प्रेरणा - http://misalpav.com/node/17606
खरं सांगायचं तर.....
आज-काल दाढी करयची देखील खुप भीती वाटते ।
कारण....
कुठलीशी गालावरली बट, नकळतच राहूनच जाते ।
दाढीचे केस मग, सहजा-सहजी तुटत नाहीत ।
भावनांचे पीळ त्या केसांतले, काहीकेल्या सुटत नाहीत ।
सुटले पीळ तुटले केस तरी, ते जखमा देउन जातात ।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेउन जातात ।
ओलावा त्या डोल्यांतला, लपवू पाहता लपत नाही ।
डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली पडल्या वाचून राहत नाही ।
आणि मग...!
का केली दाढी ही अशी...? हा प्रश्न मला सतावत राहतो ।
पण मी मात्र सदैव असाच, दाढी दरदिवशी करत राहतो ।
प्रतिक्रिया
11 Apr 2011 - 6:53 pm | नरेशकुमार
face waxing हा एक ऑप्शन ट्राय करु शकता.
11 Apr 2011 - 9:29 pm | प्रीत-मोहर
हीहीही पै बढिया है ....
11 Apr 2011 - 9:44 pm | पैसा
हीहीही!
{नृत्य वाचून आणखीच मजा आली}
12 Apr 2011 - 1:21 am | निनाव
:) दररोज दाढी केल्याबद्दल आपले आभार नि अभिनंदन!
अर्थात, कवि-भाव सुंदर!
12 Apr 2011 - 2:29 am | प्राजु
हाहाहा!
पामोलिव्ह वापरा!! ;)
12 Apr 2011 - 10:06 am | प्यारे१
ब्रेकिंग न्यूज...
ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव निखंज हे मिसळ्पाव वर असून प्राजु हा त्यांचा आय डी असल्याचे आमचा वार्ताहार दिपक भोज्पुरिया कळवतो.
12 Apr 2011 - 10:26 am | sneharani
हा हा हा!
:)
12 Apr 2011 - 3:37 pm | सुहास..
भावनांचे पीळ त्या केसांतले, काहीकेल्या सुटत नाहीत ।
सुटले पीळ तुटले केस तरी, ते जखमा देउन जातात । >>
हेहेहे कुठले कुठे !!
13 Apr 2011 - 6:47 pm | पक्का इडियट
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. :)