भिऊ नकोस ...

विश्वेश's picture
विश्वेश in जे न देखे रवी...
30 Mar 2011 - 10:14 am

स्वतापुरते लढायचे बळ तेवढे आता गाठीशी आहे ...
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."

तुझ्या ह्या आश्वासनाने केले होते भितीना दफन ...
अन उभा ठाकलो लढाया जगाशी बांधून डोईवर कफन
माहित नव्हते माझी लढाई नशिबाच्या काठीशी आहे ....
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."

लढलो अनेक समरे काही जिंकलो काही हरलो
लढता लढता लोटली वर्षे, परंतु मागे नाही फिरलो ...
हरलो शेवटी वयाकडून, माहित नव्हते गाठ साठीशी आहे ...
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."

गळाले सगळे बळ, अन गळाल्या सगळ्या आशा
आलास समोरून चालत अन दिलास पुन्हा दिलासा ...
दाखवलास मज आरसा माझ्याच भूतकाळाचा
दिसला त्यात चेहरा मज एक निरागस बाळाचा ...

दाखवून मलाच माझे बिंब म्हणालास
"कोण तू होतास ... अन काय तू झालास"
उभ्या जीवनाचा अनुभव तुझ्या गाठीशी आहे ....
अन म्हणालास "भिऊ नकोस .... तू माझ्या पाठीशी आहे"

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

महेश काळे's picture

30 Mar 2011 - 1:33 pm | महेश काळे

धन्यवाद !!

RUPALI POYEKAR's picture

30 Mar 2011 - 1:37 pm | RUPALI POYEKAR

सुंदर कविता

नगरीनिरंजन's picture

31 Mar 2011 - 10:48 am | नगरीनिरंजन

छान! आवडली कविता! यावरून मलाही एक सुचली ती टाकतोय.

sneharani's picture

31 Mar 2011 - 10:53 am | sneharani

मस्त कविता!

नारयन लेले's picture

31 Mar 2011 - 12:55 pm | नारयन लेले

मनाला भावली.

मस्तच व जेश्ट नागरिकानच्या आठ्वणी जाग्या करायला लवणारि कविता वाटली .

विनित