मावशी-आजीचे घड्याळ (दोन पाठ्यांची जुगलबंदी)

धनंजय's picture
धनंजय in कलादालन
5 May 2011 - 4:02 am

मावशी-आजीचे घड्याळ (दोन पाठ्यांची जुगलबंदी)

(वरील दोन समांतर पाठ्ये जमल्यास एकत्र वाचावीत - आधी एक, नंतर दुसरे, असे नको - अशी वाचकांना विनंती आहे. ज्यांना हे जमवायचे नसेल, त्यांनी असे मानून विचार करावा : या दोन पाठ्यांची श्राव्य जुगलबंदी आहे. ती ऐकण्यासाठी ऐलपैल डॉट कॉमवर दिलेल्या ध्वनिफिती ऐकाव्यात. मात्र दृश्य जुगलबंदी आणि श्राव्य जुगलबंदी यांत काही लक्षणीय फरक आहेत.)

कलानाट्य

प्रतिक्रिया

सहज's picture

5 May 2011 - 6:32 am | सहज

कृपया इथेच ध्वनिफिती द्याव्या अशी विनंती.

दृश्य जुगलबंदी आणि श्राव्य जुगलबंदी यांत काही लक्षणीय फरक आहेत. त्यांच्यामुळे गोंधळ होऊ नये, म्हणून ध्वनिफिती येथे नकोत.
(वरील दुवा चालत नसल्यास त्यातील हा पत्ता : http://www.ailpail.com/node/193)

सहज's picture

6 May 2011 - 6:12 am | सहज

कृपया युट्युब, इस्नाईप्स इ दुवा द्यावा असे म्हणत आहे.

मुळातूनच नाही समजले. बहुधा कसलातरी संदर्भ मला माहीत नसावा.

पंगा's picture

6 May 2011 - 6:58 am | पंगा

मुळातूनच नाही समजले. बहुधा कसलातरी संदर्भ मला माहीत नसावा.

अगदी हेच. बहुधा त्या दुसर्‍या दुव्यावरच्या ध्वनिफिती ऐकल्याशिवाय काही समजण्याची अपेक्षा नसावी. (म्हणजे, मुळात यात काही समजण्याजोगे आहे, हे गृहीत धरून.)

जाउदे झाले!

(अवांतर: 'बेट अँड स्विच' म्हणतात, ते हेच असावे काय?)

धनंजय's picture

7 May 2011 - 3:57 am | धनंजय

बहुधा त्या दुसर्‍या दुव्यावरच्या ध्वनिफिती ऐकल्याशिवाय काही समजण्याची अपेक्षा नसावी.

आता अशी अपेक्षा आहे की नाही, हे सांगणे कठिण आहे. मिसळपावावरील माझ्या अनेक लेखांमध्ये मिसळपावाबाहेरील जगाचे संदर्भ असतात. त्या संदर्भांपर्यंत मिसळपावावरील काही सदस्य/पाहुणे पोचणार नाहीत, याची कल्पना मला असते. काही सदस्य/पाहुणे पोचतील, अशी कल्पना असते. म्हणजे जाऊ शकतील ही अपेक्षा असते, आणि जातीलच अशी अपेक्षा नसतेसुद्धा.

अन्य सदस्यांनी मिसळपावावर दिलेले साहित्य वाचताना मी खुद्द काय करतो? कधीकधी दिलेल्या दुव्यांवर जातो, आणि कधीकधी जात नाही.

माझ्या मते बाहेरील दुवे म्हणजे परिशिष्टवजा असतात. अगदीच आवश्यक नाहीत, आणि अगदीच नि:संदर्भ नाहीत. म्हणून तुमचा मुद्दा काय आहे, हे लक्षात आलेले नाही. तुम्ही मिसळपावावरच्या लांबलचक प्रतिसादांत बाहेरील दुवे पूर्वी कधी वापरलेले असतील. तेव्हा तुमच्या अपेक्षा काय होत्या?

तुमच्या अवांतरामधील मुद्दा जर गंभीर असेल, तर माझे उत्तर घ्या : "तसे नाही."

शेवटले वाक्य "अवांतर" कसे हे मला कळलेले नाही. "बेट अँड स्विच" हा गंभीर आरोप चर्चिला जावा, ते वाक्य सुस्पष्ट करते. "मिसळपावावर दिलेले हे साहित्य हे खरे तर मला मिसळपाव सदस्यांना विकायचेच नाही. आणि अन्य दुव्यावर दिलेले साहित्य तितके विकायचे आहे, ही शक्यता पडताळा" असा तुमच्या अवांतराचा मथितार्थ आहे. वरील साहित्य तर मी मिसळपाव-सदस्यांपुढे ठेवलेले आहेच. ते त्यांनी बघितल्यानंतर मी "स्विच" करणार तरी कसे?

कदाचित तुमचा आरोप आहे, की मिसळपावावर दिलेले साहित्य इतके निकृष्ट आहे, की सदस्य ते स्वतःहून त्यागतील - "स्विच" साध्य. पण तोवर मी अन्य संकेतस्थळावरील माझे साहित्य अनुभवण्यास मिसळपाव सदस्यांना भाग पाडले असेल. आणि ते अन्य साहित्य इतके हानिकारक आहे, की मिसळपाव सदस्यांना फसवून ते त्यांच्या गळी उतरवणे हे फसव्या व्यापाराइतके अनैतिक आहे. असा आरोपही पटण्यासारखा नाही. जर येथील निकृष्ट साहित्य मनातून काढून टाकण्यास मिसळपाव सदस्य समर्थ असतील, तर त्या अन्य संकेतस्थळावरील साहित्यही निकृष्ट वाटल्यास त्यागतील.

कदाचित "आपल्या मिसळपावाबाहेरील अस्तित्वाची जाणीव देणे = जाहिरात करणे = अनैतिक" हा आरोप तुम्हाला करायचा आहे. पण हा आरोप प्रचंड आणि निरर्थक व्याप्तीचा आहे. मिसळपावावरती आणि मिसळपावाबाहेर आयुष्य असलेला व्यक्ती साहजिक म्हणू शकतो : "येथे आणि अन्यत्रही माझ्या कृती आहेत. माझ्या बाबतीत विचार करताना त्या बाहेरील कृतीसुद्धा परिशिष्टवजा सुसंदर्भ आहेत." विशेष करून या ठिकाणी तुम्हाला तो आरोप करावासा का वाटला?

की असे आहे : उघडपणे मिसळपावाबाहेर आयुष्य असलेल्या प्रत्येक सदस्याचे मिसळपावाबाहेरील अस्तित्वाचा संदर्भ असलेले कुठलेही वक्तव्य म्हणजे "बेट अँड स्विच"सारखे अनैतिक आहे, असे तुमचे मत आहे... आणि हे तुमचे मत सार्वत्रिक असले, तरी अनायासे या ठिकाणी तुम्ही ते मत स्पष्ट सांगितलेले आहे - असे आहे काय?
जर असे असेल तर तुमचे मत मला मान्य नाही. तुम्ही स्वतः - म्हणजे "पंगा आयडी"- मिसळपावाव्यतिरिक्त कुठेही अस्तित्व दाखवत नाही ही तुमची वैयक्तिक शिस्त आहे. परंतु हे नैतिक मूल्य आहे, हेच मला मान्य नाही. असले विक्षिप्त मूल्य पाळण्यास मी बांधील नाही.

धनंजय's picture

6 May 2011 - 8:59 pm | धनंजय

माझ्या नात्यातील काही वृद्ध स्त्रियांबद्दल मला आलेले अनुभव, हा संदर्भ आहे. वरील मावशी-आजी हे पात्र पुण्यातील सदाशिव पेठेत राहाते, पण माझ्या ओळखीतील ज्या वृद्ध स्त्रियांची आठवण माझ्या मनात आहे, त्या वेगवेगळ्या गावांत राहात होत्या.

कदाचित अशी कोणती व्यक्ती वाचकाच्या ओळखीची असू शकेल. माझ्या नात्यातल्या बायकांपैकी एखादी स्त्री वाचकाच्या ओळखीची असावी, अशी माझी अपेक्षा नव्हती. मात्र या अनुभवाचे पडसाद जाणवतील अशी कुठलीच व्यक्ती वाचकाच्या ओळखीची नसेल, तर वाचकाला संदर्भ लागणार नाही. मान्य.

गवि's picture

7 May 2011 - 6:01 am | गवि

your words:

माझ्या नात्यातल्या बायकांपैकी एखादी स्त्री वाचकाच्या ओळखीची असावी, अशी माझी अपेक्षा नव्हती. मात्र या अनुभवाचे पडसाद जाणवतील अशी कुठलीच व्यक्ती वाचकाच्या ओळखीची नसेल, तर वाचकाला संदर्भ लागणार नाही. मान्य.

>>>>>>>>

My explanation:

नाही,शब्द /अनुभवाचे पडसाद समजले नाहीत अशा अर्थाने संदर्भ म्हटले नाही.
मला पाठ्ये आणि त्यांची जुगलबंदी हा प्रयोग,कलाविष्कार काय प्रकारचा आहे ते उमगले नाही.
काहीतरी इंट्रेस्टिंग प्रयोग दिसतोय हे जरुर कळले,ते वर आधी म्हटलेच आहे. बाह्य दुव्यांबद्दलही माझे अर्थातच कसलेही आत्यंतिक मत नाही.

दोन पाठ्ये एकाच वेळी समोर ठेवण्याची फारशी परंपरा नसावी असे वाटते.

१) जॉर्ज बर्नार्‍ड शॉ याच्या "बॅक टु मेथुसेलाह" नाटकात दोन दुय्यम पात्रे एकमेकांशी एकमेकांच्या आवाजावर आवाज चढवून बोलतात. त्याचे पाठ्य त्याने पानावर दोन कॉलममध्ये दिलेले आहे. एका कॉलममध्ये एका पात्राची वाक्ये, तर दुसर्‍या कॉलममध्ये दुसर्‍या पात्राची वाक्ये. शॉची कित्येक नाटके बहुधा वाचण्यासाठी असतात, प्रयोग होतच नाहीत. त्यामुळे हे दोन कॉलम एकत्र वाचण्याकरिता असावेत. परंतु मला आठवते - दोन कॉलम हे एकाच वेळी वाचण्याकरिता सोयीचे नव्हते. मी आधी एक कॉलम आणि मग दुसरा कॉलम वाचला. आणि त्या दोन पात्रांच्या वक्तव्यात सेकंदा-सेकंदाला समांतर असे काही भासले नाही.

२) आजच टोनी कुशनर या इंग्रजी नाटककाराची मुलाखत रेडियोवर ऐकली. त्यानेही असाच प्रयोग करणार्‍या इंग्लिश नाटककर्त्रीचा उल्लेख केला : अशाच प्रकारे दोन पात्रे एकमेकांना न जुमानता संवाद बोलल्याचे . (पण दुर्दैवाने मी लेखिकेचे नाव नीट ऐकले नाही.) पण ते संवादसुद्धा "लोक एकमेकांचे न-ऐकता बोलतात" अशा आशयाचे असावेत, असे वर्णनावरून जाणवले. सेकंदा-सेकंदाला समांतर ऐकण्यासाठी नसावेत, किंवा समांतर वाचण्यासाठी नसावेत.

३) एक भाषा कच्ची आणि एक भाषा पक्की माहीत असलेल्या लोकांसाठी "पॅरॅलेल टेक्स्ट" प्रकारचे लेखनही मी वाचलेले आहे. माझ्याकडील स्पॅनिश पॅरॅलेल पुस्तकांत मात्र एक पान स्पॅनिशमध्ये, त्याचे दर्शनी पान इंग्रजीमध्ये होते. मात्र एकाखाली एक ओळी असलेली पुस्तकेसुद्धा असतात, असे ऐकलेले आहे. मात्र या प्रकारात जमल्यास एकाच ओळीवरचे पाठ्य वाचावे (म्हणजे मूळ भाषेतले) आणि अगदी गरज पडली, तरच दुसर्‍या भाषेतले समांतर पाठ्य वाचावे, अशी अपेक्षा असते. आणि भाषांतर जमेल तितके "समांतर=त्याच अर्थाचे शब्द असलेले" असते. त्यामुळे दोन वेगवेगळ्या पाथ्यांची अशी जुगलबंदी नसते.

४) पाश्चिमात्त्य संगीतामध्ये अनेक गायक वेगवेगळी धुन एकत्र गातात. त्यावरून स्फूर्ती घेऊन डग्लस हॉफ्स्टॅड्टर नावाच्या एका लेखकाने काही संवाद लिहिलेले आहेत. मात्र त्याने संवादातले वेगवेगळे आवाज एकाच वेळी वाचले जावेत अशी सोय केलेली नाही. किंबहुना त्याने असे काही केले आहे - दोन-तीन जणांचा संवाद चालू असतो. एका वेळी एकच पात्र बोलत असते. पण त्या पात्राचा विषयाचा धागा दुसर्‍या तिसर्‍या पात्राच्या धाग्यापेक्षा एककल्ली असतो. मात्र बर्‍याच वेळाने पात्रे "समेवर येतात". डग्लस हॉफ्स्टॅड्टरचे लेखन हे मोठे स्फूर्तिस्थान होते, पण (अ) त्याचे पुस्तक तसे पुरत्या ललित विषयाला वाहिलेले नव्हते, पन गणितातील एका थियरमबद्दल होते, आणि (आ) त्याच्या लेखनातल्या विविध पात्रांच्या ओळी अगदी एकाच वेळी वाचण्याकरिता नव्हत्या.

जेथवर मला ठाऊक आहे, तेथवर दोन पाठ्ये एकाच वेळी समांतर डोळ्यापुढे यावी, अशा प्रकारचे माझे वरील लेखन हे मी प्रथमच पाहिलेले आहे. तरी असे लेखन आणखी कोणी केले नसेल, असे काही मी ठामपणे म्हणू शकत नाही. फक्त मी बघितलेले नाही, इतकेच सांगू शकतो.

गवि's picture

9 May 2011 - 7:16 am | गवि

as said before:काहीतरी इंट्रेस्टिंग प्रयोग दिसतोय हे आधी कळलेले..

Now after this explanation about experiment it feels more interesting.

Thanks..

वाचून चांगले वाटले.. थोडे समजून घ्यावे लागेल. धनिफिती ऐकतो आणि पुन्हा लिहितो.
अभिनव आहे.

रेवती's picture

5 May 2011 - 6:25 pm | रेवती

दोन्ही पाठ्ये एकत्र वाचली......फारसे समजले नाही.
मग दोन्ही वेगवेगळी वाचली आणि पुन्हा एकत्र वाचली तर जास्त चांगले समजले.

आनंदयात्री's picture

7 May 2011 - 8:56 pm | आनंदयात्री

ओळी वाचून गंमत वाटली, ध्वनीफिती पण ऐकेन सवडीने.