काय वाटल असेल माझ्या जीवाला...........

शिल्पा कांबळे's picture
शिल्पा कांबळे in जे न देखे रवी...
18 Apr 2011 - 7:37 pm

चाललो होतो एकटाच एका वाटेवरुन
तु भेटलीस आणि सुरुवात झाली नव्या आयुष्याला
आनंद वाटु लागला माझ्या जीवाला
पुन्हा रोज येऊ लागलो कॉलेजला
एक दिवस धाडस करुन विचारल मी तुला
तु नाही म्हंटल नाही,
पण टाईमच नाही उरला अभ्यासाला
शेवटी केटी लागली हो हिंदी विषयाला
ती केटी ची फि भरताना काय वाटल असेल माझ्या जिवाला
नंतर पुन्हा विचारल मी तुला
तु नाव सांगीतलस तुझ्या भावाला
त्यान सुपारी दिली गुंडा शिवाला
त्यान मला खुप खुप ठोकला
आणि बनवला माझा ढोकला
जागा उरली नाही हो रक्त जायला
ते रक्त पाहुन काय वाटल असेल माझ्या जिवाला
अगं...तुझ्या नादात कधी माडी,कधी बियर,कधी इंग्लीश,
आता सुरुवात झाली हो गावटीला
जेव्हा यायला लागला चकण्याचा खर्च
तेव्हा काय वाटल असेल माझ्या जिवाला
आता ऐकत असतील तिच्या कोणी मैत्रीणी येथे
तर जाऊन सांगा आता तिला, सोडली मी तिला
आणि पकडले दुसरीला .........
पुन्हा मजा येऊ लागली माझ्या आयुष्याला,
आणि बर वाटु लागल माझ्या जिवाला
पण काय वाटल असेल तिच्या जिवाला...........

हास्यप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

श्रीराम गावडे's picture

18 Apr 2011 - 7:42 pm | श्रीराम गावडे

तिला काय वाटणार?
साला कटकट गेली.
आपणबी दुसरा पघु.

सूर्यपुत्र's picture

18 Apr 2011 - 7:48 pm | सूर्यपुत्र

फक्त एक शंका : तु नाही म्हंटल नाही,
म्हणजे तिने "हो" म्हटले ना? मग परत कशाला विचारले?

-सूर्यपुत्र.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Apr 2011 - 10:49 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अवघड आहे!!

काव्य कळत नाही .. पण षिर्षक वाचुन तुमच्या जिवाची काळजी वाट्टे ;) जिवा रावांना रामराम सांगा :)

- जिवा महाला जयवर्धने

शिल्पा जी,

तुम्ही छान प्रयत्न केला आहे, मात्र तुमचे काव्य पुन्हा वाचा आणिक अजुन कुठे अधिक छान करता येईल असा विचार करा.

मला खात्री आहे, तुम्ही अधिक छान लिहु शकता. आम्ही सर्व वाट पाहात आहोत तुमच्या पुढच्या लेखनाची.

- खूप खूप शुभेच्छा!

नरेशकुमार's picture

19 Apr 2011 - 1:39 pm | नरेशकुमार

नका लाउन घेउन जिवाला इतकं !

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2011 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार

जीवाच्या भानगडीत सखा विषयी कोणीच काही काळजी दाखवली नाही हे बघून शरम वाटली.