अर्धवट राहीलेले प्रेम

वेदान्त रोहिदास सालियान's picture
वेदान्त रोहिदास... in जनातलं, मनातलं
13 Apr 2011 - 11:43 am

प्रेम सर्वच करतात पण जो व्यक्ति दुसरया व्यक्ति च्या भावना समजून घेतो तेच खर प्रेम. प्रेम म्हणजे दुसरयासाठी आपल्या भावना बंदिस्त करून ठेवणे. प्रेम करन सोपं असत पण तिच्यासाठी/ त्याच्यासाठी त्याग करन अवघड असत.
तीच नाव विदया. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकायला तासात सुध्दा एकत्रच होतो. तेव्हा कधी तिच्या कड़े पाहिल्यावर वाटल नाही की कधी मी तिच्यावर प्रेम करेन पण म्हणतात ना की प्रेम आंधळं असत.
दिसायला तशी ती attractive रंग सावला. उंचीने लहान पण खरच तिच्या सारखी कोणीच नाही.
बरेच मुले तिच्या आणि तिच्या बहिणीच्या मागे लागले होते काही मुल त्यांना नेहमी चिडवित असत. मी सुध्दा बरयाच वेळा तिला चिडवल पण ती मला किंवा कोणत्याही मुलाला काहीच म्हणत नसे. इतर अनेक गोष्टीमुळे मी तिच्यावर प्रेम करू लागलो.सकाळी क्लास सुटल्यावर मी तिला प्रपोज केला तसा थोडा घाबरत होतो पण माझे काही जिवलग मित्रांचा सपोर्ट होता मला त्यांनी आणि तिच्या बहिणी ने मला थोड़ी मदत केली. माझ्या कोणत्याच मित्राला अपेक्षा नव्हती की मी तिला प्रपोज करेल म्हणून.
सकाळी ८.०० वाजता क्लास सुटल्यावर मी तिच्या मागे मागे गेलो तिला थांब म्हणालो तशी ती थांबली पण थोड़ी घाबरत घाबरत. शेवटी तिला मी प्रपोज केला तीच उत्तर ऐकण्यासाठी कॉलेज मध्ये लायब्ररी जवळ उभा राहिलो कोणत्याच गोष्टींचा विचार न करता सरळ जाउन उत्तर विचारल पण ती नाही म्हणाली. मला म्हणाली मी फ्रेंडशिप करेन पण मी तुला "हा" नाही म्हणु शकत "sorry". एवढ म्हणून ती निघून गेली.
त्या नंतर १२ वीच्या वर्षभर मी पुन्हा कधी तिच्या शी बोलण्याचा प्रयत्न सुध्दा केला नाही.
पण १२ वीच्या शेवटच्या दिवशी पुन्हा तिच्याशी बोलण्यासाठी गेलो या वेळी त्यावेळची भीती तिच्या चेहऱ्यावर नव्हती.
पुन्हा प्रपोज केला, पण या वेळी तीच उत्तर वेगळ होत, ती म्हणाली मला तू आवडतोस पण माझ्या घरी कळालं तर मला खुप मारतील आणि माझ कॉलेज सुध्दा बंद होइल. आता तूच सांग मी काय करु?
तिच्या या प्रश्नाला मी काहीच उत्तर देऊ शकलो नाही.

तीला उत्तर न देउन माझी काही चुक झाली का? तिच्या भावना समजुन घेन्यात मी चुकलो का? याच उत्तर तुम्हीच द्या..........

कथालेख

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

13 Apr 2011 - 11:49 am | शिल्पा ब

वा!!! याला म्हणतात संक्षिप्त!!

स्पा's picture

13 Apr 2011 - 12:03 pm | स्पा

वा!!! याला म्हणतात संक्षिप्त!!

मी चुकून विक्षिप्त अस वाचल

टारझन's picture

13 Apr 2011 - 1:30 pm | टारझन

मी चुकून विक्षिप्त अस वाचल

क .. ह .. र .. कोण ? तो की ती ?

अवांतर : लेखक मोहोदय, तिचं कॉलेज संपल्यावर बघा काही करता आलं तर :) आणि आपण एकदा सेटल झालात की डायरेक्ट तिच्या घरी घुसा :) पण आधी पोरगी खात्रीलायक आहे का ते तपासा ... नाही तर तिच्या ऐवजी तुम्हालाच छाणसा चोप मिळेल ;)

- विलुप्त

गवि's picture

13 Apr 2011 - 11:59 am | गवि

वरील फोटो (डाव्या कोपर्‍यातील छोटा) तुझाच असेल तर तू एकदम चिकनाचुपडा आहेस. कसलीच काळजी नसावी.

बाकी पोरीला आवडतोस असं ती म्हणालीय ना? घरचे मारतील एवढीच भीती आहे ना तिला ? झालं तर मग.

पुन्हा एकदा तो फोटो तुझाच असेल आणि ती तुझ्याएवढीच असेल तर तुम्ही दोघेही घरच्यांना घाबरण्याच्या वयात आहात असं दिसतंच आहे. तस्मात, फिकर नॉट. सध्या नुसतं आवडतंय त्यात आनंद बाळगावा.. बाकी सर्व यथायोग्य होईल. नाही झालं तरी एकूण सगळं ठीक होतच असतं. चिल अँड एन्जॉय. असलं वय परत मिळणार नाहीये..भावना समजून घेण्यात आत्ता वेळ वाया घालवू नये. आत्ता लाईनी माराव्यात. जमल्यास दोन तीन प्यारेलल लाईनीही माराव्यात.

भावना बिवना समजून घेणे / न समजून घेणे वगैरे घोळ पुढे करायचेच आहेत.. आत्ता नको.
:)

(मिपावर "काकांचा सल्ला" सदर सुरु करावयाचे असल्यास उत्सुक)- गवि

कूलेश्वर बाबा गगनविहारी की जय!

असुर's picture

13 Apr 2011 - 4:04 pm | असुर

+१
फक्त एकच बदल -
कूलेश्वर काका गगनविहारी की जय!

--असुर

चालेल तसं म्हणूया. जयजयकार होणे महत्वाचे!

नगरीनिरंजन's picture

13 Apr 2011 - 12:20 pm | नगरीनिरंजन

>>चिल अँड एन्जॉय. असलं वय परत मिळणार नाहीये..भावना समजून घेण्यात आत्ता वेळ वाया घालवू नये. आत्ता लाईनी माराव्यात. जमल्यास दोन तीन प्यारेलल लाईनीही माराव्यात.

असेच म्हणतो. प्रेमाच्या खुळचट कल्पनांपायी सोनेरी दिवस वाया घालवू नये.

मनराव's picture

13 Apr 2011 - 12:33 pm | मनराव

+११११११

५० फक्त's picture

13 Apr 2011 - 12:42 pm | ५० फक्त

आयला हे विक्रम वेताळ टाईप वाटतंय, अवघड आहे, उत्तर द्या तर एक नाही द्या तर दोन.

''र १२ वीच्या वर्षभर मी पुन्हा कधी तिच्या शी बोलण्याचा प्रयत्न सुध्दा केला नाही.'' - बारावीला मार्कात काय फरक पडला का यानं, आणि वर्षभर संयम ठेवताय तर अजुन ३-४ वर्षे थांबा की का उगा विद्या सोडुन भावना वगैरेच्या मागं लाग्लाय. आणि बारावीत पोरगी असले धंदे करायला लागली, होय धंदेच, तुम्हाला प्रेम बिम वाटत असलं ना तरी ज्या आईबापानी तिला जन्म दिलाय आणि १७-१८ चि होईतोवर सभाळलंय ना त्यांच्या लेखी हे धंदेच असतात. तर काय पोरगी असले धंदे करायला लागली ना तर तिचे आई बाप तिला मारणारच, काय चुक न्हाई त्यात. अन ती पोरगी जर आई बापाच्या माराला घाबरत असेल तर संसार कशी करेल रे.

एक ल्क्षात घ्या ज्या टिवित काही बाही बघुन तुमाला हे प्रेम बिम सुचतयं ना त्याच टिवित तुमचा नि त्या पोरीचा बाप खप पंचायतीचे निकाल अन हॉनर किलिंगचे रिपोर्ट बघत असतो.

अरे कालेजात शिकायला जावं, विद्या मिळाली पाहिजे ती अशी नाय, कालेजात प्रेम जमलं नाय तर जग नपुंसक नाय समजत, होतात लग्नं नंतर सुद्धा आणि पोरं पण. एवढं डोक्यात जाउ देउ नये, नंतर हीच पोरगी बायको झाली ना मग याच भावनांचा वगैरे उपयोग करुन असलं झ्यागमॅटिक ब्लॅकमेल करेल ना की ** नको पण अटी आवर अशी वेळ येईल.

हि विद्या कोण प्रकाश टाका जरा.......
आणि विद्या कशी मिळाली पायजे ते पण सांगा. माझ्या एक मित्राला अशीच विद्या सोडून गेली............होती

मराठमोळा's picture

13 Apr 2011 - 1:03 pm | मराठमोळा

हममममम.... जवानी का जोश... :)
हे वय म्हण्जे फुल्ली फिल्मी.. (कविता करणे, भावना समजुन घेणे, प्रेमाचे अर्थ लावणे, शेरो-शयरी जमा करणे वगैरे वगैरे... ) सोळावं वरीस धोक्याचं... योग्य दिशा (पक्षी:बुद्धी) मिळाली तर रामदास.. नाही तर मग देवदास. ;)

बाकी चालु द्या..

गवि's picture

13 Apr 2011 - 1:05 pm | गवि

योग्य दिशा (पक्षी:बुद्धी) मिळाली तर रामदास..

ठाणे कट्ट्याच्या दिवशी हे लक्षात आले आणि पटले.

मराठमोळा's picture

13 Apr 2011 - 1:20 pm | मराठमोळा

>>ठाणे कट्ट्याच्या दिवशी हे लक्षात आले आणि पटले

गवि,
आम्हाला पण सांगा की ष्टोरी.. :) इथे न सांगण्यासारखी असेल तर व्यनी करा.. :)

गवि's picture

13 Apr 2011 - 1:22 pm | गवि

ष्टोरी बिरी काय नाय..

नुसते निरिक्षण नोंदवले हो..

;)

पिलीयन रायडर's picture

13 Apr 2011 - 1:04 pm | पिलीयन रायडर

तुला वाटतय तितकं काही भयंकर घडलं नाहीये...
अभ्यास कर... पुढे जाउन तोच कामाला येणारे....

छोटा डॉन's picture

13 Apr 2011 - 2:39 pm | छोटा डॉन

>>अभ्यास कर... पुढे जाउन तोच कामाला येणारे....

कायपण नका सांगु राव, अभ्यास करुन कुणाचे भले झाले आहे ?
उगाच चुकीचे मार्गदर्शन नका करु राव.

बाकी लेख आणि त्यावर गवि'काकां'चा सल्ला मजेदार आहे :)
वाचतो आहे ;)

- छोटा डॉन

अभ्यास करुन न करुन सगळे शिंचे येकाच हपिसात तसल्याच खुर्चीवर तेवढ्याच पगारात काम करतात...
फरक पडत नाही....
त्यमुळे... विद्यार्जन करायला शिखा...

५० फक्त's picture

13 Apr 2011 - 1:12 pm | ५० फक्त

+१ पिलियन रायडर

तुला वाटतय तितकं काही भयंकर घडलं नाहीये...
अभ्यास कर... पुढे जाउन तोच कामाला येणारे....
.........

आणि घडलं असलं तरी एक कर इथं धागे काढु नको, वरची मराठमोळा यांची सही वाच, ती समजली की माझी वाच. दोन्ही नाही समजल्या तर पिलियन रायडर काय म्हणाताहेत तेच ध्यानात ठेव. सध्या पुरतं एवढं बॉद्धिक पुरे तुला. अजुन त्रास कमी झाला नाही तर स्पाला व्यनि टाक.

पुष्करिणी's picture

13 Apr 2011 - 1:23 pm | पुष्करिणी

वर जे २ काका कंपू आहेत त्यांचं थोडं थोडं ऐका...बाकी परिस्थिती बिकट वगैरे अजिबातच नाहीये .

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 3:20 pm | परिकथेतील राजकुमार

अभ्यास करा आणि नोकरी धंद्याचे बघा.

ह्या वयात स्वतःच्या पायावर उभे रहायचे सोडून असले धंदे कसे काय सुचतत लोकांना काय माहिती ?

आमच्या एका दिड शहाण्या मित्राला तर स्वतःला मैत्रिण नाही ह्यात इतका अपमान वाटायचा की काय सांगु. शेवटी 'उद्या पोरगी पटली तर स्वतःच्या पैशानी चहा पाजायची लायकी आहे का?' असे त्यांच्या मोठ्या बंधुराजांनी विचारले तेंव्हा अक्कल आली.

असुर's picture

13 Apr 2011 - 4:10 pm | असुर

+१

कमवायची अक्कल आली की असले भंकस प्रॉब्लेम्स ऑपॉप सुटतात.
तरीपन कल्जि घेने, हे हे!!!!

अवांतर: आवरा, हल्ली परा माझ्यासारखाच विचार करायला लागलाय की काय? :-) दर वेळी त्याला +१ लिहायची वेळ येते!! :D च्यायला, या +१ च्या फ्रस्ट्रेशनवर एक धागा काढलाच पाहीजे आता!! =)) =))

©º°¨¨°º© आयडीकथेतला मुस्तफाकुमार ©º°¨¨°º©
Only Airytales Have Happy Landings ...

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 4:18 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

अरे आता काय सांगायचे.

एक अमित म्हणुन मित्र होता. तो मैत्रिणीला मिस कॉल द्यायचा. मग ती बिचारी ह्याला फोन करायची. हा मग मोठ्या रुबाबात संध्याकाळी इकडे भेटू तिकडे भेटू वैग्रे गफ्फा हाणायचा आणि पुन्हा वरती 'संध्याकाळी पावभाजी खायची असेल तर तुझे २५ रुपये घेऊन ये' म्हणायचा.

समानतेचे युग आहे वैग्रे सगळे मान्य आहे पण ते ऐकले की आम्ही बेक्कार फुटायचो राव हसून हसून. जायचे पण मैत्रिणीच्या गाडीवर. तिने कधी पेट्रोलचे पैसे मागितल्याचे मात्र ऐकिवात नाही ;)

प्यारे१'s picture

13 Apr 2011 - 3:51 pm | प्यारे१

काका, का का असे छळताय त्या 'पाडसा'ला.....???

१२ वी च्या आगे मागे होणारं 'खरं प्रेम' कधी केलं नाही का काय तुम्ही कोणी? हल्लीच कुणाचा तरी लेख वाचला होता त्यात अशा पौगुंद वयात ( सौजन्य सांगाय पायजेत व्हय?) सल्ले मागितले जातात ते 'खुंटी' बळकट करण्यासाठी.

'बरोबर म्हणणाराच फक्त सक्खा आणि बाकी सगळे लावतात तुक्का' असे असते सगळे.

तू उत्तर नाही दिलेस तेच बरोबर केलेस. तिला तुझ्या भावना आल्यात लक्षात. सो डोन्ट वरी. कॉले़ज पूर्ण करा आणि मज्जा करा.

एकदा बंड्या धावत धावत एका एका मठात जातो तिथे सात चटयांवर सात साधु बसलेले असतात . . . . . .

बंड्या : महाराज . . . एकही पोरगी पटत नाही . . . काय करु तेवढ सांगा हो . . . . . . .

.

.

.

.

.

.

ज्येष्ठ साधु (आपल्या सहकार्यांना) : आणखी एक चटई आणा रे या बंड्यासाठी . . . . . . . . . .

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 4:14 pm | परिकथेतील राजकुमार

स्पावड्या तुला घरी प्रेमाने बंड्या म्हणतात ना रे ?

असुर's picture

13 Apr 2011 - 4:19 pm | असुर

स्पायलू = बंड्या!!! =)) =))

सं प लो!!!

तुझ्यानंतर किती चटया झाल्या रे आत्तापर्यंत??? ;-)

--असुर

या.... आलात काड्या सारायला :D

मराठमोळा's picture

14 Apr 2011 - 12:06 pm | मराठमोळा

हाहाहा..
इथे पण बरेच चटई वाले साधू आहेत.. =))
आधी हे सगळे "मज्यशि मयतरि कर्न्अर क" असे विचारणारे बंड्या होते.. =))

स्पा's picture

13 Apr 2011 - 4:18 pm | स्पा

नाही
पण तुला बंड्या म्हणून कुठल्यातरी मुलीने खरड लिहिलेली मी वाचली होती :D

©º°¨¨°º© चोरा ©º°¨¨°º©

गवि's picture

13 Apr 2011 - 4:20 pm | गवि

बंड्या म्हणून कुठल्यातरी मुलीने

मुलीचं असं नाव पहिल्यांदाच ऐकलं बुवा..

इरसाल's picture

13 Apr 2011 - 4:44 pm | इरसाल

प्रेम करा अभ्यास करा जे जेव्हा व्हायचे ते तेव्हाच होणार बाकी चालूद्या एन्जॉय करा.

आपण घेतलेले निर्णय चुक की बरोबर हे जेंव्हा दुसर्‍यांना विचारावे लागणार नाही, तेंव्हा समजायचे आपण प्रेम करण्यास योग्य आहोत ... बस्स ..स्वतावर विश्वास असणारी माणसेच प्रेम करु शकतात... नाहि तर ती स्वताची आणि पुढच्याची निव्वळ फसवणुक असते...

अर्धवट's picture

14 Apr 2011 - 8:56 am | अर्धवट

>स्वतावर विश्वास असणारी माणसेच प्रेम करु शकतात

मी चुकून "विश्वास असणारी माणसेच स्वतःवर प्रेम करू शकतात" असं वाचलं आणि दचकलोच.
असो.. कायद्यानं दचकायचीही सोय ठेवली नाही हल्ली.. ;)

ह. घ्या हो

(स्वतःवर ठाम विश्वास असूनही प्रेम दुसरीवरच करणारा.) अर्धवट

टारझन's picture

14 Apr 2011 - 11:07 am | टारझन

तु पास होऊन तिसरीत कधी जाणार ? कधी पासुन दुसरीतंच आहेस बाला ?

- वटवट

काय गणेशा?
कांदेपोहे जोरदार चाललेले दिसतायेत :D

गणेशा's picture

14 Apr 2011 - 4:39 pm | गणेशा

नाही मी मटण - भाकरी खातोय

१२ वीच्या शेवटच्या दिवशी पुन्हा तिच्याशी बोलण्यासाठी गेलो
कोणी सांगितलेत हे नसते उद्योग?
आणि पेपर कसे गेलेत? पुढच्या अ‍ॅडमिशाची चिंता करायची तर असलं काहीतरी.......
चांगली नोकरी (व्यवसाय) केलीस तर छोकरी येते बरोबर.
हे असलं काही वाचल्/ऐकलं ना की मला माझ्या मुलाची चिंताच वाटते.
हलके घेणे.;)

ज्यास्त धाकात ठेवु नका .. नाहीतर नंतर म्हणायची पाळी येईल सुरुवातीपासून मुलींमध्ये मिसळला असता तर "ही" वेळ आली नसती :P (ह. घे. हे. वे. सा. न. ल.)

अप्पा जोगळेकर's picture

14 Apr 2011 - 8:14 pm | अप्पा जोगळेकर

हे घ्या. रडू नका.

धनंजय's picture

15 Apr 2011 - 3:07 am | धनंजय

अनेक शुभेच्छा.

आनंद वाटून घ्या. ते पटणेही रम्य आणि न पटल्याची हुरहुरही रम्यच!

पुढे पक्के पटल्यावर "आज भाजी आणायला का विसरला?" आणि "मुलाने नवा कंप्यूटर मागितला आहे, पैशाची सोय करा..." या गोडगोड कॉलेजवयीन दुखण्याबाबत स्मृतिरंजन कराल (आमच्यासारखे).