रंगपंचमी तील अनिष्ट प्रकार

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
20 Mar 2011 - 9:19 pm

रंगपंचमीचा अंगावर काटा आणणारा अनुभव लिहीते आहे.

खूप वर्षे झाली त्या गोष्टीला. नवरा जहाजावर होता आणि आमचा फक्त साखरपुडा झालेला होता. मी मुंबईच्या एका महाविद्यालयात शिकत होते आणि हॉस्टेलवर रहात होते. दर शनिवारी, रवीवारी मी सासरी जाऊन रहायचे कारण नवरा एवीतेवी नव्हताच त्यामुळे आईबाबानी परवानगी दिली होती. त्यायोगे सासरच्या लोकांशी ओळख होत असे, रीतीभाती समजत असत.
एका रवीवारी नेमकी रंगपंचमी आली. आणि मी परत हॉस्टेलवर निघाले. मला सासूबाईंनी जाऊ दिले. त्यांच्या लक्षात आले नसावे की या दिवशी स्त्रियांनी मुंबईत बाहेर पडणे किती धोक्याचे असते. झाले मी रेल्वे स्टेशनवर गेले, सामसूम होती. वय लहान असल्याने, अननुभवी असल्याने माझ्यालक्षात आले नाही की हा या दिवसाचा प्रभाव आहे. मी लेडीज डब्यात शिरले, अक्षरक्षः कोणीही नव्हते. पण एक भिकारीसदृष मनुष्य येऊन उभा राहीला. आणि मग मी विचार केला "अरे मी कदाचित दुसर्‍याच डब्यात शिरले असेन. कदाचित हा स्त्रियाकरता राखीव डबा नसेलच." आणि मी काहीही कृती न करता तशीच आपल्या विचारात मग्न उभी राहीले.
.
.
.
पण केवळ देवाच्या कृपेने गाडी सुटण्याच्या २ मिनिटे अगोदर एक हवालदार तेथे आला आणि त्याने त्या भिकार्‍याला बखोटीला धरून खाली उतरविले. आणि मग मात्र माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आणि अंगावर सरसरून काटा आला. नशीबाने मला विद्याविहार ते कांजूरमार्ग दोनच स्टेशने प्रवास करायचा होता पण ती दोन स्टेशनेही खूप तणावात गेली पुढे हॉस्टेलवर जाईजाईपर्यंत जीवात जीव नव्हता.

म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती तशातला प्रकार.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Mar 2011 - 9:32 pm | निनाद मुक्काम प...

मागे एकदा असुर ह्यांच्या आत्म विश्वास ह्या लेखात मी प्रतिसाद देतांना हा मुद्दा उपस्थित केला होता
.
परदेशात एक आंधळी मुलगी सराईत पणे नियमित रेल्वेतून प्रवास करते . व आत्मविश्वासाने अनोळखी व्यक्तींशी संवाद साधते .ह्याचे गमक त्यांच्या समाजातील कायदा व सुव्यवस्था चे अढळ असणारे स्थान असते
.
आजही मुंबईत लोकल मध्ये संध्याकाळी खास पोलिसांची वर्णी असते .ती ह्याच सारख्या लोकांसाठी .
आपले नशीब थोर .म्हणून काहीच झाले नाही .अनेक चरसी किंवा भुरटे चोर महिलांच्या डब्यात पैश्यासाठी वाट्टेल त्या थराला जातात .

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे निनाद.
माझ्या मुलीला मी आयुष्यात १ गोष्टी १००% पूर्ण आणि नीट देऊ इच्छिते त्या म्हणजे - (१) स्त्रीसुलभ सावधगिरी ज्याला पर्याय नाही- नाही-नाही !!!त्रिवार नाही!!!. विकृत लैंगिकतेने पछाडलेले लोक तुमच्या आसपास येणार आणि तुम्हाला स्वतःला वाचवता आलच पाहीजे. स्वसंरक्षण हे महत्त्वाचे आहेच पण अशा परीस्थितीत मूळातच न सापडणे म्हणजे हुषारी.

स्पंदना's picture

21 Mar 2011 - 10:00 am | स्पंदना

१००% सहमत शुची.

पण आणखी एक सांग जे मी कायम माझ्या मुलांना सांगते, आपल्याशी 'लाज आणणार वर्तन करणार्‍या 'माणसाला स्वतःला लाज वाटली पाहिजे. त्यामुळे घटना घडताना जे सर्व साधारण पणे मुल आक्रसुन जात ते न होता निर्भिडपणे आवाज चढवायची मनाची तयारी असावी.

तो एकदम तरुण होता कि मध्यमवयीन होता. का तो म्हातारा होता? तो जर शारिरीक दृष्ट्या दुर्बल असला तर तो लेडीज डब्यात आला असेल.

रेवती's picture

25 Mar 2011 - 11:48 pm | रेवती

हे कै च्या कै!
लेडीज डब्यामध्ये शिरायला धाडस लागतं.

पंगा's picture

27 Mar 2011 - 8:37 am | पंगा

...लेडीज़ डब्यामध्ये चढून त्या भिकार्‍याला उतरवणारा पोलीस स्त्री की पुरुष, हेही जाणून घ्यायला आवडेल.

(पोलीस पुरुष असल्यास व्यक्तिशः काहीही आक्षेप नाही. केवळ कुतूहल.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Mar 2011 - 10:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी आज, धुळवडीच्या दिवशी, दुपारी ठाणे स्टेशनवर गेले. नेहेमीचाच, भरगच्च गर्दीचा रस्ता, राम मारूती रोड, मोकळा होता. भावाने त्याच्या बाईकवरून लिफ्ट दिली त्यामुळे पंधरा मिनीटं उन्हात चालावं लागलं नाही. पण तेवढ्या अंतरात साधारण पाचशे वहानं दिसली असती ती धुळवडीमुळे, रस्त्यात फक्त पाच वहानं दिसली. सहावं वहान लोकल ट्रेन होती.

"परप्रांतीयांमुळे ठाणं सुधारतं आहे म्हणायचं!", असं फोनवर म्हणत पुण्यात खडकी स्टेशनकडून ब्रेमन सर्कलच्या दिशेने चालत होते तर पायाशी एक फुगा फुटला.

भवानी तीर्थंकर's picture

20 Mar 2011 - 10:54 pm | भवानी तीर्थंकर

अगं, तुझा पुण्यावर राग नाही ना काही? तुझ्या लेखनात हमखास पुण्याचा उल्लेख असतो, म्हणून विचारतेय. म्हणजे, मागच्या लेखात चांगला उल्लेख होता, तरी त्यावरून खास 'चर्चा' झाली. आत्ता या प्रतिसादावरून तसंच काही होणार की काय? त्यात ठाण्याच्या संदर्भात परप्रांतीय हा उल्लेख. म्हणजे 'आगीत तेलच' (किंवा 'कोलीत' म्हणूया हवं तर). असो, अधिक लिहून मी भडका उडवत नाही उगाच. माझ्यावरच सारे कोसळायचे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Mar 2011 - 11:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुण्यावर राग? का बुवा? पुणंच काय, माझा कोणत्याच शहरावर राग नाही. पण म्हणून पुण्यात पायाशी फुटलेला फुगा कोरडा म्हणायचा का काय?

त्यात ठाण्याच्या संदर्भात परप्रांतीय हा उल्लेख.म्हणजे 'आगीत तेलच' (किंवा 'कोलीत' म्हणूया हवं तर)

तुमचा कोलीत अन कोलीती मध्ये गोंधळ झालेला आहे काय? ;-)

शिल्पा ब's picture

21 Mar 2011 - 9:01 am | शिल्पा ब

पाचकळ विनोद करु नका..

Nile's picture

21 Mar 2011 - 10:44 am | Nile

ओ ढवळाबाई!!

ज्योकची कोलीती तुम्हाला कळलीच नाही!

शिल्पा ब's picture

21 Mar 2011 - 12:45 pm | शिल्पा ब

पुन्हा तेच!!

भवानी तीर्थंकर's picture

21 Mar 2011 - 6:13 pm | भवानी तीर्थंकर

नाही. मला 'कोलीत'च म्हणायचं आहे. तेच मी म्हटलं आहे. त्याचा संदर्भ इथल्या काही 'चर्चां'मध्ये होणाऱ्या 'आतषबाजी'शी आहे.
पण ऐका ना, मला कोलीती हा शब्द माहिती नाहीये. कृपया त्याचा अर्थ कळवाल का?

अम्मळ मौज वाटली ऐकुन.

व्हँलेटाईन डे ला भेट वस्तुंची दुकाने स्वयंघोषित संस्कृती रक्षक फोडतात , पण रंग पंचमीला आया-बहिणींच्या अंगावर रंग-फुगे मारल्या जातात , अन या गोष्टी विकणार्‍यांना काहीही केले जात नाही.

अशी गैरकृत्य करणार्‍यांची तक्रार संपादक मंडळाकडे केल्या जावी , जेणे करुन ते असल्या नराधमांवर कडक कारवाई करु शकती :) :) :)

-( मजेशीर ) टारझन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Mar 2011 - 11:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आळश्यांचा राजा's picture

21 Mar 2011 - 2:25 am | आळश्यांचा राजा

तक्रारीच्या अर्जावर आमची पण सही घेतल्या जावी!

चिरोटा's picture

21 Mar 2011 - 10:24 am | चिरोटा

पण रंग पंचमीला आया-बहिणींच्या अंगावर रंग-फुगे मारल्या जातात , अन या गोष्टी विकणार्‍यांना काहीही केले जात नाही

होळी/रंगपंचमी हे घोळका संस्कृतीचे प्रतिक आहे.राज्यात घोळका संस्कृती पूर्वीपासून लोकप्रिय आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Mar 2011 - 4:44 pm | परिकथेतील राजकुमार

होळी/रंगपंचमी हे घोळका संस्कृतीचे प्रतिक आहे.राज्यात घोळका संस्कृती पूर्वीपासून लोकप्रिय आहे.

तुम्हाला कंपु संस्कृती म्हणायचे आहे काय ? त्याचमुळे बहुदा त्यांच्यावर कारवाई होत नसावी ;)

कुंदन's picture

20 Mar 2011 - 10:45 pm | कुंदन

अहो सेनेची सत्ता आहे ना ठाण्यात ?

पुष्करिणी's picture

20 Mar 2011 - 11:20 pm | पुष्करिणी

शक्य असेल तर होळी, रंगपंचमी आणि ३१ डिसेंबरची रात्र या दिवशी जर मोठा ग्रुप बरोबर असेल तरच घराबाहेर पडावं या मताची आहे मी. मागे एकदा रंगपंचमीला शिवाजीनगरहून (पुणे) कॉलेजला चालत जात असताना एक फुगा मानेवर लागून चक्कर आली होती. दोन मिनिटं डोळ्यांसमोर अंधारी...
काल वर्तमानपत्रात वाचलं होतं की फुगे मारणार्‍यांना १० वर्षाची शिक्षा करणार आहेत म्हणून्

कुंदन's picture

20 Mar 2011 - 11:33 pm | कुंदन
३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Mar 2011 - 11:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या वर्षी ठाणं सुधारल्यासारखं वाटलं. होळीच्या दिवशी संध्याकाळी एखाद तास बाहेर भटकत होते, एकही वाईट अनुभव आला नाही, स्टेशनसारख्या गजबजलेल्या भागातही दोन-तीनच रंगलेले चेहेरे दिसले. रस्त्यावर कुठेही पाणी, रंग दिसले नाहीत.
होळीच्या 'सुपरमून'मुळे बरेच कॅमेरेही बाहेर दिसत होते. त्यांच्यापैकी कोणाकडूनही तक्रार कानावर आली नाही.

धुळवडीच्या दिवशी बाहेर पडावं लागलं तर आपत्ती वाटावी अशी परिस्थिती ठाण्यात एकेकाळी असायची. पण दुपारी रस्त्यावर* फारसे रंग दिसले नाहीत, प्लास्टीकच्या पिशव्या आणि फुगेही दिसले नाहीत. दुर्दैवाने ठाण्याला शिव्या घालण्याची एक संधी मात्र हुकली.

* इतर वेळी ठाण्यातले रस्ते दिसणं मुश्किल वाटावं एवढी गर्दी, वहानं आणि खड्डे ठाण्यात आहेत. पण आज धुळवडीच्या दिवशी मात्र, दुपारीही दुकानं बंद होती म्हणून का काय, राम मारूती रस्ता, गोखले रस्ता साफ रिकामे होते. त्यामुळे रस्ता दिसला.

राजेश घासकडवी's picture

21 Mar 2011 - 6:22 am | राजेश घासकडवी

दुर्दैवाने ठाण्याला शिव्या घालण्याची एक संधी मात्र हुकली.

तुम्हाला काही लोकांनी पुणेद्वेष्टे म्हटलेलं आहे, पण या वाक्यावरून ठाणेद्वेष्ट्याही वाटता... किंवा कदाचित नुसता द्वेष्टा स्वभावच असेल. पुणे, ठाणे वगैरे आपले त्या स्वभावाच्या वाटेत येतात इतकंच.

प्रियाली's picture

20 Mar 2011 - 11:44 pm | प्रियाली

वरल्या प्रसंगाचा आणि रंगपंचमीचा नेमका संबंध काय आहे? हा प्रसंग मुंबई बंदच्या दिवशी, कामकाजाच्या दिवशी सकाळी ५ वाजता किंवा रात्री साडे अकरा वाजता वगैरे घडू शकला नसता का? पूर्वी दुपारी अडिच-तीनच्या सुमारास लेडीज फर्स्टक्लासचे डब्बे रिकामे असत त्यावेळी त्यात घुसणार्‍या गर्दुल्ल्यांची वगैरे भीती वाटत असे. अशावेळी मी ते डबे टाळत असे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Mar 2011 - 11:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असो.
रंगपंचमीच्या दिवशी मुंबैत, ठाण्यात कधी रंग खेळल्याचं पाहिलेलं नाही. धुळवडीला मात्र बराच दंगा असतो (का असायचा?).

कालचा दिवस आणि आज सकाळी सगळ्यांनी "ये ना होळी खेळायला" असं म्हणून डोकं उठवलं आहे. होळीपौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी, मराठीत 'धुळवड' असते (पंचमीला रंगपंचमी) आणि हिंदीत 'होली' असा माझा समज पाण्यात पार वाहून गेला.

शुचि's picture

20 Mar 2011 - 11:52 pm | शुचि

चिटपाखरू नसलेला डबा मी मुंबईत दुपारीदेखील पाहीला नाही. पण रंगपंचमीमुळे असा लेडीज डबा पाहायला मिळाला.

चित्रा's picture

21 Mar 2011 - 7:10 am | चित्रा

आणि मग मात्र माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आणि अंगावर सरसरून काटा आला.
केवळ भिकारी आहे म्हणून तो असे काही करेल असे समजण्याची गरज नाही. हे कोणीही करू शकेल. आपल्या आजूबाजूला काय चालले आहे हे बघावेच लागते. तुम्हाला तेव्हा मुंबईत प्रवास करण्याचा अनुभव नसावा.

मी दादरहून अगदी एक दोन स्त्रिया असतानाही सुपरफास्ट लोकलने अनेकदा प्रवास केला आहे, कधीही वाईट अनुभव आला नाही. पण गर्दी अगदीच कमी असली तर मी जनरल कंपार्टमेंटमधून प्रवास करीत असे.

दुपारी अनेकदा गाड्यांना पूर्वी कमी गर्दी असे. आताचे माहिती नाही.

नाही चित्रा "भिकारी" आहे म्हणून तो अंगलटीला येईल किंवा एखादे घृणास्पद कृत्य करेलसे मला वाटले नाही. मी एकटी त्याच्या कचाट्यात सापडणार होते म्हणून माझ्या अंगावर काटा आला. मग तो कोणीही असू शकला असता.
भिकारी काय किंवा कोणी सूटाबूटातला काय याने काहीही फरक पडत नाही.
मुलीला स्लीप -ओव्हर पार्टीला किंवा दूरच्या नातेवाईकांकडे देखील पाठविणे वगैरे या विषयावर माझी मतं खूप ठाम आणि जहाल आहेत. एखादी दुर्घटना व्हायला भिकारीच यावा लागतो असे नाही , सैतान कोणाच्याही मनात दडलेला असू शकतो.
तेव्हा भिकारी हा मुद्दा गौण.

टारझन's picture

21 Mar 2011 - 1:23 pm | टारझन

हे अश्या प्रसंगांमधुन स्वतःचं संरक्षण करता यावं म्हणुन महिलांनी जिम जॉइन करणे अत्यावश्यक झालेले आहे. जिम मधे जडजड वजने उचलुन स्वतःची फिगर तर मेंटेन राहिलंच परंतु स्नायु बळकट झाल्यामुळे कोणाशीही दोन हात करण्याचे सामर्थ्य देखील येईल. जिमच्या जोडीला कुस्ती , कराटे , कबड्डी , सुमो रेसलिंग , ज्युडो किंवा केरळी मार्शल आर्टस् ची जर जोड भेटली तर एखादी महिला आपल्या बरोबरंच् दुसर्‍या महिलांचेही संरक्षण करुन तिला हिरो ( की हिरॉइन ) होण्याची सुवर्णसंधी प्राप्त होऊ शकेल असे वाटते.

मी अफ्रिकेत असताना रात्री अपरात्री नाईट क्लब्ज् मधुन एकटाच पायी पायी यायचो. कारण मला एक तर अफ्रिकन सौंदर्याची आणि थंडगार सुखद हवामानाची नशा चढली होती. त्यातही ह थ्रिलानुभुती साठी मी असे स्टंट करायचो. तेंव्हा रोडवर नगरवधु आपल्या पोटापाण्यासाठी उभ्या असायच्या (अर्र् आवरा , विषयांतर होतंय) मी असा रात्री अपरात्री टॅक्सी ने फिरण्या ऐवजी पायी फिरतो म्हणजे पैसे वाचवतो किंवा चिक्कु मारवाडी आहे अशी टिकेची झोड माझ्या काही अफ्रिकन कलिग्ज् ने उठवली होती , परंतु त्या टिकांकडे मी जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत होतो . एके दिवशी त्यांनाही मी अफ्रिकन नाईट्स् ची रोडट्रीप घडवली तेंव्हा त्यांना ही ते आवडले . मग् आमचा ग्रुप कंपाला च्या रोडवर् रात्री अपरात्री भटकायचा. बर्‍याचदा नगरवधु माझी छेड काढायच्या , अश्लिल कमेंट्स् पास करायच्या तेंव्हा मी एकटाच त्यांच्या कचाट्यात सापडेल म्हणुन् सर्रकन काटा उभा रहायचा त्याची आठवण ह्या लेखा/प्रतिसादाच्या निमीत्ताने झाली ती इथे नमुद करावीशी वाटली .

महिलांनी अजुन एक सोप्पा उपाय म्हणुन नखे वाढवावीत आणि एक छोटी कानस बरोबर् ठेवुन वेळोवेळी नखांना धारंही लावावीत जेणे करुन ऐन टायमाला काटा उभा राहिला तर नखे उपयोगात आणल्या जाऊ शकतील.

- शशी
(रिव्हर्स स्विमिंग करत) भाय , तुम साईन करते हो या नाय !!

पंगा's picture

21 Mar 2011 - 5:28 pm | पंगा

हे अश्या प्रसंगांमधुन स्वतःचं संरक्षण करता यावं म्हणुन महिलांनी जिम जॉइन करणे अत्यावश्यक झालेले आहे. जिम मधे जडजड वजने उचलुन स्वतःची फिगर तर मेंटेन राहिलंच परंतु स्नायु बळकट झाल्यामुळे कोणाशीही दोन हात करण्याचे सामर्थ्य देखील येईल. जिमच्या जोडीला कुस्ती , कराटे , कबड्डी , सुमो रेसलिंग , ज्युडो किंवा केरळी मार्शल आर्टस् ची जर जोड भेटली तर एखादी महिला आपल्या बरोबरंच् दुसर्‍या महिलांचेही संरक्षण करुन तिला हिरो ( की हिरॉइन ) होण्याची सुवर्णसंधी प्राप्त होऊ शकेल असे वाटते.

फिगर मेंटेन? आणि सुमो रेसलिंग??????

काहीतरी गडबड तर होत नैये ना?

टारझन's picture

21 Mar 2011 - 6:57 pm | टारझन

काय पंगा ! तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती :)

चिंतामणी's picture

24 Mar 2011 - 2:08 pm | चिंतामणी

प्रत्येकजण आपापल्या दृष्टीकोतुन बघत असतो ना.

त्याने तेच केले. ;)

योगप्रभू's picture

21 Mar 2011 - 1:07 pm | योगप्रभू

लोकलच्या डब्यात भिकारी येऊन उभा राहणे, हे रोजचेच आहे. 'रंगपंचमीच्या अनिष्ट प्रथा' शीर्षकाखाली हा अनुभव विसंगत वाटतो.

रेवती's picture

21 Mar 2011 - 2:50 am | रेवती

हम्म्म!

''एका रवीवारी नेमकी रंगपंचमी आली. आणि मी परत हॉस्टेलवर निघाले. मला सासूबाईंनी जाऊ दिले. त्यांच्या लक्षात आले नसावे की या दिवशी स्त्रियांनी मुंबईत बाहेर पडणे किती धोक्याचे असते.''

त्यांच्या लक्षात आले असेलच ओ, पण त्यांना लग्नाआधीच टेस्ट करायचे असेल तुमच्यात डेअरिंग किती आहे अशा गोष्टींना तोंड द्यायचे, काय उद्या लग्नानंतर अशी वेळ आली तर उगा त्याचा बाउ नको करायला सुनेनं. कारण् तुमची सासु मुंबईतल्या असतील तर त्यांना या गोष्टींची कल्पना नसेल ही कल्पना करवत नाही.

आमच्याकडे माझी बायको आमच्या लग्नाआधी घरी आली की, आई तिला शेंगादाणे भाज, झाडावरची फुलं काढुन आण अशी कामं लावत असे. अनुभवी सासवांना अशा छोट्या छोट्या गोष्टीतुन सुनांच्या / होणा-या सुनांच्या स्वभावाची बरीच वैशिष्ट्ये कळतात.

आमच्याकडे माझी बायको आमच्या लग्नाआधी घरी आली की, आई तिला शेंगादाणे भाज, झाडावरची फुलं काढुन आण अशी कामं लावत असे. अनुभवी सासवांना अशा छोट्या छोट्या गोष्टीतुन सुनांच्या / होणा-या सुनांच्या स्वभावाची बरीच वैशिष्ट्ये कळतात.

हे वाचून चुचु ताईंची आठवण आल्याशिवाय राहिली नाही.;)
मुलगे लग्नाआधी त्यांच्या सासरी गेल्यावर कोडकौतुकात नाहून निघायची शक्यता जास्त असते.
मुलींना वेगळी वागणून का? त्या आय टी वाल्या असल्या तर?;)

>>त्या आय टी वाल्या असल्या तर?
आयटीवाल्या असतील तर कदाचित मुलाला स्वयंपाक येतो का आणि मुलीला काही व्यसन नाही ना ? असे प्रश्न विचारत असावेत बहुधा !!

परिकथेतील राजकुमार's picture

21 Mar 2011 - 2:31 pm | परिकथेतील राजकुमार

अंगावर बाभळीचे झाडच उगवले हा अनुभव वाचुन.

मलापण एकदा असाच भयावह अनुभव आला होता.

खूप वर्षे झाली त्या गोष्टीला. शिक्षणाच्या नावाने शंख होता आणि आमचा फक्त डिप्लोमा झालेला होता. मी पुण्याच्या एका महाविद्यालयात शिकत होतो आणि घरात रहात होतो. दर शनिवारी, रवीवारी मी डान्सबार मध्ये जाऊन रहायचो कारण नोकरी एवीतेवी नव्हतीच त्यामुळे आईबाबानी परवानगी दिली होती. त्यायोगे बारबालांशी ओळख होत असे, रीतीभाती समजत असत.
एका रवीवारी नेमकी गांधीजयंती आली. आणि मी परत ड्याण्सबार वर निघालो मला आई बाबंनी जाऊ दिले. त्यांच्या लक्षात आले नसावे की या दिवशी बेवड्यांनी पुण्यात बाहेर पडणे किती धोक्याचे असते. झाले मी ड्याण्सबारवर गेले, सामसूम होती. वय लहान असल्याने, अननुभवी असल्याने माझ्यालक्षात आले नाही की हा या दिवसाचा प्रभाव आहे. मी बारच्या आत शिरलो, अक्षरक्षः कोणीही नव्हते. पण एक पोलिससदृष मनुष्य येऊन उभा राहीला. आणि मग मी विचार केला "अरे मी कदाचित पोलिस चौकीत शिरलो असेन. कदाचित हा ड्याण्सबार नसेलच." आणि मी काहीही कृती न करता तसाच आपल्या विचारात मग्न उभा राहीलो.
.
.
.
पण केवळ देवाच्या कृपेने ऑर्डर देण्याच्या २ मिनिटे अगोदर एक वेटर तेथे आला आणि त्याने त्या पोलिसाला‍ हातात नोटा धरून बाहेर नेले. आणि मग मात्र माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आणि अंगावर सरसरून काटा आला. नशीबाने मला एक बियर ते रॉयल स्टॅगचे दोन पेग येवढाच प्रवास करायचा होता.

म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती तशातला प्रकार.

चिगो's picture

21 Mar 2011 - 4:40 pm | चिगो

काळजी घे रे बाबा... आजकाल दिवस वाईट आहेत. स्वतःला जप हां...

रेवती's picture

21 Mar 2011 - 6:31 pm | रेवती

काय, बरा आहेस ना परा?;)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Mar 2011 - 6:36 pm | परिकथेतील राजकुमार

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे रेवती.
माझ्या मुलाला मी आयुष्यात १ गोष्टी १००% पूर्ण आणि नीट देऊ इच्छितोत्या म्हणजे - (१) ड्रायडे सुलभ सावधगिरी ज्याला पर्याय नाही- नाही-नाही !!!त्रिवार नाही!!!. निर्व्यसनाने पछाडलेले लोक तुमच्या आसपास येणार आणि तुम्हाला स्वतःला वाचवता आलच पाहीजे. व्यसनसंवर्धन हे महत्त्वाचे आहेच पण अशा परीस्थितीत मूळातच न सापडणे म्हणजे हुषारी.

_________________________________________________
वाटसरू जास्ती, खाऊनि राहिला
प्रात:काली परसात गेला, उठोनिया

झालं का तुझं सुरु?
या पराचं लग्न करा रे कोणीतरी.........हातात भाजीची पिशवी घेऊनच दिसायला हवा यावर्षी!

कुंदन's picture

21 Mar 2011 - 7:02 pm | कुंदन

अहो बाल विवाहाला कायद्यानं बंद्या घातलेल्या आहेत
.

त्यात नाना चाल्लाय. अन परा नवीनच व्यवसाय सुरु करतोय , जरा जम बसु द्यात त्याचा.

एखादा बालिष आयडी बघुन लावुन द्या :)

- लावंगी

धमाल मुलगा's picture

21 Mar 2011 - 6:50 pm | धमाल मुलगा

धुळवडीची भांग अजून उतरलेली दिसत नाही! ;)

इंटरनेटस्नेही's picture

21 Mar 2011 - 10:25 pm | इंटरनेटस्नेही


=))=))=))
=)) =))
=))=))=))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=))=)) =))=))=)) =))
=))=)) =)) =))=))=))

जबरदस्त! मस्त प्रतिसाद!

-

बीयरस्नेही.

श्रावण मोडक's picture

21 Mar 2011 - 7:01 pm | श्रावण मोडक

झाले मी ड्याण्सबारवर गेले,

हे वाचून क्षणभर थबकलो. मग पुढे वाचत गेलो आणि सारं स्पष्ट झालं. त्या दिवसाचा प्रभाव अजून पऱ्यावर टिकून असावा. ;)

परत तुमच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून ही घ्या यादी ड्राय डे ची:
१ मे... १,१४ जुलै, ...१,१५ ऑगस्ट,....१,३,१४ सप्टे.....१,२,८ ऑक्टो.....१,९ नोव्हे......१,२५ डिसें.....

खूश...????

धनंजय's picture

22 Mar 2011 - 5:58 pm | धनंजय

चित्राशी सहमत आहे. मुंबई (आणि पुणे, नागपूर, वगैरे गावे सुद्धा) स्त्रियांच्या वावरासाठी पुष्कळच सुरक्षित आहेत.

स्त्रीसुलभ सावधता नेहमी असावी, असे शुचि यांचे म्हणणे ठीकच आहे.

पण या परिस्थितीत रंगपंचमी/धुळवड/भिकारी यापेक्षा "एकटी स्त्री जितपत काळजी घेते, तशी घ्यावी" हे तत्त्व ठीक वाटते. आणि घटना घडून गेल्यानंतर "तसे काही नसेलच" ही शक्यता मनात प्राथमिक म्हणून ठेवली पाहिजे.

- - -
मागच्या महिन्यातलीच गोष्ट :
काही नातेवाइकांसह मी गडचिरोलीमधील नक्षलग्रस्त भागात कारने प्रवास करत होतो. दुपारची उन्हे कलू लागली होती, आणि "लवकर मुक्कामाला पोचले पाहिजे" अशी भावना मनात घर करू लागली होती. मध्येच जंगलात एका ठिकाणी दोन बैल हाकणार्‍या एका माणसाने कार इशारा करून थांबवली. "तुम्ही आलात त्या दिशेने जवळच पळत जाणारी गायवासरे बघितली का?" आम्ही नाही म्हणालो. परत निघालो.
मनात भीती होती - हा नक्षली टोळ्यांचा काही गाड्या थांबवण्याचा काही प्रकार आहे का? हा कसला विचित्र प्रश्न गाडी थांबवून विचारण्याचा... असल्या सगळ्या शंका येणे, धोक्याच्या ठिकाणी सतर्क सावध राहाणे, हे ठीकच आहे.
पण घटना घडून गेल्यावर ही शक्यता लक्षात ठेवायलाच पाहिजे, की "तो बहुधा असाच कोणी गायी शोधायला जाणारा गुराखी होता." मी म्हणू लागलो "आम्ही नक्षलांनी किडनॅप होता-होता सुदैवाने वाचलो" तर ते ठीक नाही.
- - -

पांथस्थ's picture

25 Mar 2011 - 4:54 pm | पांथस्थ

पण घटना घडून गेल्यावर ही शक्यता लक्षात ठेवायलाच पाहिजे, की "तो बहुधा असाच कोणी गायी शोधायला जाणारा गुराखी होता." मी म्हणू लागलो "आम्ही नक्षलांनी किडनॅप होता-होता सुदैवाने वाचलो" तर ते ठीक नाही.

हे एकदम मुद्देसुद. नाहितर कल्पनाविलास करुन गुराख्याचा गनराख्या करुन टाकायचो आपण!

प्रकाश१११'s picture

28 Mar 2011 - 1:51 pm | प्रकाश१११

शुची -फार प्रामणिक अनुभव मांडलाय आपण.
आणि एक सांगतो एखादा माणूस ,तरुण सरळ असतो त्याला अनुभव नाही येत. त्याच्यावर नाही प्रसंग येत
पण एखादी मुलगी, तरुणी मात्र साधी सरळ असुद्या .तिच्यावर प्रसंग येऊ शकतो. आणि येतोही .
हे खूप खरे आहे. लिखाण आवडले.भिडले.