बहकलेले दिवस

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
8 Apr 2011 - 4:33 pm

कसे ते बहकलेले दिवस
अन् कश्या त्या मंतरलेल्या रात्री
मोहर तुझ्या अवघ्या देहास
अन् सुगंधी दरवळ माझ्या गात्री

एवढे एवढे होत उरले होते
जग फक्त आपल्या दोघांचे
क्षणाक्षणांवर उमटले होते
सुंदर ठसे आपल्या मिलनाचे

सहवासी सुखाचा सोहळा
निळ्या नभीचा निळा चांदवा
अद्भुत अनुभव आगळा
तुझ्या मिठीचा नवा गोडवा

कंपित ओठांची धुंद सय
थरथरते स्पर्श मोरपिशी
गंधित श्वासांची संथ लय
झरझरते हर्ष हृदयाशी

झुगारून दे काळाची बंधने
फिरून जागवं ते क्षणन् क्षण
उभारून दे स्मरणांची स्पंदने
भारुनी अस्वस्थतेचे कणन् कण

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०८/०४/२०११)

शृंगारकविता

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

8 Apr 2011 - 4:38 pm | नगरीनिरंजन

मस्त! छान जमलीये कविता!

एवढे एवढे होत उरले होते
जग फक्त आपल्या दोघांचे
क्षणाक्षणांवर उमटले होते
सुंदर ठसे आपल्या मिलनाचे

हे तर अप्रतिम!

फक्त एक प्रश्न आहे.
'मोहोर तुझ्या अवघ्या देहास' की 'मोहर तुझ्या अवघ्या देहास'?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Apr 2011 - 4:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हे ध्यानातच नाही आल..... धन्यु हो!! बदल केला आहे.

निनाव's picture

8 Apr 2011 - 4:43 pm | निनाव

छानच. मस्त रचना.
ननिं ना अनुमोदन.

चित्रा's picture

8 Apr 2011 - 6:02 pm | चित्रा

नव्याने सुरुवात करण्याची इच्छा आवडली :)

अरुण मनोहर's picture

9 Apr 2011 - 7:33 am | अरुण मनोहर

>>मोहर तुझ्या अवघ्या देहास
अन् सुगंधी दरवळ माझ्या गात्री<<

हे खासच!

मदनबाण's picture

9 Apr 2011 - 9:27 am | मदनबाण

शॉलिट्ट... :)
शॄंगार रसाने "टच्च भरलेली" कविता... ;)

काव्यवेडी's picture

9 Apr 2011 - 12:16 pm | काव्यवेडी

मस्त कविता !!

प्रकाश१११'s picture

9 Apr 2011 - 12:29 pm | प्रकाश१११

कंपित ओठांची धुंद सय
थरथरते स्पर्श मोरपिशी
गंधित श्वासांची संथ लय
झरझरते हर्ष हृदयाशी

सुरेख !!

गणेशा's picture

12 Apr 2011 - 4:11 pm | गणेशा

अप्रतिम काव्य ...

सहवासी सुखाचा सोहळा
निळ्या नभीचा निळा चांदवा
अद्भुत अनुभव आगळा
तुझ्या मिठीचा नवा गोडवा

विशेष आवडले

गवि's picture

12 Apr 2011 - 4:36 pm | गवि

मस्त रे.. आवडले एकदम..

sneharani's picture

12 Apr 2011 - 4:53 pm | sneharani

मस्त कविता

मी ऋचा's picture

12 Apr 2011 - 5:53 pm | मी ऋचा

मस्त!

प्राजक्ता पवार's picture

12 Apr 2011 - 10:40 pm | प्राजक्ता पवार

कविता आवडली .

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Apr 2011 - 10:05 am | मिसळलेला काव्यप्रेमी

धन्यु हो सर्वांचे!!

प्यारे१'s picture

13 Apr 2011 - 10:59 am | प्यारे१

कशी राहिली ही ' शृंगाररसपूर्ण कविता' वाचायची?

बाकी 'मिका' हे नाव शोभतंय हा....

रामदास's picture

13 Apr 2011 - 11:19 am | रामदास

छान आहे कविता. थोडा स्वानुभव मिसळून प्यालो आणि आणखी बरं वाटलं .
फिरून जागाव ते क्षणन् क्षण
हे जगावं असं असेल पण जागावं ला ही काही हरकत नाही .

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Apr 2011 - 5:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

ते जागवं आहे :)
बदल केल्या गेल्या आहे.

माझीही शॅम्पेन's picture

13 Apr 2011 - 10:59 pm | माझीही शॅम्पेन

छान छान !

-----------पिसळलेला मिसळ-प्रेमी -----------