श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्या जाऊ दे मला या नितांत सुंदर गजलेचे विडंबन.
श्री. प्रदीप कुलकर्णी हे अत्यंत प्रतिभावान गझलकार . आम्ही त्यांच्या गझलांचे चाहते.
त्यांची जाऊ दे मला ! ही गझल वाचताच आमच्यातला दिड वर्ष सुस्तावलेला गझलकार खडबडून जागा झाला. आणि हे औधत्य आमच्या हातून घडले.
सोड माझा हात... जाऊ दे मला !
मी जरी वाह्यात... जाऊ दे मला !
बायको रागावते हल्ली सखे
फार झाली रात... जाऊ दे मला !
भेटण्याआधी तिला थुंकून द्या
तोबरा तोंडात... जाऊ दे मला !
जेन्ट्स की लेडीज हे सांगू नका
वाजताहे वात... जाऊ दे मला !
ज्या ठिकाणी गार होतो जीव हा
त्या नव्या अड्ड्यात... जाऊ दे मला !
काय एका बाटलीचे चारशे?
आणतो स्वस्तात... जाऊ दे मला !
बहकला 'धोंड्या' तमाशा पाहुनी
नारही रंगात... जाऊ दे मला !
----- धोंडोपंत
प्रतिक्रिया
20 Oct 2007 - 3:23 pm | केशवसुमार
धोंडोपंत,
एकदम झकास विडंबन..
तुमच्यातला गझलकार जागा झाला हे उत्तम झाले.. (प्रदिप कुलकर्ण्यांचे आभार मानायला हवेत)
येउ देत आता एकसे एक गझला ( आम्हाला नवा माल ;) )
(आपला जूना जाहता )केशवसुमार
20 Oct 2007 - 3:58 pm | विसोबा खेचर
धोंड्या,
सुंदर विडंबन केलं आहेस रे..
ज्या ठिकाणी गार होतो जीव हा
त्या नव्या अड्ड्यात... जाऊ दे मला !
काय एका बाटलीचे चारशे?
आणतो स्वस्तात... जाऊ दे मला !
ह्या ओळी आवडल्या!
केशव म्हणतो त्याप्रमाणे तुझ्या गझला अजूनही येऊ देत!
मध्यंतरीचा बराच काळ तू कुठल्या मानसिक तणावातून गेला आहेस हे मला माहीत आहे, तरीही एखाद्या कलाकाराने जमेल तशी आपली अभिव्यक्ति सुरूच ठेवावी असं मला वाटतं. in fact, आपलं रोजचं आयुष्य त्याने थोडं अधिक सुखावहच होतं असंही वाटतं!
असो, पुढील लेखनाकरता मनापासून शुभेच्छा!
तुझा,
तात्या.
20 Oct 2007 - 5:47 pm | राजे (not verified)
मस्तच... पंत... सुर सापडला तर मग !
चला लवकर एक मस्त गझल लिहा येथे पाहू...
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....