त्म-बाहेर.म्हणजे आत बाहेर हेच खरे.
६)हा "मामला" यातल्या थोर/थोर पंडीतांनांहि उलगडत नाहि,म्हणुनच ते पंडित कायम 'थंडित' असुनहि स्वतःला यातले 'भाई' समजतात...
पराग दिवेकर....
प्रतिक्रिया
11 May 2011 - 2:12 am | पाषाणभेद
पराग फारच अनुभव दिसतो आहे बाबा. त्याच्याशिवाय असले काव्य येणे मुश्किल आहे.
11 May 2011 - 4:24 pm | अत्रुप्त आत्मा
---धुंदीशाळा---
अनुभवं ही आला,काडीमोड ही जाहला।
तरी राहते मनी,ती दीव्य कहाणी॥
घटक वेगळा तरी,त्याच त्या घटना।
कुठे असतो प्याला,कुठे नुसतेचं पाणी...॥
'पराग'
30 Dec 2015 - 1:58 pm | प्रचेतस
अरेच्चा,
हे वाचलंच नव्हतं.
30 Dec 2015 - 2:50 pm | सूड
अन्भवाचे बोल?
30 Dec 2015 - 2:58 pm | अविनाशकुलकर्णी
हॅप्पि न्यु ्वर्ष
.........................
जग हे मधुशाला
कुणी न येथे भला चांगला, जो तो पेदाड झिंगलेला
ज्याची त्याला प्यारी बाटली
बाटली तले सखे सौंगडी
देशी असो वा विदेशी, प्रिय हो ज्याची त्याला
जो तो अपुल्या जागी लुडके
नजर न धावे चकण्या पलीकडे
गिल्लासातले सारे बेवडे पिवुनी करिती लीला
कुणा न माहीत किती ढोसले ते
कोठुन आलो ते नच स्मरते
उता-याला मन घाबरते, जो आला तो रमला
30 Dec 2015 - 6:27 pm | शान्तिप्रिय
विडंबन आणि सर्व प्रतिसादातिल कविता. उत्तम!
मनोरंजन झाले भरपुर.
30 Dec 2015 - 7:37 pm | कंजूस
बांधला तो सुटला या जगाच्या बंदिशाळेत.
सुटकेचा मार्ग: जिए.
एकच प्यालातली गाणी वि सि गुर्जरांची होती?
राम गणेश पित नसत पण निरीक्षण भारी.
खालची सही पराग दिवेकर आवडली.
विडंबन भारी आहे.
आखड नीट समजलं नाही.खोपडी ,मोसंबी ,मोहाची,फेणी ऐकून आहे.
30 Dec 2015 - 7:49 pm | बाबा योगिराज
३१ ला हेच गाउन दाखवतो आन पार्टीत भाव खातो.
गुरजी आन आकु दादा मस्तच. मज्जा आली
30 Dec 2015 - 8:12 pm | सूड
शहाणे असाल तर असलं धाडस करु नका!! =))
31 Dec 2015 - 9:31 am | अविनाशकुलकर्णी
करु द्यात हो..झिंगल्यावर कुणाला असते शुद्ध???
31 Dec 2015 - 1:55 pm | तिमा
http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/sex-news/people-who-fre...
जास्त स्मायली वापरणारे कायम सेक्सचा विचार करतात. - इति मटा
31 Dec 2015 - 2:12 pm | प्रचेतस
अगागागागा _/\_
31 Dec 2015 - 6:05 pm | सतिश गावडे
अगागा... हे निरिक्षण म्हणावे की स्वानुभव?