आमचे मनोगतीय मित्र श्री खोडसाळपंत यांनी अलिकडेच एक सुरेख गझल लिहिली आहे. गझल फारच छान आहे. आम्ही खोडसाळरावांचे प्रथमपासूनच फ्यान आहोत. सदर गझल आम्हाला फार आवडली आणि म्हणून ती आम्ही इथे देत आहोत...
आपला,
तात्या सरपंच!
कैक सारे मिसळ खाया लागले
अन् रुचिपालट कराया लागले
हा असंतुष्टांस अड्डा लाभला
रुष्टणारे चळवळाया लागले
वाजले स्वातंत्र्यडंके जालभर
दो दिसांनी शांत व्हाया लागले
बंदुका स्कंधी दुज्याच्या ठेवुनी
पारधी पारध कराया लागले
'प्रसव'पत्राची करोनी डिलिवरी
पोस्टमन कोणी ठराया लागले
'वीजवाटा' तद्न्य तो लावे छडा
नाव पोष्ट्या कोण घ्याया लागले !
जाहली ऐसी तिखट मग मिसळ की
वाचता ठसके बसाया लागले
Tor वा सायबरकफेच्या आडुनी
बाण शत्रुंवर पडाया लागले
हाय, एकाची तिथे नावे किती
फसवणारेही फसाया लागले !
जाग सरपंचा कधी येईल का ?
लोक त्याला वापराया लागले
खोडसाळा, हीच खाणावळ बरीे
परतणारे कुजबुजाया लागले
प्रतिक्रिया
18 Oct 2007 - 4:42 pm | चित्तरंजन भट
गझल एकंदर ठीक आहे आणि खोडसाळ आहे.
(खोडसाळपंतांना गर्भपाताचे दु:ख का व्हावं ह्याचं मला आश्चर्य वाटतं आहे. खोडसाळ सुईण की सरोगेट मदर? सध्या रिकामटेकडे मन विचार करते आहे.)
18 Oct 2007 - 6:15 pm | आजानुकर्ण
'वीजवाटा' तद्न्य तो लावे छडा
नाव पोष्ट्या कोण घ्याया लागले !
याचा अर्थ काय आहे कोणी स्पष्ट करेल का?
वीजवाटा म्हणजे 'सर्किट' का?
- (संभ्रमित) आजानुकर्ण
18 Oct 2007 - 7:58 pm | राजीव अनंत भिडे
जाग सरपंचा कधी येईल का ?
लोक त्याला वापराया लागले
बाकी ठीक आहे, परंतु सरपंचाची काळजी नका करू! तो बिनधास्त आहे आणि होणार्या परिणामांना बिनधास्तपणे सामोरं जायची त्याची तयारी आहे किंवा होणार्या बर्यावाईट परिणामाना फाट्यावर मारण्याची त्याच्यात धमक आहे!
खोडसाळा, हीच खाणावळ बरीे
परतणारे कुजबुजाया लागले
हे मात्र खरं आहे! ज्यांना तिखट, झणझणीत खायची सवय आहे त्यांनीच मिसळपाववर यावं! मुळव्याधीची भिती असलेल्यांनी मिसळपावकडे फिरकूही नये हे उत्तम! त्यापेक्षा जुन्या घरी जाऊन कुजबुजत बसणंच अधिक बरं! ;)
राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.
18 Oct 2007 - 9:48 pm | सुवर्णमयी
तात्या, एकच नियम का बरे नाही ?
ही गझल जर व्यक्तीगत रोखाची आहे तर का बरे रहावी? एकच एका काठावरून दुसर्या काठावर उडी मारली की न्याय बदलतो की काय?
मग पोस्टमनने पोस्ट केलेली चिन्मयीची कविता सुद्धा व्यक्तीगत रोखाची होती ना? म्हणून काढली ना?
आणि प्रकाशित करायची असेल तर अशी करा-ह्यात व्यक्तीगत रोखाचे शेर काढून टाकले आहेत. या शेराना त्यांचे स्वतःचे अस्तित्व आहे.
कैक सारे मिसळ खाया लागले
अन् रुचिपालट कराया लागले
वाजले स्वातंत्र्यडंके जालभर
दो दिसांनी शांत व्हाया लागले
बंदुका स्कंधी दुज्याच्या ठेवुनी
पारधी पारध कराया लागले
जाहली ऐसी तिखट मग मिसळ की
वाचता ठसके बसाया लागले
Tor वा सायबरकफेच्या आडुनी
बाण शत्रुंवर पडाया लागले
हाय, एकाची तिथे नावे किती
फसवणारेही फसाया लागले !
खोडसाळा, हीच खाणावळ बरीे
परतणारे कुजबुजाया लागले
पंचायत समितीने यावर विचार करावा..यावर विचार करून काही कारवाई झाली नाही तर या गझलेतले शेर जे काही सांगतात ते खरे आहे असे समजावे लागेल आणि मिसळपाव एक स्वतंत्र संकेतस्थळ म्हणून त्यावर केलेले असे लेखन कितिपत योग्य आहे ते पहा.
सोनाली
18 Oct 2007 - 10:11 pm | मिसळपाव पंचायत समिती
मिसळपावाच्या ध्येय धोरणांनुसार,
मिसळपावावर मर्यादित स्वरुपाच्या व्यक्तिगत रोखाला मनाई नाही. कमरेखालील वार, संकेतस्थळाशी संबंधीत नसलेल्या गोष्टी उकरून काढणे, आणि सदस्यांच्या घरातील नातेवाईकांना विनाकारण ओढून आणणे इ. इ. लेखनाचे संपादन करणे आवश्यक आहे. वरील कवितेत आपणास तशी वाक्ये दिसल्यास कृपया दाखवून देणे. मिसळपाव पंचायत समिती त्यावर कार्यवाही करेल याची खात्री ठेवावी.
मिसळपाव पंचायत समिती.
18 Oct 2007 - 9:51 pm | धोंडोपंत
वा वा खोडसाळपंत,
तुमची ग़ज़ल छान आहे हो. आमचे दोन शब्द.
जमत नाही पचविणे ज्यांना तिखट
मिसळ खाता ते हगाया लागले
पाहता घरकूल सुंदर आमुचे
का किडे ते वळवळाया लागले?
गुंतवळ शेजारच्या अंगणातले
का बरे येथे पडाया लागले?
पाहता कर्तृत्व हे पोष्ट्या तुझे
खोडसाळाला रडाया लागले
वाचता हे काव्य पोष्ट्या बडबडे
"पंत का आई *वाया लागले?"
आपला,
(सडेतोड) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
18 Oct 2007 - 9:57 pm | सर्किट (not verified)
गुंतवळ शेजारच्या अंगणातले
का बरे येथे पडाया लागले?
क्या बात है, धोंडोपंत !!
- सर्किट
19 Oct 2007 - 1:27 am | राजीव अनंत भिडे
पाहता कर्तृत्व हे पोष्ट्या तुझे
खोडसाळाला रडाया लागले
वाचता हे काव्य पोष्ट्या बडबडे
"पंत का आई *वाया लागले?"
वा धोंडोपंत,
खोडसाळ श्री मिलिंद फणसे या मनोगतीय पित्त्याला तुम्ही फारच छान प्रत्त्युत्तर दिले आहे!
पण बाकी, ज्ञानेश्वरी लिहून विनायकाला मनोगतावर जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी 'पोस्टमन' हे नांव घेऊन मिसळपाववर एकाच दिवसात मिळाली! मज्जा आहे बुवा विनायका तुझी! ;)
आणि त्याबद्दल सर्कीटच्या आयपी पत्त्याच्या शोधकौशल्याचे कौतुक वाटते!
पूर्वी 'तात्या' हा काही मनोगतींच्या काव्याचा विषय होता! त्याच्या ब्लॉगवर इथे ही नोंद सापडेल. एवढंच नव्हे, तर आरत्यांचाही विषय होता! मनोगतावरील त्याच्या एका चाहतीने त्याच्यावर चक्क एक आरतीही रचली आहे! आणि मजा म्हणजे या आरतीतदेखील तात्याच्या मिसळप्रेमाचा मजेशीर उल्लेख सापडतो!
आता तात्याचं मिसळपाव हे मनोगतावर अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या गझलेचा विषय आहे! मज्जा आहे बुवा तात्याची आणि मिसळपावची, एकंदरीत तात्याचं आणि त्याच्या पहिल्या प्रेमाचं नातं अजून काही संपायला तयार नाही!
अवांतर अ) : संपदा साठे हिने तात्यावर जी कविता रचली आहे तिचा मात्र आता मिसळपाववर राग दिसतो आहे! कारण श्री प्रमोद देवांच्या एका लेखात त्यानी साठेच्या अनुदिनीचा पत्ता दिला होता तो त्याच लेखाला आलेल्या तात्याच्या प्रतिसादावरून तिने काढून टाकायला सांगितला आहे. हा आपला माझा अंदाज हो! खरं खोटं देव जाणे, पण त्यामुळे बिचार्या प्रमोद देवांची मात्र मधल्या मधे गोची झाली. साठेने तात्याकरवी बिचार्या प्रमोद देवांची पंचाईत केली!
(सर्व संकेतस्थळांवर कुठे काय चाललंय यावर आमची घारीसारखी नजर असते!)
अवांतर ब) : खोडसाळ श्री मिलिंद फणसेंसारख्या बर्याच जणांना झणझणीत मिसळ झेपलेली, सहन झालेली, पचलेली दिसत नाही! ;)
राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.
आ. पं. स. यांसी,
वरील प्रतिसादत मिसळपावच्या धोरणांनुसार मर्यादित स्वरुपाचे वैयक्तिक उल्लेख आहेत. परंतु आपण वर उलेख केल्याप्रमाणे मिसळपावच्या धोरणांनुसार कुणावरही कमरेखाली वार केले नाहीत आणि कुणाच्याही कौटुंबिक गोष्टी वा नातेवाईकांचा उल्लेख केलेला नाही. सबब आमचा हा प्रतिसाद येथे राहावा अशी अपेक्षा आणि विनंती!
19 Oct 2007 - 3:16 am | विकेड बनी
संपदा साठे हिने तात्यावर जी कविता रचली आहे तिचा मात्र आता मिसळपाववर राग दिसतो आहे! कारण श्री प्रमोद देवांच्या एका लेखात त्यानी साठेच्या अनुदिनीचा पत्ता दिला होता तो त्याच लेखाला आलेल्या तात्याच्या प्रतिसादावरून तिने काढून टाकायला सांगितला आहे.
या बाईंचे तिथे नाव वेगळेच आहे. पण मुद्दा तो नाही. अनुदिनीही पब्लिक म्हणजे सार्वजनिक असते. ती लोकांनी वाचावी म्हणूनच प्रकाशित केलेली असते. तिचा दुवा एकाने दुसर्याला दिला तर या बाई त्या प्रत्येकाला येऊन माझ्या अनुदिनाचा दुवा देऊ नका असे सांगत कशा काय फिरू शकतात? त्याउप्पर मिसळपाव पंचायत समिती त्यांचे म्हणणे ऐकून तो दुवा का काढते?
अशा बायांनी अनुदिनी लिहूच नये ते उत्तम म्हणजे हे असे "हसे" होणार नाही.
19 Oct 2007 - 3:38 am | कोलबेर
>>त्याउप्पर मिसळपाव पंचायत समिती त्यांचे म्हणणे ऐकून तो दुवा का काढते?
तेज राव, सदर उल्लेख श्री प्रमोद देव यांनी विनंती केल्यामूळे काढण्यात आला होता.
19 Oct 2007 - 8:25 am | प्रमोद देव
सदर उल्लेख श्री प्रमोद देव यांनी विनंती केल्यामूळे काढण्यात आला होता.
मीच तशी विनंती केली होती. संबंधितांची परवानगी न घेता म्हणा अथवा त्यांना कोणतीही कल्पना न देता मी तो दुवा दिला होता. त्यामागला हेतु जरी विशुद्ध असला तरी एखाद्या व्यक्तीने त्याला आक्षेप घेतल्यास तो मान्य करावा अशा सदिच्छेनेच मी तो दुवा इथून काढायला सांगितला होता. मात्र 'संपादना'ची सोय असल्यामुळे मी स्वतःच संपादन करून तो दुवा हटवला. त्यात 'मिपापंस'चा कोणताही हात नाही.
18 Oct 2007 - 9:55 pm | सर्किट (not verified)
गझल आवडली:
हाय, एकाची तिथे नावे किती
फसवणारेही फसाया लागले !
हा शेर तर विशेष !
- वीजवाटा