Skip to main content

का केली मैत्री ही अशी...?

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी रविवार, 10/04/2011 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगायचं तर..... आज-काल मैत्री करयची देखील खुप भीती वाटते । कारण.... कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते । बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत नाहीत । भावनांचे पीळ त्या नात्यातले, काहीकेल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले धागे तरी, ते जखमा देउन जातात । जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेउन जातात । ओलावा त्या डोल्यांतला, लपवू पाहता लपत नाही । डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली पडल्या वाचून राहत नाही । आणि मग...! का केली मैत्री ही अशी...? हा प्रश्‍न मला सतावत राहतो । पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो । हर्षद अ.प्रभुदेसाई....
लेखनविषय:

वाचने 1656
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

तु असा कि मैत्री करत राहतोस, आणि असे जीवघेणे लिहित जातोस. मित्रा दोस्ती मध्ये अशी अट नाही घालायची, आसवे आपली अशी नाही ढाळायची. शब्द उत्तम, आणि भावना भिडल्या राव एकदम.

राव,झकाsssस मनाला भिडलय.. शब्दात धार आहे करुनेचि म्हनुनच मित्रा मैत्रि करयला घाबरतो.