दाणे पडले टप टप टप
चिमण्या गोळा पट पट पट
चिव चिव करता टिपती दाणे
टिपता टिपता म्हणती गाणे
या रे पिलांनो जवळी या
आपण गाणे गाऊ या
घरटे काडयांनी सजवू
दाणे पोटापुरते जमवू
हाव नको ती जास्तीची
सवय करू या कष्टांची
चोच दिली ज्या देवाने
घास ठेवले समोर त्याने
आभार त्याचे मानू या
चिव चिव गाणे गाऊ या
प्रतिक्रिया
2 Apr 2011 - 9:26 pm | टारझन
वय किती तुमचे ?
-किडेश
3 Apr 2011 - 12:10 pm | पंगा
अशा कवितांच्या टार्गेट ऑडियन्सबद्दल वयाच्या अटीची अपेक्षा करणे समजण्यासारखे आहे, पण अशा कविता करणारास वयाची अट नसावी. (किमानपक्षी, तशी ती असण्याचे काही कारण दिसत नाही.)
कदाचित अशी कविता येथे प्रकाशित करणे हा येथील वाचकवर्गाच्या सरासरी मानसिक वयोगटाबद्दल (पक्षी: 'प्रगल्भ'तेबद्दल) ताशेरे झोडण्याचा छुपा (किंवा तितकासा छुपाही नाही असा) प्रकार असावा काय? तसे असल्यास या उपक्रमाबद्दल वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा नोंदवू इच्छितो.
3 Apr 2011 - 1:58 pm | प्रास
.
बालगीत आवडले हे वे. सां. न.
3 Apr 2011 - 2:18 pm | टारझन
काय बालकविता आवडली म्हणजे काय ? बालकवितेचे विषय बालकांना शोभेसे असावेत. इथे थिम बालकवितेची आणि त्यातलं तत्वज्ञान मोठ्यांसाठी. ह्याला बालकविता म्हणतात काय ? !
बालक आहे तो .. त्याला काय कळतं मोह माया ? उगा काहीतरीच ..
लहाण पोराला गिफ्ट म्हणुन .. देण्यासारखा प्रकार आहे !
एकदम छप्परफाड छप्परी बालकविता आहे . शुद्ध आणि प्रांजळ भाषेत. स्पष्ट प्रतिसादाबद्दल राग माणु नये . ( कारण तुम्ही राग माणल्यास आम्हाला काही फरक पडणार नाही )
3 Apr 2011 - 6:57 pm | प्रास
बहुदा बालगीत किंवा लहान मुलांच्या कविता या ठराविक साच्यांच्याच असाव्यात, त्यात चांगल्या संस्कारार्थ कोणताही संदेश नसावा असा काहीसा तुमचा ग्रह असल्याचे जाणवते.
माझ्या मते या बालगीतामध्ये लहान मुलांसाठीच एक चांगल्यापैकी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो देण्यासाठी वापरलेले रुपकही लहान मुलांना समजण्यासारखेच आहे. तुम्हाला आवडले नसल्यास तो तुमचा प्रश्न आहे.
3 Apr 2011 - 2:12 pm | टारझन
मी अट घातल्याचे दाखवुन द्यावे आणि १००० रुपये घेउन जावे. :)
- (बॉलकवी) अटेश
3 Apr 2011 - 2:37 pm | पंगा
हजार रुपयांत आमच्याकडून काम करवून घेण्याऐवजी, अशी कामे दर्जेदारपणे आणि फुकटात करून देणारे आपल्याला इतरत्र पैशाला पासरी मिळू शकतील, असा प्रेमळ सल्ला आम्ही आपणांस देण्याची गरज आहे काय?
शिवाय, काम क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून होणे अधिक होतकरू गरजवंतांस उद्यमसंधी दिल्याचे पुण्य पदरी पडणे, हे दोन बोनस फायदेही आहेत.
तसेही, आजकाल आम्ही अशी कामे तशीच विशेष निकड असल्याशिवाय घेत नाही. एक म्हणजे, आज हजार रुपयांची आम्हाला विशेष गरज नाही. शिवाय, उसळत्या तरुण रक्तास संधी दिली पाहिजे; कसें? ;-)
तेव्हा, पहा विचार करून.
3 Apr 2011 - 9:49 pm | आत्मशून्य
तूस्सी छा गये...............