एका अपरिमेयाचं मुक्तसुनीत

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
13 Apr 2011 - 6:37 am

३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१०...

वर्तुळ.

मी पहिल्यांदा हा आकारबंध
नेत्रपटलांच्यावरती केला पिकसेलबद्ध
तेव्हापासून झालोय वेडापिसासा

मुक्तकंपासभिरकी वलयरेषेपलिकडे
प्रकाशकणग्राही रेटिनापटापलिकडे
घडले असे गारुड

व्यासोच्छिष्टजगतात मर्यादेच्या
परिघापल्याड मुक्त अमर्यादतेचा
दिसलाय रिकामा आवाका

आवाक्याबरोबरच दिसलं एक
समन्वयसाधक केंद्रविस्तारमर्यादक
अस्तित्ववेधी "शून्य"

त्याच्या हिरण्यगर्भकेंद्राचा
लक्षदिशासामायिक सिमेट्रीचा
तो मनःचक्षुसाक्षात्कारच

परीघव्यासछेद जो स्थिरगुणोत्तरी
अनंतदशांगुळांच्याही पल्याडी
अपरिमेयसंख्यामय,

शून्यमंडलव्याख्याकारी 'पाय'ला
क्षणैकतेपुरते गोठवणारे
हे "शून्य"...

कविताविज्ञान

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

13 Apr 2011 - 7:03 am | भडकमकर मास्तर

दोन तीन वेळा वाचले... मग समजल्यासारखे वाटले ...
अमर्याद , लक्षदिशासामायिक परंतु गोठलेल्या वर्तुळाकार शून्याबद्दल काहीसे...

शरदिनीच्या कवीतांपेक्षा लवकर समजतय की!;)

सुनील's picture

13 Apr 2011 - 7:20 am | सुनील

उपक्रमावर नंदन यांनी केलेल्या एका खरडीची आठवण आली.....

नंदन
बुध, 01/16/2008 - 15:57
नमस्कार सुनील. 'पाय'ची किंमत एखाद्या मराठी वाक्याद्वारे स्मरणात ठेवता येईल का, हा तुमच्या प्रतिसादातील प्रश्न वाचून हा जरा बालिश वाटेल असा प्रयत्न केला आहे -

3.14159 26535 89793 23846 26433

कशाला ही भलीमोठी व अगडबंब (संख्या) एकसमयावच्छेदेच ध्यानी बाळगण्यासाठी विनाकारण गोंधळ घालताहात? :)
अनमानधपक्याने गणनशास्त्रविषयक पूर्वग्रहदूषित समजगैरसमजांचा विचार केला तरीही, पुरातनकाळातील भारतीय संख्याशास्त्रज्ञांचे काही पायबद्दलचे ठोकताळे जुळत नाहीत.

चिरोटा's picture

13 Apr 2011 - 11:06 am | चिरोटा

धन्यवाद सुनील. पण ही लक्षात ठेवायला कठीण वाटते. ह्या आठवड्यात 'पाय' वर दुसरा लेख पाडतोय!, त्यात ह्याचा उल्लेख केला आहे.

नगरीनिरंजन's picture

13 Apr 2011 - 8:53 am | नगरीनिरंजन

शून्यमंडलव्याख्याकारी 'पाय'ला
क्षणैकतेपुरते गोठवणारे
हे "शून्य"...

छान! अनंतविश्वात अविरतपणे भरकटणार्‍या एखाद्या 'व्हॉयेजर'चा फोटो पाहावा तसं वाटलं किंवा लांबलचक अनंत नळकांड्याला डोळा लावल्यावर त्याची लांबी एका वर्तुळात साकळलेली दिसावी तसं.

प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ समजला. पण समग्र कवितेचा अर्थ समजायला शतजन्म शोधावे लागतील बहुतेक! आता भडकमकर मास्तरांना कविता आवडलीय म्हणजे शरदिनीबैंच्या कवितेपेक्षा 'भारी' झाली असा घ्यावा काय?

(लंबूटांग धाव!!!)

विसुनाना's picture

13 Apr 2011 - 10:49 am | विसुनाना

'झीरो टेंड्स टू इन्फिनिटी' : कधीकाळी लिमिट्स शिकत असताना केलेल्या गमतींची आठवण झाली.
बिग बँगही आठवला.

कविता आवडली.

इथं साध्या कविता कळत नाहीत आता ही कविता कळायला आपट्यांकडून योगबल उधारीवर आणावे लागणार का?

चिरोटा's picture

13 Apr 2011 - 11:03 am | चिरोटा

भारी कविता.
राजेश, आता e आणि वर्गमुळात(-१) वर पण येवू द्यात्.

विजुभाऊ's picture

13 Apr 2011 - 11:13 am | विजुभाऊ

सुनीत हा काव्य प्रकार तसा ओळींची मर्यादा मानली तर मुक्तच असतो.
पण मग मुक्तसुनीत असे नाव देण्याचे काय प्रयोजन आहे ते उमजले नाही. ( कदाचित टयार्पी साठी ते नाव नावात गोवले असावे असा कयास आहे)
बाकी

  • आवाक्याबरोबरच दिसलं एक
  • समन्वयसाधक केंद्रविस्तारमर्यादक
  • अस्तित्ववेधी

या बद्दल काय बोलायचे
आय इन द यू इन द यू इन द आय असेच काही गुरुदेवांसारखे.

सुनील's picture

13 Apr 2011 - 3:37 pm | सुनील

सुनीत हा काव्य प्रकार तसा ओळींची मर्यादा मानली तर मुक्तच असतो.
नसावे.

केशवसुतांनी (आणि म्हणूनच केशकुमारांनीदेखिल) "आम्ही कोण" मध्ये शार्दूलविक्रीडित ह्या वृत्ताचा वापर केलेला आहे. तीच गोष्ट अन्य जुन्या कवींची.

असो, हे अवांतर झाले!

राजेश घासकडवी's picture

13 Apr 2011 - 5:55 pm | राजेश घासकडवी

हा फ्री व्हर्स साठी मराठी प्रतिशब्द आहे. सुनीत या काव्यप्रकारात चौदा ओळी असतात, सर्वसाधारणपणे सात द्विपदी. वरची कविता सात कडव्यांमध्ये विभागली आहे. म्हणून हे मुक्तसुनीत हे नुसतंच फ्री व्हर्स नाही तर यमक व छंदाशी लांबून संबंध सांगणारं आहे.

धनंजय's picture

13 Apr 2011 - 9:06 pm | धनंजय

कल्पक. हो कल्पकच हे अंककवन मुक्तसुनीतावेगळेही असो; "गारुडा"ऐवजी वापरलेला "भारूड" बदलावाच

Yes. I love a funny mnemonic's pi

नंदन! ते कल्पकच

राजेश घासकडवी's picture

13 Apr 2011 - 9:53 pm | राजेश घासकडवी

आत्ताच. मी बदलला तो शब्दप्रयोग :)

धनंजय's picture

13 Apr 2011 - 11:34 pm | धनंजय

गारूड. हो गारूडच या कवनाचिया नवआवृत्तिलेखनात दिसू लागल्यासरशी अनुरोधाचे झालेसे इतिकर्तव्य...

विसुनाना's picture

14 Apr 2011 - 2:41 pm | विसुनाना

अरेच्या! या कवितेत जे दडवलंय शब्दावगुंठनामधून तेच उशिरानंतर समजल्याचा सखेद बधीरपणा.
वरचे हे प्रतिसाद व राजेशजींच्या काव्याविष्कारामधूनही हेच चरणकमल अनेकवेळा दिसत असतानाही...
धन्यच! हे लिहिणारे जे रचनाकार 'नवाक्षरनामधारक' त्यांना विनम्रपणाने दंडवतही घालावा लागणारच.

हाहाहा! या कवितेला त्या प्रथेनुसार प्रतिसादरूपातूनच योग्य गरजेइतके नेहमीचेच आकडे वापरतोय

साक्षात π वर कविता? घासू गुर्जी, तुस्सी ग्रेट हो!

रमताराम's picture

13 Apr 2011 - 9:59 pm | रमताराम

गुरुत्वाकर्षण बंद केले की घनगोलाचा त्रिकोण होतो हा नुकताच लागलेला नि डोक्याला शॉट लावणारा शोध आठवला.
घासुगुर्जी, असली भयानक आठवण करून देणारे लिखाण केल्याबद्दल 'शो कॉज व्हाय यू शुड नॉट बी सेन्ट टू ग्रॅविटीलेस हेल!'

चतुरंग's picture

13 Apr 2011 - 10:53 pm | चतुरंग

कुठे आहेत तुमचे पाय गुर्जी?
इकडे करा, आमची ही आदरांजली अर्पण! ;)

-रंगा

प्रभो's picture

13 Apr 2011 - 11:15 pm | प्रभो

क ड क!!!

ajay wankhede's picture

13 Apr 2011 - 11:17 pm | ajay wankhede

सत्र्र्यान्दा वाचलि राव्..मेन्दुचा पार भुगा झलाय.. "पाय" नि अभियन्ता बनवलय पण "पाय "वर कविता.यु आर ग्रेट

छानच.
तुम्ही जर इंजिनियर असाल, तर कॄपया व्यवसाय बदला .
(गम्मत केली बरं...:) ).

मेघवेडा's picture

14 Apr 2011 - 3:10 am | मेघवेडा

च्यायला .. अख्खा दिवस गेला.. आत्ता समजली! शून्य करड्या रंगात का लिहिलंय याचा विचार करत होतो इतका वेळ! आत्ता कळलं तेज्यायला!

गुर्जी, साष्टांग दंडवत स्वीकारावा! :)

केशवसुमार's picture

14 Apr 2011 - 12:35 pm | केशवसुमार

घासुगुर्जी..
एकदम मस्त कविता..आवडली..
(भोपळा)केशवसुमार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2011 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, कविता काही झेपली नाही.
(कोणी मला व्यनिमनीतून 'आशयाबद्दल' सांगा रे काहीतरी)

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Apr 2011 - 1:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पिकसेलबद्ध, मुक्तकंपासभिरकी, रेटिनापटापलिकडे, वगैरे हायब्रिड शब्द आवडले.

गुर्जींनी या कवितेमधून पायची व्याख्या, गणिती सूत्रांमधे आढळणारा पाय इत्यादी कल्पना मजेशीर पद्धतीने मांडल्या आहेत. शेवटचं कडवं सगळ्यात जास्त आवडलं. "पाय ही अपरिमेय (irrational) संख्या किती डेसिमल्सपर्यंत लक्षात ठेवायची" असा प्रश्न कोणी विचारला तर "जेवढे विचित्र शब्द बनवता येत असतील तेवढी" असं एक उत्तर सुचत आहे. त्यामुळे कवितेचा शेवट अतिशय तार्किक वाटला.

काही व्यक्तीगत टिप्पणी: पायवर कविता आणि कवितेच्या शीर्षकातला शब्द ही गोळाबेरीज रोचक आहे. अर्थात गुर्जींनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहेच. :-)

चित्रा's picture

14 Apr 2011 - 4:03 pm | चित्रा

पिकसेलबद्ध, मुक्तकंपासभिरकी, रेटिनापटापलिकडे, वगैरे हायब्रिड शब्द आवडले.

+१.
व्यासोच्छिष्टजगतात मर्यादेच्या
परिघापल्याड मुक्त अमर्यादतेचा
दिसलाय रिकामा आवाका

हे भारीच..

प्रदीप's picture

16 Apr 2011 - 10:34 am | प्रदीप

हायब्रीड शब्द आवडले तरी 'पिकसेलबद्ध' खटकले. इथे कंट्युनिटीला छेद जातो, म्हणून.

नंदन's picture

14 Apr 2011 - 1:45 pm | नंदन

पिकसेलबद्ध, मुक्तकंपासभिरकी, रेटिनापटापलिकडे, वगैरे हायब्रिड शब्द आवडले.

सहमत आहे.

मराठी आंतरजालीय कवितेचा 'परीघ' ओलांडणारी कविता! :)

कविता छानच .. शब्द खुपच अवघड वाटले वाचायला ...

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Apr 2011 - 4:03 pm | बिपिन कार्यकर्ते

मायला!

परिकथेतील राजकुमार's picture

14 Apr 2011 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार

कशाला असले काहितरी करत बसता हो ?

एक चित्र काढा बघु फर्मास ;)

लिखाळ's picture

15 Apr 2011 - 8:30 pm | लिखाळ

समजले नाही. आवडले :)

क्रान्ति's picture

18 Apr 2011 - 7:59 pm | क्रान्ति

यांच्या अफाट, अचाट, विराट काव्याची आठवण झाली!

रंगीला रतन's picture

13 Aug 2023 - 10:10 pm | रंगीला रतन

लॉल...