या पाखरांस आता
आहे निघून जाणे
हे शब्द सूर सरले
ओठी न येई गाणे
छेडीत रोज तारा
येई जुळून गीत
ह्रद्यातूनी भरोनी
येई फूलून प्रीत
सार्या स्मृती सुखाच्या
दाटून आज आल्या
गेली उडून पिल्ले
डोळ्यात प्रेमधारा
रे माझिया पिलांनो
हा जीव गुंतला रे
डोळ्यात आज माझ्या
बघ प्राण साठला रे
फिरता नभांगणात
परतून येथ या रे
वेड्या जीवास माझ्या
रे एक साद द्या रे
हे वेड या मनाचे
तुंम्हास रे कळावे
अन् शब्द सूर ताल
पुन्हा जुळून यावे
प्रतिक्रिया
17 Jun 2008 - 2:56 pm | विसोबा खेचर
वा! सुरेख कविता....
सार्या स्मृती सुखाच्या
दाटून आज आल्या
गेली उडून पिल्ले
डोळ्यात प्रेमधारा
या ओळी विशेष भावल्या!
17 Jun 2008 - 5:06 pm | शितल
मस्त कविता
छेडीत रोज तारा
येई जुळून गीत
ह्रद्यातूनी भरोनी
येई फूलून प्रीत
सार्या स्मृती सुखाच्या
दाटून आज आल्या
गेली उडून पिल्ले
डोळ्यात प्रेमधारा
हे तर छानच जमले आहे
17 Jun 2008 - 6:02 pm | िमसळपाव
व्वा पुष्कराज, हल्ली अशा किवता फारशा सापडत नाहीत. तुम्ही अजून किवता ईथे िलहील्या असल्या तर त्याचे दुवे (िलंक्स) द्याल का?
(तात्याबा, या किवतेला आता "या िचमण्यानो परत िफरा रे" सारखी छान चाल लावून त्याची मप३ ईकडे टाका!)
18 Jun 2008 - 11:04 am | पुष्कराज
.
22 Jun 2008 - 10:32 am | पुष्कराज
एक नवीन लावणी मि.पा. वर लिहली आहे
-पुष्कराज
17 Jun 2008 - 7:16 pm | इनोबा म्हणे
फारच सुंदर कविता...
छेडीत रोज तारा
येई जुळून गीत
ह्रद्यातूनी भरोनी
येई फूलून प्रीत
सार्या स्मृती सुखाच्या
दाटून आज आल्या
गेली उडून पिल्ले
डोळ्यात प्रेमधारा
या ओळी अप्रतिमच...
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
17 Jun 2008 - 7:57 pm | चतुरंग
चतुरंग
17 Jun 2008 - 9:31 pm | llपुण्याचे पेशवेll
सुंदर कविता.
हे वेड या मनाचे
तुंम्हास रे कळावे
अन् शब्द सूर ताल
पुन्हा जुळून यावे
छान ओळी आहेत. :)
पुण्याचे पेशवे