वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात . जम्बु द्वीपाचा म्हणजे प्रस्तुत पृथ्वीच्या प्राचीन भूगोलाचा फक्त आपण विचार येथे करणार आहोत. पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार एकंदर सप्त द्वीपे आहेत, जम्बु ,प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर . त्यातील केवळ जम्बु द्वीप मानवी दृष्टीगम्य आहे. इतर दुसर्या डायमेंशन मध्ये आहेत. अनेक संशोधकांची इथेच चूक झाली व ते इतर ६ द्वीपे ह्या पृथ्वीवरच शोधत बसले. पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत. तेव्हा दृश्य पृथ्वी म्हणजे केवळ जम्बु द्वीप होय. जम्बुनद् हा एका जांभळट रंगाचा सुवर्णाचा प्रकार आहे. हे सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे , जे ह्या पृथ्वी वरच उपलब्ध होते.(अजुन ही असेल) . तर जम्बु द्वीपाची विभागणी नऊ वर्षात म्हणजे देशात केली आहे. संस्कृतमध्ये देशाला वर्ष असे म्हणतात जसे भारतवर्ष ! . त्यांची स्थाने मेरु पर्वताला केन्द्र ठेऊन सांगितली आहेत. मेरु पर्वत म्हणजे पृथ्वीच्या केन्द्रातुन जाणारा दक्षिण-उत्तर अक्ष होय.ह्या नऊ वर्षांची माहिती खाली देत आहे.
१. भारतवर्ष- हिमालय ते कन्याकुमारी
२.किम्पुरुषवर्ष- इंडोनेशिया,मलेशिया,कम्बोडिया आदि आग्नेय भाग, इथे रामोपासना चालायची. अजुन ही चालते
३.हरिवर्ष- इथे नृसिंह उपासना चालायची
४.रम्यक- इथे मत्स्य अवताराची उपासना चालायची
५.हिरण्यमय-इथे कूर्मरुपात उपासना चालायची
६.उत्तरकुरु- हे म्हणजे सध्याची दक्षिण अमेरिका . ह्याचा आकार भारतासारखा धनुष्याकार वर्णिलेला आहे. इथे वराहरुपात उपासना चालायची
७.भद्राश्ववर्ष- हे म्हणजे चीनचा अतिपूर्वेकडचा भाग. कदाचित आता तिथे पॅसेफिक सागर आहे. इथे घोड्याचे डोके असलेल्या विष्णुमूर्तिची (हयग्रीव)उपासना व्हायची.
८.केतुमाल वर्ष- इथे कामदेवरुपात उपासना व्हायची , हे म्हणजे आफ्रिका खंड किंवा युरोप
९.इलावृत्त वर्ष- हे उत्तर ध्रुवाभोवती आहे. इथेच गन्धमादन पर्वत आहे. इथुन चार पवित्र नद्या चार दिशेला गेल्या. त्यातील एक म्हणजे गंगा, अन्य नद्या चक्षू(फरात- इराक मधील) , सीता(रशिया/चीन) ,भद्रा (उ. अमेरिका). अरबांच्या इतिहासानुसार, ह्या पवित्र नद्या नील्,फरात्,जेहु,सेहु अशा आहेत. जिज्ञासुना अधिक शोधता येईल.
हे झाले पुराणातील वर्णन, भास्कराचार्य सारखा गणिती ही ह्या वर्णनाला आपल्या ग्रंथात पुष्टी देतो. सूर्यसिध्दान्ता सारख्या प्रमाण ज्योतिष ग्रंथात तर प्राचीन शहरांची ही माहिती आहे. आपण जसे आता विषुवृत्त, रेखावृत्त इ. नकाशा करण्यासाठी संकल्पना वापरतो. तशाच कल्पना प्राचीन भारतीय ही वापरायचे. त्यांनी लंका हे प्राचीन बेट शून्य विषुवृत्तावर व शून्य पृथ्वी मध्य वृत्तावर मानले आहे. हे पृथ्वी मध्ये वृत्त आजच्या उज्जैन शहरातुन दक्षिण-उत्तर जाते. ह्या वृत्तावर दक्षिणेला हिन्दी महासागरात कुठे तरी लंका हे बेट होते .(कदाचित ते आताची लंका ही असू शकेल. सध्याची लंका विषुवृत्तापासुन ६ अंश उत्तरेला आहे)
ह्या प्राचीन लंका ह्या दिव्य शहरापासुन ९० अंशावर पूर्व-पश्चिम दोन शहरे होती. व १८० अंश विरूध्द एक शहर होते. ही चार शहरे देवांनी बांधलेली व अत्यंत प्रगत होती असा ज्योतिष ग्रंथात उल्लेख आहे. सूर्यसिध्दान्तात खालील उल्लेख आहे.
समन्तान् मेरुमध्यात् तु तुल्यभागेषु तोयधेः /
द्वीपिषु दिक्षु पूर्वादिनगर्यो देवनिर्मिताः //
भूवृत्तपादे पूर्वस्याम् यमकोटीति विश्रुता /
भद्राश्ववर्षे नगरी स्वर्णप्राकारतोरणा //
याम्यायाम् भारते वर्षे लङ्का तद्वन् महापुरी /
पश्चिमे केतुमालाख्ये रोमकाख्या प्रकीर्तिता //
उदक् सिद्धपुरी नाम कुरुवर्षे प्रकीर्तिता /
तस्याम् सिद्धा महात्मानो निवसन्ति गतव्यथाः /
{लंका ही भारतीय ज्योतिषानुसार ० अंश विषुवृत्तावर व ० अंश पृथ्वी मध्यवृत्तावर मानली आहे. हे मध्य वृत्त अवन्ती म्हणजे सध्याच्या ऊज्जैन शहरातून जात असे}
(लंका)भारतवर्ष व (सिध्दपुरी)उत्तरकुरूवर्ष आणि (यमकोटी)भद्राश्ववर्ष व (रोमक)केतुमाल्वर्ष ही प्राचीन देवनिर्मित शहरे परस्परांच्या १८० अंश समोर आहेत. सध्याच्या नकाशानुसार सिद्धपुरी हे मेक्सिकोमध्ये, यमकोटी हे उत्तर पॅसेफ़िक मध्ये बेट असावे. रोमक हे प.आफ्रिकेमध्ये असेल, व लंका हे बेट एकतर सध्याची श्रीलंका असेल किंवा हिन्दी महासागरातील श्रीलंकेच्या खालचे एखादे बेट असेल.
मी आजच्या नकाशानुसार ह्यांचे अक्षांश-रेखांश खाली देत आहे, ज्यांना उत्सुकता आहे त्यांना अधिक शोध घेता येईल. गुगल अर्थ तसेच इतर देशांच्या मायथोलोजिचा हि उपयोग करता येईल.
लंका- ० अंश उत्तर, ९० अंश पूर्व
सिध्दपुरी-० अंश उत्तर ९० अंश पश्चिम
यमकोटी-० अंश उत्तर १८० अंश पश्चिम
रोमक- ० अंश उत्तर ० अंश पूर्व (ग्रीनीच शहराच्या सरळ रेषेते दक्षिणेला हे शहर आहे)
लाखो वर्षात समुद्र व इतर भूरचनेत वारंवार बदल झाल्यामुळे, वरील शहरे अचूक हुडकून काढणे अशक्यप्राय बनले आहे. तरी ही वरील माहिती कमी इंटरेस्टिंग नाही. ज्यांना प्राचीन इतिहासात रस आहे त्यांना मजेशीरवाटेल अशी आशा आहे.
ता.क.- वरील भूगोलानुसार एखादा नकाशा बनवता आला तर मी ह्या लवकरच ह्या लेखातच अपडेट करेन
संदर्भ-
सूर्यसिध्दान्त
विष्णु पुराण
सिध्दान्त-शिरोमणी-भास्कराचार्य
प्रतिक्रिया
12 Apr 2011 - 3:34 pm | चैतन्यकुलकर्णी
दिल्याबद्दल धन्यवाद..
12 Apr 2011 - 3:43 pm | अरुण वडुलेकर
वैदिक भूगोल व शहरे हा आपला अभ्यासपूर्ण लेख आपला व्यासंग दर्शवितो.
आपण ज्या ग्रंथाचा उल्लेख संदर्भादाखल केलेला आहे, त्यातील कांही माझ्याही वाचनात आलेले आहेत.
परंतु मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यासक असल्याने माझा वाचनाचा दृष्टिकोन जरा निराळा होता.
या ग्रंथांचा भौगोलिकदृष्ट्या आपण घेतलेला मगोवा प्रशंसनीय आहे. विशेषतः कांही स्थळांचे
दिलेले अक्षांश-रेखांशात्मक संदर्भ मोलाचे आहेत. या विषयावर आपले आणखीही लेखन वाचायला
निश्चित आवडेल.
13 Apr 2011 - 4:11 pm | मूकवाचक
पु. ले. शु.
12 Apr 2011 - 4:05 pm | sagarparadkar
हे जरी समजा खरे आहे असं मानलं तरी आत्ता ह्या ज्ञानाचा नक्की कसा आणि कोणता उपयोग करायचा? त्याने काय साध्य होणार?
बरं पृथ्वी हेच एक जंबुद्वीप आहे असं समजलं तर उर्वरीत (प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर) ही द्वीपे मग कुठे आहेत? जांभळ्या रंगाचे सोने कधी कोणी पहिले आहे का? पाहिले असल्यास ते सोनंच आहे, आणि सर्वोत्तम दर्जाचंच आहे असं कशावरून म्हणणार?
संशोधक जर उर्वरीत सहा द्वीपांचा शोध घेण्यात चुकतात, तर आपण का नाही शोध घेतलात? जी गोष्ट / वस्तु कुणालाच कोणत्याच साधनांनिशी दिसत किंवा जाणवत नाही ती खरी कशी मानायची? तसा अट्टाहास का? त्याने काय साध्य होणार?
12 Apr 2011 - 4:26 pm | अन्या दातार
लेख औत्सुक्यपूर्ण आहे. फक्त भाषा जरा समजेल अशी ठेवा.
दृष्टीगम्य वगैरे शब्दांनी भंजाळून गेलो होतो.
13 Apr 2011 - 12:02 am | पुष्करिणी
+१, जरा सोपी भाषा वापरता आली तर बरं होइल
12 Apr 2011 - 4:45 pm | प्रास
ईश महोदय,
आपला उपक्रम स्तुत्य आहे आणि आपला अभ्यास दांडगा! एक विनंती आहे. उपरोल्लेखित निबंधामध्ये बर्याच अंशी संदर्भ स्पष्ट झालेले दिसत नाहीत. केवळ
असं लिहून कसं चालेल? १८ पुराणे आणि अनेकानेक ज्योतिष ग्रंथांमध्ये संदर्भ कसे हुडकावेत? सदर बाबतीत विष्णु पुराणासह इतर पुराणांत आणि रामायण-महाभारत महाकाव्यात काही वेगळे संदर्भ उपलब्ध होत असल्यास त्यांची संगती कशी मांडावी?
पुन्हा मेरु पर्वत म्हणजे पृथ्विचा अक्ष असल्यास भारतवर्षादि निरनिराळी वर्ष (तुमच्या मते देश) कसे निश्चित झाले? तो संदर्भही त्याच्या कारणमीमांसेसह उपलब्ध झाल्यास विषय अधिक स्पष्ट होण्यास हातभार लागेल. जम्बुनद म्हणजे जांभळ्या रंगाचे सोने(?) अधिक स्पष्ट व्हावे अशी इच्छा.
एकूण अधिक उत्तम प्रकारे सदर निबंध अद्ययावत करता आल्यास उपयुक्त होईल.
पुलेशु
13 Apr 2011 - 12:40 am | ईश आपटे
खाली विष्णुपुराणाचा संदर्भ दिला आहे. इतर ही पुराणात थोडया फार फरकाने हीच माहिती आहे. इतर द्वीपांविषयी माहिती आहे. पण ती निव्वळ गूढ स्वरुपाची आहे.
मेरु पर्वता भोवती संपूर्ण ग्रह,नक्षत्रे प्रदक्षिणा करतात असा पुराणात उल्लेख आहे. सूर्यसिध्दान्तासारख्या ज्योतिष ग्रंथाच्या आधारे हा निष्कर्ष निघतो, कि मेरु म्हणजे पृथ्वीच्या केन्द्र बिन्दुतुन जाणारा दक्षिणोत्तर अक्ष . पुराणात निरनिराळ्या वर्षांची स्थाने मेरु पर्वताच्या सापेक्ष, पूर्व्,पश्चिम इ. दिली आहेत. त्यावरुन वरील निष्कर्ष काढले आहेत.मेरु पर्वताचे वरचे टोक हे उत्तर ध्रुव मानले आहे.
उत्तर कुरु हे भारताच्या अचुक १८० अंश पलीकडे आहे असे पुराणात वर्णन आहे. व त्याचा आकार धनुष्यासारखा आहे असे ही दिले आहे. ह्या वरुन ते वर्ष द. अमेरिका खंड ठरते.
सुवर्णाचे पाच प्रकार भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी मानले आहेत. त्यापैकी ३ दैवी आहेत. चौथा हा खनिजात सापडणरा, जो सध्या वापरात आहे. व पाचवा म्हणजे पार्या पासून बनवलेले सोने.
जाम्बुनद हे पहिल्या ३ प्रकारातील सोने असावे. कदाचित ते पृथ्वीच्या क्रक्स मध्ये असेल. (हा अंदाज आहे). पण जाम्बुनद हा शब्द, जांभळ्या रंगाचे सुवर्ण असलेल्या नदीशी संबंधित आहे...
13 Apr 2011 - 1:01 am | प्रियाली
ते पूर्वी उत्तरेला होते का? मग वाहत वाहत एके दिवशी दक्षिणेला आले? असे कसे आपल्या पूर्वजांनी दक्षिण अमेरिकेला उत्तर कुरु नाव दिले?
अरेरे! यडपट कुठला गॅलिलिओ!
पर्वत असेल तर अक्ष कसा? अक्ष असेल तर पर्वत कसा?
दैवी म्हटले की झाले ;) पुण्यवान लोकांना ते दिसते आणि पापी लोकांना दिसत नाही असेही म्हणून टाका. :)
13 Apr 2011 - 9:23 am | llपुण्याचे पेशवेll
ते पूर्वी उत्तरेला होते का? मग वाहत वाहत एके दिवशी दक्षिणेला आले? असे कसे आपल्या पूर्वजांनी दक्षिण अमेरिकेला उत्तर कुरु नाव दिले?
वाहत दक्षिणेला आलेही असेल बॉ. शास्त्रज्ञ म्हणतात काही लाख वर्षांपूर्वी पृथ्विवरचे सगळा भूभाग एकसंध होता नंतर तुकडे पडून खंड सरकत सरकत एकमेकांपासून दूर गेले. अजूनही अशी आंतरखंडीय हालचाल होत आहे आणि असते. त्यामुळे अनेक भूकंप सागरात आणि भूपृष्ठावरही होत असतात. त्यामुळे तसे झालेही असेल.. कोणी बघितलंय. ;)
13 Apr 2011 - 5:20 pm | प्रियाली
पृथ्वी त्रिकोणी असेल तर कोनावरून घसरत घसरत दक्षिणेला येणे शक्य आहे. गोलाकार पृथ्वीवर मात्र खंड प्रामुख्याने पश्चिम-पूर्व किंवा नैऋत्य (हळू हळू दक्षिण) सरकायला हवेत. उत्तर दक्षिण नाहीत आणि ही प्रक्रिया फार फार पूर्वी झाली.
13 Apr 2011 - 11:41 pm | एक
सरकल्या मुळे, हिमालयाची निर्मिती झाली असं काहीसं ऐकल्या सारखं वाटतं आहे.
ठामपणे मत व्यक्त करायला मी अजून सर्वज्ञ झालो नाही त्यामुळे माझा आपला अंदाज.
-एक
13 Apr 2011 - 11:54 pm | प्रियाली
अगदी सरळ उत्तर नाही, अग्नेयेला (पण पर्यायाने उत्तरेला) सरकत आली भारताची भूमी हे योग्य आहे. त्यात सर्वज्ञ असण्यानसण्याचा प्रश्न नाही. ही घटना लाखो वर्षांपूर्वी घडली (सुमारे ७०० लाख वर्षे) म्हणूनच आपट्यांना प्रश्न आहे की उत्तर कुरू कुठून कसे वाहत आले? नेमके कुठे होते?
कारण ते जर लाखो वर्षांपूर्वी उत्तरेला होते म्हणून नाव उत्तर कुरु होते आणि जेव्हा दक्षिणेला आले तेव्हाही त्याला उत्तर कुरु नाव होते म्हणजे ते वाहत आल्याचे आपल्या पूर्वजांना माहित होते किंवा उत्तर कुरु उत्तरेला असताना आपले पूर्वज अस्तित्वात होते आणि प्रगत होते. हे मला पटलेले नाही. असो.
14 Apr 2011 - 1:11 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>> अग्नेयेला (पण पर्यायाने उत्तरेला) सरकत आली भारताची भूमी
तुम्हाला ईशान्य म्हणायचे आहे का?
15 Apr 2011 - 3:47 pm | प्रियाली
ईशान्येला ;) गल्तीसे मिश्टेक.
13 Apr 2011 - 11:17 am | ईश आपटे
मेरुच्या उत्तरेला आहे म्हणून त्याला उत्तर कुरु हे नाव आहे. नकाशा लोड केल्यावर अधिक स्पष्ट होईल.
13 Apr 2011 - 4:35 pm | पंगा
'उत्तर कुरु' हे बायेनीचान्स संस्कृतात आहे काय? म्हणजे 'उत्तर कर' असा काही आदेश वगैरे? पण मग 'उत्तर करणे' म्हणजे काय? 'उत्तर देणे' ऐकले होते. 'उत्तर करणे' नवीन आहे. 'उत्तर करण्या'चा उत्तरक्रियेशी काही संबंध आहे काय?
(पण तसे असेल तर मग संस्कृत गंडल्यासारखे वाटते. जेवढे आठवते त्यावरून 'उत्तरा'ची बायेनीचान्स द्वितीया वगैरे नको का व्हायला? म्हणजे 'उत्तरं कुरु' किंवा असे काहीतरी? की संस्कृताची पडझड व्हायला तेव्हाच सुरुवात झाली होती?)
13 Apr 2011 - 5:14 pm | प्रियाली
जर मेरु पर्वत म्हणजे दक्षिण-उत्तर अक्ष असेल तर त्याच्या उत्तरेला म्हणजे काय? द. ध्रुवावर उभे राहिले तर इतर सर्व जग उत्तरेला दिसते तसे काही आहे का?
12 Apr 2011 - 5:03 pm | llपुण्याचे पेशवेll
वाह छान माहीती आहे. पूर्वीपासून जगाचा नकाशा कायम बदलत आले आहेत. पूर्वी एकमेकांना जोडलेले खंड आतापर्यंत एकमेकांपासून दूर दूर गेले आहेत. त्यामुळे पुराणांमधील वर्णने आणि सद्यःस्थिती यांच्यात तफावत यायची फार शक्यता आहे असे वाटते.
13 Apr 2011 - 4:23 pm | गणपा
हा घ्या पुरावा. ;)
12 Apr 2011 - 5:09 pm | पक्का इडियट
चांगली माहिती संकलित केली आहे.
आज उपलब्ब्ध असलेल्या पुराणांचे पुनर्लेखन जरी गुप्तकाळातील असले तरी परंपरेने आलेले पुराणांमधले कित्येक संदर्भ हे वेदपूर्वकालापासूनचे आहेत असे मानले जाते. त्यातून अनेक इतिहासाचे संदर्भ मिळतात. कल्पना, इतिहास, चमत्कृती यांचे अनोखे संगम असलेले साहित्य म्हणजे भारतीय पुराणे. कित्येकदा त्यातला धुसर असलेला भेद लक्षात न आल्याने, त्यांच्यावर काल्पनिक असा शिक्का मारला जातो. कथा काल्पनिक असु शकतात त्यात असलेला संदर्भ कदाचित बहुमुल्य असु शकतो हे अनेक जण लक्षात घेत नाहीत. वादाची सुरवात तिथे होते. सारासार विचाराने आकलन केल्यास अनेक गोष्टी समजतात हे नक्की.
चांगला उपक्रम आहे. चालू राहू द्या !!
12 Apr 2011 - 5:32 pm | नितिन थत्ते
पृथ्वी त्रिकोणी असल्याने शीर्षकातील "भूगोल" हा शब्द खटकला. सुधारणा करावी.
12 Apr 2011 - 7:28 pm | पक्का इडियट
सहमत आहे. परंतु लेटेस्ट बातमीनुसार पृथ्वी बटाट्याच्या आकाराची आहे http://english.cntv.cn/program/newsupdate/20110402/103172.shtml
13 Apr 2011 - 10:15 pm | अगोचर
पृथ्वी बटाट्यासारखी नसुन तिचे गुरुत्वाकर्षण बटाट्यासारखे आहे
15 Apr 2011 - 12:08 pm | पक्का इडियट
काय सांगता? अरे हो खरेच की ! मला कळलेच नाही आधी. :)
12 Apr 2011 - 7:50 pm | ५० फक्त
थत्ते साहेब, वैदिक काळात प्रुथ्वी गोलच होती, आता आता आपट्यांनी लिहायला सुरु केल्यापासुन त्रिकोणि झाली असावी..
हो किन्नई ओ आपटे .
अवांतर - एक हे आपटे प्राआआआआआआचीन इतिहास आपटताहेत आणि ते दुसरे आपटे कट्टे करताहेत, दोन्ही आपट्यांच्या नाडी पट्ट्या काढुन आपटे- कट्टे आणि नाडीपट्टे असा एक शोधनिबंध लिहिल काय कुणि ?
12 Apr 2011 - 5:38 pm | प्रियाली
व्वा! व्वा! आपट्यांच्या सुरस कथामालिकेतील आणखी एक पुष्प. आवडले.
13 Apr 2011 - 11:29 am | योगप्रभू
आपटे साहेब,
सोन्याच्या प्रकाराचा उच्चार जम्बुनद् नसून जांबूनद असा आहे. पण हे जांभळट रंगाचे असून सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे, हे कसे मानावे?
चाणक्य आपल्या अर्थशास्त्रात म्हणतो
जांबूनद, शातकुंभ, हाटक, वैणव व शृंगीशुक्तिज असे सोन्याचे उत्पत्तिस्थानावरुन पाच भेद आहेत. हे सोने शुद्ध रुपाचे, रसायनाने बनवलेले किंवा खाणीतून काढून शुद्ध केलेले असे तीन प्रकारचे असते. कमलातील परागाच्या वर्णाचे, मऊ, स्निग्ध, नादरहित व चमकणारे सोने श्रेष्ठ होय. शुद्ध सोन्याचा हळदीसारखा एकच वर्ण असतो. सोने तापवले असता जे आत व बाहेर कमलातील परागासारखे किंवा कोरांटीच्या फुलासारखे एकरंगी असते, ते उत्तम. पण ते जर काळसर किंवा निळसर निघाल्यास अशुद्ध जाणावे. तांबूस पिवळे सोने मध्यम व लाल सोने कनिष्ठ जाणावे.
आता तुम्ही तर म्हणताय, की जांभळट सोने. म्हणजे निळा व लाल या रंगांचे मिश्रण. मग जांभळे सोने उच्च दर्जाचे कसे ठरेल?
13 Apr 2011 - 5:15 pm | प्रियाली
असामान्य योगबलाने आपट्यांनी जांबूनदचे जम्बुनद करून त्याला हिरवट-निळसर दिसणारा टरक्वाइज ठरवले आहे. अधिक खुलासा माझ्या खरडवहीत.
15 Apr 2011 - 3:44 pm | राजेश घासकडवी
खरा जांभळा तोच. तुमच्या डोळ्यावर लाल चष्मा असल्यामुळे त्यातून जो रंग दिसतो त्याला तुम्ही जांभळा म्हणता.
मर्ढेकरांच्या ओळी थोड्या बदलून लिहितो
अशीच जावी वर्षे काही, आणि महात्मा यावा पुढचा
जम्बुस आम्ही पुन्हा पहावे काढुन चष्मा डोळ्यांवरचा...
असे चष्मे काढण्याची वेळ आपल्यावर आणत असल्यामुळे ईश आपटे हे रेग्युलर महात्मा आहेत असंच मर्ढेकर म्हणतील.
15 Apr 2011 - 6:47 pm | ईश आपटे
चांगली कविता आहे...त्या पाय वर केलेल्या :) कवितेपेक्षातर खूपच चांगली
12 Apr 2011 - 5:49 pm | परिकथेतील राजकुमार
छान संकलन केले आहेत आणि उत्तम शब्दात आमच्यापर्यंत पोचवले आहेत.
लेखन थोडे आटोपते घेतल्यासारखे वाटले. ह्याविषयावर अजुन वाचायला आवडेल.
12 Apr 2011 - 7:46 pm | स्मिता.
या माहितीपूर्ण लेखांमुळे ज्ञानात मोलाची भर तर पडतेच आहे सोबत करमणूकही होते.
अजून येऊद्या.
12 Apr 2011 - 5:56 pm | आत्मशून्य
.
12 Apr 2011 - 6:02 pm | तर्री
अभ्यास पूर्ण ऊत्तम लेख.
कालगणना , युगांची संकल्पना , ज्योतिष , पृथ्वीची निर्मीती , आकाशगंगेची निर्मीती , ह्या सगळ्यावर भाष्य करणारी भारतीय संस्कृती खरच थोर ! आज त्यामधील काही दुवे संदर्भ हीन , शासत्राधार नसलेले वाटतील ,पण त्या वर भाष्य आहे हे मला खूप मोलाचे वाट्ते.
इश साहेबाना प्रणाम ....
12 Apr 2011 - 6:55 pm | राजेश घासकडवी
हे सागर कुठच्या द्रव्यांचे आहेत हे सांगाल का?
तुम्ही दिलेल्या संदर्भातले उल्लेख किती जुने आहेत? शहरंच्या शहरं हरवेपर्यंत त्यात बदल कसा झाला नाही?
वेगवेगळ्या डायमेन्शन, न सापडणारी शहरं मानण्यापेक्षा ते काल्पनिक स्थळांचं वर्णन असू शकेल का?
12 Apr 2011 - 8:45 pm | मृत्युन्जय
गुर्जी पिरी रीसचे नकाशेही काल्पनिकच मानावेत काय? की तो भारतीय नसल्यामुळे आणी त्याचे वैदिक संस्कृतीशी नाते नसल्यामुळे त्याचा उदोउदो करण्यात हरकत नसावी?
12 Apr 2011 - 9:35 pm | राजेश घासकडवी
हा कोण हे मला माहीत नाही. तो नकाशे काढत असे असं तुमच्या लिखाणावरून दिसतं. त्याचे नकाशे कोणी माझ्या समोर मांडून 'शहरं सापडणार नाही कारण समुद्राच्या उलथापालथीमुळे ती हलली आहेत' असं म्हटलं तर मी हेच प्रश्न विचारेन.
भारतीय असणं व वैदिक संस्कृती यांचा मी कुठे उल्लेख केला? संदर्भ काय इतकंच विचारलं.
अभारतीय चक्रम विचारांवर मी जरूर शंका घेतो. एरिक व्हॉन डॅनिकेनचे विचार शंका घेण्यालायकच आहेत. चक्रम विचारांवर कोणा एका देशाचा मक्ता नाही.
12 Apr 2011 - 9:43 pm | गोगोल
> एरिक व्हॉन डॅनिकेनचे विचार शंका घेण्यालायकच आहेत
हा मनुष्य बरोबर होता हे आता सिद्ध झालेल आहे. अधिक माहिती साठी माझा खालील प्रतिसाद बघा.
12 Apr 2011 - 10:10 pm | मृत्युन्जय
पिरी रीस १६ व्या शतकातील समुद्री चाचा / खलाशी / व्यापारी काहीही म्हणा. त्याच्या सफरीच्या अनुभवावरुन आणि पुरातन नकाश्यांवरुन त्याने पृथ्वीचा नकाशा तयार केला होता. अर्थात हे नकाशे त्याने चक्क ढपलेले होते. या नकाशात द्क्षिण अमेरिका, अफ्रिका आणि अंटार्क्टिका जोडलेले दाखवले होते. त्या काळात हे ज्ञान कोणालाही नव्हते की त्याने कढलेले नकाशे ख्रिस्त्पुर्व १०००० च्या पृथ्वीच्या भुगोलाशी तंतोतंत जुळतात. मग हे ज्ञान कुठुन आले. बर हे भूभाग नंतर वेगळे कसे झाले? गोंडवनलँड आणि लॉरेशियाचे काय? आख्खे खंड हालले तर शहरे हलु शकत नाहीत काय? की आपल्याला जे माहित नाही ते अस्तित्वातच नाही म्हणुन डोळ्यावर झापडे ओढुन घेउन स्वस्थ बसायचे?
12 Apr 2011 - 10:41 pm | राजेश घासकडवी
पिरी रीसवरील लेख वाचायला आवडेल. पण तूर्तास या लेखावरच बोलू.
नाही, डोळसपणे प्रश्न विचारायचे. आणि समर्थ उत्तरांची अपेक्षा ठेवायची. उत्तरं योग्य वाटली तर स्वीकारायची. पुरेसे पुरावे दिसले नाहीत तर नाकारायची. इतकं साधं आहे.
12 Apr 2011 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय.
-दिलीप बिरुटे
12 Apr 2011 - 9:15 pm | बबलु
चांगला लेख. वाचतोय. अजून येउद्या.
(आणि नकाशा इथे डकवता आला तर पहा प्लिज).
12 Apr 2011 - 10:26 pm | पिवळा डांबिस
(आणि नकाशा इथे डकवता आला तर पहा प्लिज).
सहमत आहे...
फोटो टाकल्याशिवाय पाककृतीला प्रतिसाद द्यायचा नाही ही मिपाची परंपरा (चुकलो, थोर परंपरा) आहे!!!
12 Apr 2011 - 10:36 pm | प्रियाली
+१. या पाककृतीत चांगलेच पकवले आहे. ;)
13 Apr 2011 - 4:54 pm | अलख निरंजन
हाहाहाहा...आपट्यांनी पुलाव चांगला पकवला आहे. फोटो दिला तर तर सोन्याहूनही जांभळे होईल.
12 Apr 2011 - 9:24 pm | आळश्यांचा राजा
छान माहिती.
लेखकाने प्राचीन ग्रंथांमधील माहितीवर प्रकाश टाकण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याबद्दल अभिनंदन आणि आभार.
लेखकाच्या मतांशी मी बरेचवेळा सहमत नाही. परंतु तरीही त्यांचे लेखन स्वागत करावे असेच आहे. लेखकाचे इंटरप्रिटेशन पटत नसेल तर ते बाजूला ठेऊनही काही नवीन माहिती मिळते, आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये असे असे म्हटले होते हे समजते, हे ध्यानात घेऊन या लेखनाची दखल घेतली जावी.
(अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे लेखन असे समजून, कदाचित,) काही सदस्य तिरकस, टोमणेवजा प्रतिसाद देत आहेत. लेखकाने त्याकडे लक्ष न देता आपले लेखन करत रहावे ही विनंती. व्यक्तिशः मला या लेखकाच्या लेखनात बरीच नवीन माहिती मिळाल्याचा आनंद मिळतो. आपापले इंटरप्रिटेशन करायला प्रत्येकजण स्वतंत्र आहे.
12 Apr 2011 - 10:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखकाचे इंटरप्रिटेशन पटत नसेल तर ते बाजूला ठेऊनही काही नवीन माहिती मिळते, आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये असे असे म्हटले होते हे समजते, हे ध्यानात घेऊन या लेखनाची दखल घेतली जावी.
सहमत आहे.
(अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे लेखन असे समजून, कदाचित,) काही सदस्य तिरकस, टोमणेवजा प्रतिसाद देत आहेत. लेखकाने त्याकडे लक्ष न देता आपले लेखन करत रहावे ही विनंती. व्यक्तिशः मला या लेखकाच्या लेखनात बरीच नवीन माहिती मिळाल्याचा आनंद मिळतो. आपापले इंटरप्रिटेशन करायला प्रत्येकजण स्वतंत्र आहे.
सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
12 Apr 2011 - 11:05 pm | प्रियाली
नाही! शालेय किंवा महाविद्यालयीन इतिहास हा कचर्यासारखा आहे कारण तो कॉंग्रेस आणि साम्यवादी पुरस्कृत आहे* असे पटवून द्यायच्या उद्योगात आपटे आहेत म्हणूनही टोमणेवजा, तिरकस प्रतिसाद आहेत.
लेखन आवडण्यात आणि पटण्यात लेखनाचा उद्देश हाही महत्त्वाचा भाग असतो.
* हे त्यांनी एका मिपा सदस्येच्या खरडवहीत लिहिलेले आढळेल.
13 Apr 2011 - 1:13 am | राजेश घासकडवी
ईश आपटे यांनी टोमणेवजा विधानं, तिरकस लेखन केलेलं आहे. तसं करायला काहीच हरकत नाही, फक्त त्यांच्या लेखनावर तशाच प्रतिक्रिया आल्या तर कोणीच राग मानू नये.
तरी बरं कोणी त्यांना, त्यांनी इतरांना दिल्या तशा अर्वाच्य शिव्या दिलेल्या नाहीत.
13 Apr 2011 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ईश आपटे यांचे वरील लेखन तिरकस आहे काय ?
-दिलीप बिरुटे
12 Apr 2011 - 11:10 pm | धनंजय
प्रस्तुत लेखकाने कुठल्याही अन्य इन्टरप्रेटेशनविरुद्ध टोमणेबाजी असलेले लेख सुरुवातीला लिहिले. त्या प्रकारचे उल्लेख या लेखामध्ये नाहीत हे स्तुत्य आहे. पण आदल्या लेखांत सुरू झालेली/केलेली टोमणेबाजी ही प्रतिसादकांच्याच माथी बांधणे मला प्रशस्त वाटत नाही. हिरिरीने मुद्दे मांडतानासुद्धा अभ्यासाच्या बाबतीत तटस्थपणा आणि विश्वासार्हता असते, असा तुमचा जो नावलौकिक मिसळपावावर आहे, तो तुम्हाला कष्टाने कमवावा लागला होता. (नम्रपणामुळे तुम्हाला हे बहुधा आठवतही नसेल.)
अमुक-अमुक ग्रंथात तमुक-तमुक तपशील आहेत, हे तटस्थ वर्णन तर माहिती म्हणून स्वागतार्हच आहे. तसेच त्या काळातले विद्वान त्या काळातल्या ज्ञानाच्या आधारे वादविवाद घालत : त्या युक्तिवादांना जोखताना त्या काळातल्या तथ्य-माहितीची मर्यादा राखली पाहिजे. ही अभ्यासपद्धत सुद्धा सुयोग्यच आहे. (कारण आपण तिथे युक्तिवादाची तार्किकता जोखत असतो, निष्कर्षाची अद्ययावत ग्राह्यता नव्हे. याचे उदाहरण म्हणून प्राचीन अणुवादाबद्दल विवादाची चर्चा येथे बघावी.)
परंतु अशा प्रकारच्या लेखनामध्ये पुष्कळदा विपरितच दिसते : प्राचीन ग्रंथांमधली विविधता, त्यांच्यातील लेखकांची नवीन शोध लावण्याची पद्धत अणि जिज्ञासा, या सर्व सार्वकालिक प्रशंसनीय गोष्टी बाजूला ठेवून चांगली-वाईट-सगळीच-वाक्ये सत्य असल्याचे प्रतिपादन केले जाते. म्हणजे ना धड तटस्थ "रिपोर्टिंग" ना धड अभ्यासपूर्ण विवाद. एका प्राचीन ग्रंथाची ओळख करून देणार्या लेखाला प्रास्ताविक म्हणून मी एकदा असे लिहिले होते :
13 Apr 2011 - 6:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आदल्या लेखांत सुरू झालेली/केलेली टोमणेबाजी ही प्रतिसादकांच्याच माथी बांधणे मला प्रशस्त वाटत नाही.
आदल्या लेखाचे जाऊ द्या. पण याच लेखात असे काही प्रतिसाद आहेत जे लेखनातील विषयाबद्दल तुच्छतेची अशी भावना प्रतिसादातून दर्शवितात. प्राचीन अशा भारताचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा लेखनाच्या माध्यमातून शास्त्रीयदृष्ट्या फारसा आलेला नाही याबद्दल कुणाचे दुमत असणार नाही. प्राचीन काळातील इतिहास लेखनाकडे भारतीयांचे तसे दुर्लक्षच झाले असे म्हणतात. भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतांना प्राचीन भारतीय साहित्याचाही साधन म्हणून उपयोग केलेला दिसून येतो. प्राचीन वाड;मयातील विचारांना आधुनिक जगाशी जोडण्याच्या प्रयत्नाच्या बातम्याही कधी-कधी वाचनात येतात. वैदिक वाड;मयातून येणारे विषय आणि त्याची मांडणी कालौघात चूक-बरोबर असूही शकेल. लेखक जेव्हा आपला मांडलेला विचार 'सत्यच' आहे असा आग्रह करत असेल तेव्हा वाचकांनी सद्य साधने,काळ, वगैरेंबरोबर 'विवेकाचा'ही उपयोग करुन मत बनविले पाहिजे. प्रतिसादातून प्रतिवाद करतांना उपलब्ध असलेली साधने आणि संदर्भांचे दाखले दिले पाहिजेत. नाही देता आले तर वाचनमात्र हा पर्याय असतोच. आणि हे सर्व करण्याऐवजी लेखन 'मनोरंजन' करते असे म्हणून प्रतिवाद होत नाही. लेखनात येणारी प्राचीन माहिती ही 'टाकाऊच' आहे असे म्हणून पाहण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या संदर्भांद्वारे चर्चा संवादी होण्याकरीता काही अधिक प्रयत्न झाले पाहिजेत. सांगायचा मुद्दा असा की, आदल्या लेखातील टीकेचा या लेखाशी संबंध आळशांच्या राजांनी जोडलेला नाही असे मला वाटते. जोडलेला असला तरीही तो प्रतिसाद सदरील धाग्यात 'स्वतंत्र' ठरावा आणि 'काहींसाठी' फिट्ट बसणारा असा झाला आहे, असो, चुभुदेघे.
-दिलीप बिरुटे
14 Apr 2011 - 1:18 am | धनंजय
तुमच्याबद्दल मिसळपावावर जो आदर आहे, त्याकरिता तुमचे पूर्वीचे लेखन आणि प्रतिसाद आठवणे महत्त्वाचे. नम्रतेमुळे या चांगल्या इतिहासाकडे तुम्ही दुर्लक्ष करीत असला, तरी ती वस्तुस्थिती आहे. तुम्ही किंवा मी आपले स्वतःचे विविध सदस्यांशी असलेले संबंध आठवून बघूया. लेखनाचा इतिहास तुम्ही किंवा मी संदर्भात घेत नाही काय? (तुम्ही प्रामाणिकपणे विचार करून उत्तर द्याल ही खात्री आहे. त्यामुळे तुम्ही "नाही" म्हटले तरी जुने लेख आणि प्रतिसाद शोधण्याच्या भानगडीत पडणार नाही.)
नाही. (पुढे बघा.) विरोध करणारे प्रतिसाद लिहिणार्या काही सदस्यांनी खुद्द भारतीय इतिहासाच्या संदर्भात आत्मीयतेने लिहिलेले आहे. त्यांच्या लेखनाचा इतिहास डोळ्याआड करूया, म्हणता? (हे ठीक नव्हे, असे मी मानतो, तरी) मग फक्त प्रतिसादावरून हे लोक याच लेखाला दोष देत आहेत की भारतीय इतिहास या विषयाला, हे तुम्ही कसे काय ठरवले?
अर्थातच.
ठीक. लेखकानेही साधनांचा सुयोग्य उपयोग करावा, अशी अपेक्षा रास्त आहे, आणि प्रतिसादकांनीसुद्धा.
वर बघावे. साधनांचा उपयोग सुयोग्य नसला, तर ही चर्चा अभ्यासपूर्ण अशी नसतेच.
साधनांचा उपयोग सुयोग्य नसला, तर चर्चा अभ्यासपूर्ण नसते. मनोरंजक मात्र असू शकते. कल्पित कथा आणि ललित वाङ्मयाला साधनसामग्रीच्या शुचितेचे बंधन नसते.
शक्य आहे. साधनसामग्रीची शुचिता नसली, तर टाकाऊ आणि टिकाऊ माहितीमध्ये फरक करण्यासाठी साधने हवीत. याची प्राथमिक जबाबदारी लेखकाकडे असते. बारीकसारीक टाकाऊ-टिकाऊ विवेक मग वाचकाकडे सोपवता येतो. उदाहरणार्थ मराठी वाङ्मयाबाबत खालील परिच्छेद बघा :
"फुलराणी" ही कविता कवी कुसुमाग्रज यांनी लिहिली आहे. "फुटकी तपेली" ही कविता बालकवी ठोंबरे यांनी लिहिली आहे.
आता यात बरीचशी माहिती बरोबर आहे. "फुलराणी" आणि "फुटकी तपेली" या मराठी वाङ्मयातल्या दर्जेदार कविता आहेत, हे खरे आहे. कुसुमाग्रज आणि बालकवी ठोंबरे हे मराठी वाङ्मयातले शैलीदार कवी आहेत. इतकेच काय थोडेसे चुकीचे शब्द खोडले, तर उर्वरित वाक्य ठीकच आहे :
"फुलराणी" ही कविता कवी कुसुमाग्रज यांनी लिहिली आहे. "फुटकी तपेली" ही कविता बालकवी ठोंबरे यांनी लिहिली आहे.
हे सर्व असताना, परिच्छेद "टाकाऊ-नसलेला मानावा" असे कोण म्हणेल? तुम्ही तुमच्या सहकार्याकडून वरील वाक्ये खपवून घ्याल काय? नाही, अशी खात्री वाटते. मग या इतिहासाच्या बाबतीत अशी हेळसांड कशाकरिता?
आळशांच्या राजा यांनी संबंध जोडला नाही, ही जर नजरचूक असेल, किंवा त्यांनी आदले लेखन बघितले नसेल. तर ती नजरचूक मी त्यांच्या लक्षात आणून दिली. "प्रतिसाद धाग्यात स्वतंत्र आहे" म्हणजे नेमके काय? हा धागा सोडल्यासही "काहीं"चे वर्तन सुयोग्य नाही, असा या "स्वतंत्र"चा मथितार्थ आहे काय? म्हणजे या धाग्यात नव्हे तर अन्यत्र "स्वतंत्रपणे" या "काहीं"चे वर्तन सुयोग्य नाही, असे म्हणायचे आहे काय? "अन्यत्र" म्हणजे त्या "काहीं"च्या लेखनाचा इतिहासाचा संदर्भ आहे काय? तर मग मला मुद्दा समजलाच नाही : या धाग्याच्या लेखकाच्या अन्य लेखांचा इतिहास संदर्भात घ्यायचा नाही, पण प्रतिसादकांच्या अन्य लेखनाचा इतिहास संदर्भात घ्यायचा? त्यातही भारताबद्दल आदर व्यक्त करणारा प्रतिसादकांचा इतिहास सोडून संदर्भात घ्यायचा? हे काही ठीक वाटत नाही.
13 Apr 2011 - 1:28 am | रामपुरी
डोळ्याला झापडे बांधून वाचण्यापेक्षा त्यातला पटेल तो भाग लक्षात ठेवणं चांगलं. थोडक्यात, माझं तेच बरोबर न म्हणता बरोबर ते माझं हा दॄष्टिकोन ठेवता आला तर पहा.
12 Apr 2011 - 9:24 pm | प्रशु
नविन माहिती समजली, असेच लिहत रहा...
12 Apr 2011 - 9:40 pm | गोगोल
हे सगळ थोतांड आहे असे म्हणणार्या लोकांकडे लक्ष देऊ नका.
मध्यंतरी अमेरिकेत SG-1 नावाच्या बर्याच डॉक्युमेंटरीज आल्या होत्या. त्यात परग्रहावरील लोक, प्राचीन संस्क्रुती ई. बर्याच गोष्टिंचा ऊहापोह करण्यात आला होता. पण मग हळूहळू त्या डॉक्युमेंटरीज दाबून टाकण्यात आल्या.
खूप दूर च्या ग्रहांवर क्षणार्धात कस पोहोचता येत (जे आपल्याकडील योग्यांनी आधीच सांगून ठेवलय) त्याच प्रात्यक्षिक देखील करून दाखवल आहे. प्राचीन काळी शोध लावलेल्या एका तबकडी च्या आकाराच्या रिंगेतून आत शिरल की दुसर्या ग्रहावर निघता येत. अमेरिकेला हे सगळे फायदे फक्त त्यांच्या साठी हवे असल्याने त्यांनी ही माहिती दडपून टाकलेली आहे. भारताला आत्ता गरज आहे ती इस्रो सारखे खर्चिक प्रकल्प बंद करून आपल्या वेदग्रंथांचा खूप गम्भिर्याने अभ्यास करण्याची.
आपल्या कडेच सगळ आधूनिक विज्ञान आहे .. पण आपण करंटे ते नासाचे अनूकरण करण्यासाठी पाण्यासारखा पैसा बरबाद करतोय. मला सांगा की त्या इस्रो मध्ये जितका पैसा ओतलाय त्यात वैदिक ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी कितीतरी शाळा महाविद्यालये यांना अनुदाने देता आली असती.
12 Apr 2011 - 9:51 pm | मन१
मेलो.
फुटलो.
पडलो खालती जमिनीवर.
भन्नाट वक्रोक्ती लिहिलित साहेब.
--मनोबा.
12 Apr 2011 - 9:59 pm | गोगोल
हे ह्या बुद्धिजिवी लोकांची अजून एक खेळी.
कुणी काहिही गाम्भिर्याने सांगितल की वक्रोक्ती म्हणून त्यातील हवा काढून टाकायची.
12 Apr 2011 - 10:28 pm | मन१
हा शब्द बर्याचदा वाचतो, पण नक्की कुणाला म्हणतात ते काही कळलं नाही.
असो. मला खरोखर वक्रोक्ती वाटली. कुणीही वाकडं बोलताना एखादी गोष्ट जरा अतिच करुन सांगतं, तसा प्रतिसाद वाटला.
आता तसं वाटुन घेणं बंद घ्यावं काय?
--मनोबा.
12 Apr 2011 - 10:15 pm | चतुरंग
म्हणजे डॉक्यूमेंटरी नसून अमेरिका-कॅणडा संयुक्त विद्यमाने चालवलेली सायन्स फिक्शन मालिका होती - हा घ्या विकीचा दुवा
http://en.wikipedia.org/wiki/Stargate_SG-1
सायन्स फिक्शन मालिका असल्याने त्यात भरपूर कपोलकल्पित गोष्टींचा भरणा असणारच. काहीच्या बाही खरे मानून चालणे आपल्या अजिबातच फायद्याचे नाहीये. भारतीय संस्कृतीचा डोळस अभिमान असणे जास्त योग्य ठरेल.
-(तिसर्या मितीतला)मीतरंग
12 Apr 2011 - 10:34 pm | गोगोल
आहे हे सांगणे म्हणजेच अमेरिकन सरकार ची दड्पून टाकण्याची खेळी होय.
मी या डॉक्युमेंटरीज प्रत्येक भाग बघितला असून मला तरी आपल्या वेदीक संस्क्रुतीच्या जवळचे निष्कर्ष वाटले.
12 Apr 2011 - 11:32 pm | शिल्पा ब
<<खूप दूर च्या ग्रहांवर क्षणार्धात कस पोहोचता येत (जे आपल्याकडील योग्यांनी आधीच सांगून ठेवलय) त्याच प्रात्यक्षिक देखील करून दाखवल आहे.
काय सांगता? लिंका देता येत असतील तर पहा. आम्हालाही त्या डॉक्युमेंटर्या पहायला आवडतील. काही नतद्रष्ट लोकं सायंटॉलॉजीची सुद्धा अशीच खिल्ली उडवतात हे पाहुन आम्हाला अतीव वेदना होतात.
बाकी आपला प्रतिसाद क्या कहने!!
12 Apr 2011 - 11:33 pm | गोगोल
तर हुलु वर बघायला मिळ्तील.
नसाल तर http://www.fastpasstv.eu/ येथे जाऊन स्टारगेट प्रोग्रॅम बघा.
फक्त जरा जपून .. अमेरिकन सरकारला जर कळल की तुम्हाला त्यांच्यावर संशय आला आहे तर तुम्हाला विसा मिळायाला प्रॉब्लेम येऊ शकतो.
12 Apr 2011 - 11:42 pm | शिल्पा ब
<<<फक्त जरा जपून .. अमेरिकन सरकारला जर कळल की तुम्हाला त्यांच्यावर संशय आला आहे तर तुम्हाला विसा मिळायाला प्रॉब्लेम येऊ शकतो.
मला काय प्रतिसाद द्यावा हेच सुचत नाही. कोणीतरी मदत करा.
12 Apr 2011 - 10:44 pm | पिवळा डांबिस
सायन्स फिक्शन मालिका आहे हे सांगणे म्हणजेच अमेरिकन सरकारची दडपून टाकण्याची खेळी होय!!!!
ठो!!
:)
कित्ती खेळकर आहे अमेरिकन सरकार!!!
(खुद का माथा पटककर बातां: अगर अमेरिकन सरकार को दडपना होना तो मालिकाच टीव्हीपर कायकू दिखाना?)
12 Apr 2011 - 10:45 pm | पिवळा डांबिस
हे गोगोल महाराजांच्या प्रतिसादाला होतं, मूळ लेखाला नाही...
शिंचं चुकुन डावीकडे सरकलं!!!
12 Apr 2011 - 11:04 pm | गोगोल
> (खुद का माथा पटककर बातां: अगर अमेरिकन सरकार को दडपना होना तो मालिकाच टीव्हीपर कायकू दिखाना?)
त्यांच्या पण चुका होतातच की. चुका लक्षात आल्यावर त्यांनी त्या सुधारल्या. ह्याच डॉक्युमेंटरीज चा तिसरा भाग (SGU) आहे. ज्या मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ एका प्राचीन यानावर कसे जातात आणि काय करतात ते दाखवले आहे. पण जेव्हा त्यांच्या लक्षात येऊ लागले की लोकांना मुर्ख बनवणे येव्हढे सोपे नाही तेव्हा त्यांनी तो प्रोग्रॅम चक्क कॅन्सल केला. बोला आता?
13 Apr 2011 - 12:00 am | पिवळा डांबिस
काय बोलणार?
आम्हाला वाटलं की ते टीव्हीचं लो टीआरपी वगैरे लफडं असेल...
पण आता तुम्ही छातीठोकपणे म्हणताय कान्स्पिरन्सी, तर कान्स्पिरन्सी!!!
13 Apr 2011 - 12:15 am | गोगोल
म्हणजे नुसत्या गफ्फा आहेत हो गफ्फा.
अमेरिकन सरकारची धूळफेक.
13 Apr 2011 - 9:50 pm | पिवळा डांबिस
अहो काल तुम्ही ते दडपण्याचं म्हणालात म्हणून मुद्दाम चेक केल!!
(आम्हालातरी काय खाज बघा!!:))
साय-फाय चॅनलवर अजून ही दाखवताहेत सटारगेट-१!!!
एन्जॉय!!!
:)
14 Apr 2011 - 5:32 am | गोगोल
परत बघणार...
कर्नल ओ नील झिंदाबाद!!
13 Apr 2011 - 12:25 am | प्राजु
आजकाल मिपावर सॉल्लिड उहापोह होतोय ना! आणि कोणत्याही धाग्यावर, कथेवर, रामायणावर!!
जिवंतपणाचं लक्षणच जणू!! ;)
13 Apr 2011 - 12:39 am | पंगा
अगदी! गोडा मसाला घरी आणण्याच्या कृतीवरही होतो.
(लिहिणारा/री) जिवंत असल्याचे लक्षण! ;)
'मी काहीबाही लिहितो, म्हणजे मी आहे.' (देकार्तची क्षमा मागून.) (कोणी याचे ल्याटिनीकरण करणारा तज्ज्ञ आहे काय रे???)
13 Apr 2011 - 1:04 am | धनंजय
स्क्रीबो एर्गो सुम्
scribo ergo sum
13 Apr 2011 - 9:46 am | पंगा
...scriboमध्ये ती काहीबाही लिहिण्याची अर्थच्छटा कितपत येते, याबाबत साशंक आहे.
जिवंतपणाचा निर्देशक म्हणून नुसते काहीतरी लिहिणे उपयोगी नाही. काहीबाही (किंवा काहीतरीच) लिहिणे महत्त्वाचे.
या अनुषंगाने, कृपया त्या scriboचे पुनर्ल्याटिनीकरण करू शकाल काय? (Illegitimi non carborundumच्या धर्तीवरचे स्यूडोल्याटिन असले तरीही चालू शकेल.)
(पहिला कच्चा खरडा म्हणून Bullshito ergo sum सुचले होते, पण त्यात मजा नाही. नको तितके थेट आहे. थोडे साटल्य बरे.)
13 Apr 2011 - 9:55 am | llपुण्याचे पेशवेll
जम्बोजेट जम्बोजेट झुईंग ची आठवण झाली.
13 Apr 2011 - 4:45 am | आंसमा शख्स
वेगळे लेखन वाचून चांगले वाटले.
(इतिहास पाहतांना वेगळ्या गोष्टी समोर येतात. काही संप्रदायांमध्ये एका विशिष्ट घटनेआधी काहीच अस्तित्त्वात नव्हते असे मानल्यामुळे काही वेळा चमत्कारिक परिस्थिती होते. माझ्या वडिलांनाही या अभ्यासाचा छंद होता. पण त्यांच्या अभ्यासावर समाजाकडूनच कडक टिका आणि नियंत्रण आले. मजहब इमानपेक्षा वेगळे काही बोलतो म्हणून नातेवाईक आणि मित्रांकडूनही त्रास भ्जोगावा लागला हे सत्य आहे. हे सगळे माझ्या डोळळ्यासमोर घडले आहे.)
वर आलेले काही प्रतिसाद माझ्या वडिलांना त्रास देणार्यांच्या सारकेच आहेत. त्यांना वेगळे काही सहन होत नाही. खुदा त्यांना चांगली बुद्धी दे.
वेगळे विचार मांडायला त्रास सहन करावाच लागतो. पण माझ्यात तरी माझ्या वडिलांसारखे आयुष्य जगण्याची हिम्मत नाही. म्हणून खुदाच्या क्रुपेने फक्त तुमच्या लेखनाची पढाई आहे.
13 Apr 2011 - 5:36 am | निनाद
लेख रोचक आहे. मते पटली किंवा न पटली तरी हे मांडायला माझी काहीच हरकत नाही. किंबहुना सर्व इतिहास अभ्यासकांनी लेखाचे स्वागत केले पाहिजे असे वाटते.
उत्सुकता म्हणून सूर्यसिध्दान्त असा शोध विकीवर घेतला असता. अजून काही मनोरंजक माहिती सापडली. हा ग्रंथ स्वतः सूर्याने दिला असे एक पौराणिक मत आढळते. तर आधुनिक मतानुसार सूर्यसिध्दान्त याचा लेखक माहिती नाही. किंवा लेखक कोण याविषयी मतभिन्नता आढळते असे म्हणता येईल. या ग्रंथाचा काळ इ.स पूर्व ६०० असावा असे मानले जाते. किंवा कदाचित त्या आधीचाही असेल. म्हणून या ग्रंथावर, 'ग्रीक किंवा मेसापोटामिया येथील तत्त्वज्ञांची भारतीय प्रत' असा आक्षेप घेतला जाऊ शकत नाही, असे मानणारा एक मतप्रवाह आहे. इस.पूर्व तिसर्या शतकातील बौद्ध ग्रंथात याचे उल्लेख आहेत. पैतमाह सिद्धांत, पौलिश सिद्धांत आणि रोमक सिंद्धांत या ग्रंथात याचा उल्लेख आहे. तसेच वराह मिहीर आणि आर्यभट्ट यांच्या लेखनात या ग्रंथाचे संदर्भ आढळतात.
एका वर्षात पृथ्वीच्या भ्रमणाला लागणारा काळ, याची अचूक माहिती या ग्रंथात नोंदवलेली आहे, ती ३६५.२५६३६२७ दिवस अशी आहे. ही माहिती आजच्या मान्यतेनुसार जवळपास अचूक आहे.
या ग्रंथात ग्रहगोल आणि त्यांचे आकार यावर माहिती आहे.
ग्रहांचे आकारमान -
शुक्र - सूर्यसिध्दान्तानुसार शुक्राचा आकार ३००८ मैल आहे. (विकीवर सूर्यसिध्दान्तातील एकक दिलेले नाही. पण ते बहुदा योजने असावे.) आधुनिक खगोलशास्त्राची सद्य मान्यता म्हणते की शुक्राचा आकार ३०३२ मैल आहे.
शनी - त्याचप्रमाणे सूर्यसिध्दान्तानुसार शनीचा आकार ७३८८२ मैल आहे. आधुनिक खगोलशास्त्राची सद्य मान्यता म्हणते की ७४५८० मैल आहे. म्हणजे फक्त सुमारे १ टक्क्याचा फरक यात दिसला आहे.
तसेच सूर्यसिध्दान्तातच साईन व कॉस यांचे संदर्भ किंवा मूळ दिसून येते. ग्रहणे आणि त्याची कारणे याचा उहापोहही या ग्रंथात आहे.
एकुणच सुर्यसिद्धांत हा ग्रंथ रोचक आहे. या ग्रंथाचा आवाका वैश्विक मिती या संदर्भात आहे/असावा. त्यामुळे त्यातील संदर्भ गंभीरतेने अभ्यासण्यास हरकत नसावी. सुर्यसिद्धांत या ग्रंथात कपोलकल्पित गोष्टी नाहीत असे मला वाटले. अजून अभ्यास व्हायला हवा. खरे तर अनेक पाश्चात्य विद्यापीठात हा ग्रंथ अभ्यासला जातो आहे, असे जालावर दिसून आले.
या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर बर्जेस (Burgess ) या अभ्यासकाने Surya-Siddhanta; a text-book of Hindu astronomy या नावाने इ.स. १८५८ मध्ये केले. अभ्यासूंना हे भाषांतर प्रमुख ग्रंथालयात उपलब्ध आहे असेही दिसते.
आशा आहे या माहितीचा उपयोग होईल.
13 Apr 2011 - 5:49 am | Nile
आकार म्हणजे काय? आकाराचे एकक मैल असते का?
13 Apr 2011 - 6:01 am | निनाद
डायामिटर... (परिघ हा नेमका शब्द का?)
13 Apr 2011 - 6:09 am | Nile
डायामीटर म्हणजे व्यास. पेरीमीटर म्हणजे परीघ.
13 Apr 2011 - 6:10 am | आनंदयात्री
अच्छा !! मग आकार म्हणजे काय ?
(पळा मारतोय आता.)
13 Apr 2011 - 6:12 am | Nile
जो फार सुटतो तो. ;-)
13 Apr 2011 - 11:10 am | श्रावण मोडक
प्रत्युत्तराची अपेक्षा आहे. ;)
13 Apr 2011 - 7:51 pm | आनंदयात्री
सर्वद्वेष्टे माझा द्वेष करत नाहीत आणि ते फार जहाल तुच्छतावादीही नाहीत म्हणुन ते जवळचे :)
वैयक्तिक हल्लास्वरुपी विनोदावर हसणे ही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.
13 Apr 2011 - 8:24 pm | श्रावण मोडक
हाहाहाहा...
उत्तर बाकी भारी आहे. त्यात जवळचे, लांबचे असे मीतीदर्शक शब्द दिसले आणि भरून पावलो रे...
13 Apr 2011 - 11:59 pm | खुसपट
शनिचा आकार = शनि ची व्याप्ति. द्विमितीमध्ये (लांबी व रून्दी) मोजमापाचे एकक मैल हे बरोबरच आहे. दृश्य स्वरुपात व्याप केवढा हे सांगताना आकार हाच शब्द वापरला जातो. वर्तुळाकार वस्तूच्यासाठी 'व्यास' हा व्याप्ति निदर्शक शब्द वापरतात.असो.
खुसपट
13 Apr 2011 - 6:02 am | आनंदयात्री
धन्यवाद निनाद. पुरक माहिती अत्यंत उत्तम आहे. आपट्यांनी दिलेली माहितीही रोचक विस्मित करणारी आहे (फक्त चाळणी लाउन वाचली :) )
धन्यवाद.
13 Apr 2011 - 11:14 am | Nile
वरील प्रतिसादातील माहितीची लेख आपटे तर नव्हेत? ;-) (ह. घ्या. )
ही माहिती तुम्ही कॉपी पेस्ट केली आहे की तपासून पाहिली आहे? तुम्ही दिलेल्या विकीपानावर काही श्लोक दिसले त्यात ही माहीती आहे का? आकडे तर कुठे दिसत नाहीत.
बाकी सगळं जाउद्या, फक्त त्या पुस्तकात पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या परीवलनाचे गणित कसे केले आहे तेव्हढे इथे कॉपी पेस्ट करा म्हणजे कुणा 'इशाने' का सुर्याने ते पुस्तक लिहले आहे ते कळण्यास मदत होईल.