मुंबई विरुध्द पुणे ( आयपील क्रिकेट सामना)

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
20 Apr 2011 - 11:55 am

आजपर्यंत मुंबई विरुध्द पुणे अशा चर्चा/ भांडणे आपण अनेक ठिकाणी, अनेक वेगवेगळ्या संदर्भाने पाहिल्यात , रंगवल्यात

या दोन्ही शहरांच्या नावापुढे 'कर' जोडून दोन्ही संस्कृतीतील फरक, स्वभावपैलू विविध ठिकाणी, अगदी संकेतस्थळांवरही विक्रमी चर्चा आपण केल्या आहेत.

आज आयपील सामन्याच्या निमित्याने आज ही दोन्ही शहरे एकमेकांविरुध्द लढण्यास सज्ज झाली आहेत. आजचा सामना वानखेडेवर तर ४ मेला परत एकदा दोन्ही शहरे ( संघ ) भिडतील डी.वाय पाटील मैदानावर

सचीन आणी युवीला शुभेच्छा !!!

अमोल केळकर
----------------------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

20 Apr 2011 - 12:03 pm | मराठमोळा

बर मग?
किती प्रतिसाद हवेत?

स्पा's picture

20 Apr 2011 - 12:15 pm | स्पा

IPL हा प्रकार फाट्यावर मारण्यात आलेला असल्याने सदर सामन्यात काडीचाही रस नाही

छोटा डॉन's picture

20 Apr 2011 - 12:39 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.

बाकी ह्या टीमला 'पुणे टीम' का म्हणावे असा एक प्रश्न आहे बरं का.
म्हणजे ह्यात पुण्याचे म्हणावे असे नक्की काय आहे ?

बाकी आयपीएल सामने, त्यांचे निकाल आणि त्यानंतर होणार्‍या चर्चा ह्यांचे आम्हाला नेहमीच कवतिक वाटत आले आहे.
परवा कुणी कोच्चीने म्हणे पुण्याच्या टीमला हरवले होते ( आम्ही असले भिकारडे सामने पहात नसल्याने आम्हाला त्याचे दु:खही नाही आणि कवतिकही नाही ), त्यानंतर 'फेस्बुक'वर लै मारामार्‍या सुरु झाल्या कमेंटांच्या, आम्ही नुस्ती गंमत पहात होतो.
तर झाले काय की आमच्या मित्राने चुकुन 'पुणे हरल्याचा आनंद झाला' असे स्टेटस टाकले ( त्या दिवशी त्याचे ग्रह फिरले असावेत बहुतेक, असो ) आणि त्यानंत बाकी पब्लिक जे त्यावर चढ चढ चढले की विचारु नका.
असो, त्यातल्या काही केमेंट्स " तु कोच्चील चालता हो, तु मराठी / महाराष्ट्रीयन नाहीस ( अर्थात ह्या भिन्न बाबी आहेत हा भाग वेगळा ), तुमच्यासारख्या लोकांना 'मनसे'ने बडवायला हवे ( का ? मनसैनिकांना आजकाल दुसरी कामे नाही आहेत काय?) " वगैरे टाईप होत्या हो. आयला हे म्हणजे उदाहरणार्थ अवघडच झाले.
अशी खुन्नस फक्त आम्ही आधी 'भारत-पाकीस्तान' सामन्यात पहात होतो.
आता पब्लिक रोजच असे 'हायपर' होऊ लागले तर कठिणच आहे.

अवांतर :
आज तर म्हणे 'पुणे-मुंबई' सामना, म्हणजे एका श्रेष्ठत्वाचा शाश्वत वादात अजुन एका पैलुची परीक्षा.
मग निकालानंतर आज रस्त्यावर पुन्हा जल्लोश होणार काय ?
सांगता येत नाय बॉ, अफुची नशा लै वाईट असते ;)

अति-अवांतर :
वारंवार आमचे फुटबॉलप्रेमाच्या वास्ताँ देणार्‍या क्षुद्र अज्ञानी किटाणुंना आम्ही सांगु इच्छितो की फुटबॉलमध्ये त्यांचे सपोर्टर्स त्यांच्या 'क्लब'ला सपोर्ट करतात. समजा कुणी रियाल माद्रिदला बार्सिलोनाने हरवले म्हणुन माद्रिदमध्ये राहणार्‍या बार्का सपोर्टला तिकडुन गाशा गुंडाळावा लागत नाही. तसेच चेल्सीच्या एखाद्या पराभवानंतर समस्त मँचेश्टरवासियांना लंडनमधुन हाकलले जात नाही किंवा तत्सम आव आणणारी विधाने केली जात नाहीत. असो.

- छोटा डॉन

अमोल केळकर's picture

20 Apr 2011 - 12:57 pm | अमोल केळकर

हम्म प्रतिसाद आवडला :)

अमोल

वारंवार आमचे फुटबॉलप्रेमाच्या वास्ताँ देणार्‍या क्षुद्र अज्ञानी किटाणुंना आम्ही सांगु इच्छितो की फुटबॉलमध्ये त्यांचे सपोर्टर्स त्यांच्या 'क्लब'ला सपोर्ट करतात. समजा कुणी रियाल माद्रिदला बार्सिलोनाने हरवले म्हणुन माद्रिदमध्ये राहणार्‍या बार्का सपोर्टला तिकडुन गाशा गुंडाळावा लागत नाही. तसेच चेल्सीच्या एखाद्या पराभवानंतर समस्त मँचेश्टरवासियांना लंडनमधुन हाकलले जात नाही किंवा तत्सम आव आणणारी विधाने केली जात नाहीत. असो.

हळवे स्पष्टीकरण .. डोळे वाकस झाले =))

बाकी क्लबांच्या नावाने भांडाभांड पाहिली की आपसुकंच करंमणुंक होते =)) ही लोकं एवढी प्रोफेशनली भांडतात की असं वाटतं ही क्लबं ह्यांना भांडायचे पैसे देतात की काय ? बरं तर बरं ही भांडणारी लोकं ना मँचेश्टर मधे रहात , ना लंडण मधे .. ही रहातात भारतातल्या पुण्यात =))
बाकी अजुन पर्यंत कोणी पुणेकराने कोच्चीला सपोर्ट केल्या म्हणुन पुण्यातुन गाषा गुंडाळल्याचे ऐकिवात नाही :) हो बोलबच्चन झाली असेल तर अशी बोलबच्चन जालावरही धाकल्यांपासुन थोरल्यांपर्यंत सगळेच करतात :)
बोलबच्चन असे धर्म आपुला :)

-(फुटबॉल दे लिगा) चिल शी

छोटा डॉन's picture

20 Apr 2011 - 1:58 pm | छोटा डॉन

प्रत्येक ठिकाणी आमच्या फुटबॉलप्रेमाची साक्ष काढुन व त्यावर आदळाआपट करुन आत्तापर्यंत काही उपयोग झाला आहे का ? मग आताही होईल असे वाटते आहे का ?

बाकी चालु द्यात.
मला लोक उगाच घसा खरडुन ओरडताना दिसतात म्हणुन हे खरडले, बाकी ठिक :)

- छोटा डॉन

टारझन's picture

20 Apr 2011 - 2:06 pm | टारझन

जाऊ दिले आहे :)
सांगण्याचा संदर्भ असा होता .. की ज्याची त्याची आवड .. आता एखाद्याला शेपु आवडत नाही त्याला कशाला घसा खरडुन सांगायच .. बाबा रे .. शेपु म्हणजे सुरेख अन्न्नाविश्कार :) शेपु युं .. शेपु ट्युं .. :)

पण तरीही .. कोण कुठले परके क्लब .. त्यात परके प्लेयर्स .. आणि त्यावरुन भांडणं मित्रामित्रांत .. :) हस्यास्पद आहे हे .. ह्याचे स्पष्टीकरण होऊच शकत नाही. .घसा फाटला तरी :)

बाकी आयपीएल भिकारचोट आहेच्च .. आम्ही फक्त इंटरनॅशनल गेम्स मधे हारण्या जिंकण्याचा इंटरेस्ट ठेवतो ...
आयपिएल कोण हारला कोण झिंकला .. झा* फरक पडत नाही :) आणि त्यावरुन आम्ही बोलबच्चन म्हणुन कोणाला हुसकावुनही लावत नाही :)

छोटा डॉन's picture

20 Apr 2011 - 2:15 pm | छोटा डॉन

पण तरीही .. कोण कुठले परके क्लब .. त्यात परके प्लेयर्स .. आणि त्यावरुन भांडणं मित्रामित्रांत .. हस्यास्पद आहे हे .. ह्याचे स्पष्टीकरण होऊच शकत नाही. .घसा फाटला तरी

एवढ्या पार्टला दणदणीत 'लाईक' केले आहे :)

बाकी कधीतरी निवांत बसल्यावर आम्ही तुमचे फुटबॉल क्लब्स आणि सुपरस्टार्स ह्यावर बौद्धिक घेऊच.
तुम्ही क्रिकेटचे सांगायला सुरवात केली की मी पळुन जाईन ... ;)

- ( पुर्णविराम )छोटा डॉन

मी-सौरभ's picture

20 Apr 2011 - 7:56 pm | मी-सौरभ

>> कधीतरी निवांत बसल्यावर
कधी तरी कट्टा करावा तर तुम्ही टांग देता आणि मग वरचं वाक्य टंकता हे पटत नाही :)

गणपा's picture

20 Apr 2011 - 1:05 pm | गणपा

अति-अवांतर आवडले. :)

सविता's picture

20 Apr 2011 - 1:27 pm | सविता

कुठलाही खेळ ह्या त्याच्यामधल्या थरार, लागणारी कौशल्ये यामुळे न आवडता ...त्या खेळाचे चाहते हरल्यावर- जिंकल्यावर कसे वागतात्...या वरून यावरून आवडतो होय तुम्हाला!!!

बॉर..बॉर..बॉर.....

फारच हुच्च निवड बै तुमची .... आम्हाला नॉय बा जमणार इतके उच्च निकष ठेवायला!!!!

छोटा डॉन's picture

20 Apr 2011 - 1:52 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो

- छोटा डॉन

स्मिता.'s picture

20 Apr 2011 - 2:03 pm | स्मिता.

संपूर्ण प्रतिक्रिया आवडली. असंही तो आय पी एल प्रकार डोक्यात जातो. आम्ही तरी त्याला दुर्लक्षितच करतो.

माझ्या पूर्वीच्या ऑफिसात टिम रूमस् ला शहरांची, नद्यांची, पर्वतांची नावं दिलेली होती.
त्याचप्रकारे या सामन्यांमधील संघांना काहीतरी नाव द्यायचं म्हणून पुणे, मुंबई, चेन्नई, इ. शहरांची नावं दिलेली आहेत... त्याहून जास्त शहरांशी निगडीत असं त्या संघांत काहीही नाही. मग त्या-त्या शहरातल्या लोकांनी एवढं हायपर होण्यात काय तथ्य आहे काही कळत नाही.

फेसबूक वरचे स्टेटस मॅसेजेस् बघून तर ते टाकणार्‍यांची आणि त्यावर कमेंटस् देणार्‍यांची कीव येते.

प्रिय आंजा मित्र,
श्री. छोटा डॉन यांसी गण्याचा सनविवि,
आपला तो बाब्या दुसर्‍याचे रे कार्टे ही म्हण तु एकली असशीलच. तुझा हा प्रतिसाद वाचुन याचा काहिसा अनुभव आला म्हणुन हा प्रपंच.
आपल्यालाही फुटबॉल आवडत पण ४ वर्षातुन एकदाच. याचा प्रत्यय गेल्या वर्षी घेतलाच असेल. :)
माझं खर प्रेम आहे क्रिकेटवर. मग ते खेळाडूंची खरी कसोटी पहाणार कसोटी क्रिकेट असो वा एकदिवसीय वा हल्लीच टि-२० असो. जेव्हा मामला आंतरराष्ट्रीय असतो (दोन वा अधिक देशांतला) तेव्हा त्याच स्फुरण वेगळच असतं. (जस माझं फुटबॉल प्रेम ४ वर्षांनी उफाळुन येत तसं तुझ क्रिकेटच.)
क्लब क्रिकेटशी सार्धम्य असलेले कसोटीसामने आपल्याकडे पुर्वापार पासुन चालत आले आहेत.(रणजी.. दुलीप करंडक आदी....) आयपिएल ने त्यात पाश्चात्य फुटबॉल सारखा कमर्शियल अ‍ॅप्रोच आणला एवढचं.
जस तुला क्लब फुटबॉल आवडत तसच एखाद्याला क्लब क्रिकेट आवडण्यात गैर काही नाही. पण म्हणुन एक मेकांच्या नावाने गळे काढणं. आमचंच फुटबॉल /क्रिकेट श्रेष्ठ हा भासवण्याचा अट्टाहास पाहुन हसु येतं. (इथे हे फक्त तुलाच उद्देशुन नाही.)

असो,
कुणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही.

तुझा आणि क्रिकेटचा डायहार्ड फॅन.
गणा.

मेघवेडा's picture

20 Apr 2011 - 4:20 pm | मेघवेडा

दणदणीत सहमती!

अवांतर : डान्राव, चेल्सीच्या टीममध्ये चेल्सीचं काय आहे? फक्त स्टेडियम? तेही वास्तविक आहे फुलहम मध्ये! ;)

मेवे,
विषय क्रिकेटचा, आय.पी.एल.चा, पुणे आणि मुंबईच्या टीम्सचा आहे. त्यामुळे या धाग्यात चेल्सीच्या टीमला उगाच नावे ठेवू नयेत. ;-)

आणि तुमच्यामुळे आमचा आजचा चेल्सी-बर्मिंगहॅम म्याच थेट ष्टँफर्ड ब्रिजाच्या ग्राऊण्डावर पहायचा चान्स हुकला आहे. कुठे फेडाल हे पाप?? संधी पाहून हा स्कोअर सेटल करणेत येईल.

--(चेल्सी फ्यान) असुर

मेघवेडा's picture

20 Apr 2011 - 4:57 pm | मेघवेडा

असुर म्हाशय,

तसे आम्हीही चेल्सीचेच सपोर्टर आहोत बरं का.. पण पुणेरी डॉणचा "म्हणजे ह्यात पुण्याचे म्हणावे असे नक्की काय आहे ?" हा मुद्दा न पटल्याने ते उदाहरण दिलं.

बाकी कालपरवा पर्यंत पुणे टीमचा उदो उदो करणारं पब्लिक अचानक काळ समोर दिसू लागताच (!!) "यात पुण्याचे म्हणावे असे नक्की काय आहे" वगैरे तद्दल टुकार आर्ग्युमेंट करताना पाहून अं ह झा

पुन्हा अवांतर : पुण्याच्या आयपीएल टीमची डॉणाडॉण उडवणारे मुंबईच्या आयपीएल टीमचे बोलर्स मुंबैचेच आहेत बरं का!!

नितिन थत्ते's picture

20 Apr 2011 - 5:35 pm | नितिन थत्ते

"म्हणजे ह्यात पुण्याचे म्हणावे असे नक्की काय आहे ?"

हे वाक्य डॉणरावांबाबतच लिहिले आहे असे क्षणभर वाटले.

>>> हे वाक्य डॉणरावांबाबतच लिहिले आहे असे क्षणभर वाटले.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

थत्तेचाचा गप्प बसायचे ठरवुन हळुच चिमटे ? ते पण एवढे ?

- लोटपोट

छोटा डॉन's picture

20 Apr 2011 - 5:50 pm | छोटा डॉन

ते काही का असेना !

पण आमच्या असल्या हीन चाळ्यांपायी थत्तेचाचांसारख्या थोर, महान, गांधीवादी, आण्णावादी आणि सध्या मौनव्रतात असलेल्या सज्जन माणसाला त्यांचे मौन सोडावे लागले ही चांगले नाही झाले.
आम्हाला उपरोक्त बाबीचा अत्यंत आंतरिक त्रास होत आहे, शरमेने आमची मान पार खाली गेली आहे.
आपल्याकडुन असल्या बालीश खेळापायी होत असलेल्या चाळ्यांचा त्रास देशातल्या शांत, सज्जन लोकांना होत असतो हे आम्ही कधीपासुन सांगत आहोत. बघा बघा, त्याचे उदाहरण बघा इथेच ...

असल्या ह्या महान पापाचे प्रायश्चित्त म्हणुन आत्ता ह्या क्षणाला आम्ही 'क्रिकेट आणि त्यातल्या त्यात आयपीएल हा आमचा सर्वात आवडता खेळ असुन फुटबॉल हा एक नंबरचा भिकारडा खेळ आहे' अशी घोषणा करुन स्वतःलाच आत्मिक क्लेष देत आहोत.
कदाचित ह्यानंतर मी थत्तेचाचांप्रती केलेल्या महान अपराधाला किंचित क्षमापात्र ठरेन असे वाटते.

- ( दिलगीर ) छोटा डॉन

नितिन थत्ते's picture

20 Apr 2011 - 6:08 pm | नितिन थत्ते

क्षणभरच तसे वाटले असल्याने आपले प्रायश्चित्तही क्षणभरातच संपवावे. :)
बाकी आयपीएल आणि २०-२० हे क्रिकेट नसल्याचे मत आधी मांडलेच आहे.

छोटा डॉन's picture

20 Apr 2011 - 5:07 pm | छोटा डॉन

>> तुमच्यामुळे आमचा आजचा चेल्सी-बर्मिंगहॅम म्याच थेट ष्टँफर्ड ब्रिजाच्या ग्राऊण्डावर पहायचा चान्स हुकला आहे

काय ???
अरे कुठे फेडशील हे पापं ?

ह्यापुढे मी मेव्याचा कोणत्याही प्रतिसाद / वाक्य / खरड / व्यनी ह्यांचे महत्व माझ्यालेखी 'शुन्य' असेल असे जाहिर निवेदन देतो. आजपासुन मेव्याला आमच्या 'बॅड-बुका'त घालावे का कसे ह्यासाठी संबंधितांशी चर्चा करतो लगेच.

@ असुर : च्यायला फोटो वगैरे पाठव रे बाबा.

- छोटा डॉन

तिमा's picture

21 Apr 2011 - 5:44 pm | तिमा

म्हणजे ह्यात पुण्याचे म्हणावे असे नक्की काय आहे ?

सहमत. खरा सामना हा मुंबईचे ११ मवाली आणि पुण्याचे ११ भामटे यांच्यातच होऊ शकेल.

कुंदन's picture

20 Apr 2011 - 1:21 pm | कुंदन

बराच मोकला वेळ दिसतोय केळकर सायबाना. ;-)

सुहास..'s picture

20 Apr 2011 - 2:03 pm | सुहास..

ठेंगा मोड >> काढुन टाकला

बाकी ह्या टीमला 'पुणे टीम' का म्हणावे असा एक प्रश्न आहे बरं का.
म्हणजे ह्यात पुण्याचे म्हणावे असे नक्की काय आहे ?

पुणे टीमचा कर्णधार दिल्लीकर आहे.
मागे एकदा शाहुने दिल्लीकरांशी अनाक्रमणाचा आणि इतरानी आक्रमण केल्यास मदतीचा तह केला होता
( प्रसम्गी दिल्लीचेही तख्त राखते मराठी) असे वाचले आहे. त्यानुसार अजूनही घटना घडत असाव्यात बहुतेक.
किंवा शाहीस्तेखानाने पुण्याच्या लालमहालात तळ ठोकला होता त्याकळात शाहेस्तेखान पुणे ही त्याची जहागीर मानत असे. तद्वत पुणे संघाचे झाले असावे.
किंवा त्या संघाला काही उणे वाटू नये म्हणून पुणे टीम ( हो टीमच. कारन पुणे आणि संघ हे वादाचे मुद्दे उगाच प्रतिसादत यायला नकोत) म्हणत असावेत.

छोटा डॉन's picture

20 Apr 2011 - 1:51 pm | छोटा डॉन

ते सगळे असु द्यात हो !
अहो पण पुण्यात चक्क ४ किंवा अधिक जण एकत्र येतात, भांडणं न करता एक संघ तयार करतात, त्यांच्यात मतभेद होत नाहीत ही बाब आश्चर्याची नसावी काय ?
'पुणे' हे नाव घेऊन असे केल्याचे एक तरी उदाहरण आहे का ?
मी तर म्हणतो की मुद्दामुन ह्या संघास 'टीम पुणे' असे नाव देऊन पुण्याची व मराठी माणसाची उपरोधीक थट्टा केलेली आहे, आपण सर्वांनी ह्याचा निषेध करायला हवा ;)

- छोटा डॉन

मिगो's picture

20 Apr 2011 - 3:24 pm | मिगो

हे मात्र खर...

भडकमकर मास्तर's picture

20 Apr 2011 - 1:35 pm | भडकमकर मास्तर

गप्प राहायचे ठरवले आहे

किसन शिंदे's picture

20 Apr 2011 - 1:35 pm | किसन शिंदे

छया....आताची आयपीएल आम्हाला नाय आवडली ब्वा.

आत्मशून्य's picture

20 Apr 2011 - 3:45 pm | आत्मशून्य

ह्या वर्षी सर्वलोक ज्याचे वीषेश चाहते आहेत, व ज्याने आय.पी.एल. ला यशाच्या ऊत्तूंग शीखरावर न्हेले तो बीझीनेस महागुरू, व आय.पी.एल. चा अनाधीकृत सर्वेसर्वा ललीत मोदी नसल्याने आय.पी.एल. दर्जा, संयोजन, मार्केटींग, ऊत्सूकता, कूतूहल, ग्लॅमर याबाबतीत संपूर्ण गंडले आहे. म्हणूनच ना चुरस वाटतेय ना वीशेष थरार. बाकी नाही म्हटलं तरी लोकांनाही वर्ल्डकप संपल्यावर त्यांची पडीक काम ऊरकायची आहेतच..... बराच आराम झालाय आधीच. आधी ललीतला परत बोलवा, आणी चीरायु आमीन ला दूसरी जबाबदारी द्या, तरच आय.पी.एल. चा होणारा आय.सी.एल. टाळता येइल.

बाकी मुंबई विरुध्द पुणे काय म्हणणार ? आनंद आहे.

आधी अवांतर, मग अतिअवांतर आणि त्यानंतर अति-अति अवांतर........

हे सर्व प्रकार आवडले आहेत याची नोंद घ्यावी......

:-)

मूळ मुद्दा कोणता हेच विसरायला झालेलं......

बाकी सचिनने सर्वाधिक रन केल्या आणि मलिंगाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या की आम्ही टीव्ही बंद करायला मो़कळे.....

:-)

रंगोजी's picture

20 Apr 2011 - 4:34 pm | रंगोजी

बाकी सचिनने सर्वाधिक रन केल्या आणि मलिंगाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या की आम्ही टीव्ही बंद करायला मो़कळे.....

बास.. आणखी काय पाहिजे आयपीयल मधून..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2011 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रैवारी डिवायपाटीलच्या मैदानावर पुणे वि. दिल्ली थेट म्याच पाहण्यासाठी खडतर रात्रीचा प्रवास केला.
पुणे जिंकावे म्हणून घसा कोरडा पडेपर्यंत सपोर्ट केला. पन्नास रुपयाला एक झेंडा आणि शंभरचे घेतले तर तीन मिळतात म्हणून तीन झेंडे घेऊन चिल्या-पिल्यांसहित फुल्ल सपोर्ट पुण्याच्या संघाला केला. सालं पुणे हरल्यावर मी पुण्याच्या संघाला का सपोर्ट करत आहे, हे मात्र कळत नव्हते. म्हणून आजच्या सामन्याबद्दल काही बोलण्याऐवजी गप्प राहण्याचे ठरवले आहे. :)

-दिलीप बिरुटे

पक्का इडियट's picture

20 Apr 2011 - 6:25 pm | पक्का इडियट

ब्वॉर्रर्रर्रर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

पक्का इडियट's picture

20 Apr 2011 - 6:51 pm | पक्का इडियट

प्राडॉ दिलीप बिरुटे यांनी आधी " गप्प रहाणार आहे " अशा अर्थाचा केवळ एका वाक्याचा प्रतिसाद दिला होता, ज्याला मी "बॉर्रर्रर्" असा प्रतिसाद दिला.

यानंतर प्रा डॉ दिलीप बिरुटे यांनी प्रतिसाद स्वसंपादित केला आणि मला खरड केली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटेचे चित्र
बुधवार, 20/04/2011 - 18:34

बॉरंचा प्रतिसाद दुरुस्त करा. माझा प्रतिसाद अद्ययावत केला आहे.

सर्वसामान्य सदस्यांना उपप्रतिसाद आल्यावर प्रतिसाद संपादित करता येत नाही, पण प्रा डॉ यांनी संपादकपदाचा गैरवापर करत स्वतःचा प्रतिसाद संपादित केला आहे. त्याचा निषेध म्हणून त्यांची इच्छा / सुचना / आदेश असूनही माझा मूळचा प्रतिसाद मी तसाच ठेवला आहे.

हा प्रतिसाद आणि वरील माझा प्रतिसाद उडवण्याचे स्वातंत्र्य प्रा डॉ यांना आहे पण ते उडवणार नाहित असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2011 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी माझा प्रतिसाद टाकल्यानंतर काही क्षणानंतर माझ्या प्रतिसादाला संपादित अवस्थेत नेले होते. संपादित अवस्थेत सदरील प्रतिसादावर दुरुस्ती करण्याचे काम चालुच होते. तेव्हाच मला 'पक्का इडियट' या सन्मानीय सदस्याला खरड करण्याची खाज आली. इडियट नावावर माऊसला राइट क्लीक करुन ओपन लिंक इन न्यु टॅबवर खरड टाकल्यानंतर संपादित अवस्थेतील प्रतिसाद प्रकाशित केला. असो, माझ्या स्वयंसंपादनाच्या प्रतिसादामुळे सर्वसामान्य सदस्य म्हणून आपणास जो त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

बाकी, 'अवलिया' नावाच्या एका सदस्याला मी प्रतिसाद टाकल्यावर उपप्रतिसाद टाकण्याची सवय होती. असाच घोळ तेव्हाही झालेला होता. त्यांनाही काहीच तथ्य नसलेल्या विषयावर अशीच जाहीर बोंब मारायची जी सवय होती त्याची आठवण झाली.

-दिलीप बिरुटे

सुर तेच छेडीता चित्रं उमटले मनी. ;)

मस्त कलंदर's picture

20 Apr 2011 - 7:31 pm | मस्त कलंदर

पन्नास रुपयाला एक झेंडा आणि शंभरचे घेतले तर तीन मिळतात म्हणून तीन झेंडे घेऊन चिल्या-पिल्यांसहित फुल्ल सपोर्ट पुण्याच्या संघाला केला.

अरेरे...
स्टेडियमच्या आत हे सगळं फुकट मिळतं. माहित नव्हतं तर निदान विचारायचंत तरी.. :-)

बाकी, घसा कोरडा पडेपर्यंत सपोर्ट करूनही पुण्याची टीम हरल्याच्या तुमच्या दु:खात सामील आहे..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2011 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> स्टेडियमच्या आत हे सगळं फुकट मिळतं.
फुकट कुठे मिळत होते ? पुणे वारियर्सवाल्यांचा अधिकृत स्टॉलवर झेंडे, टी-शर्ट, टोप्या नगदी पैसे घेऊन विकत होते. हे फुकटचे दुकान कुठे होते ?

>>>> माहित नव्हतं तर निदान विचारायचंत तरी
आता सांगा...! झेंडे, टोप्या, टी-शर्ट फुकट कुठे मिळतात ते. :)

बाकी, आयपील म्हणजे नुसते पैसे कमविण्याचा धंदा. पेप्सी ऐंशी रुपये. दोन घोट पाणी तीस रुपये.

अवांतर : मैदानातील माहोल जब्बरदस्त असतो. भले-भले थिरकायला लागतात हे सर्व असले तरी थेट मैदानापेक्षा टीव्हीवर सामन्याची खूप मजा येते असे माझे प्राथमिक मत बनले आहे.

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

20 Apr 2011 - 6:24 pm | विनायक प्रभू

लेख

भडकमकर मास्तर's picture

22 Apr 2011 - 2:18 am | भडकमकर मास्तर

गप्प र्हायचे ठरवले आहे...

आयपीएल वगैरे एकदम बकवास आहे.. ईपीएल वगैरे तर भंकस आहे, पण ते इथे सांगून काय उपयोग?

पण गप्प रहायचं ठरवल्यामुळे जास्त काय बोलत नाही.

सर्वद्वेष्टा,

विसोबा खेचर's picture

22 Apr 2011 - 9:23 am | विसोबा खेचर

आम्ही जिंकलो..!

(कट्टर) मुंबैकर.