मराठी आमची रोजी-रोटी ,
बेचाळिस पिढ्यांसाठी कारखाने वरपले ,
सीटं बदलली, नोटवाल्या बाबाचा जयजयकार केलात,
झोपडपट्टीत स्लिपांबरोबर १००० च्या नोटा-वाटप,
तरीही मराठी आमची रोजी-रोटी
विकास म्हणजे पन्नास लाखाची टोयाटो,
विकास म्हणजे , लवासा, मुळशी आणि मावळ,
विकास म्हणजे सिंचन विभागाचे कुरण ,
विकास म्हणजे ब्रिगेड स्थापना,
तरीही मराठी आमची रोजी-रोटी
पुतळे हलवा रात्रीचे
उद्घाटन करा पहाटेचे ,
क्रेडीट घ्यायचे कुणी, अटी-तटी ची युती,
दाढ्या कुरवाळा,जाती-पातीत पेटवा संघर्ष
तरीही मराठी आमची रोजी-रोटी
फायलींचा गठ्ठा , पि.ए. कडे सोन्याच पेन,
एका शहरात गळे घालायचे, दुसर्यात गळे काढायचे,
देव पाण्यात बुडवुन बसतात, कधीतरी 'पंत' प्रधान होतील म्हणुन,
दात पडले, डोके सडले , काकांना म्हातार-चळ , पुतण्याकड माज,
तरीही मराठी आमची रोजी-रोटी
दर पावसाळ्यात गटारे तुडंब,
दर उन्हाळ्यात लोड-शेडींग,
नागपुरातल ऑफिस आयटी सेक्टर च जणु ,
विदर्भातला शेतकरी सावकारी पाशात,
तरीही मराठी आमची रोजी-रोटी
धान्य सडवा , दारु बनवा ,
गावोगावी बियर शॉपी, जमीनीच भुत मानगुटी,
आरटीआय वाले जिवानिशी जातात,
तुरडाळ , कांद्यात सामान्य गुंततात,
अडते मात्र दुपारी, छानश्या बार मध्ये बसुन नोटा मोजतात
तरीही मराठी आमची रोजी-रोटी
तरीही मराठी आमची रोजी-रोटी
तरीही मराठी आमची रोजी-रोटी
प्रतिक्रिया
14 Mar 2011 - 3:36 pm | प्रकाश१११
सुहास - कडवट कठोर,जीवघेणे सत्य ..!!
14 Mar 2011 - 10:39 pm | पिंगू
एकदम कडक...
- पिंगू
14 Mar 2011 - 10:55 pm | गणेशा
कविता आवडली ..
14 Mar 2011 - 11:01 pm | पैसा
कविता आवडली सुहास, पण आम्ही मराठी लोक अशा गोष्टींबद्दल काही वाटण्याच्या पलीकडे गेलो आहोत...
16 Mar 2011 - 9:48 am | sneharani
मस्त! आवडली कविता!
16 Mar 2011 - 3:28 pm | जागु
कविता आवडली.
17 Mar 2011 - 1:15 pm | मैत्र
झकास सुहास..
17 Mar 2011 - 1:22 pm | स्पंदना
प्र्.का.टा.आ.
17 Mar 2011 - 1:20 pm | स्पंदना
होय बाबा. काय करायच?
(पण एक विचारु ? मराठी कशी काय रोजी रोटी? ते काम तर माय इंग्लिशच आहे ना?)
17 Mar 2011 - 1:20 pm | नरेशकुमार
why always marathi marathi marathi ?
You may live without marathi but not without english.
17 Mar 2011 - 1:25 pm | स्पंदना
आम्ही तिन तिन प्रतिसाद टाकुन सुहास यांच्या गुड्बुकात जायचा प्रय्त्न करतो आहोत.
17 Mar 2011 - 1:26 pm | इंटरनेटस्नेही
मस्त! आवडली कविता!
कठोर,जीवघेणे सत्य ..!!