उन्हाळ्यातली धमाल
शाळेला कधी सुट्ट्या लागतील आणि कधी मनसोक्त हुंडरायला ,खेळायला मिळतंय याची आमचा ग्रुप चातकासारखा वाट पाहत असायचा
एरवी इतर बाकीची मुले आईबाबांना "आपण गावी कधी जायचं ? "असा हट्ट करताना पाहिलेलं ,पण आमच्या ग्रुपमधली टाबर "आपण गावाला जायचं नाही, इथेच राहायचं ,आम्हाला भरपूर खेळायचं आहे "असा हट्ट करायची .
त्यामुळ कॉलनितल्या मुला-मुलीनी गावी न जाण्याचा पायंडाच पाडला होता
आमच्या कॉलनीत आमचा १०-१२ जनाचा मस्त ग्रुप होता मी पप्पू ,राहुल्या ,प्रियांका ,जेमी ,अक्ष्या,मन्या, स्वीटी , गोकुळ्या,विशाखा ,इति कधी गावी गेलेलो नाहीच सुट्टीत !
नुसता धिंगाणा धिंगाणा ,खेळणे आणि खेळणे ,न भुकेची आठवण ,ना होम वर्कची ,स्वत. कधी दुपारी झोपलो नाही ना बाकीच्यांना निवांत झोपू दिले ! कधी क्रिकेट ,तर कधी लीन्गोरचा ,कधी विषामृत तर कधी डब्बा एक्स्प्रेस खेळता - खेळता दिवस कमी पडायचा ,रात्रीच तर विचारू नका लपा-छपी खेळायला जाम मज्जा यायची .कधी कधी कॉलनितले मोठे दादा लोकपण खेळायचे, मग ज्याच्यावर राज्य आहे तो रड्लाच समजा !
सकाळी आमचा ग्रुप लवकर उठायाचा कारण, जॉगिंगला जायचं !
सगळ्यात आधी पंक्या उठायाचा ,मग तो एकेक करून कुणाची कडी वाजवून ,कुणाला आरोळी देऊन ,कुणाच्या दारावर दगड मारून ,असे आम्ही सगळे महाभाग एकत्र होऊन जॉगिंगला जात असू .
जॉगिंगचे निमित्त होते फक्त, आम्ही सगळे काही अंतरावर गेल्यावर एक टेकडीच्या पायथ्याशी बसून गाण्याच्या भेंड्या ,शिवणापाणी नाहीतर आंधळी कोशिंबीर खेळत बसू. त्या टेकडीचे भयंकर आकर्षण होते आम्हाला! तिला चहुबाजूनी उंच उंच भिंतीच कुंपण घातलेलं होत ,त्या भिंतीवर कुठल्या तरी भाषेत काहीतरी लिहिलेले होत
सभोवताली छोटीशी बाग होती आम्ही रोज तिथे जाऊन फुल तोडायचो,रस्त्यावरचे गुलमोहोराचे गुच्छे ,तरवडाची पिवळी फुले आणून फुलदाणीत सजवायचो (आणि आई रोज ते फेकून द्यायची )
एक दिवस असाच धिंगाणा करताना तिथल्या एका वाचमनन पाहिलं आणि एकाला बखोटला धरल " का रे कुठ चाललास ?गेटवर का चढत होतास ?बाकीची मुल ओरडली "ओ काका जाऊ द्या चुकल चुकल" पुन्हा नाही येणार आम्ही , प्लीज एकदा सोडून द्या ,प्लीज प्लीज.
काका : - "गाढवानो खबरदार जर तुम्ही गेटवरून आत गेलात तर तुम्हाला माहित आहे का हि पारशी लोकांची स्मशानभूमी आहे " हा शब्द एकूणच सगळे टरकले
मसनवटा म्हणजे कबरस्तान "जिथे फक्त भूत असतात पिक्चरमध्ये असत्तात तशी, अशी आमची सर्वांची समजूत होती.
आपण रोज इथे खेळायचो भुतांच्या मध्ये "स्वीटी चा प्रश्न "
एकसुरात सगळे पळळा SSS भूत आल रे !
त्या दिवसापासून टेकडीवर जान बंद झालेलं
दुपारचे खेळ म्हणजे सर्व थोर मंडळीच्या डोक्याला खुराकच होता ,सर्व महिला मंडळ उन्हाळी कामामध्ये गुंतलेले असायचे ,आणि त्यात आमची भर !कुणाची लोणची ,कुणाच्या कुरड्या ,कुणाचे पापड टेस्ट करायला आम्ही असायचोच !कामाच्या गडबडीत लक्ष कोण देतेय आमच्याकडे मग काय आमचेच राज्य !
असच , एकदा संध्याकाळी खेळता खेळता जेम्या त्याची नवीन रेंजर सायकल आम्हाला दाखवायला घेऊन आला त्याच्या बाबांनी त्याला चांगले मार्क मिळाले म्हणून घेऊन दिली होती .रेड कलरची ती रेंजर सर्वाना भुरळ घालीत होती सर्वजन "ए मला पण एक चक्कर , दे ना रे प्लीज प्लीज म्हणत त्याच्या मागेपुढे करत होती जेमी पण तेव्हढाच दिलदार होता तो हि सगळ्यांना एक - एक चक्कर देत होता
परीक्षेत चांगला स्कोर करून नवी कोरी रेंजर अथवा तत्सम गिफ्ट मिळविणे हे आमच्या बापाजन्मी शक्य नसल्यामुळे "दुधाची तहान ताकावर "म्हणून मी आणि पप्पूपण(भैय्या ) लाईनमे लग गये.
मी तेव्हा नवीन नवीन सायकल शिकले होते ,बाबांनी महत्प्रयासाने शिकवली होती नेमका त्या दिवशी माझा बर्थ- डे पण होता आणि बाबा केक आणण्यासाठी बाहेर गेलेले होते
आईची तयारी चालू होती चिवडा सामोसे वैगेरे वैगेरे .....
माझा नंबर आला पण सगळे थोडे का- कु करत होते (माझी हाईट आणि तब्येत पाहता मला ती झेपेल कि नाही हाच मोठा प्रश्न होता त्यांच्या समोर )
जेमी ;- अरे पियू तू चलायेगी क्या ? ये लेडीज सायकील नही रेंजर हे ,तू चला लेगी क्या ?
मी;- उसमे क्या अवघड हे? मे मेरे पप्पा कि भी चलाती हु वोभी नळी कि हे, तेरे रेंजर कि तऱ्ह ! तुझे चक्कर नही देणे का क्या ? फिर देख हा तू ?
जेमिला माहित होते कि ,आज माझा बर्थ डे आहे चक्कर नाही तर आपल्याला आमंत्रण पण नाही हा माझा निरागस स्वभाव त्याला पुरेपूर माहित होता
मोठ्या हिमतीने त्याने त्याची लाडकी नवी कोरी रेंजर माझ्या हातात दिली मी नळीवर पाय टाकून झोकांड्या खात खात पाय टेकवत टेकवत सुरुवात केली नंतर सीटवर बसले उतार होता सायकल स्पीड मध्ये चाललेली आनंद गगनात मावत नव्हता , कॉलनीचा रस्ता जिथे संपतो तिथे एक मुख्य वाहतुकीचा रस्ता होता आम्ही आमच्याच नादात असल्यामुळे तिथून मागे फिरण्याची बुद्धी झाली नाही .
मुख्य रस्त्यावरच्या सरळ मार्गी जाणाऱ्या कारला आम्ही साईडने जोरदार धडक मारली नळीवरून पाय न काढता आल्यामुळ सायकल बोकांडी घेऊन आमची स्वारी रस्त्यातच पलटी झाली
मुल ओरडली ,रस्त्यातले लोक धावले "आग बाई केव्हडे लागलाय , तुझे आई बाबा कुठे आहेत? इतका वेळ मला काहीच समजले नव्हते कारण डोळे गच्च मिटले होते डोळे उघडले तर काय ?
माझा हात मनगट आणि कोपराच्या बरोबर मधोमध अर्ध -गोलाकार भयानक वाकडा झाला होता हात वळवता येत नव्हता,
ढोपर फुटली होती ,उजव्या हाताला चांगलाच खरचटलं होत त्यातून रक्त येत होत ते पाहून मी जे भोकाड पसरले कि विचारू नका एव्हाना आई धावत धावत आली होती मुलीचा हात असा कसा झालाय हे तिला नक्की कळत नव्हते ती प्रचंड घाबरलेली होती तरी हि त्या अवस्थेत तिने माझ्या हाताला अलगद तिच्या हातात घेतले होते ,अण्णा धावत धावत आले
शेजारचे काका स्कूटर घेऊन आले पुढे काका ,मागे अण्णा आणि मध्ये मी कसेबसे एका हॉस्पिटल मध्ये पोहचलो ,
डॉक्टरांनी पहिले
" मुलीचा हाथ मोडला आहे प्लास्टर घालावे लागणार आहे पण आमच्या इथे लाईट नाही एकस - रे काढणे शक्य नाही
तेव्हा त्याने दुसर्या हॉस्पिटलचा पत्ता दिला .पण तत्पूर्वी हात एका ब्यांडेज मध्ये गुंडाळून गळ्यात बांधून दिला
त्या हॉस्पिटलला पोहचलो डॉक्टरांनी हात पहिला एकस -रे काढला तर हात बरोबर मध्ये मोडला होता "दोन्ही हाड चांगलीच क्र्याक गेलेली आहेत आणि सूज उतरल्याशिवाय प्लास्टर शक्य नाही तेव्हा आज तिला ADMIT करावे लागेल असे सांगितले.
वाढदिवस बोम्बलला सगळेच बोंबलले ना केक ना खाऊ !
अशा प्रकारे हात मोडून पहिल्यांदाच हॉस्पिटलचे दर्शन घेणाऱ्या पहिल्या बालिकेचा मान मलाच मिळाला होता .माझा हात एका हुकला ९० डिग्रीच्या काटकोनात अडकवून ठेवला होता वेदना कमी व्हाव्या म्हणून .कॉलनीतले चिल्ले पिल्ले मित्रमंडळ त्यांच्या आईबाबा सोबत मला भेटून जात होते
बाबा बिचारे रात्रभर झोपले नाहीत मी रडायची म्हणून .हाताला कळ लागत होती
दुसर्या दिवशी मला भूल देऊन रीतसर प्लास्टर झाले आणि डीसचार्ज मिळाला
आईने दारात आल्याबरोबर एक भाकरीचा तुकडा ओवाळून फेकून दिला ,आजीने दृष्ट काढली ,कुणी रागावले मात्र नाही .
ते दंडापासून केलेलं प्लास्टर मानेला चांगलेच जड जड वाटत होते .म्हणून काही दिवस फार जड गेले २१ दिवस संपण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते कारण अर्धी सुट्टी माझी वाया गेली होती
डॉक्टरांनी मला अज्जिबात आवडत नसलेली अंडी दिवसातून २ वेळा ती पण उकडून खायला सांगितली होती
आणि तीहि एक मोठी शिक्षाच होती माझ्यासाठी !
कसेबसे २१ दिवस संपले प्लास्टर काढले पुन्हा एकस - रे काढला हाड जुळून आली होती
बाबांनी हुश्श केले आणि मी हि ! पण डॉक्टरांनी प्लास्टर काढले आणि एक घट्ट बँडेज बांधले हाताला आणि तीन क्लिप लावल्या आणि १०-१५ दिवस असेच ठेवायचे ,अज्जिबात काढायचे नाही .
अजून एक शिक्षा आधीच तो हात दुसर्या हातापेक्षा खूप बारीक आणि कुपोषित दिसत होता आणि त्यात पुन्हा हे !
१०-१२ दिवस गेले निघून कसेतरी .तसेही आमचे कॅरम ,पत्ते ,बुद्धिबळ ,नाही काही तर टि. व्ही. झिंदाबाद चालूच असे
शेवटी तो दिवस उजाडला मी कॅलेंडरवर तशी खूनच केली होती एकदाच बँडेज काढून फेकून दिल .
"अण्णा आजोबांच्या काळातला रेडीओ , निट का चालत का नाही? म्हणून त्याच्यात बोट (स्क्रू ड्रायव्हर) घालीत बसले होते संध्याकाळचे ४-५ वाजले असतील मुल विषामृत खेळत होती ,मी लगेच त्यांच्यात हुंडरायला गेले आणि नेमक एकीला अमृत देता देता माझा तोल गेला आणि मी पुन्हा डाव्या हातावर पडले नुकतीच जुळून आलेली हाडे परत पिचकली सगळे घाबरले , मुल गायब झाली होती,उगीच आपल्यावर आळ नको यायला म्हणून !
अण्णा रेडीओ निट करत बसले होते त्यांच्या पाठीमागे जाऊन मी उभी राहिले हातात हात धरून !
पण यावेळी मी जास्ती घाबरले नव्हते (जणू हात मोडण्यात हातखंडा होता माझा )
"अण्णा, अ ..अण्णा,.... दोन तीन वेळा आवाज दिला, पण भीतीमुळ गांगरलेला क्षीण आवाज काही केल्या अण्णांना एकू जात नव्हता
" ओ अण्णा माझा हात मोडलाय परत " जोरात ओरडले
अण्णा खडबडून उठले हात पहिला आणि माझ्या कानाखाली जाळ करायला हात उगारला तेव्हड्यात आई धावत आली.
"अहो मारताय काय तिला ?तुम्हाला देवाने काही अक्कल दिली कि नाही ? आधी दवाखान्यात चला.
आज्जी :- "हि कार्टी काही सुखाने जगू द्यायची नाही कुणाला " नुसते काही न काही उपद्व्याप करत बसते मेली "
आई ;- का ग तुला एव्हढी काय हौस आली होती खेळायची ,आत्ताच प्लास्टर काढले होते न ? हाताच वाटोळ करून घेशीन कायमच "
डॉक्टरांना सांगते हीच प्लास्टर चांगल ३-४ महिने ठेवा त्या शिवाय सुधारायची नाहीस तू "
माझा चेहरा अजून रडवेला झाला
गुपचूप स्कूटरवर बसले
हॉस्पिटल मध्ये पोहचलो ,डॉक्टर फोनवर बोलत होते मला पाहून फोन ठेवला केबिन मधून बाहेर आले
" काय ग हात दुखतो का "
वडिलांना विचारले," काय झालाय हाताला ?
वरून कापडात गुंडाळून ठेवलेला हात मी अलगद बाहेर काढला आणि डॉक्टरांनी त्यांचा हात त्यांच्या कपाळावर मारून घेतला " अरे बाई काय केल तू पुन्हा ? सांगितलं होत न तुला २-३ महिने जप म्हणून ,कसा काय मोडलास परत ?
मी ;- खेळता खेळता पडले आणि मोडला
डॉक्टर ; - "का हो ,तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होते न?
अण्णा ; - कार्टी ऐकेल तर शपथ "
डॉक्टर माझ्याकडे दटावून :- आता प्लास्टर करतो पण पुन्हा जर का तू हात मोडला तर मोठा लोखंडी रॉडच घालावा लागेल हातात !
बघ मग तू, न तुला खेळता येणार न सायकल चालवता ,माझे भोकाड पुन्हा चालू झाले .
यावेळी मला भूल दिली नाही प्लास्टर झाले घरी आणले परत तेच ,जड जड प्लास्टर ,उकडलेली अंडी ,आईचे आजीचे सल्ले , कडू कडू औषध आणि गोळ्या आणि पुन्हा तेच हातमोडके हातमोडके sssss म्हणून मुलाचं चिडवण
पण त्यातही एक मज्जाच होती.
उन्हाळ्याची सुट्टी ,दंगा करण्याची दंग होण्याची
सुट्टीतले दिवस, मौजमजेचे दिवस , बर्फाचा गोळा खाण्याचे , सायकलवर मनसोक्त भटकून ,दमून झाडाखाली निवांत बसून डब्बे खाण्याचे ,कैर्या खाऊन तोंड आंबट करण्याचे ,सगळ्यांनी वर्गणी करून फुटबाल घेऊन खेळण्याचे,मंदिराच्या चकचकीत ओट्यावर भोवरे खेळण्याचे , रात्रीचे गच्चीत झोपण्याचे, आजीकडून गोष्टी ऐकण्याचे ,सर्व कस भन्नाट, मनसोक्त ,आलबेल !
त्यावेळी आत्तासारख ना कुठला समर क्याम्प ना कुठल संस्कार शिबीर
जे होत तेच एन्जोय केलेलं मनापासून भर भरून
"बालपण. तुमच आनि आमच सेमच असत "
असेच म्हणते :)
प्रतिक्रिया
11 Apr 2011 - 1:37 pm | मृत्युन्जय
टेकडीच्या आठवणीवरुन एका मित्राचा किस्सा आठवला. पट्ठ्या एकदा को़कणात गेला होता. रहायला एका वाडीत होता. संध्याकाळी लाइट गेले होते आणि प्रचंड उकाडा होता म्हणुन हा चक्क बीचवर जाउन झोपला. पाठे टेकायला मस्त एक बसका बाक मिळाला त्याच्यावर ताणुन दिली याने. सकाळी उठुन बघितले तर कोणा ख्रिश्चनाची कबर होती. कशावर झोपलो आहे हे कळाल्यावर परत डोळे मिटुन घेतले :)
11 Apr 2011 - 1:43 pm | टारझन
डॉक्टर भलतेच वेडे दिसतात ;) हाताच्या प्लास्टर बरोबर डोक्याचाही एक्स रे काढुन प्लास्टर करायचं लक्षात आलं नाही का ? :) ;)
बाकी लेखन आख्यानी वाटले :)
हे वाक्य विशेष आवडले ..
तसेच मध्ये च वाक्य तोडणे, नविन लाईन वर लिहीणे , आणि अल्पविराम वगैरे गोष्टी फाट्यावर मारलेले लेखन म्हणजे मिपा अलंकारंच
- ( नळी वाला ) सायकल शुमाकर
11 Apr 2011 - 1:49 pm | पियुशा
@ टारया
डॉक्टर्र तुझ्या एव्धा हुशार नव्हता ना रे बिचारा ;)
बाकि एकच म्हनते
"ना आवडतीचे मीठ अळणी"
:)
11 Apr 2011 - 1:54 pm | टारझन
त्या तंबुतल्या हिमालय रिटर्न वैद्यबुवांकडे णेले होते काय ? बाकी "हॉस्पिटल मधे लाइट नाही ? " रोमांचक आहे :)
"नावडतीचे मीठ अळणी" हे कसे वाटते ?
- मंददीप खारे
एवढंच ना .. आळण झोडु .. एवढंच ना ..
आमचं आमचं आळण आमचं वळण .. घेऊन संग एकटेच झोडू.. एवढंच ना ..
11 Apr 2011 - 1:58 pm | स्पा
चान चान
तुला बक्षिस
11 Apr 2011 - 1:58 pm | स्मिता.
पियुषा, फारच अगाऊ होतीस ग लहानपणी! (आताही तशीच असावीस असं वाटतं ;))
मीसुद्धा सुट्टीची अशीच वाट बघायचे. आमच्या इकडे मुलांचा गृप नव्हता पण मी आणि माझा भाऊ भरपूर खेळायचो आणि टी. व्ही. पण खूप वेळ बघायला मिळायचा :)
आई तिची उन्हाळी कामं माझ्या परिक्षेनंतर सुरू करायची. मग माझी आई-आजीच्या मधे लुडबुड चालायची. त्यात दुपारी बर्फाचा गोळा किंवा ऊसाचा रस, संध्याकाळी कुल्फी, कधीतरी रात्री आइसक्रिम अशी ऐश चालायची.
टाईम-मशिन हवेच बुवा!!
11 Apr 2011 - 2:04 pm | पियुशा
:)
11 Apr 2011 - 2:02 pm | पियुशा
@ टार्या
हॉस्पिटल मधे लाइट नाही
यात रोमन्च्क काय आहे?
त्यावेळी जेणरेटर नसावा त्यानच्याकडे कदाचित :)
11 Apr 2011 - 3:30 pm | ५० फक्त
डावा हात दोन वेळा मोडला त्यामुळे का काय माहित नाही पण लिखाण मध्ये मध्ये जाड मध्ये मध्ये बारीक झालंय. बाकी, छान आठवणी आहेत. पुढं त्या रेंजर सायकलचं काय झालं ते सुद्धा लिहिलं नाहीत, तिला पण प्लॅस्टर घातलं होतं का नाही ?
असो, पुढच्या भागात लिहा.
म्हणजे तुम्ही लिहित रहा आम्ही वाचण्याचा प्रयत्न करु.
@ स्पाव्ड्या तुझा प्रतिसाद पाहुन मनरावने सांद्ण ट्रिपला सांगितलेला जोक आठवला. धन्यवाद.
11 Apr 2011 - 3:49 pm | डावखुरा
?????????????????
डावा हात मोडला होता ना...??
11 Apr 2011 - 3:35 pm | विशाखा राऊत
मस्तच लिहिले आहेस... ज्याची सायकल होती त्याने तुझ्या बाजुलाच बसुन मोठे भोकड चालु केले नव्ह्ते का? :D..
"बालपण. तुमच आनि आमच सेमच असत "
एकदम सहमत :)..
11 Apr 2011 - 3:48 pm | डावखुरा
सुरवात नक्कीच छान झाली होती....
11 Apr 2011 - 9:55 pm | आत्मशून्य
वाचताना ह्रूदयाचा ठोका चूकला, व डावा हात दूखायला लागला.....
- ह्रूदयशून्य
अवांतर :- मिपावरती बालविभाग केव्हांपासून सूरू झाला ? असो आता झालाच आहे तर हा सूट्टीपूरता मर्यादीत नसावा अशी अपेक्शा आहे. तसेच सजावटीसाठी इथे, ढग्,सूर्य, फूगे व इतर बालगोपाळांची चीत्रे, शब्दकोडी व सामान्य ज्ञान, वीनोदी चूटके, आज काय घडल, पोफळीबागचे रहस्य, सूपर सीक्स, फास्टर फेणे... वगैरे वगैरे मटेरीयल इंक्लूड करावे ही वीनंम्र याचना
11 Apr 2011 - 4:40 pm | sneharani
छान लिहलस ग!
11 Apr 2011 - 7:00 pm | वाहीदा
त्या जेमी अन त्याच्या रेंजर चं पुढे काय झाले ? तुझ्या मुळे त्यालाही घरी नक्कीच थोबाडीत बसली असणार !
बाकी तु लहानपणापासूनच धडपडी आहेस हे कल्ले ;-) . मी ही लहानपणी भरपूर वेळा पायाचा ठोपर अन हाताचा कोपर फोडून घेतला होता ,अन प्रत्येक वेळेला माझ्यामुळे ताईला बोलणी खावी लागत असे. पण तिची ही ताईगिरी असायचीच
मज्जा आली वाचताना :-)
नेहमी अशीच रहा !
11 Apr 2011 - 5:52 pm | गणेशा
नेहमी प्रमाणे .. आपणच त्या गृपमध्ये होतो आनि हा अनुभव अनुभवलाय असेच वाटत होते वाचताना.. एकदम छान
खालील लाईनस विशेष आवडल्या .. पण त्या नंतर हात मोडल्यामुळे वाईट वाटले. तरीही सायकल चे काय झाले आनि जेमी बिच्चार्याची काय अवस्था होती ह्याचेच राहुन राहुन विचार मनात येत होते ..
11 Apr 2011 - 7:32 pm | प्रास
मजा आली वाचताना.....
बाकी
सहमत.
एक शंका -
टाबर म्हणजे काय?
पुलेशु
12 Apr 2011 - 1:54 am | ajay wankhede
उन्हाळ्यात आम्हि हमखास मामा च्या गावाला जायचो. गावात धमाल करायचि बन्दि. काय बि असो "बालपन तुमचं नि आमचं सेम असते. खुप आवडल..
12 Apr 2011 - 6:55 am | शिल्पा ब
छान लिहिलंय गं!! टार्याच्या बोलण्याकडे लक्ष देउ नकोस...त्याला एक " न" मेला धड लिहिता येत नाही अन दुस र्यांना शुद्धलेखन शिकवतोय !!
बाकी टाबर काय असतं?
12 Apr 2011 - 10:38 am | टारझन
हॅहॅहॅ.. किती हळवा प्रतिवाद होता हा ... लहाण पोरांची समजुत अशीच काढतात म्हणा =)) दोन पावले पुढे जाऊन मी तर म्हणेन ... " ताल्याचं नाव ना आपण भोकालीला सांगु .. मग ती त्याला शिक्षा कलीन .. तु त्याच्या कले लक्श देउ नकोश .. " :)
अवांतर : शब्द शुद्धलेखन आणि वाक्य लेखन ह्यातला फरक समजवणार्या जालिय विणय सरांकडे शिल्पा ब ची पण शिफारस करावी ;)
- शेंब्डा ण
12 Apr 2011 - 11:04 am | शिल्पा ब
भयंकर आवडला हा प्रतिसाद. =)) =))
12 Apr 2011 - 9:29 am | पियुशा
बाकी टाबर काय असतं?
मारवाडी मधला शब्द आहे हा
टाबर म्हनजे लहान मुल
:)
12 Apr 2011 - 10:26 am | मुलूखावेगळी
हेच लिहायला आले होते
12 Apr 2011 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा !
छान आहे हो लिखाण.
बालवाडीत असताना कथाकथनाच्या कार्यक्रमाला लागायची अगदी तशी तंद्री लागली हे लेखन वाचताना.
12 Apr 2011 - 5:30 pm | प्रकाश१११
खूपच लडिवाळ आठवणी .बालपणात घेऊन गेले शब्द .
आवडले .लिहित रहा. !!