हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही
पहाटेच्या थंडीत ऊठुन व्यायाम करावासा वाटतो
अंथरुणाची ओढ आता पुर्वीसारखी वाटत नाही
हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही
हल्ली मंडईतही पुर्वीसारखे नजरेला गजरे दिसत नाही
कारण गजरे विकणारी बाई आता गजरे विकत नाही
देवांच्या तसबिरी विकण्याचा नवा धंदा ती करते
आणि या धंद्यात पैसा जास्त सुटतो असं काहीसं म्हणते
म्हणलं जाऊदे, नाहीतरी आपल्याला गजर्याची तितकी काही गरज राहिलेली नाहीये
आणि थंडीही आता पुर्वीसारखी गुलाबी राहिलेली नाहीये
रात्रीच्या आकाशात आजकाल नुसते ढगच दिसतात
सगळ्या चांदण्या कुठे गेल्या काहीच कळत नाही
चंद्रही आता पहिल्यासारखा लोभस वगैरे वाटत नाही
हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही
हली ऐन हिवाळ्यात उगाचच आईस्क्रीम खावंस वाटत नाही
दोघांनी मिळुन खायचं यापेक्षा सर्दी झाली तर काय करायचं हा विचार काही केल्या मनातुन जात नाही
तारुण्य संपतंय असं अजुन तरी वाटत नाहीये
पण काहीही म्हणा, हल्ली थंडी काही पुर्वीसारखी गुलाबी राहिलेली नाहीये
हल्ली ती सुद्धा पुर्वीसारखी फार वेळ नटत नाही
मी कितीही रोखुन बघितलं तरी काही केल्या लाजत नाही
आणि आश्चर्य म्हणजे मलाही त्याचं काही वाटत नाहीये
याला कारण थंडीच आहे... कारण आजकाल साली थंडीच गुलाबी राहीलेली नाहीये.
प्रतिक्रिया
21 Jun 2008 - 8:43 pm | स्वप्निल मन
फारच सुरेख कविता आहे!
स्वप्निल मन
पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.
22 Jun 2008 - 9:43 am | विसोबा खेचर
मस्तच कविता आहे! :)
तात्या.
22 Jun 2008 - 9:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुलाबी नसलेल्या थंडीची करामत आवडली.
22 Jun 2008 - 9:51 am | II राजे II (not verified)
;)
जबरा !
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
22 Jun 2008 - 7:44 pm | शितल
छान कविता.
23 Jun 2008 - 4:48 am | चतुरंग
आयुष्यातल्या थंडीचं गुलाबीपण ओसरत जाणं छान टिपलंय! ;)
चतुरंग
23 Jun 2008 - 9:50 am | चाणक्य
सर्व प्रकट व अप्रकट वाचकांचे आभार.
चाणक्य