आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला
अवघे आभाळ काजळून कंठ माझा दाटला
पंचप्राण शोषून माझे जीव असा टांगला
तुझ्या स्मरणात भिजता कसा हा जडावला
वर्षाव मोहरलेल्या तुझ्या स्वप्नांचा बरसला
मनास माझ्या वाहवत क्षितीजास घेऊन गेला
क्षितिजी तुझ्या स्मरणांचा आता वणवा पेटला
वाहत आलेल्या मनास माझ्या चटका लावून गेला
प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला
तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला
आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला
जीवास सुखावून काळजास हुरहूर देऊन गेला
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२१/०४/२०११)
प्रतिक्रिया
21 Apr 2011 - 5:24 pm | विदेश
प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला
तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला
सुरेख !
21 Apr 2011 - 6:22 pm | निनाद
अरे काय चाल्लेय काय?
पावसात वणवा? पावसात गारपीट ठीक पण वणवा?
गारपीटीत तुझ्या सरणांचा आता वणवा पेटला
वाट पाहत आलेल्या मनास माझ्या मटका लावून गेला
कसे वाटते?
-काव्य बाधिर्याचा बादश्शा
निनाद
21 Apr 2011 - 6:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हा ! हा!! हा!! भारी आहे!! __/\__ तुम्हाला!!
22 Apr 2011 - 2:18 am | निनाव
मि.का.,
खूपच सुंदर.
प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला
तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला
सुंदरच. व्वाह.
24 Apr 2011 - 3:34 pm | अलोककुमार
प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला
तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला
सुंदरच. व्वाह.